National academy of direct taxes Nagpur requirement 2024.
National academy of direct taxes Nagpur requirement 2024.
विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर यांच्या अंतर्गत अर्धवेळ प्रशिक्षक, प्रशिक्षक, शिक्षक या पदाच्या जागा भरण्यात येत आहेत. पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे. जाहिरातीमध्ये दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या वाचूनच अर्जदारांनी अर्ज करावा.
जाहिराती मधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
पदाचे नाव – अर्धवेळ प्रशिक्षक, प्रशिक्षक, शिक्षक.
या जाहिरातीमधील पदाची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे–
पात्र असलेल्या अर्जदाकडे पुरेसे कौशल्य आणि किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे/ experience in imparting training/coaching of the sport/game/activity for which he/she is applying.
National level Federation (of respective sports)/Institute approved
Coaches, representation of District/State/National Team (as player/coach) is preferable.
या पदासाठी नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – नागपूर.
या पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – 55 वर्षे.
या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे.
या पदासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता पुढील प्रमाणे –
उपसंचालक प्रशासन, खोली क्रमांक S – 06, ATC बिल्डिंग, दुसरा मजला, NADT, छिंदवाडा रोड नागपूर. पिन कोड – 440030. |
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 15 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
जाहिरातीमधील पदाचे संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी तिची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा –
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा –
जाहिरातीमधील पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढील प्रमाणे – On hourly basis 400 rupees per hour.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो पदांबद्दल व जाहिराती बद्दल माहिती जाणून घेतल्यानंतर नेहमी एका ब्लॉग नंतर एक विशेष माहिती एका विशेष टॉपिकवर आम्ही टाकत असतो. ती माहिती ब्लॉग वाचल्यानंतर जेव्हा विद्यार्थी वाचतो तेव्हा काही प्रमाणात तरी त्याच्या लक्षात तो टॉपिक राहतो. मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघितले मृदांचे चार प्रकार. आता आपण बघूया बाकीच्या चार मृदांचे प्रकार .
५) पर्वतीय मृदा – विद्यार्थी मित्रांनो या पर्वतीय मृदेला हिल सोईल देखील म्हटले जाते. तसेच या मृदेला व नियम मृदा देखील म्हटले जाते. या पर्वतीय मृदेचे भारतातील क्षेत्रफळ हे 2.85 लाख चौरस किलोमीटर इतके आहे. भारतातील एकूण क्षेत्रफळापैकी पर्वतीय मृदेचे क्षेत्रफळ हे सुमारे 8.67% इतके क्षेत्रफळ आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण बघितले आहे की पर्वतीय मृदा हे ओबडधोबल मृदा असते म्हणजेच जाड भरडी मृदा असते. ही मृदा अविकसित व अपरिपक्व मृदा असते. जाड भरडी पाण्याचा निचरा होणारी व सेंद्रिय द्रव्य य आयुक्त असलेले ही मृदा पोटॅश फॉस्फरस व चुनखडीचे प्रमाण जास्त असलेले मृदा असते. ही मृदा तसे आम्लधर्मीय मृदा आहे. या मृदांमध्ये ह्युमंसचे प्रमाण खूप कमी प्रमाणात दिसून येते. या पर्वतीय मृदेमध्ये बरेच प्रकार असतात.
पर्वतीय मृदा सूचिपर्णी अरण्याच्या प्रदेशात आढळते.
पर्वतीय मृदा आढळणारे प्रदेश पुढीलप्रमाणे – आसाम दार्जिलिंग उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या प्रदेशात पर्वतीय मृदा खूप मोठ्या प्रमाणात आढळते.
पर्वतीय मृदेमध्ये घेण्यात येणारी पिके पुढीलप्रमाणे – तांदूळ मक्का पडदाडे शेंगवर्गीय पिके चारा पिके फळ पिके चहा हे सर्व पिके या मृदेत घेतली जातात.
या पर्वतीय पिकांमध्ये रासायनिक घटक म्हणजे सेंद्रिय द्रव अधिक प्रमाणात असते.
६) वाळवंटी मृदा – वाळवंटी मृदा म्हणजे डेसर्ट सोईल असेही या मृदेला म्हणतात. ही मृदा मुख्यतः राजस्थान व पंजाब मधील प्रदेशात वालुकाश्म प्रकारात आढळते. या वाळवंटी मृदेने भारतात 1.46 लाख चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ व्यापलेले आहे. या मृदेत ओसाड रेती वाळू असते. यांच्या मिश्रणाने तयार झालेली ही मृदा आहे. या मृदेत वनस्पती वाढत नाहीत त्यामुळे ते हे सेंद्रिय घटक नसतात. या मृदेमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण कमी जास्त आढळून येते. तसेच येथे सिंचनासाठीच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तेथे पिके घेतली जात नाहीत.
वाळवंटी मृदा आढळणारे प्रदेश पुढीलप्रमाणे – राजस्थान व पंजाब मधील ओसाड प्रदेश हे वाळवंटी मृदा आढळणारे प्रदेश आहेत.
वाळवंटी मृदा प्रदेशातील पिके पुढीलप्रमाणे – कापूस हरभरा ज्वारी मका बाजरी इत्यादी पिके वाळवंटी मृदा प्रदेशात घेतली जातात.
वाळवंटी मृदा प्रकारात दोन प्रकार पडतात. ते दोन प्रकार पुढील प्रमाणे – रेगोसाल मृदा -या मृदेत खोल व खडबडीत होत असलेले मृदा असते.
लिथोसोल मृदा – या मृदेमध्ये वाळू खडकावर साचलेल्या रेती पासून तयार झालेली मृदा असते.
७) दलदल युक्त मृदा / पिट मृदा – दलदल युक्त मृदा हे दमट व जास्त पाऊस असलेल्या किनारी प्रदेशात दिसून येते. प्रदेशात दलदल युक्त खादर मृदा आढळते. या दलदल युक्त मृदेची निर्मिती ही सतत पाण्याचा संपर्क येत असल्यामुळे तयार होते. हे मृदा समुद्रकिनाऱ्याजवळ सकल प्रदेशात दिसते. या मृदेमध्ये वनस्पतीचे अवशेष कुजल्यामुळे तेथे सेंद्रिय घटक तयार होतात. या कूजण्याच्या प्रोसेस मुळे येथे सेंद्रिय घटक खूप मोठ्या प्रमाणात तयार होत असतात. या मृदेमध्ये फॉस्फेट तथा पोट्याशचे खूप मोठ्या प्रमाणात कमी असते. या मृदेमध्ये आम्लधर्मीय मृदा असून फेरस आयरन मुळे या मृदेला निळा रंग मिळतो. पाणथळ असणाऱ्या जमिनीत तागाचे पीक खूप मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. व त्या पिकातून उत्पन्न सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मिळत असते.
दलदल युक्त मृदा असलेले प्रदेश पुढीलप्रमाणे – भारतात पश्चिम बंगालमधील सुंदरबन आंध्र प्रदेश ओरिसा व तसेच आंध्र प्रदेश राज्याच्या किनारपट्टीचा भाग, उत्तर प्रदेशातील अल्मोडा उत्तर बिहारचा भाग तसेच केरळचा पोटाग्राम व अलपुझा जिल्हा कच्छच्या रणांमध्ये ही मृदा आढळते.
या दलदल युक्त मृदेमध्ये घेण्यात येणारी पिके पुढीलप्रमाणे – या मृदेमध्ये घेण्यात येणारी पिके ताग तांदूळ पिके घेतली जातात.
या दलदल युक्त मृदेमध्ये mangro वनस्पती चांगल्या प्रकारे वाढते.
८) क्षारयुक्त मृदा – विद्यार्थी मित्रांनो या क्षारयुक्त मृदेला सलाईन किंवा अल्काइन मृदा सुद्धा असे म्हणतात. मातीच्या आठ मृदा प्रकरण पैकी ही एक मृदा म्हणजे क्षारयुक्त मृदा.
जमिनीवर खूप मोठ्या प्रमाणात क्षार साचनाच्या प्रोसेसमुळे जमीन ही क्षारयुक्त होते. तसेच एखादी सुपीक जमिनीवर जर हेच क्षार साचत गेले तर हे जमीन क्षारयुक्त होते. सुपीक जमिनीत क्षारयुक्त जमिनी चा प्रकार वाढल्यामुळे तेथे पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत नाही. त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी हे या मृदेवर साचून राहते.
ज्या ठिकाणी कालव्याचे पाणी पसरलेले असते त्या ठिकाणी क्षारयुक्त मृदा खूप मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येते. केशा करणे या क्रियेमुळे भूपृष्ठावर सोडियम कॅल्शियम व मॅग्नेशियम सल्फेट व कार्बोनेट मध्ये त्याचे रूपांतर होते.
क्षारयुक्त जमीन म्हणजेच क्षारयुक्त मृदा असणारे प्रदेश पुढीलप्रमाणे – क्षारयुक्त जमीन असणारे प्रदेश पुढीलप्रमाणे
पंजाब हरियाणा राजस्थान बिहार उत्तर प्रदेश महाराष्ट्र या राज्यात क्षारयुक्त मृदा दिसून येते. क्षारयुक्त मृदेने या राज्यांमध्ये एकूण 1.7 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे.
क्षारयुक्त जमिनीत घेतली जाणारी पिके पुढीलप्रमाणे – क्षारयुक्त जमिनीत घेतली जाणारी पिके बरसीम, धान, ऊस, आवळा, जांभूळ इत्यादी प्रकारचे पिके या क्षारयुक्त मृदेमध्ये घेतली जाते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले जमिनी म्हणजेच माती व त्या मातींचे प्रकार.
घळी पडलेल्या जमिनी – घळी पडलेल्या जमिनीचे क्षेत्र 0.086 कोटी हेक्टर इतके आहे.
झुडपांच्या जाळ्यासह जमिनी या 1.847 कोटी हेक्टर इतके आहे.
पाणी भरलेल्या व दलदलीच्या जमिनी या 0.054 कोटी हेक्टर इतके आहे.
लवंता आणि अल्कली बाधित जमिनी यांचे प्रमाण 0.070 कोटी हेक्टर इतके आहे.
स्थलांतरित शेती क्षेत्र याचे प्रमाण 0.103 कोटी हेक्टर इतके आहे.
कमी उपयोग केलेल्या निकृष्ट वन जमिनी यांचे क्षेत्र 1.021 कोटी हेक्टर इतके आहे.
निकृष्ट गवताळ व सराव जमिनी यांच्या क्षेत्र 0.071 कोटी हेक्टर इतके आहे.
निकृष्ट पण माळ्याच्या जमिनी असलेले प्रकार क्षेत्र हे 0.003 कोटी हेक्टर इतके आहे.
वाळू जमीनीचा प्रकार क्षेत्र हे 0.352 कोटी हेक्टर इतके आहे.
खनिकर्म / औद्योगिक पडीक जमीन प्रकाराचे क्षेत्र हे 0.005 कोटी हेक्टर इतके आहे.
ओसाड आणि खडकाळ क्षेत्र जमिनीचा प्रकार क्षेत्र हे 0.687 कोटी हेक्टर इतके आहे.
तीव्र उताराचे क्षेत्र जमीन प्रकार हे क्षेत्र 0.077 कोटी हेक्टर इतके आहे.
हे हिमनदी क्षेत्र जमिनीचा प्रकार क्षेत्र हे 0.414 कोटी हेक्टर इतके क्षेत्र आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया ऋतू बद्दल व त्यां ऋतूमध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांबद्दल संपूर्ण माहिती.
जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये पावसाळा हा ऋतू असतो.
या पावसाळ्या ऋतूमध्ये घेण्यात येणारी पिके पुढीलप्रमाणे – मध्ये घेण्यात येणारी पिके ज्वारी बाजरी तांदूळ कापूस ऊस कडधान्य सोयाबीन चहा रबर आणि कॉफी हे आहे.
ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये हिवाळा हा ऋतू येतो. या हिवाळा ऋतू मध्ये घेण्यात येणारी पिके पुढील प्रमाणे – गहू हरभरा ज्वारी मोहरी वाटाणा हे पिके हिवाळा ऋतू मध्ये घेतली जातात.
मार्च ते जून या महिन्यांमध्ये उन्हाळा हा ऋतू येतो. या ऋतूमध्ये घेण्यात येणारी पिके पुढील प्रमाणे – या ऋतूमध्ये भुईमूग सूर्यफूल हे पिके घेतली जातात.
भारतातील पिकांचे प्रकार पुढील प्रमाणे.
विद्यार्थी मित्रांनो भारतात एकूण आठ प्रकारचे पिकांचे प्रकार घेतली जातात. त्या पिकांचे प्रकार पुढील प्रमाणे…
तृणधान्य पिकांचा प्रकार – या प्रकारामध्ये ज्वारी बाजरी भात गहू आणि मका हे पीक घेतले जाते.
कडधान्य पिकांचा प्रकार – या प्रकारामध्ये तूर मूग उडीद मटकी हरभरा हे पिके घेतली जातात.
अन्नधान्य पिकांचा प्रकार – या अन्नधान्य पिकांच्या प्रकारांमध्ये तृणधान्य आणि कडधान्य घेतली जातात.
गळीत धान्य पिकांचा प्रकार – गणित धान्य पिकांच्या प्रकारामध्ये भुईमूग करडई सूर्यफूल एरंड तीळ सोयाबीन हे पिके घेतली जातात.
नगदी पिके – या पिकांच्या प्रकारात कपाशी ऊस हळद चहात ताग आणि तंबाखू हे पिके घेतली जातात.
चारा पिके – चारा या पिकांमध्ये मका ओठ बरसिम लसूण घास नेपियर गवत चवळी हे पिके घेतली जातात.
वन पिके – या वन पिकांच्या प्रकारामध्ये बाभूळ नीम साग सरस चिंचा आणि निलगिरी हे पिके घेतली जातात.
मिलेट्स – मिलेटस या पिकांच्या प्रकारामध्ये छोट्या आकाराचे दाणे असणारी पिके घेतली जातात. ते पिके पुढीलप्रमाणे – बाजरी ज्वारी रागी नाचणी भगर राजगिरा.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितलं भारतातील पिकांचे प्रकार.
तुम्हाला आमचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर या ब्लॉगची लिंक तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. तसेच तुमच्या whatsapp टेलिग्राम व इतर ग्रुप मध्ये सुद्धा या ग्रुपची लिंक तुम्ही शेअर करू शकतात. परीक्षेसाठी ची माहिती ही आम्ही प्रत्येक ब्लॉग मध्ये तसेच वेगवेगळ्या योजनांची माहिती आम्ही या ब्लॉगमध्ये आम्ही टाकत असतो. तुम्हाला ब्लॉगचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद..