शिव समर्थ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सातारा अंतर्गत भरती 2024. शिव समर्थ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी भरती 2024.

Shiv Samarth multi-State cooperative society Bharti 2024.

Shiv Samarth multi-State cooperative society Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो शिव समर्थ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अंतर्गत भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये वाहन चालक, क्लार्क, अधिकारी, सल्लागार व्यवस्थापक पदांच्या भरती आहे. या पदां संदर्भातील संपूर्ण माहिती आपण पुढे बघूया.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे

पदाचे नाव वाहन चालक, क्लार्क, अधिकारी, सल्लागार व्यवस्थापक.

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण – सातारा, महाराष्ट्र.

या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आणि ऑनलाइन या दोघी पद्धती आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्याचा ईमेल पत्ता पुढीलप्रमाणे – shivsamarth.ho@gmail.com

अर्ज पाठवण्याचा पत्ता – शिव समर्थ भवन, कराड – ढेबेवाडी रोड, तळमावले तालुका पाटण जिल्हा सातारा, पिनकोड – 415103.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2024 आहे.

विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत. काही दिवस झाले आम्ही तुम्हाला चालू घडामोडी हा विषय शिकवत होतो. कारण चालू घडामोडी या विषयातून बरेच प्रश्न परीक्षेला येत असतात. त्यामुळे तुमच्या गुणांचा टक्का वाढावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच्या अगोदर आम्ही इतिहास भूगोल असे बरेच विषय तुम्हाला शिकवले आहेत म्हणजेच त्याच्या नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. प्रत्येक विषयात तुमचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणजे तुम्हाला सर्व विषयांचे महत्त्वाचे टॉपिक ज्ञात व्हावे म्हणून आमची हे खटपट चाललेले आहे. महत्त्वाच्या नोट्स वाचून तुम्ही यशाचा पल्ला गाठू शकतात.
चला तर मग सुरु करूया आजचा नवीन टॉपिक.
नागपूर अधिवेशनाचे महत्त्व पुढील प्रमाणे – 15 सदस्य काँग्रेस कमिटीची स्थापना या अधिवेशनामध्ये झालेली.
तसेच काँग्रेसच्या प्रातीक समिती यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली.
तसेच त्यामध्ये गाव मोहल्ला समिती स्थापन करण्यात आले.
व गरिबांना काँग्रेसच्या सभासद होता यावे यासाठी 25 पैसे वर्गणी तेथे देण्यात आले.
महाराष्ट्र मध्ये असहकारचा कार्यक्रम अमलात आणण्यासाठी टिळकांचे अनुयायी पुढील प्रमाणे –
शिवराम पंथ परांजपे, काकासाहेब , गंगाधरराव देशपांडे, अरे भाऊ फाटक, वासू काका जोशी, चिंतामण वैद्य.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मद्यपान निषेध कार्यक्रम कुठे झाला होता त्याच्याबद्दल माहिती.
पुणे धारवाड ठाणे मुंबई.
महाराष्ट्रामध्ये वेंगुर्ला मालवण रत्नागिरी सातारा अहमदनगर येवला अमळनेर चिंचवड यवतमाळ अकोला खामगाव या ठिकाणी राष्ट्रीय शाळा काढण्यात आल्या होत्या.
मध्य प्रांत व वऱ्हाड मधील आंदोलनामध्ये डॉक्टर चोळकर बाबासाहेब परांजपे वामनराव जोशी यांचा सहभाग होता.
शंकरराव देव हे मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जातात.
या सत्याग्रहाला मुळा नदीच्या पात्रात सुरुवात झाली. ही सुरुवात 16 एप्रिल 1921 रोजी झाली.
हा सत्याग्रह चार वर्षे चालला. म्हणजे 1921 ते 1924 या दरम्यान.
विद्यार्थी मित्रांनो परदेशी मालावर बहिष्कार हा दोन जुलै 1921 रोजी टाकण्यात आला.
काँग्रेसचे आर्थिक अधिवेशन डिसेंबर 1922 या वर्षी गया येथे झाले होते.
याच्या अध्यक्ष होते चित्तरंजन दास. मोतीलाल नेहरू या डिसेंबर 1922 च्या काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनाचे सेक्रेटरी होते.
काँग्रेसचे खिलाफत स्वराज्य पार्टीची स्थापना 1 जानेवारी 1923 रोजी झाली. या पार्टीची स्थापना दास व नेहरू यांनी केली. स्वराज्य पार्टीचे अध्यक्ष होते दास.
आणि स्वराज्य पार्टीचे सचिव होते मोतीलाल नेहरू.
1923 यावर्षी दिल्ली येथे अधिवेशनात स्वराज्य पक्षाचे नेत्यांना काँग्रेसमध्ये राहून स्वराज्य पक्षाच्या तिकिटावर निवडणुका लढवण्याची परवानगी दिली होती.
या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अबुल कलाम आझाद.
1919 चा कायदा मुळे म्हणजेच कायद्यानुसार 1923 मध्ये कायदेमंडळाच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया स्वराज्य पक्षाबद्दल माहिती.
स्वराज्य पक्षाचे लोक कायदेमंडळातून मार्च 1926 ला बाहेर पडले.
1926 च्या निवडणुकीत स्वराज्य पक्षाला 40 जागा मिळाल्या होत्या.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया स्वराज्य पक्ष अपयशी काय ठरला त्याची कारणे.
हा पक्ष अपयशी ठरला कारण स्वराज्य पक्षात पडलेले फूट तसेच मतभेद यामुळे आलेला शिस्तीचा अभाव. व जनतेचा कमी होत चाललेला पाठिंबा. तसेच त्यांच्यामध्ये फोडा व सोडा नीती.
ही स्वराज्य पक्षापैकी ठरण्याचे कारण आहे.
सायमन कमिशनची स्थापना ही आठ नोव्हेंबर 1927 रोजी झाले.
याची स्थापना होण्याचा कारण पुढीलप्रमाणे – या कमिशनची स्थापना ही 1919 च्या मॉडफोर्ड कायद्याचे परीक्षण करण्यासाठी झाली होती.
या कायद्याची तरतूद पुढीलप्रमाणे – दहा वर्षानंतर सुधारणांचे कार्याचे परीक्षण करण्यासाठी आयोग स्थापन केला जाईल या कायद्याची तरतूद होती.
1927 या वर्षी मद्रास येथील काँग्रेसच्या अधिवेशनात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास झाला. त्यामध्ये अध्यक्ष होते अन्सारी.
सायमन कमिशनवर मुस्लिम लीग लिबर्टी पार्टी हिंदू महासभा यांनी बहिष्कार टाकला होता.
3 फेब्रुवारी 1928 या रोजी सायमन कमिशन मुंबई मध्ये आले होते.
लाला लजपत राय यांचे निधन 17 नोव्हेंबर 1928 रोजी झाले.
सायमन कमिशन ने 1928 ते 1929 या काळात चौदाशे मैलाचा प्रवास केला होता.
मे 1930 या काळात सायमन कमिशन ने आपला अहवाल सादर केला होता.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया नेहरू अहवाल मध्ये कशाचा समावेश होता त्याबद्दल माहिती.
त्यामध्ये 19 मूलभूत हक्क सार्वजनिक प्रौढ मतदान महिलांसाठी समान हक्क अल्पसंख्यांक यांचे संरक्षण या गोष्टींचा समावेश होता.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया नेहरू समितीचे सदस्य.
त्या समितीतील सदस्य पुढील प्रमाणे.
या समितीमध्ये मोतीलाल नेहरू हे अध्यक्ष होते.
जवाहरलाल नेहरू हे सिक्रेटरी होते.
सुभाष चंद्र बोस – काँग्रेस.
तेज बहादुर सप्रू लिबरल फेडरेशन.
सर अली इमान
दोन नोव्हेंबर 1929 रोजी प्रमुख राष्ट्रीय नेत्यांचे संमेलन दिल्ली येथे झाले.
दिल्ली घोषणा पत्रातील मागण्या पुढील प्रमाणे.
राजनीतिक गुन्हेगारांना क्षमा देण्यात यावे.
दिल्ली घोषणापत्रातील मागण्या हे आर्विन यांनी नाकारल्या.
लाहोर 1929 मध्ये अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचे मागणी करण्यात आली होती.
स्वातंत्र्य दिन हा 26 जानेवारी 1930 म्हणून साजरा करण्यात आला होता.
31 डिसेंबर 1929 दिनी पंडित नेहरू यांनी मध्यरात्री रावी नदीच्या किनारी स्वातंत्र्याचा तिरंगा झेंडा फडकवला होता.
गांधीजींनी यंग इंडिया मध्ये लिहिलेले लेखात पुढील प्रकाराच्या मागण्या होत्या – या मागण्यांमध्ये सिविल सेवा व सैन्यांवरील खर्चामध्ये 50% कपात.
मादक पदार्थांची विक्री पूर्णपणे बंद करण्यात यावी ही सुद्धा मागणी त्या लेखात होती.
सर्व सार्वजनिक कायद्यांना सोडून देण्यात यावे ही मागणी सुद्धा त्या लेखात होती.
विदेशी कापडावरील आयातीवर निर्बंध.
मिठावरील कर रद्द करावा ही सुद्धा मागणी या लेखात होते.
मिठाच्या सत्याग्रहासाठी गांधीजींनी साबरमती होऊन दांडी येथे 12 मार्च 1930 ला निघाले होते.
मिठाच्या सत्याग्रहातील महिला या सरोजिनी नायडू आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया फेरवादी गटातील नेते यांच्या बद्दल माहिती.
चित्तरंजन दास मोतीलाल नेहरू हकीम अजमल खान हुसेन सुरावरदी.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया नाफेरवादी गटातील नेते कोण होते त्यांच्याबद्दल माहिती.
वल्लभभाई पटेल डॉक्टर एम ए अन्सारी राजेंद्र प्रसाद सी गोपालचारी.
राजू ताई कदम 5 सप्टेंबर 1930 रोजी सातारा जिल्ह्यातील वेळशी गाव येथे पोलिसांनी झेंडा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी यांनी झेंडा सोडला नाही.
सातारा मधील एकूण 39 लोकांना पोलिसांनी पकडले होते.
1930 च्या लढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सहभाग होता.
बापूसाहेब सहस्रबुद्धे यांनी दहीहंडी सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते.
भंडारा अमरावती सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया – भोजराज, हरिहरराव देशपांडे, पातुरकर, कृष्णराव मोरे.
नागपूर मध्ये नरकेसी
अकोला येथे दुर्गाताई जोशी व दादासाहेब गोले व ब्रिजलाल बियानी यांनी केले होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पुसदच्या सत्याग्रहाचे लोन कुठपर्यंत गेले होते त्याची माहिती.
तळेगाव या गावापर्यंत याचे लोन गेले होते.
तसेच वडाळी या गावात सुद्धा व खामगाव बुलढाणा चांदा भंडारा या ठिकाणी सुद्धा याचे लोन पसरले होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया चले जाव चळवळ सुरू करण्याचे कारणे.
क्रिप्स मिशन अयशस्वी ठरले त्यामुळे चलेजाव चळवळ करण्याचे ठरले.
लोकांमधील वाढता वाढता असंतोष हे सुद्धा कारण आहे.
ब्रिटिशांचा यांचा पराभव होईल असे लोकांना वाटत होते त्यामुळे चलेजाव चळवळ सुरू करण्यात आली होती.
ज्या पद्धतीने ब्रिटिशांनी मलाया व ब्रह्मदेशातून माघार घेतली त्यावरून लोक अधिकच नाराज झाले होते त्यामुळे चले जाव चळवळ सुरू करण्यात आले होते.
जपानी आक्रमणाची धास्ती जनतेने घेतली होती त्यामुळे चलेजाव चळवळ सुरू करण्यात आले होते.
कामगार संघटना कायदेशीर मान्यता ट्रेड युनियन ॲक्ट 1926 नुसार.
संयुक्त खानदेश मजूर फेडरेशनची स्थापना 1937 यावर्षी करण्यात आली होती.
श्रीपाद अमृत डांगे यांनी मुंबई येथे झालेल्या ब्रिटिश गिरणीच्या संपाचे नेतृत्व 1939 यावर्षी केले होते.
विद्यार्थी मित्रांनो दिल्ली व अमृतसरच्या नेत्यांच्या निमंत्रणावरून गांधीजींना अटक करण्यात आले होते ते ठिकाण कोणत्या होत्यात आपण जाणून घेऊया.
गांधीजी हे दिल्लीकडे जात असताना त्यांना मथुरे जवळ अटक करण्यात आले होते.
महात्मा गांधीजींना असहकार चळवळी दरम्यान अटक करण्यात आले होते. त्यांना मुंबई येथील तुरुंगात डांबण्यात आले होते.
30 मे 1919 रोजी रवींद्रनाथ टागोर यांनी आपला किताब परत केला होता.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया तिसऱ्या गोलमेज परिषदेत कोणाला बोलवण्यात आले नाही त्यांच्याबद्दल माहिती.
हिंदू महासभा, जिन्हा, इकबाल.
आता आपण जाणून घेऊया तिसऱ्या गोलमेज परिषदेत प्रमुख प्रतिनिधी म्हणून कोण कोण उपस्थित होते त्यांच्याबद्दल माहिती.
आगाखान, आंबेडकर, तेजबहादुर प्रभू, बेगम जहा आरा, केळकर, शहानवाज. हे तिसऱ्या गोलमेज परिषदेत प्रमुख प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर याच ब्लॉग सारख्या आम्ही ईतर ब्लॉग सुद्धा पुढे भविष्यात टाकणार आहोत. त्यासाठी तुम्ही या ब्लॉगची लिंक तुमच्या मित्र मंडळींमध्ये शेअर करा. व या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाल्या असल्यास माफ करा. चला तर मग भेटूया आता नवीन टॉपिक वर नवीन ब्लॉगमध्ये.