Power grid corporation of India recruitment 2024.
Power grid corporation of India recruitment 2024.
विद्यार्थी मित्रांनो पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड याचे मुख्यालय गुडगाव येथे आहे.
एक भारतीय सरकारी मालकीचे इलेक्ट्रिक युटीलिटीज कंपनी आहे.
पॉवरग्रिड ही कंपनी भारतात निर्माण होणाऱ्या एकूण विजे पैकी 50 टक्के वीज वापरते.
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये पुढील प्रकारच्या जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
डिप्लोमा ट्रेनिं ( इलेक्ट्रिकल ), डिप्लोमा ट्रेनिं ( सिव्हिल ) , डिप्लोमा ट्रेनिं ( HR), कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी ( एच अँड ए) आणि सहाय्यक प्रशिक्षणार्थी ( एफ अँड ए ) पदांसाठी 802 जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच प्रशिक्षणार्थी अभियंता ( इलेक्ट्रिकल ) आणि प्रशिक्षणार्थी पर्यवेक्षक ( इलेक्ट्रिकल ) पदांच्या एकूण 170 जागा भरण्यात येणार आहे.
जाहिरात क्रमांक – CC/ 10 / 2024.
संपूर्ण जागा 802.
पदाचे नाव आणि तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | डिप्लोमा ट्रेनिं ( इलेक्ट्रिकल ) | 600 |
2 | डिप्लोमा ट्रेनी ( सिविल ) | 66 |
3 | ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी ( HR ) | 79 |
4 | जुनिअर ऑफिसर ट्रेनी ( F and A) | 35 |
5 | असिस्टंट ट्रेनी ( F and A ) | 22 |
संपूर्ण जागा | 802 |
पद क्रमांक एक डिप्लोमा ट्रेनिं ( इलेक्ट्रिकल ) साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे. | 70 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा. ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल ( पॉवर ) / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सिस्टिम इंजिनिअरिंग / पॉवर इंजिनिअरिंग ( इलेक्ट्रिकल). (SC /ST /PWD: उत्तीर्ण श्रेणी ) |
पद क्रमांक दोन डिप्लोमा ट्रेनी ( सिविल ) साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे. | 70 टक्के गुणासहित सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा ( SC/ ST/ PWD – उत्तीर्ण श्रेणी) |
पद क्रमांक तीन ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी ( HR ) साठी लागणारी शैक्षणिक पात्रता. | 60% गुणांसह पदवीधर / BBA/ BBM / BBS. |
पद क्रमांक चार जुनिअर ऑफिसर ट्रेनी ( F and A) साठी लागणारी शैक्षणिक पात्रता. | INTER CA / INTER CMA |
पद क्रमांक पाच असिस्टंट ट्रेनी ( F and A ) साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे. | 60 टक्के गुण. ( SC/ ST/ PWD – उत्तीर्ण श्रेणी आवश्यक ) |
6 नोव्हेंबर 2024 रोजी (SC/ ST – 5 वर्षे सूट. OBC – 3 वर्षे सूट ) |
संपूर्ण भारत ( भारतात कोठे ही ). |
GENERAL/ OBC/ EWS – 300 रुपये. ( SC/ ST/ PWD / ExSM – परीक्षा फी नाही. ) |
GENERAL/ OBC/ EWS – 200 रुपये. ( SC/ ST/ PWD / ExSM – परीक्षा फी नाही. ) |
- पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 12 नोव्हेंबर 2024.
- पदासाठी ची परीक्षा तारीख पुढील प्रमाणे – परीक्षा तारीख नंतर कळविण्यात येईल.
पदासाठीच्या महत्त्वाच्या लिंक पुढीलप्रमाणे.
पदासाठीची जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
ऑनलाइन एप्लीकेशन करण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WHATS APP LINK – CLICK HERE
TELEGRAM LINK – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो तुमच्या यशाचे गमक चालू घडामोडी या विषयाकडे आता आपण वळूया.
१) लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या “काकसर ब्रिज” चे “कॅप्टन अमित भारद्वाज सेतू” नामकरण करण्यात आले.
कॅप्टन अमित भारद्वाज यांनी कारगिल युद्धात आपले शौर्य दाखवले होते व त्यांना वीरगती प्राप्त झाली होती. यांच्या स्मरणार्थ काकसर ब्रिजला कॅप्टन अमित भारद्वाज सेतू हे नाव देण्यात आले.
कारगिल युद्धाला पंचवीस वर्षे पूर्ण झाले आहे.
कॅप्टन अमित भारद्वाज यांनी 1999 च्या कारगिल युद्धात आपल्या मातृ भूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिले.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया लडाख बद्दल माहिती.
लडाखची राजधानी ही लेह आहे.
त्याचे लेफ्टनंट गव्हर्नर बिडी मिश्रा आहे.
२) विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया बदललेली नावे.
पोर्ट ब्लेअर चे नवीन नाव श्री विजय कुमार करण्यात आलेले आहे.
राष्ट्रपती भवनाच्या अशोक हॉल चे नवीन नाव अशोक मंडप करण्यात आलेले आहे.
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलचे नवीन नाव गणतंत्र मंडप करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचे नवे नाव अहिल्यानगर हे केले आहे.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम चे नवीन नाव निरंजन शहा स्टेडियम करण्यात आलेले आहे.
आंध्र प्रदेशची नवीन राजधानी ही अमरावती आहे.
तेलंगणा ची नवी राजधानी हैदराबाद ही आहे.
अयोध्या रेल्वे स्टेशनचे नवीन नाव अयोध्या धाम हे आहे.
गुजरातच्या सिग्नेचर ब्रिजचे नवीन नाव सुदर्शन सेतू हे आहे.
उत्तराखंड मधील जोशी मठ शहराचे नाव ज्योतिर मठ ठेवण्यात आले.
उत्तराखंडच्या कोश्याकुटीली तहसील चे नाव कैचीधाम हे ठेवण्यात आले आहे.
३) विद्यार्थी मित्रांनो चेन्नई येथे समर्थक या बहुउद्देशीय जहाज प्रकल्पाचे पहिले जहाज सुरू करण्यात आले आहे.
हे जहाज बनवण्याचे काम L AND T कंपनीकडे देण्यात आलेल्या आहे.
14 ऑक्टोबर 2024 रोजी बहुउद्देशीय जहाज प्रकल्पाचे पहिले जहाज समर्थक याचे चेन्नई येथे लॉन्च करण्यात आले होते.
४) पुण्यामधील जेजुरी या ठिकाणी भारतातील पहिल्या बायोपोलिमर प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया महाराष्ट्राबद्दल माहिती. तुम्हाला महाराष्ट्राबद्दल माहिती तर माहितीच असेल तरीसुद्धा आपण परत एकदा रिविजन करून घेऊया.
महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल हे सी. पी. राधाकृष्णन आहेत.
महाराष्ट्राची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झाली. ( गुजरातची स्थापना सुद्धा या दिवशी झालेली आहे)
महाराष्ट्राचे राज्य वृक्ष हे आंबा हे आहे.
महाराष्ट्रातील लोकनृत्य हे लावण्या आणि तमाशा आहे.
महाराष्ट्रातील सण हे पोळा, गुढीपाडवा हे आहे.
सुप्रसिद्ध एलोरा लेणी सुद्धा महाराष्ट्र या राज्यात आहे.
क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या स्थान देशात तिसरे स्थान आहे.
पहिले स्थान हे राजस्थान आहे, दुसरे मध्य प्रदेश, आणि त्यानंतर महाराष्ट्र या राज्याचा नंबर लागतो.
महाराष्ट्रात बरीच राष्ट्रीय महत्त्वाचे उद्याने आहेत ते पुढील प्रमाणे.
गुगामल राष्ट्रीय उद्यान, चांदोली राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान.
तसेच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र या राज्याला सहा राज्यांच्या सीमा लागून आहेत.
आणि एक केंद्रशासित प्रदेशाला महाराष्ट्राचे सीमा लागू आहे ती म्हणजे दादरा आणि नगर हवेली.
५) महाराष्ट्र या राज्यात लाडका भाऊ योजना सुरू केली.
६) महाराष्ट्र येथे पंतप्रधान मोदींनी बंजारा हेरिटेज म्युझियमचे उद्घाटन केले.
७) महाराष्ट्र या राज्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केले.
८) महाराष्ट्र राज्याला कृषी आणि ग्रामीण समृद्धी साठी नवीन धोरणे आणि विकासात्मक उपक्रम स्वीकारल्याबद्दल 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळाला.
९) महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री रमेश बैस यांनी “गेटवे टू द सी हिस्टोरिक पोर्ट्स आणि डॉक्स ऑफ मुंबई रिजन” या पुस्तकाचे प्रकाशन केले.
१०) महाराष्ट्र राज्यातील गट महिला आणि पुरुषांनी 56 वी राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2023 – 24 जिंकले.
११) विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया पाच ज्योतिर्लिंग.
भीमाशंकर – पुणे
परळी वैजनाथ – बीड
त्र्यंबकेश्वर – नाशिक
ओढा नागनाथ – हिंगोली
घृष्णेश्वर – छत्रपती संभाजी नगर.
१२) एम के स्टॅलिन यांना आशिया मानव संसाधन विकास जीवनगौरव पुरस्कार 2024 देण्यात आला.
त्यांचे पूर्ण नाव मुथूवेल करुणांनिधी स्टॅलिन हे आहे.
ते तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया तमिळनाडू या राज्याबद्दल.
या तमिळनाडू राज्याची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली.
या राज्याची राजधानी आहे चेन्नई.
या राज्याचे मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन.
आणि या तमिळनाडू राज्याचे राज्यपाल आहेत R.N RAVI.
तमिळनाडू राज्याचे उच्च न्यायालय हे मद्रास उच्च न्यायालय आहे.
१३) भारतीय तटरक्षक दलाने तमिळनाडू राज्यात जलचर केंद्राचे उद्घाटन केले.
ते रामेश्वर जवळील ICGS मंडपम येथे.
१४) टाटा मोटर्स हे तमिळनाडूमध्ये कारखाना सुरू करण्यासाठी 9000 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.
१५) निगल नलमा म्हणजेच तुम्ही बरे आहात का ही योजना तामिळनाडू राज्याने सुरू केली.
१६) तमिळनाडू या राज्यात शार्क च्या शरीराचे अवैध व्यापार खूप मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे हे राज्य शार्कच्या शरीराचे अवैध वापर करण्यात देशात अव्वल आहे.
१७) केंद्र सरकार आणि मेटा यांनी ऑनलाइन घोटाळ्यांना तोंड देण्यासाठी धोकाधारी से बचो ( घोटाले से बचो ) मोहीम सुरू केली आहे.
META चा हा उपक्रम इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, गृह मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले आहे.
या मोहिमेचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे.
देशात मोठ्या प्रमाणात होणारे घोटाळे आणि सायबर फसवणुकीच्या वाढत्या डोक्याचा सामना करण्यासाठी.
विद्यार्थी मित्रांनो ही एक राष्ट्रीय चळवळ असू शकते ज्यामुळे भारतीय नागरिकांना या धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करता येईल.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मेटा बद्दल.
META – मेटा ची स्थापना 4 फेब्रुवारी 2004 रोजी झाली.
मेटा चे सीईओ हे मार्क झुकरबर्ग आहेत.
बेटाचे मुख्यालय कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे आहे.
आणि मेटाचे पूर्वीचे नाव हे फेसबुक हे होते.
१८) विजया किशोर रहाटकर यांची केंद्र सरकारने राष्ट्रीय महिला आयोग च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.
विजया किशोर रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली त्या 9 व्यां अध्यक्ष असतील.
19 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांचे नियुक्ती करण्यात आली.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया राष्ट्र महिला आयोगाबद्दल.
ही एक वैधानिक संस्था आहे. ही संस्था 31 जानेवारी 1992 रोजी भारतीय संसदेने 1990 मध्ये पारित केलेल्या कायद्यानुसार स्थापन केलेली होती.
या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य म्हणून अर्चना मजुमदार यांचे आयोगाच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आले.
१९) हिंदी कैमेरून या भारतातील ब्रिटनच्या पहिल्या महिला उच्च युक्त बनल्या.
२०) काँगो या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान जुदिथ सुमिनवा तुलुका.
२१) अनामिका बी राजीव या भारतीय नौदलाची पहिला महिला हेलिकॉप्टर पायलट बनल्या.
२२) मेक्सिको या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती क्लोडिया शिणबाम या बनल्या आहेत.
२३) ईदशीशा नोंगरांग या मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या.
२४) टैन सु शान या DBS समूहाच्या पहिल्या महिला सीईओ बनल्या.
२५) साधना सक्सेना नायर या भारतीय सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या.
२६) आलिया नीलम या लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनला.
२७) ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री या रेचल रिवस् बनल्या.
२८) प्रीती राजक या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला सभेदार बनल्या.
२९) नीना सिंह या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DGP बनल्या.
३०) थायलंड देशाच्या नवीन पंतप्रधान पैतोंगटार्न शिनावात्रा बनल्या आहेत.
३१) तटरक्षक दलाद्वारे 16 17 ऑक्टोबर रोजी गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दमण आणि दिव किनाऱ्यावर सागर कवच हा सराव आयोजित केला होता.
कटरक्षक दलाचे मुख्यालय हे गांधीनगर दिल्ली येथे आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतीय तटरक्षक दलाबद्दल माहिती.
भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 1 फेब्रुवारी 1977 रोजी झाली.
भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक एस परमेश आहेत.
भारतीय तटरक्षक दलाचे ब्रीद वाक्य हे वयम रक्षामः हे आहे.