RRB ministerial and isolated categories recruitment 2025. Mega bharti post 1036.
RRB ministerial and isolated categories recruitment 2025. Mega bharti post 1036.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो आर आर बी अंतर्गत भरती निघालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी मूळ पीडीएफ वाचून पदा नुसार पात्रता बघून आपल्या अर्ज आहे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.
या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती व तपशील पुढील प्रमाणे.
या पदांसाठी एकूण 1036 जागा भरण्यात येणार आहेत.
पदांचे नाव – पदव्युत्तर शिक्षक, वैज्ञानिक पर्यवेक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, मुख्य कायदा सहाय्यक, सरकारी वकील, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, वैज्ञानिक सहाय्यक प्रशिक्षण, प्रशिक्षण कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ प्रचार निरीक्षक, कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक, ग्रंथपाल, संगीत शिक्षक महिला, प्राथमिक रेल्वे शिक्षक, सहाय्यक शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा, प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III.
या पदासाठी असणारी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – 18 ते 48 वर्ष.
या पदासाठी अर्ज शुल्क पुढीलप्रमाणे –
SC/ST/EX.SM/ PWED/FEMALE – 250 रूपये.
फॉर ऑल CANDIDATES – पाचशे रुपये.
या पदासाठीची निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी.
या पदासाठी अर्ज सुरू होण्याची तारीख – 7 जानेवारी 2025.
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2025.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो काही दिवसांपासून आम्ही तुमच्यासाठी चालू घडामोडी हा टॉपिक सुरू केलेला आहे. परीक्षेमधील तुमचे भीती संपवण्यासाठी या टॉपिकचा आम्ही सुरुवात केला आहे. या टॉपिक बद्दल तुम्हाला आम्ही नोट्स प्रोव्हाइड करा. चला तर मग सुरु करूया आजचा चालू घडामोडीचा टॉपिक.
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा भारताचे ग्रुप कॅप्टन सुभाष शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठविणार आहेत. त्या मिशनचे नाव आहे axiom 4.
लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांचे सैन्याच्या वैद्यकीय सेवा महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेले आहेत.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माण्याची वाडी राज्यातील पहिले सौरग्राम ठरलेले आहे.
2025 मधील आगामी 98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार आहे. 1954 नंतर 70 वर्षांनी दिल्लीत साहित्य संमेलन करणार आहे. तारका तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली 1954 मध्ये दिल्लीत साहित्य संमेलन झाले होते.
बुद्धदेव भट्टाचार्य पश्चिम बंगालचे सातवे मुख्यमंत्री यांचे निधन झालेले आहे. मार्क्सवादी कम्युनिअर पक्षाचे ते नेते होते.
ओडिशाची राजधानी भुवनेश्वर मध्ये देशातील पहिले धान्य एटीएम लॉंच करण्यात आलेले आहे.
भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्षपदी सीएस शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
दीप काठीकरांच्या चित्रीकरणाचा इटालिया ग्रीन फिल्म फेस्टिवल मध्ये गौरव करण्यात आलेला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाहत्या नाल्यातून प्लास्टिकची बाटली तोंडात पकडून बाहेर काढताना नयनताराचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल झाला होता. प्रसिद्ध छायाचित्रकार दीप काठीकर यांनी हा 23 सेकंदांचा व्हिडिओ चित्रित केला होता.
पेटीएम ने व्यापारा कडील पेमेंट साठी देशातील पहिला कार्ड रीडर साऊंड बॉक्स आणला आहे. या आधारे डेबिट क्रेडिट कार्ड मार्फत पेमेंट करता येईल.
UIDAI चे नवे सीईओ आहेत अमित अग्रवाल.
भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या 75 व्या वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांतर्गत लैंगिक समानतेवर आधारित लापता लेडीज हा चित्रपट सर्वोच्च न्यायालयात दाखविण्यात आला. चित्रपट निर्माते दिग्दर्शक आमिर खान, किरण राव आहेत.
1912 मध्ये कोल्हापूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केशवराव भोसले नाट्यगृह बांधले होते. ऑगस्ट 2024 मध्ये या नाट्यगृहास आग लागली होती. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा फार मोठा ठेवा आहे.
पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे देशातील सर्वात मोठे बंदर उभारण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गे वाढवण बंदरावर पोचता यावे यासाठी एम एस आर डी सी समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय हॉकी संघाची भिंत अशी ओळख असलेला हॉकी संघाचा गोलकीपर पी आर श्रीजेशची ज्युनिअर हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आलेले आहे.
विश्वास पाटील यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक अण्णाभाऊ साठे द अपहोल्डर ऑफ दलित अँड विमेन लिटरेचर.
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने सन 2023 2024 हा कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कारासाठी बाबा भांड तसेच कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार ईश्वरलाल परमार यांना जाहीर करण्यात आलेला आहे.
पुण्यातील कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र राज्य सरकारने सेंटर ऑफ एक्सलनचा दर्जा बहाल केला आहे.
यामुळे हे देशी गाई साठीचे देशातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स संशोधन केंद्र ठरनार आहे. यासाठी राज्य सरकारने 71 कोटी निधीची तरतूद केलेली आहे.
कॅबिनेट सचिव पदी टी. व्ही सोमनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेले आहे. यांचा 30 ऑगस्ट 2024 पासून दोन वर्षांचा कार्यकाळ असणार आहे. राजीव गौबा यांच्याकडून कार्यभार त्यांनी स्वीकारला.
कोल्हापुरातील वनस्पतींना अभ्यासकांना विशाल गडावर कंदील पुष्प प्रजातीचा शोध लागल्यामुळे तिचे नामकरण सेरो पेजिया शिवरायिना असे केले. त्या नवीन वनस्पतीला शिवरायाचे नाव दिलेले आहे.
इतिहासातील काकोरी ट्रेन घटनेला 9 ऑगस्ट 2024 रोजी 100 वर्षे पूर्ण झालेले आहेत.
स्वित्झर्लंड मध्ये आयोजित 77 व्या लोकार्नो चित्रपट महोत्सवात शाहरुख खान यास त्याच्या सिनेमातील योगदानाबद्दल प्रतिष्ठित पार्दो ॲला कॅरिरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराने सन्मानित होणारा तो पहिला भारतीय ठरला.
12 ते 15 ऑगस्ट च्या दरम्यान दहावा मित्र शक्ती युद्ध अभ्यास श्रीलंका या ठिकाणी भारत आणि श्रीलंका दरम्यान पार पडला आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने इ स्पोर्ट्सला नक्कीच स्तरावर प्रोत्साहन देण्याच्या हेतूने पहिला ए स्पोर्ट्स ऑलिंपिक खेळाचे यजमानपद सौदी अरेबियाला देण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेशांमधील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर आयसीसी ने महिलांची T20 विश्वचषक स्पर्धा संयुक्त अरब अमिरातील येथे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा तीन ते 20 ऑक्टोबर 2024 दरम्यान होणार आहे. स्पर्धा क्रमांक नववी ती स्पर्धा आहे. एकूण सहभागी संघ 10 आहेत. त्याची सुरुवात 2009 या वर्षापासून झाली आहे. सर्वाधिक वेळा विजेता संघ ठरलेला आहे ऑस्ट्रेलिया तो सहा वेळा विजय संघ ठरलेला आहे.
सामोआ देशातील डॅरिअस व्हीसरणे एका षटकात समाधी 39 धावांचा विक्रम केला आहे. T20 विश्वचषक स्पर्धेसाठी सुरू असलेल्या आशियाई पॅसिफिक क्षेत्र पात्रता फेरीत व्हिसरणे वानुआतू संघाच्या नवीन नीपिकोला सलग सहा षटकार मारले आहे. तसेच गोलंदाजाने तीन नोबॉल टाकले आहे.
लाडके बहीण योजनेतील महिला भगिनींच्या खात्यावर 17 ऑगस्टला पैसे जमा करण्याची सुरुवात झाली म्हणून 2024 पासून 17 ऑगस्ट हा दिन लाडकी बहीण दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.
संसदेच्या अतिशय प्रतिष्ठित अशा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ काँग्रेस खासदार केसी वेणू गोपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
केरळमधील कोल्लममध्ये देशातील पहिला डिजिटल कोर्टाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे.
19 ऑगस्ट 2024 रोजी भारतातून सुपरमून आणि ब्ल्यू मून दिसला. सुपरमॅन म्हणजे चंद्राचे पृथ्वी जवळ येणे आणि चंद्राचा आकार मोठा दिसणे. तर ब्ल्यू मून म्हणजे एकाच महिन्यातील दुसरी किंवा एकाच मौसम मातील चार पौर्णिमांपैकी तिसरी पौर्णिमा होय.
थायलंडच्या संसदेने पायतोंग टार्न चिनावत यांची पंतप्रधान पदासाठी निवड केली आहे. त्यात थायलंडच्या सर्वात तरुण 37 वर्षीय पंतप्रधान आणि देशाच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान बनले आहे.
भारताचे 19 वे लष्कर प्रमुख सुंदर राजन पद्य नाभन यांचे 18 ऑगस्ट 2024 ला 83 व्या वर्षी निधन झाले. एक ऑक्टोबर 2000 ते 31 डिसेंबर २००२ ते भारताचे लष्कर प्रमुख होते. त्यांच्या टोपण नाव होते पॅडी. त्यांनी लिहिलेल्या पुस्तक रायटिंग ऑन द वॉल होते.
पुण्याची रहिवासी असलेल्या डायना पंडोल मेरे सिंग चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर ठरलेले आहे.
लेटरल एन्ट्री म्हणजे परीक्षेशिवाय थेट भरती होय. लॅटरल एन्ट्री द्वारे केंद्र सरकार यूपीएससीच्या मोठ्या पदांवर खाजगी क्षेत्रातील तज्ञांची थेट भरती करते. यूपीएससीमध्ये लॅटराल एन्ट्री 2016 मध्ये सुरू झाली होती.
कांस्य धातूपासून बनवलेली स्टॅच्यू ऑफ युनियन या हनुमानाच्या 90 फूट उंच मूर्तीचे अमेरिकेत उद्घाटन करण्यात आले आहे.
12 ऑगस्ट 2024 रोजी राज्य वन्यजीव मंडळाचे बैठकीत पुढील प्रजनन केंद्राला मान्यता देण्यात आलेले आहे.
पानमांजर - पेंच.
गिधाड - नाशिक
रान म्हैस - गडचिरोली.
ॲक्सिस बँक आणि व्हिसा यांनी भारतातील उच्चभृसाठी खास PRIMUS क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे.
L AND T फायनान्स मध्ये आरबीआय कडून NBFC आयसीसी दर्जा प्राप्त केला.
भारताने तिसरा व्हाईस ऑफ ग्लोबल साऊथ समिटचे आयोजन 17 ऑगस्ट 2024 रोजी केले होते.
2024 चे अकराव्या प्रो कबड्डी लिलावातील सर्वाधिक महागडा खेळाडू सचिन तनवर 2.15 कोटी रुपये. त्याचा संघ आहे तमिळ थलाय वास.
दक्षिण आफ्रिकेचे माजी गोलंदाज मोर्नी मॉरकेलं यांची भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदी नियुक्त करण्यात आलेले आहे.
माझे भारतीय वनरक्षक पीआर श्रिजेशच्या सन्मानार्थ हॉकी इंडियाने त्याची जर्सी क्रमांक 16 निवृत्त केली आहे.
थायलंडमध्ये न्यायालयाने पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना नैतिक उल्लंघन केल्याप्रकरणी पदावरून हटविले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयातील भारताचे नवे राजदूत आहेत पी हरीश
ई डी चे नवीन संचालक आहेत राहुल नवीन.
राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षे ऐवजी पाच वर्षे करण्यात आलेला आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कार्यरत असलेल्या कडधान्य सुधार प्रकल्पाने विकसित केलेल्या तुरीचं वाण फुले पल्लवी आणि क्षमता असणाऱ्या पिकावरील संशोधन प्रकल्पाने विकसित केलेले चारधारी वालाच्या वान फुले श्रावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आले आहे.
बंगळुरू इथे पार पडलेला महाराजा क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात तीन सुपर होण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडलेला आहे.
हुबळी टायगर आणि बंगरूळ ब्लास्टर्स यांच्यात हा सामना चींना स्वामी स्टेडियमवर पार पडला होता.
ऑगस्ट 2024 मध्ये भारताच्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अमेरिकेच्या दौरावर गेले होते. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलेवान यांची त्यांनी भेट घेतली.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुमच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप वर तुम्ही शेअर करू शकतात. या ब्लॉग मध्ये काय टायपिंग मिस्टेक झाली असल्यास माफ करा. भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये.