PM internship scheme 2024. पीएम इंटर्नशिप योजना 2024. PM internship scheme 2024.

PM internship scheme 2024.

विद्यार्थी मित्रांनो पीएम इंटर्नशिप योजना ही केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने म्हणजेच एमसीएने सुरू केली आहे.

पीएम इंटर्नशिप या योजनेसाठी नोंदणी ही 12 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली.

या पीएम इंटर्नशिप योजना अंतर्गत इंटर्नशिप ही एक वर्ष किंवा बारा महिन्यांच्या कालावधीसाठी राहील.

तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज सादर करू शकता.

संपूर्ण जागा – आठ हजार पेक्षा जास्त.

या योजनेचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.

अनु क्रमांकयोजनेचे नावयोजनेची पद संख्या
1पीएम इंटर्नशिप योजना 8000+
संपूर्ण जागा 8000+

पी एम इंटर्नशिप योजनेसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे.

दहावी / बारावी / आयटीआय (ITI )/ डिप्लोमा / बी.ए (BA) / बी.एस.सी (BSC) / बी.कॉम (B.COM) / बी.सी.ए (BCA) / बी.बी.ए (BBA) / बी. फार्म (B. PHARM )

पीएम इंटर्नशिप योजने साठी असणारी वयाची अट पुढील प्रमाणे – 21 ते 24 वर्षे.

पीएम इंटरशिप योजनेसाठी लागणारी फी (FEE) – यासाठी कोणतीही फी नाही.

पीएम इंटर्नशिप योजनेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे.

  1. भारतातील कंपन्या मधील अनुभव – बारा महिने ( एक वर्ष )
  2. मासिक सहाय्यक – पाच हजार रुपये.
  3. एक वेळ अनुदान – सहा हजार रुपये.
  4. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा संरक्षण.

पीएम internship योजनेबाबत महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे –

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – शेवटची तारीख ही वेळापत्रकानुसार.

योजनेचे कार्यक्षेत्र – ही योजना भारतातील सर्व राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये राहील.

पी एम इंटरनशिप योजनेचे जाहिरात पीडीएफ (PDF) स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा.

इंग्रजी मधून जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.CLICK HERE
HINDI मधून जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.CLICK HERE
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक कराCLICK HERE.

OFFICIAL वेबसाईट साठी पुढील लिंक वर क्लिक कराCLICK HERE.

विद्यार्थी मित्रांनो परीक्षेबाबतीत पुढील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा. या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जाण्यासाठी पुढे क्लिक करा.

WHATS APP LINK TELEGRAM LINK

या योजनेसाठी कोणते विद्यार्थी अपात्र ठरतील ते आपण पुढील प्रमाणे बघूया.

  • आई. आई. टी, आईआईएम, NID, आई आई एस ई आर, राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय चे पदवीधर.
  • ज्यांच्याजवळ सीए, सीएमए, एमबीबीएस, बीडीएस, एमबीए, कोणतीही मास्टर डिग्री असलेले विद्यार्थी.
  • जे विद्यार्थी किंवा जी व्यक्ती केंद्र सरकार किंवा राज्य सरकार योजना च्या अंतर्गत कौशल्य, इंटर्नशिप या विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेत आहे.
  • ज्या व्यक्तींना किंवा विद्यार्थ्यांनी एनटीएस किंवा एन ए पी एस अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
  • ज्या उमेदवाराच्या परिवारात 2023 – 24 यावर्षी वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
  • किंवा उमेदवाराच्या परिवारातील कोणताही सदस्य हा सरकारी कर्मचारी आहे.

विद्यार्थी मित्रांनो या योजनेसाठी विमा कव्हरेज सुद्धा आहे. ते आपण पुढील प्रमाणे बघूया.

भारत सरकार ची विमा योजना पंतप्रधान जीवन ज्योती बिमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यांच्या अंतर्गत प्रत्येक इंटरन ला विमा द्वारे कव्हरेज देण्यात येईल. विम्याचे वार्षिक मूल्य हे सरकारद्वारे दिल्या जाईल.

याच्या व्यतिरिक्त कंपनी इंटर्न ला अतिरिक्त दुर्घटना विमा कव्हरेज प्रदान करेल.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया या योजनेत सहभागी कंपन्यांची यादी.

१) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड.
२) टाटा कन्सल्टन्सी सर्विस लिमिटेड.
३) एचडीएफसी बँक लिमिटेड.
४) ऑइल अँड नेचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड.
५) इन्फोसिस लिमिटेड.
६) एनटीपीसी लिमिटेड.
७) टाटा स्टील लिमिटेड.
८) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड.
९) आयसीआयसीआय बँक लिमिटेड.
१०) पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड.
११) टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
१२) विप्रो लिमिटेड.
१३) एच सी एल टेक्नॉलॉजीस लिमिटेड.
१४) आयटीसी लिमिटेड.
१५) हिंदुस्तान झिंक लिमिटेड.
१६) रिलायन्स जिओ इन्फो कॉम लिमिटेड.
१७) महानदी कोल फील्ड्स लिमिटेड.
१८) एन एम डी सी लिमिटेड.
१९) हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड.
२०) आर इ सी लिमिटेड.
२१) जे एस डब्ल्यू स्टील लिमिटेड.
२२) GAIL (इंडिया) लिमिटेड.
२३) कॉग्निजंट टेक्नॉलॉजी सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.
२४) LARSEN अँड TOUBRO LIMITED.
२५) ॲक्सिस बँक लिमिटेड.
२६) नॉर्दन कोलफिल्ड लिमिटेड.
२७) ऑइल इंडिया लिमिटेड.
२८) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड.
२९) जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड.
३०) रिलायन्स रिटेल लिमिटेड.
३१) न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड.
३२) टेक महिंद्रा लिमिटेड.
३४) पावर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड.
३५) INDUSIND बँक लिमिटेड.
३६) एन एच पी सी लिमिटेड.
३७) स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड.
३८) मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड.
३९) वेदांता लिमिटेड.
४०) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड.
४१) SERUM इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.
४२) बजाज फायनान्स लिमिटेड.
४३) महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड.
४४) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड.
४५) सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड.
४६) बजाज ऑटो लिमिटेड.
४७) कोटक महिंद्रा बँक लिमिटेड.
४८) ACCENTURE सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड.
४९) श्रीराम फायनान्स लिमिटेड.
५०) MUTHOOT फायनान्स लिमिटेड.
५१) RUNGTA SONS प्रायव्हेट लिमिटेड.
५२) मोटो कॉर्प लिमिटेड.
५३) कॉल इंडिया लिमिटेड गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग.
५४) मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड.

५५) अंबुजा सिमेंट लिमिटेड.
५६) इंडस टॉवर्स लिमिटेड.
५७) एशियन पेंट लिमिटेड.
५८) सिपला लिमिटेड.

विद्यार्थी मित्रांनो या योजनेत टोटल 500 कंपन्या आहेत. बाकीच्या कंपन्या तुम्हाला बघायचे असल्यास त्यासाठी तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकतात.

सहभागी कंपन्यांची यादीCLICK FOR PDF

विद्यार्थी मित्रांनो आता आपण चालू घडामोडी या टॉपिक कडे वळूया.

महात्मा फुले जन आरोग्य योजना आता सर्व कुटुंबांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या अगोदर फक्त या योजनेचा लाभ हा अंत्योदय , पिवळे किंवा केशरी कार्ड धारकांना मिळत होता.

परंतु 2012 च्या जुलै महिन्यापासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही आता राज्यातील सर्व कुटुंबांसाठी लागू करण्यात आले आहे.

योजनेबद्दल आता थोडीफार माहिती आपण जाणून घेऊया.

या योजनेत रुग्णांच्या आरोग्य विमा संरक्षणाची ही रक्कम प्रतिक कुटुंब ही एक लाख पन्नास हजार वरून पाच लाख रुपये करण्यात आलेली आहे.

हे आरोग्य योजना राज्यातील 900 रुग्णालयाने मार्फत १३५६ प्रकारचे छोटे उपचार या विमा संरक्षण अंतर्गत केले जाऊ शकते.

विद्यार्थी मित्रांनो आदरणीय हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दवाखान्याला मिळालेला प्रतिसाद पाहता 347 ठिकाणी हे चिकित्सालय सुरू करण्यात आलेले आहे.

विद्यार्थी मित्रांनो या उपक्रमावर 78 कोटी रुपये खर्च झालेत.

या उपक्रमा अंतर्गत काही उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देणार आहे ती आपण पुढील प्रमाणे बघूया.

विद्यार्थी मित्रांनो राज्यातील महिलांनी च्या असताना कॉल करून या आजारात वाढ झालेली दिसून आलेले आहे. या महिलांना आजाराची तपासणी सहज व स्वस्त व्हावे यासाठी या आरोग्य उपकेंद्रात महिलांसाठी स्थान व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी ही उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येतील.

तसेच विद्यार्थी मित्रांनो या योजनेत राज्यात 3324 रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहे. त्या रुग्णवाहिका यासाठी की गर्भवती महिला व बालकांसाठी आरोग्य संस्थेत मोफत ने-आन करण्यासाठी.

*विक्रम मिसरी यांची भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

15 जुलै रोजी ते पदभार स्वीकारतील.

यांच्या अगोदर भारताचे परराष्ट्र सचिव हे विनय मोहन क्वात्रा हे होते.

त्यांचा कार्यकाल हा सहा महिन्यांनी वाढवण्यात आला होता.

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या नियुक्तीला मान्यता दिली आहे.

विक्रम मिसरी हे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम बघत होते.

विक्रम मिसरी हे 1989 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेत म्हणजेच आयएफएस रुजू झाले होते. ही निवड युनियन पब्लिक सर्विस कमिशन मार्फत करण्यात येते. त्याचा शॉर्टफॉर्म आहे यूपीएससी.

विक्रम मिसरीं हे स्पेन, चीन , आणि म्यानमार मध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांनी नोकरी केले होती.

राजदूत म्हणून नोकरी करताना त्यांनी परराष्ट्र मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय आणि तसेच आंतरराष्ट्रीय कामांवर काम केली होती.

*विद्यार्थी मित्रांनो आता आपण ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2024 बद्दल माहिती जाणून घेऊया.

इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट ने ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स जारी केला त्यात व्हिएन्ना, ऑस्ट्रिया ला जगातील राहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून नाव दिलेले आहे. 2024 च्या निर्देशांकात शिक्षण, आरोग्यसेवा, संस्कृती, पर्यावरण, स्थिरता आणि पायाभूत सुविधा यासारख्या गोष्टींवर जगभरातील शहरांना रेट करतो.

व्हिएन्ना नंतर कोपनहेगन, डेन्मार्क हे दुसऱ्या स्थानावर आहे.

झुरीच , स्विझरलँड तिसऱ्या स्थानावर.

मेलबर्न आणि ऑस्ट्रेलिया हे तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरले.

*डेन्मार्क या देशाने पशुधन उत्सर्जनावर जगातील पहिला कार्बन कर लादला.

डुकराचे मांस आणि दुग्ध उत्पादन क्षेत्र मुख्यतः त्याच्या मजबूत डुकराचे मांस आणि दुग्ध उत्पादन क्षेत्राद्वारे चालविल्या जाणाऱ्या पर्यावरणावर कमी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न या देशासाठी एक मोठे पाऊल ठरले आहे.

डेन्मार्कचा शेती हा प्रदूषणाचा सर्वात मोठा स्रोत आहे. डॅनिश सरकारने 2030 पासून प्रत्येक गायीवर ६७२ क्रोन इतका वर्षाला कर लावण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी मित्रांनो हा कर गाईंनी निर्माण केलेल्या हरितगृह वायलवर आधारित आहे.

या प्रकल्पात झाडे लावणे आणि ओलसर क्षेत्र बनवणे यासारख्या पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या प्रकल्पात 40 अब्ज क्रोन टाकण्यासाठी समाविष्ट केले आहे.

*डी आर डी ओ ( DRDO) च्या अभ्यास ने सहा यशस्वी चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

अभ्यास हे एक हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टारगेट आहे. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये हिट ( heat ) असे म्हणतात.

भारतातील बंगळुरू येथील एरोनॉटिकल डेव्हलपमेंट ने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ साठी बनवलेले आहे.

डीआरडीओ ने चांदीपूर, ओडिसा येथे एकात्मिक चाचणी श्रेणीमध्ये अभ्यासाचे सहा वेळा चाचणी केली आणि त्या सर्व चाचण्या या चांगल्या ठरल्या.

त्यामुळे सिस्टम अधिक चांगले कार्यकर्ते आणि अधिक विश्वासार्ह होते.

*जागतिक बँकेने भारताच्या ग्रीन एनर्जी कशासाठी $1.5 अब्ज अनुदान दिले आहे
विद्यार्थी मित्रांनो जागतिक बँकेने कमी कार्बन उर्जेच्या भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी भारताला हे कर्ज दिलेले आहे. या धोरणात्मक निधीमुळे ग्रीन हायड्रोजन आणि इलेक्ट्रोलायझर तयार करण्यास मदत होईल आणि यामुळे देशाला अक्षय ऊर्जा वापरणे हे सोपे जाईल.

*बायो प्लास्टिक पार्क उभारण्याचे काम हे उत्तर प्रदेश सरकारने लखिंपुर खेरी या जिल्ह्यात उभारला.

योगी आदित्यनाथ सरकारने प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कुणबी या गावात पार्क स्थापन केले.

या पार्कसाठी 1000 हेक्टर क्षेत्र व्यापून आणि 2000 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प बनवण्यात आला आहे.

नवीकरणीय स्रोतांपासून बनविलेले बायो प्लास्टिक, पेट्रोलियम आधारित प्लास्टिकला पर्यावरणास अनुकूल पर्याय प्रदान करून त्वरित विघटित होतात.

*जागतिक बँकेने नुकताच “स्थलांतर विकास संक्षिप्त अहवाल” प्रसिद्ध केला.

भारत हा जागतिक स्तरावर सर्वात मोठा रेमीटन्स प्राप्त करणारा देश आहे. भारताला 2024 मध्ये 124 अब्ज डॉलर्स आवक रेमिक्स आणि 2025 मध्ये 129 अब्ज डॉलर्स मिळण्याची अपेक्षा आहे.