Social welfare Recruitment 2024.
SAMAJ KALYAN VIBHAG BHARATI 2024. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन
विद्यार्थी मित्रांनो समाज कल्याण विभागात 2019 जागांसाठी भरती निघालेली आहे.
सामाजिक न्याय, कल्याण आणि समाजातील वंचित आणि वंचित गटांच्या सक्षमीकरण करण्याची जबाबदारी या संस्थेकडे आहे.
विद्यार्थी मित्रांनो या कॅबिनेट स्तरावरील एक मंत्री मंत्रालयाचे नेतृत्व करतो.
या समाज कल्याण विभाग भरती उच्च श्रेणी स्टेनो, वार्डन महिला, वार्डन सामान्य, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, निम्नस्त्रेणी स्टेनो, समाज कल्याण निरीक्षक आणि स्टेनो टंकलेखक या अशा पदांच्या 219 जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.
जाहिरात क्रमांक – सकआ / आस्था /प्र – 2 / पद भरती / जाहिरात / 2024 /3743.
पदांच्या संपूर्ण जागा 219.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | उच्च श्रेणी लघुलेखक | 10 |
2 | गृहपाल / अधीक्षक महिला | 92 |
3 | गृहपाल / अधीक्षक सर्वसाधारण | 61 |
4 | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
5 | निम्न श्रेणी लघुलेखक | 03 |
6 | समाज कल्याण निरीक्षक | 39 |
7 | लघु टंकलेखक | 09 |
संपूर्ण जागा 219 | 219 |
पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे.
पद क्रमांक एक साठी लागणारी पात्रता शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे. | 1) दहावी उत्तीर्ण २) इंग्रजी लघु लेखन 120 शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी लघुलेखन 120 शब्द प्रतिमिनिट. ३) इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट. ४) एम एस सी आय टी (MS-CIT) किंवा समतुल्य. |
पद क्रमांक दोन साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे. | १) कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक. २) (MS-CIT) एम एस सी आय टी किंवा समतुल्य. |
पद क्रमांक 3 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे. | १) कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक. २) (MS-CIT) एम एस सी आय टी किंवा समतुल्य. |
पद क्रमांक 4 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे. | १) कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक. २) (MS-CIT) एम एस सी आय टी किंवा समतुल्य. |
पद क्रमांक 5 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे. | 1) दहावी उत्तीर्ण २) इंग्रजी लघु लेखन 100 शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी लघुलेखन 100 शब्द प्रतिमिनिट. ३) इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट. ४) एम एस सी आय टी (MS-CIT) किंवा समतुल्य. |
पद क्रमांक 6 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे. | १) कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक. २) (MS-CIT) एम एस सी आय टी किंवा समतुल्य. |
पद क्रमांक 7 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे. | १) दहावी उत्तीर्ण २) लघुलेखन 80 शब्द प्रतिमिनिट 3) इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट. |
पदासाठी लागणारी वयाची अट पुढील प्रमाणे – 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्ष. (मागासवर्गीय पाच वर्षे सूट)
पदासाठी नोकरीचे ठिकाण – पुणे महाराष्ट्र.
पदासाठी लागणारी परीक्षा फी पुढील प्रमाणे – खुला प्रवर्ग १००० रुपये ( मागास प्रवर्ग – 900 रुपये )
पदासाठीच्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे –
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे | 11 नोव्हेंबर 2024. | |
पदासाठीची परीक्षा तारीख | पदासाठी परीक्षा तारीख नंतर कळविण्यात येईल. |
- पदाची जाहिरात PDF स्वरूपात – DOWNLOAD PDF
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक – CLICK HERE
- अधिकृत वेबसाईट लिंक – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप व टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.
WHATS APP GROUP | CLICK HERE |
TELEGRAM GROUP | CLICK HERE |
विद्यार्थी मित्रांनो तुमच्या यशाला गवसनी घालण्यासाठी आमची टीम सुद्धा प्रयत्न करत आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये मदत होण्यासाठी आम्ही स्वतः तयार केलेल्या काही नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. ह्या नोट्समुळे तुम्ही रिविजन करून आम्ही दिलेले टॉपिक लक्षात ठेवून आणि त्याचा उपयोग करून तुम्ही परीक्षेदरम्यान करू शकतात.
चला तर मग आता सुरू करूया सातवाहन कालखंड.
सातवाहन कालखंड
विद्यार्थी मित्रांनो सातवाहन कालखंड हा इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 हा होता.
आता आपण बघूया सातवाहन घराण्याचा उदय कसा झाला. शुंग आणि कनवांचे वर्चस्व हे मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारतात निर्माण झाले.
सातवाहनांनी सुस्थिर शासन निर्माण करण्यासाठीच्या बाबी पुढील प्रमाणे – धार्मिक सहीष्णूता, व्यापारास चालना , राजकीय स्थर्य, उत्कृष्ट प्रशासन.
या गोष्टींमुळे सातवाहन कालखंडाचे कला, स्थापत्य व साहित्य मध्ये भरभराट झाली.
सातवाहनांच्या राजांनी 460 वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. त्यांचे एकूण 30 राजे होते. इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 असे त्यांनी राज्य केले.
सातवाहन घराणे हे महाराष्ट्राला जागतिक नकाशावर सर्वात प्रथम दर्शवणारे आणि महत्त्व प्राप्त करून देणारे राज घराणे होते.
काही इतिहासाकारांच्या मते सातवाहन घराणे हे मूळचे आंध्र प्रदेशचे होते तर डॉक्टर मिराशींच्या मताप्रमाणे त्यांचे मूळ घराणे विदर्भ येथे होते. विद्यार्थी मित्रांनो ऐतिहासिक साधनांवरून सातवाहनांचे मूळ स्थान हे महाराष्ट्रातील पैठण होते व ती त्यांची राजधानी होती.
पुरातत्व उत्खननाद्वारे सातवाहनांचा कालखंड जाणून घेण्यासाठी कोणकोणत्या शहरांचा उपयोग झाला तो आपण बघूया – कोल्हापूर, भोकरदन, कराड, पैठण, नाशिक.
तसेच कार्ले, भाजे, बेडसे, पितळखोरे, अजंठा, कान्हेरे येथील लेणी चैत्य, स्तूप, विहार व शिलालेख.
विद्यार्थी मित्रांनो सापडलेल्या नाण्यां द्वारे सुद्धा इतिहासकारांना इतिहास जाणून घेण्यास मदत होते.
साहित्य
1) गुनाढ्याची ” बृहत्कथा “
२) राजा हाल ” गाथा सप्तशदी “
आपण आता बघूया सातवाहन राजवंशातील प्रमुख राजे.
१) सातवाहन राजवंशाचा संस्थापक सिमुक हा राजा होता. याने शेवटचा कन्व राजा सूशर्मा ला ठार केलं.
हा स्वतःला दक्षिणपथपती बिरूध धारण केले. विधिशा आणि विदर्भ जिंकून.
२) सिंमुकचा मुलगा सातकरणी याला राजा कृष्णाच्या नंतर राज्य मिळाले. सातकरणी प्रथम व त्याची राणी नागनीका यांची प्रतिमा नाणेघाट येथे कोरल्याचे पुरावे मिळाले. सातकरनी हा वैदिक धर्माचा कट्टर पुरस्करता होता. सातकरणी याने दोन अश्वमेध यज्ञ व राजसुय यज्ञ केले. याने कलिंग नरेश खारवेल चा पराभव केला होता. याच्या शहरामुळे राजवंशातील राजे त्यांच्या नावासमोर सातवाहन असा शब्दप्रयोग न करता सातकर्णी असा करू लागले.
शकांच्या आक्रमणानंतर सातवाहनांचे राज्य दुर्बल बनले होते.
३) राजा हाल याने प्राकृत भाषेला राजश्रय देऊन गाथा सप्तशती या प्राकृत काव्यसंग्रह असल्याची माहिती समोर येते.
४) गौतमीपुत्र सातकर्णी याने सत्येचे पुनर्जीवन केले. हा आपल्या मुलाचे वर्णन “त्रिसमुद्रतोय पितवाहन” म्हणून केले. याचा अर्थ ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी प्यायला आहे असे उद्गार गौतमी बलश्री हिने केले. या राजाने शक, पल्लव, यवन, त्यांचा पराभव केला होता. तसेच क्षत्रप राजा नहपाणाचा पराभव करून सातवाहनांचे प्रतिष्ठा वाढवले.
हा राजा आईचा खूप आदर करत असे त्यामुळे त्याने आपल्या नावाच्या पूर्वी आईचा आवर्जून उल्लेख केलेला सर्वीकडे दिसतो.
५) यज्ञश्री सातकर्णी हा सातवाहन घराण्यातील शेवटचा राजा. शेकांनी जिंकलेला प्रदेश परत जिंकला व साम्राज्य वाढवले, त्याच्या नाण्यांवर जहाजाचे चित्र दिसून आले यावरून आरमार व व्यापाराविषयी त्याची माहिती मिळाली.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सातवाहन कालीन आर्थिक स्थिती कशी होती.
सर्वांचा काळ हा शेती क्षेत्रात आर्थिक समृद्धीचा होता. त्यांचा व्यवसाय शेती हा प्रमुख व्यवसाय होता. त्याकाळी उत्पादनाचा १/१० भाग भूमिका म्हणून शेतकरी राजाला देई. त्यांनी तलाव, कालवे, विहिरी खोदलेल्या होत्या.
बृहत संहिता यात खरीप व रब्बी पिकांचा उल्लेख त्यांनी आवर्जून केलेला आहे. त्या काळात शेती बरोबरच जोडधंदा म्हणून दूध व मांस यासाठी पशुपालनाचा व्यवसाय केला जाईल. गाय बैल घोडा मेंढी बकरी खेचर कुत्रा हत्ती उंट हे प्राणी त्याकाळी पाळले जाई.
हा कालखंड एकदम समृद्ध कालखंड होता हे दिसून आले.
या सातवाहन कालखंडात वस्त्र उद्योग हा अति महत्त्वाचा उद्योग म्हणून दिसून आला. मलमली रेशमी, साधे, तलम, या वस्त्रांचे उत्पादन त्याकाळी घेतले जाई.
या सातवाहन काळात तांबे , लोखंड, पितळ , सोने , चांदी या धातूंचा दागिने म्हणून उपयोग केला जाई.
मूर्ती, कृषी अवजारे, घरगुती वस्तू बनवण्यासाठी सुद्धा या धातूंचा वापर केला जाई.
यांचा परकीय व्यापार खूप मोठ्या प्रमाणात चालत होता. त्यामुळे त्यांची भडोच, सोपारा बंदरे तर तेर, पैठण हे शहरे खूप प्रसिद्धीस त्या काळात आलेली होती.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया सातवाहन काळातील धार्मिक स्थिती. आपण पाहिल्याप्रमाणे सातवाहन राजे हे वैदिक धर्माचे खूप मोठे अनुयायी व पुरस्कर्ते होते हे दिसून आले. हे दानधर्म खूप करत त्यांच्या अश्वमेध आणि राजसूय यज्ञ यात दानधर्म केला जाईल. या काळात सूर्य पूजा, यक्ष पूजा, मातृदेवता, नागदेवता याचे पूजन खूप मोठ्या प्रमाणात केले जाईल व याच काळात यांना महत्त्व प्राप्त झाले.
या सातवाहन काळात वैष्णव व शैव धर्मासोबत बौद्ध धर्माचा विकास खूप मोठा प्रमाणात झाल्याचे दिसून येते. यांनी विहार आणि स्थुप बांधून बौद्ध भिक्षूकांसाठी उदरनिर्वाहाची व्यवस्था निर्माण केली होती.