ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत भरती 2024. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत रिक्रुटमेंट 2024. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती.

Tadoba tiger reserve Chandrapur Bharti 2024.

Tadoba tiger reserve Chandrapur Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत भरती निघालेली आहे. या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी पदासाठीची मूळ जाहिरात बघून आपले पात्रता बघून लवकरात लवकर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

या पदाची मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो आम्ही चालू घडामोडी हा टॉपिक तुम्हाला शिकवत आहोत. त्यामध्ये तुम्हाला परीक्षेसाठीचे महत्त्वाची माहिती मिळणार आहे. चालू घडामोडी या विषयाची भीती तुमची नाहीसे होण्यास आम्ही मदत करू. चला तर मग सुरु करूया आजचा टॉपिक चालू घडामोडी.

झारखंड या राज्याने मैया सन्मान योजनेचे रक्कम वाढवलेले आहे. ही योजना झारखंड राज्याची योजना आहे त्या योजनेमध्ये महिलांना पूर्वी एक हजार रुपये आर्थिक सहाय्यता सरकारकडून दिले जात होती. ती रक्कम आता वाढवलेले आहे आणि ती रक्कम आता 2500 रुपये इतकी करण्यात आलेली आहे.
विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. या राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत.
यापूर्वी या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. 2016 ते 2021 या दरम्यान त्या महिला आयोगाचे अध्यक्ष होते.
राष्ट्रीय महिला आयोग हे अधिनियम 1990 नुसार आहे.
या आयोगाची स्थापना ही 1992 या रोजी झालेले आहे.
या आयोगाचे कार्य पुढील प्रमाणे –
या आयोगाचे कार्य महिला सुरक्षा व महिला संबंधित गुन्ह्यांसंदर्भात कारवाई करणे व फसवणूक, कामाच्या ठिकाणी छळ अशा महिलांविषयक मुद्द्यावर काम करणे. त्याबरोबरच महिला संबंधित घटनात्मक वैज्ञानिक समस्यांबाबतित सरकारला शिफारशी करणे.
सध्याच्या महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष या रूपाली चाकणकर आहेत.
पुणे या शहरात भारतातील पहिले बायोपोलिमर प्रकल्प सुरू करण्यात आले.
याची निर्मिती ही प्राज इंडस्ट्रीजने केले. प्लास्टिकला पर्याय म्हणून हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे.
या प्रकल्पाचा उद्देश पुढील प्रमाणे – या प्रकल्पाचा उद्देश प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालणं आहे.
या प्रकल्पाचा फायदा पुढीलप्रमाणे – हा बायोपोलिमर प्रोडक्ट अतिशय कमी वेळेत विघटित होतात. यामुळे प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.
भारतातील पहिला सीओटू ( CO2) पासून मिथेनॉल बनवणारा प्रकल्प हा पुणे येथे आहे आणि पुणे हे महाराष्ट्र मधील आहे.
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच दमणगंगा वैतरणा गोदावरी आणि दमनगंगा एकदरे गोदावरी या नदीजोड प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे.
या प्रकल्पाबद्दल माहिती पुढील प्रमाणे –
सिंचन व पिण्याचे पाण्याचा पुरवठा वाढवण्यासाठी 5.68 टीएमसी पाणी या प्रकल्पात वळवले जाणार आहे.
या प्रकल्पामध्ये पश्चिमेस अरबी समुद्रात वाहून जाणारे दमनगंगा नदीचे पाणी हे गोदावरी नदीपात्रात वळवले जाणार आहे.
या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील 13000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
उत्तर प्रदेश या राज्यात हिंदी साहित्य संग्रहालय सुरू करण्यात येणार आहे. मित्रहो उत्तर प्रदेश या राज्यातील काशी या ठिकाणी भारतातले पहिले हिंदी साहित्य संग्रहालय सुरू केले जाणार आहे.
हे संग्रहालय एखाद्या भाषेसाठी समर्पित भारतातील पहिलेच साहित्य संग्रहालय असणार आहे.
या संग्रहालयासाठी लागणारा खर्च पुढील प्रमाणे –
या संग्रहालया साठी एकूण खर्च हा 25 कोटी रुपये लागणार आहे.
मित्रहो नासा अंतराळ संस्थेने नुकतेच युरोपा क्लीपर मिशन लॉन्च केलेले आहे.
चला तर मग आता आपण जाणून घेऊया युरोपा क्लिपर मिशन बद्दल संपूर्ण माहिती.
गुरु ग्रहाच्या चंद्रा संबंधित हे मिशन आहे. या मिशनद्वारे युरोपावरील मानवी जीवनाची शक्यता तपासली जाणार आहे.
यासाठी रॉकेट प्रक्षेपण करणार आहे त्या रॉकेटचे नाव पुढीलप्रमाणे – या रॉकेटचे नाव आहे फाल्कन SPACE X
या मिश्रणाचे मोहीम असणार आहे सहा वर्षांची.
या मिशनमध्ये या रॉकेटला एकूण तीन अब्ज किलोमीटर अंतर पार करावे लागणार आहे.
कॅनडा देशासोबत चे संबंध बिघडल्याने त्या देशातील भारतीय उच्च आयुक्तांना भारतात परत बोलण्यात आलेले आहे. कॅनडामधील दहशतवादी हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्या प्रकरणात कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारताला दोषी ठरवलेला आहे.
त्यामुळे त्यांनी कॅनडातील भारतीय उच्चायुक्त यांच्यावर संशय व्यक्त केला आहे.
यामुळे पुरावे नसताना कॅनडा भारतावर आरोप करत आहे त्यामुळे हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या प्रकरणामुळेच दोन्ही देशांच्या संबंध बिघडलेले आहेत.
विश्वखाद्य दिवस हा 16 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. याचा उद्देश आहे जगाला भूकमारी पासून वाचवणे व कुपोषण निर्मूलन करणे.
हा दिवस विश्वखाद्य दिवस म्हणून का साजरा करण्यात येतो त्याचे कारण पुढीलप्रमाणे – 16 ऑक्टोबर 1945 या दिवशी फुड एग्रीकल्चर ऑर्गनायझेशन ची स्थापना झालेली होती म्हणून 16 ऑक्टोबर हा दिवस साजरा करण्यात येतो.
या विश्वखाद्य दिवसाची थीम पुढीलप्रमाणे – राईट टू फुड फोर बेटर लाइफ अँड बेटर फ्युचर. ही या दिवसाची थीम होती.
न्यूझीलंड या देशाने महिला टी-ट्वेंटी विश्व कप 2024 चा किताब जिंकलेला आहे.
याचे संस्करण हे नववे संस्करण होते.
याचे आयोजन हे UAE यांनी केले होते.
याचा विजेता होता न्यूझीलंड हा देश.
याचा अंतिम सामना हा न्यूझीलंड वर्सेस दक्षिण आफ्रिका हा होता.
मित्रहो न्युझीलँड महिला संघाने पहिल्यांदा T20 विश्वकप जिंकलेला आहे.
महिला आशिया कप 2024 हा श्रीलंका या देशाने जिंकलेला आहे.
पुरुष टी२० विश्व कापा 2024 भारत या देशाने जिंकलेला आहे.
पुरुष वनडे विश्व कप 2023 ऑस्ट्रेलिया देशाने जिंकलेला आहे.
आयसीसी ची नवीन अध्यक्ष हे जय शहा आहेत.
विद्यार्थी मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या न्यायाची देवतेच्या प्रतिमे मध्ये बदल झालेला आहे. त्यात बदल केलेले पॉईंट पुढील प्रमाणे – डोळ्यावरील पट्टी हटवण्यात आलेले आहे. हातात तलवार ऐवजी संविधान देण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र व बिहार या राज्यात दरम्यान केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी शेतकरी समृद्धी किसान स्पेशल रेल्वे सुरू केलेले आहे.
ही रेल्वे महाराष्ट्रातील देवळाली ते बिहार मधील दानापूर दरम्यान ही रेल्वे चालणार आहे.
या रेल्वेच्या उद्देश पुढील प्रमाणे – या रेल्वेचे उद्देश महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीक मालाला वेगाने इतर राज्यांमध्ये पोहोचवण्यासाठी आहे.
या रेल्वेतील वाहतूक खर्च हा चार रुपये प्रति किलो आहे.
याच्या एकूण अंतर 1515 किलोमीटर इतके आहे.
याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे शेतमाल वेगाने व वेळेवर विकता येणार आहे.
मित्रहो नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजेच इंटरनॅशनल सोलार अलायन्स 2024 चे आयोजन हे भारतात करण्यात आलेले होते.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी – इंटरनॅशनल सोलर अलायन्स.
याचे आयोजन हे नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.
यामध्ये एकूण जगभरातील एकूण 120 सदस्य सहभागी झाले होते.
याचा कालावधी होता तीन ते सहा नोव्हेंबर दरम्यान.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी द्वारे ISA च्या सदस्य देशांना सौरऊर्जेचा अवलंब करण्यास सक्षम करणे आणि सौर ऊर्जेच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी निधी गोळा करण्यावर भर दिला जाणार आहे.
ISA याची स्थापना ही 2015 या वर्षी झालेले आहे.
स्थापनेमध्ये भारत व फ्रान्स या देशांनी पुढाकार घेतलेला होता.
याचे मुख्यालय हे गुरुग्राम येथे आहे.
कलम 6a विषय सुप्रीम कोर्टाकडून महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आलेला आहे. हे कलम नागरिकत्वाशी संबंधित आहे.
हे कलम आसाम मधील स्थलांतरितांना नागरिकत्व देण्यासंदर्भातील आहे. या कलमांमध्ये उल्लेख आहे की 24 मार्च 1971 च्या आधी जे लोक आसाम मध्ये आले त्यांना भारताचे नागरिकत्व मिळेल.
या कलमाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे कलम योग्य असल्याचे निर्णय दिलेला आहे.
१९७१ मध्ये बांगलादेशच्याच निर्मितीनंतर मोठ्या संख्येने स्थलांतरित लोक भारतामध्ये येऊ लागलंय त्याला स्थानिक लोकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर अराजकता पसरले. हे वर्ष होते 1979 ते 1985.
त्यामुळे आसाम ACCORD केला गेला. याद्वारे भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये कलम सहाय्य समाविष्ट करण्यात आलेले होते.
18 ऑक्टोबर हा दिन जागतिक रजोनिवृत्ती दिन म्हणून साजरा करण्यात आला. याचे थीम होते MENOPAUSE HORMONE THERAPY.
रजोनिवृत्ती म्हणजे महिलांमध्ये वयाच्या 42 ते 45 या वयामध्ये मासिक पाळी येणे बंद होते यालाच रजोनिवृत्ती म्हणतात.
मासिक पाळीची सुरुवात ही 12 ते 14 या वयात होते.
विद्यार्थी मित्रांनो केंद्र सरकारने समर्थ योजनेचा कालावधी दोन वर्षांसाठी वाढवला आहे ही योजना वस्त्रोद्योगा संबंधातील आहे.
समर्थ योजनेबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया – केंद्रीय वस्त्र मंत्राद्वारे या योजनेचे कालावधी दोन वर्ष वाढवण्यात आलेला आहे. हा कालावधी 2026 पर्यंत करण्यात आलेला आहे.
या योजनेसाठी मंजूर केलेला निधी पुढीलप्रमाणे – 495 कोटी रुपये.
या योजनेद्वारे तीन लाख लोकांना वस्त्र उद्योग क्षेत्राशी संबंधित कौशल्य विकसित करता येईल.
या योजनेचा उद्देश पुढील प्रमाणे – वस्त्र उद्योग व संबंधित क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती करणे या योजनेचा उद्देश आहे.
17 ऑक्टोबर हा दिवस गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात येतो.
याची थीम आहे ELIMINATING SOCIAL AND INSTITUTIONAL ABUSES .
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दारिद्र्य निर्मूलन संबंधित महत्त्वाच्या समित्या –
सुरेश तेंडुलकर समिती
रंगराजन समिती.
विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेलच. कारण या टॉपिक मध्ये आणि तुम्हाला महत्त्वाच्या चालू घडामोडी समजावून दिले आहेत. यामुळे तुम्हाला परीक्षेत खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा.