उत्तर रेल्वे अंतर्गत पदांची भरती 2024. नॉर्दन रेल्वे भरती 2024. उत्तर रेल्वे रिक्रुटमेंट 2024. नॉर्दन रेल्वे रिक्रुटमेंट 2024.

Northern railway Bharti 2024.

Northern railway Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो उत्तर रेल्वे अंतर्गत स्पोर्ट कोणत्या दरम्यान स्तर 2 ते 5 मध्ये पदांसाठी जागा भरण्यात येत आहेत. पदानुसार पात्र असणारे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. चला तर मग आता जाणून घेऊया या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती.

पदाचे नाव स्पोर्ट्स कोटा स्तर 2 ते 5.

या पदांसाठी एकूण पदसंख्या 21 आहे.

या पदासाठीचे असणारे वयोमर्यादा पुढीलप्रमाणे- 18 ते 25 वर्ष.

या पदासाठी अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठीचे अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धत आहे.

या पदासाठीचे अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी शेवटची तारीख 11 डिसेंबर 2024 आहे.

OFFICIAL WEBSITE वर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE

या पदासाठी जी मूळ जाहिरात बघण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF

(MAIN जाहिरातीमध्ये तुम्हाला अर्ज शुल्क तसेच पदाचे शैक्षणिक पात्रता बघता येईल आणि तसेच पदांची वेतनश्रेणी सुद्धा लेवलनुसार बघता येईल.)

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो नवनवीन ब्लॉग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वाची माहिती मिळत आहे. सध्या आपण घेत आहोत चालू घडामोडी हा टॉपिक. परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा हा टॉपिक मुलांना भीतीदायक वाटतो. ती भीती घालवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी दररोज चालू घडामोडी हा टॉपिक घेऊन येत आहोत. तो तुम्हाला फायदेशीर आहे आणि या टॉपिक ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवा.

चला तर मग सुरु करूया आजचा टॉपिक –

पुणे येथे जैन संग्रहालय व ज्ञान केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे.
याचे उद्घाटन हे रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालेले आहे.
हे 50 एकर क्षेत्रामध्ये आहे.
या संग्रहालयाद्वारे जैन धर्माच्या मूल्यांचा प्रचार व प्रसार केला जाईल.

नितीन गडकरी यांनी अमृत महोत्सव पार्क नागपूर याचे उद्घाटन केलेले आहे. टेन नॅशनल हायवे 44 वर आहे.

दिल्ली या राज्याने उघड्यावर कचरा जाळण्यात बंदी अभियान सुरू केलेले आहे.

अँटी ओपन बर्निंग मिशन याला म्हणतात.
वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने हे अभियान सुरू केलेले आहे.

या अभियानाद्वारे उघड्यावर कचरा जाळणाऱ्यावर कारवाई होणार आहे.

विद्यार्थी मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे के राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत ते रिपब्लिकन पार्टीचे नेते आहेत. त्यांचे चिन्ह होते हत्ती.

विद्यार्थी मित्रांनो अमेरिकेमध्ये एकूण दोन पार्टी आहेत. पहिली रिपब्लिकन त्याचे चिन्ह हत्ती. व दुसरी पार्टी आहे डेमोक्रॅटिक पार्टी त्याच्या चिन्ह होते गाढव.

मिशन proba 3 हे इयू म्हणजेच EU देशाचे अंतराळ मोहीम आहे.
याचा फुल फॉर्म आहे युरोपियन स्पेस एजन्सी.
ही मोहीम भारताच्या इसरो कडून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

या मोहिमेचा उद्देश पुढीलप्रमाणे – सौर परीघाजवळ असलेल्या सूर्याच्या कोरोना थराचा अभ्यास करण्यासाठी या मोहिमेचा उद्देश आहे.

अरुण योगीराज यांना कर्नाटक सरकारने राज्य उस्तव पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अरुण योगीराज यांना कलेच्या क्षेत्रामध्ये दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे.
आयोध्यातील राम लल्ला यांची मूर्ती यांनी बनवलेले आहे.

नवी दिल्ली येथे पहिले आशियाई बौद्ध शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिखर संमेलन 5 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या संमेलनाची थीम पुढीलप्रमाणे – role of Buddha Dhamma in strengthening asia.

या शिखर संमेलनाचा उद्देश आहे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया गौतम बुद्ध यांच्या बद्दल संपूर्ण माहिती.
गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ आहे.
त्यांचा जन्म हा लुंबिनी येथे झाला होता. ते नेपाळमधील ठिकाण आहे.
त्यांच्या पत्नीचे नाव यशोधरा होते.

रिद्धिमान साहा यांनी नुकतीच निवृत्तीची घोषणा केलेली आहे ते क्रिकेट खेळाशी संबंधित आहेत.

हे भारतीय टीम मध्ये फलंदाज व यष्टीरक्षक आहेत.
2024- 25 रणजी ट्रॉफी झाल्यानंतर ते निवृत्त होणार आहेत.
त्यांची कारकीर्द पुढीलप्रमाणे – त्यांनी एकूण कसोटी सामने हे 40 खेळले आहेत. त्यामध्ये त्यांच्या धावा 1353 होते. व शतके तीन होते.
त्यांनी नऊ एक दिवसीय सामने खेळलेले आहेत.

सात नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. हा दिवस राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून साजरा करण्यात आला.
या दिवशी साजरा करण्याचे कारण पुढीलप्रमाणे – 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत प्रवेश घेतला होता म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.
याच दिवशी शाळा कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित वकृत्व स्पर्धा तसेच निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

ग्लोबल AI PREPAREDNESS INDEX मध्ये भारताचे स्थान हे 72वे आहे.

या इंडेक्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला कोणत्या देशाने सर्वाधिक वापरात आणले त्यानुसार त्याचे क्रमवारी देण्यात आलेली आहे.

IMF कडून हा इंडेक्स प्रकाशित करण्यात येतो.

इंडेक्स मधील टॉप तीन देश पुढील प्रमाणे – सिंगापूर, डेन्मार्क, अमेरिका.. त्यामध्ये भारताचा 72वा क्रमांक लागतो.

विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिले AI शाळा ही केरळा येथे ओपन करण्यात आलेली आहे.

भारतातील पहिली एआय शिक्षिका ही IRIS आहे.

विद्यार्थी मित्रांनो स्वच्छ सर्वेक्षण 2023 नुसार पहिले स्वच्छ शहर हे इंदोर + सुरत आहे हे संयुक्तरित्या आहे.
स्वच्छ छावणी ही महू छावणी आहे.
स्वच्छ राज्य हे महाराष्ट्र एमपी आणि छत्तीसगड आहे. क्रमानुसार आहेत.

लैंगिक असमानता इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक लागतो 108 वा.
मानव विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक लागतो 134 वा.
लोकशाही निर्देशांक भारताचा क्रमांक आहे 41 वा.
वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स यामध्ये भारताचा क्रमांक आहे 126 वा.
ग्लोबल पीस इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक आहे 116 वा.
ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक आहे 105 वा

7 नोव्हेंबर हा राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
कॅन्सर रोगाचे लक्षणे उपचारांबद्दल जागृक्ता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
डब्ल्यू एच ओ च्या माहितीनुसार जगात कॅन्सरचे एकूण रुग्ण आहे 18 दशलक्ष इतके होते.
त्यापैकी भारतामध्ये असणारे कॅन्सर रुग्ण हे 1.5 दशलक्ष इतके रुग्ण आहेत.

2025 या वर्षाचे आर्मी डे परेड पहिल्यांदा महाराष्ट्रात पुणे या शहरात होणार आहे. ही आर्मी डे परेड 15 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. दरवर्षीही परेड दिल्ली या शहरात होत असते. पहिल्यांदाच पुणे या ठिकाणी हे आर्मी डे परेड होणार आहे. पुण्याच्या समृद्ध सैनिकी वारसाच्या सन्मान म्हणून या दिवसाच्या आयोजन करण्यात आलेले आहे.

खडकी युद्ध हे 1817 मध्ये झाले.
ते युद्ध ब्रिटिश ईस्ट इंडिया वर्सेस मराठे होते.
या युद्धापासून पुणे हे शहर आर्मीचे प्रमुख केंद्र बनले होते.
खडकवासला मध्ये एनडीए ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया महत्त्वाचे दिवस.

आर्मी डे हा 15 जानेवारी वरती साजरा करण्यात येतो.
एअर फोर्स डे हा 8 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो.
आयटीबीपी दिवस हा 24 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.
नेव्ही डे हा चार डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
बीएसएफ दिवस हा 1 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन हा 2 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो.
पोलीस स्मृती दिवस हा 21 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पंचवार्षिक योजनेबद्दल माहिती. आता आपला टॉपिक चेंज झालेला आहे चालू घडामोडी एवजी आपण घेत आहोत आता पंचवार्षिक योजना.

पहिले पंचवार्षिक योजना ही 1951 ते 1956 या वर्षांत दरम्यान होते. या योजनेमध्ये मुख्य भर देण्यात आलेला आहे कृषी या क्षेत्राला. याच्या प्रतिमान होते HEROD DOMAR. यामध्ये आर्थिक वृद्धी दर होता संकल्पित 2.1%. आणि यामध्ये आर्थिक वृद्धी दर साध्य होता 3.6%. सार्वजनिक क्षेत्रापैकी सर्वाधिक खर्च हा कृषी व जलसिंचन यांच्यावर करण्यात आला.

दुसरी पंचवार्षिक योजना आहे 1956 ते 1961 या दरम्यान घेण्यात आलेली होती. या योजनेवर मुख्य भर देण्यात आलेला आहे जड व मूलभूत उद्योग यांच्यावर. याच्या प्रतिमान होते महालनोबिस. याचे आर्थिक वृद्धीदर संकल्पित होते 4.5%. आणि सध्या आर्थिक वृद्धीदर होते 4.21%. सार्वजनिक क्षेत्रापैकी सर्वाधिक खर्च हा वाहतूक व दळणवळण या क्षेत्रामध्ये झाला.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया तिसरी पंचवार्षिक योजना. ही तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966 या वर्षात दरम्यान झाली होती. या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक भर हा कृषी बाजार उद्योगांना देण्यात आला होता. त्याचे प्रतिमान होते महालनोबिस एस चक्रवर्ती. याच्या आर्थिक वृद्धीदर संकल्पित होते 5.6%. व आर्थिक वृद्धी दर साध्य होते 2.75%. सार्वजनिक क्षेत्रापैकी सर्वाधिक खर्च हा वाहतूक व दळणवळण या योजनेमध्ये झाला होता.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पंचवार्षिक योजनेचे चौथी पंचवार्षिक योजना. ही चौथी पंचवार्षिक योजना त्याचा कालावधी होता 1969 ते 1974 या वर्षा दरम्यान. या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर देण्यात आलेला होता स्वावलंबन/ स्थैर्य सह वाढ. या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रतिमान होते ॲलन मान व रुद्र, धनंजय राव गाडगीळ. आर्थिक वृद्धी दर या पंचवार्षिक योजनेतील चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 5.7% होता. त्यामध्ये सध्या आर्थिक वृद्धीदर 2.05% इतका होता. त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रापैकी सर्वाधिक खर्च हा कृषी व जलसिंचन यावर झालेला होता.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पंचवार्षिक योजनेमधील पाचवी पंचवार्षिक योजनेबद्दल संपूर्ण माहिती.
या पाचवी पंचवार्षिक योजनेचे वर्ष होते म्हणजेच कालावधी होता 1974 ते 1978 यादरम्यानचा. या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक भर देण्यात आलेला होता दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन यांच्यामध्ये. याचे प्रतिमान होते ॲलन व रुद्र/ डी डी धर. याच्या आर्थिक वृद्धी दर संकल्पित 4.4% होते. याच्या आर्थिक वृद्धीदर साध्या 4.83% होते. याचे सार्वजनिक क्षेत्रापैकी सर्वाधिक खर्च उद्योग या क्षेत्रात झालेला होता.

विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉगची लिंक तुमच्या मित्र मंडळींमध्ये तुम्ही नक्की पाठवा. आम्ही दररोज नवनवीन प्रकारचे टॉपिक तुमच्यासाठी घेऊन येत असतो. कारण परीक्षेसाठी तुम्हाला या टॉपिकचा मदत व्हावी म्हणूनच. चला तर मग उरलेले पंचवार्षिक योजना आपण पुढच्या ब्लॉग मध्ये घेऊया. तसेच या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाल्या असल्यास क्षमा मागतो.