Warehousing development and regulatory authority Bharti 2024.
Warehousing development and regulatory authority Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो वखार विकास व नियामक प्राधिकरणाद्वारे वरिष्ठ सल्लागार माहिती तंत्रज्ञान आणि कनिष्ठ सल्लागार माहिती तंत्रज्ञान यांच्या जागा भरण्यात येत आहेत. जाहिरात बघून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहेत. अर्जाच्या शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज पाठवणे गरजेचे आहे.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
या पदासंदर्भातील माहिती पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार माहिती तंत्रज्ञान आणि कनिष्ठ सल्लागार माहिती तंत्रज्ञान.
एकूण पदसंख्या – 2
वरिष्ठ सल्लागार माहिती तंत्रज्ञान – 1 जागा कनिष्ठ सल्लागार माहिती तंत्रज्ञान – 1 जागा |
या पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करा – DOWNLOAD PDF
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
पदासाठी अर्ज पाठवण्याची पद्धत – ऑफलाइन पद्धत आहे.
या पदासाठी चा अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे – सहाय्यक संचालक (HR) , वखार विकास आणि नियामक प्राधिकरण, एन सी यू आय बिल्डिंग, सिरी संस्थात्मक क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, हौज खास नवी दिल्ली – पिन कोड 110016.
या पदासाठी अर्ज करण्याचे शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 15 डिसेंबर 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघितले मुस्लिम लीगचे अध्यक्ष बद्दल माहिती व त्यांचा कार्यकाळ.
आता आपण बघूया पहिल्या केंद्र सरकारमधील अंतरिम सरकारमधील मंत्री व त्यांचे खाते.
पंडित नेहरू यांचा खाते पंतप्रधान, परकीय कामकाज व राष्ट्रकुल संबंध होते.
वल्लभभाई पटेल यांच खातं गृह ,सूचना, प्रसारण हे तीन होते.
बलदेव सिंग यांचे खाते संरक्षण होते.
सी राजगोपालाचारी यांचे खाते शिक्षण व कला होते.
असफली यांच खाते रेल्वे व वाहतूक होते.
जगजीवन राम यांचे खाते कामगार होते.
जॉन मथाई यांचे खाते उद्योग होते.
राजेंद्र प्रसाद यांचे खाते अन्य व कृषी होते.
सी एच भाभा यांचे खाते कारखाने, खानी व ऊर्जा होते.
लियाकत अली खान यांचे खाते वित्त होते.
इब्राहिम चंद्री गार वाणिज्य होते.
गाजनाफर अली खान यांचे खाते आरोग्य होते.
अब्दुल रब निस्तार यांचे खाते पोस्ट व नागरी उड्डाण होते.
जोगेंद्रनाथ मंडळ यांचे खाते कायदा होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया फाळणीच्या परिणाम देशापुढे असंख्य समस्या उभ्या राहिल्या त्या समस्या कोणत्या त्या पुढील प्रमाणे.
फाळणीच्या दरम्यान हिंदू मुस्लिम दंगे खूप मोठ्या प्रमाणात झाले. या दंग्यांमुळे बरेच नुकसान झाले.
पाकिस्तानातून आलेला सुमारे 60 लाख लोकांचे पुनर्वसन करण्यात आले.
देशातील मुस्लिमांचे सांप्रदायिक शक्तींपासून संरक्षण करणे.
संस्थानांचे विलीनीकरन हे सध्या समस्या उभी राहिली होती.
पाकिस्तानने छेडलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युद्धाची तयारी.
कम्युनिस्टांची बंडखोरी.
कायदा सुव्यवस्था राखणे हे खूप अवघड झाले होते.
राजकीय स्थैर्य राखने हे सुद्धा अवघड झाले होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया संस्थांचे विलीनीकरण यांच्या बद्दल माहिती.
मयूर भंज याचे ओरिसात विलीन झाले.
कोल्हापूर हे मुंबई प्रांत विलीन झाले.
रामपूर हा उत्तर प्रदेशात विलीन झाले.
गोपाळे मध्यवर्ती राजकारभार विलिन झाले.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशने यांच्या बद्दल माहिती.
अधिवेशन स्थळ परतुर येथे झालेल्या अधिवेशन हे 1937 या वर्षी झाले होते.
त्याचे स्वागताध्यक्ष गोविंदराव घारे होते. व परतुर अधिवेशनाचे अध्यक्ष गोविंदराव नांनल होते.
महाराष्ट्राच्या परिषदेचे अधिवेशन हे लातूर येथे सुद्धा झाले होते. अधिवेशनाचे वर्ष 1938 हे होते. या अधिवेशनात स्वागताध्यक्ष भास्करराव नळदुर्गकर होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष श्रीनिवास शर्मा होते.
महाराष्ट्र परिषदाचे अधिवेशन उमरी या ठिकाणी सुद्धा झाले होते. या अधिवेशनाचे वर्ष 1941 होते. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष देविदास व्हेकर होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष काशिनाथ वैद्य होते.
महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशन औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा झाले होते. या ठिकाणी झालेले अधिवेशन 1943 यावर्षी झाले होते. या ठिकाणी झालेल्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आ कृ वाघमारे होते. या ठिकाणी झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष श्रीधर वामन नाईक होते .
सेलू या ठिकाणी झालेल्या अधिवेशनाचे वर्ष 1945 होते. या महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशन याचे अध्यक्ष दिगंबरराव बिंदू होते. याचे स्वागताध्यक्ष मुकुंदराव पेडगावकर होते.
महाराष्ट्र परिषदेची अधिवेशन लातूर या ठिकाणी सुद्धा झाले होते. लातूर या ठिकाणी झालेल्या अधिवेशनाचे वर्ष 1946 होते. लातूर या ठिकाणी झालेल्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष फुलचंद गांधी होते. तसेच या अधिवेशनाचे अध्यक्ष आ क्रू वाघमारे होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया संयुक्त महाराष्ट्र परिषद जळगाव याबद्दल संपूर्ण माहिती. त्यामध्ये आता आपण बघूया अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यवाह सहकार्य वाह व कोषाध्यक्ष.
संयुक्त महाराष्ट्र परिषद जळगाव चे अध्यक्ष शंकरराव देव होते. या संयुक्त महाराष्ट्र परिषद जळगावचे उपाध्यक्ष ब्रिजलाल बियानी , पूनमचंद रांका. केशवराव जेधे. दवा पोतदार. दिगंबर बिंदू होते.
तसेच मुख्य कार्यवाहक हे ग त्र माडखोलकर होते.
तसेच सहकार्यवाह वसंतराव नाईक, नवरे, डॉक्टर अंत्रोळीकर, व प्रमिला ओक होते.
तसेच कोषाध्यक्ष हे दा.वी गोखले होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्र निर्मितीच्या हालचाली त्यातील डॉक्टर आंबेडकर यांची भूमिका.
भाषावर प्रांतरचना केल्यास हिंदुस्तानचे अधिक तुकडे होतील म्हणजे पडतील असे डॉक्टर बाबासाहेबांचे म्हणणे होते.
भाषिक प्रांतरचनेचा निर्णय झाल्यास संयुक्त महाराष्ट्रात उपप्रांत निर्माण न करता एक भाषा एकच प्रांत करावा असे त्यांचे म्हणणे होते.
संयुक्त महाराष्ट्रात मुंबईचा समावेश करण्यात यावा असे त्यांची भूमिका होती.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सिंधू पाणी वाटप करारा बद्दल माहिती.
सिंधू पाणी वाटप करार कराची येथे नेहरू व आयुब खान यांच्यात झाला. सिंधू वातीच्या सहा उपनद्यांच्या पाणी वाटपासाठी अमेरिकन तज्ञ डेव्हिड लेव्हियंथल यांनी एक योजना सुचवले त्यानुसार झालेल्या सिंधू करारानुसार पाकिस्तानला सिंधू झेलम चीनाब यांचे पाणी देण्यात आले.
व भारताला रावी बियास सतलज यांचे पाणी देण्यात आले.
1964 यावर्षी जागतिक बँकेने या योजनेचा स्वीकार केला होता. व धरणे कालवे यासाठी दोन्ही देशांना कर्ज देण्याची व्यवस्था केली होती.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया स्त्रियांविषयीचे कायदे.
ते कायदे पुढील प्रमाणे.
1856 यावर्षी विधवा विवाह संमती देणारा कायदा अमलात आला.
1872 यावर्षी नोंदणी विवाह कायदा म्हणजे स्पेशल मॅरेज ॲक्ट या कायद्याने प्रथम सिविल मॅरेज उपलब्ध करून दिले.
1829 यावर्षी झालेला कायदा शारदा कायदाप्रमाणे लग्नासाठी मुलाचे वय 18 व मुलीचे वय 14 करण्यात आले होते.
1838 यावर्षी झालेला कायदा स्त्रियांना मालमत्तेचा हक्क देणारा कायदा होता.
1946 या वर्षी झालेला कायदा हिंदू विवाहित स्त्रियांना विभक्त राहून पोटगी मागण्याचा हक्काचा कायदा होता.
1955 या वर्षी झालेला कायदा हिंदू मॅरेज ॲक्ट होता.
1956 यावर्षी झालेला कायदा हे स्री पुरुष भेद नष्ट करून स्री ला सासर माहेरच्या संपत्तीमध्ये वारसा हक्क मिळवून देणारा कायदा मंजूर झाला.
1956 यावर्षी झालेला कायदा त्यात मुलगा मुलगी दत्तक घेण्याचा हक्क तसेच वृद्ध आई-वडिलांना मुलाकडून किंवा मुलीकडून स्वतःसाठी पोरगी घेण्याचा अधिकार तसेच विधवा सुनेला सासरकडून पोटगी घेण्याचा हक्क या कायद्याने मिळाला
1956 या वर्षी झालेला तिसरा कायदा हा कायदा हिंदू सक्सेशन ऍक्ट, हिंदू मायनॉरिटी आणि गार्डियनशिप ॲक्ट , हिंदू ऍडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट.
1956 या वर्षी झालेल्या चौथा कायदा स्त्रियांच्या अनैतिक व्यापारास बंदी.
1961 यावर्षी झालेला कायदा हा हुंडा विरोधी कायदा होता.
1984 या वर्षी झालेला स्त्रियांविषयी चा कायदा हा गर्भजल परीक्षण कायदा होता.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सती प्रथा बंद करण्यासाठी केलेल्या अर्जावरील सह्या.
बंगाल प्रांतात सती प्रथा बंद करण्यासाठी अर्जावर राजा राम मोहन रॉय यांनी सही केली होती.
मद्रास प्रांतातील अय्यर यांनी सती प्रथा बंद करण्यासाठी केलेला अर्जावर सही केली होती.
मुंबई प्रांत येथे जगन्नाथ शंकर शेठ यांनी सती प्रथा बंद करण्यासाठी केलेल्या अर्जावर सही केली होती.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढील तीन व्यक्तींबद्दल माहिती जाणून घेऊया. या तीन व्यक्ती पुढील प्रमाणे – नरहर बाळकृष्ण जोशी, रँगल रघुनाथ परांजपे, गोपाळ कृष्ण गोखले.
नरहर बाळकृष्ण जोशी हे कर्वे यांचे वर्गमित्र व खूप जवळचे मित्र होते.
रंगल रघुनाथ परांजपे हे उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबईला जाण्यास कर्वे यांना मदत केली होती.
गोपाळ कृष्ण गोखले यांनी कर्वे यांना फर्ग्युसन महाविद्यालयात गणित शिकवण्यासाठी बोलावले.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया अनाथ बालिकाश्रम 14 जून 1896 याबद्दलची माहिती.
कुणाच्या सदाशिव पेठेतील रावबहादूर भिडे यांच्या वाड्यात 14 जून 1896 रोजी अनाथ बालीकाश्रमाची स्थापना करण्यात आली होती.
या संस्थेचे सचिव होते महर्षी कर्वे. आणि अध्यक्ष होते डॉक्टर रा गो भांडारकर.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अनाथ बालिकाश्रमात आलेला मुलींची संख्या.
1899 यावर्षी अनाथ बालीकाश्रमात मुलींची संख्या चार होती.
1900 यावर्षी अनाथ बालिकाश्रमात मुलींची संख्या सात होते.
1901 यावर्षी अनाथ बालिकाश्रमात मुलींची संख्या 11 होती.
1902 यावर्षी अनाथ बालीकाश्रमाची मुलींची संख्या 14 होती.
1903 यावर्षी अनाथ बालिकाश्रमाची मुलींची संख्या 21 होती.
1904 यावर्षी अनाथ बालिकाश्रमात आलेल्या मुलींची संख्या 40 होते.
विद्यार्थी मित्रांनो कर्वेंना मिळालेल्या पदव्या पुढीलप्रमाणे.
पुणे विद्यापीठ 1952 डि.लीट.
बनारस विद्यापीठ 1952 डि.लीट.
एस एन डी टी महिला विद्यापीठ – 1954 – डि.लीट.
भारत सरकार 1955 पद्मविभूषण.
मुंबई विद्यापीठ 1957 एल एल डी.
भारत सरकार 1958 भारतरत्न.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सदन बद्दल माहिती.
शारदा सदन हे विधवा स्त्रियांना मदत करत असे.
मुक्ती सदन हे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी होते.
कृपासदन हे निराश्रीत विधवा स्त्रियांसाठी होते.
रमाबाई असोसिएशन हे निराधार स्री यांना मदत करण्यासाठी होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया महर्षी शिंदे यांनी स्थापन केलेल्या संस्था. त्या स्थापन केलेल्या संस्था पुढीलप्रमाणे.
डिप्रेस्ड क्लासेस मिशन.
अखिल भारतीय दलित संघ.
अहिल्याश्रम.
भारतीय युवक कृषक समाज.
ऑल इंडिया मराठा एज्युकेशन कॉन्फरन्स.
राष्ट्रीय मराठा संघ.
या संस्था महर्षी शिंदे यांनी स्थापन केल्या होत्या.
विद्यार्थी मित्रांनो आमचा आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुम्ही तर मित्रांमध्ये शेअर करू शकतात. तसेच या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असल्यास क्षमा मागतो.