Naval Ship Repair Yard Bharti 2024.
Naval Ship Repair Yard Bharti 2024.
संपूर्ण जागा 210.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया या भरतीबद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.
पदांचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांचा ट्रेड | पदांची संख्या |
1 | अप्रेंटिस ( नेव्हल शिप रिपेयर यार्ड, कारवार ) | कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, ICTSM, मेकॅनिकल डिझेल, मशिनीस्ट, MMTM, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक REFF & AC , पेंटर, शीट मेटल वर्कर , प्लंबर, टेलर, वेल्डर (G and E) | 180 |
2 | अप्रेंटिस ( नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड, गोवा) | कारपेंटर, इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रिशियन एअरक्राफ्ट, COPA, मेकॅनिक रडार आणि रेडिओ एअरक्राफ्ट, फिटर, ICTSM, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट एअरक्राफ्ट, मशिनिस्ट, प्लंबर/ पाईप फिटर, पेंटर, शीट मेटल वर्कर, वेल्डर ( G AND E ) | 30 |
संपूर्ण जागा | 210 |
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे : १) 50% गुणांसहित दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक. २) 65 टक्के गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (ITI) उत्तीर्ण असणे आवश्यक.
या पदांसाठी असणारी वयाची अट पुढील प्रमाणे : 15 एप्रिल 2025 रोजी 14 ते 21 वर्षांपर्यंत. ( SC/ ST – पाच वर्षे सूट )
या पदासाठी लागणारी अर्ज फी पुढील प्रमाणे – या पदासाठी कोणतीही अर्ज फी नाही.
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – कारवार आणि गोवा.
या पदासाठी अर्ज पाठवण्यासाठी चा पत्ता पुढील प्रमाणे – The officer incharge, dockyard apprentice school, naval ship repair yard, naval base, Karwar, 581308.
या पदासाठीच्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे :
या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 November 2024.
या पदासाठी अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 3 November 2024.
या पदासाठीच्या महत्त्वाच्या लिंक पुढील प्रमाणे.
या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे क्लिक करा – Click Here
ऑफिशियल लिंक वर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – click here
या पदाची जाहिरात पीडीएफ (PDF) स्वरूपात मिळवण्यासाठी पुढे क्लिक करा. – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WHATS APP LINK
TELEGRAM LINK
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याबद्दल सखोल माहिती. चला तर मग तयारीला लागा कारण लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात येत आहे. तुम्ही तर तयार असणारच तरी आमची टीम तुम्हाला तुमचे यश काढण्यासाठी मदत करेलच. चला तर मग सुरु करूया आपला महत्त्वाचा टॉपिक.
गुजरात या राज्याला महाराष्ट्राचे चार जिल्हे लागून आहेत ते पुढील प्रमाणे आपण बघूया.
पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जिल्हा संख्यानुसार राज्य क्रम.
मध्य प्रदेश, कर्नाटक , गुजरात , तेलंगणा, छत्तीसगड , गोवा.
महाराष्ट्राचे १ मे 1981 ला एकूण 26 जिल्हे होते.
आता त्यात चालू घडीला महाराष्ट्राचे 36 जिल्हे आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया मूळ जिल्हे आणि त्यात नवीन तयार झालेला जिल्हा.
एकूण नवीन जिल्हे हे दहा जिल्हे तयार झाले. ते दहा जिल्हे पुढीलप्रमाणे.
क्रमानुसार दहा जिल्हे.
सिंधुदुर्ग, जालना, लातूर, गडचिरोली, मुंबई उपनगर, नंदुरबार, वाशिम, गोंदिया, हिंगोली, पालघर हे नवीन जिल्हे आहेत.
रत्नागिरी आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजी नगर हे मूळ जिल्ह्यातून 1 मे 1981 रोजी नवीन जिल्हे तयार झाले.
रत्नागिरी या जिल्ह्यातून नवीन जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा तयार झाला.
औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून जालना हा नवीन जिल्हा तयार झाला.
उस्मानाबाद हा जिल्हा उस्मानाबाद या जिल्ह्यातून लातूर हा नवीन जिल्हा 16 ऑगस्ट 1982 रोजी तयार झाला.
चंद्रपूर या जिल्ह्यातून नवीन जिल्हा हा गडचिरोली जिल्हा 26 ऑगस्ट 1982 रोजी तयार झाला.
मुंबई शहर या मूळ जिल्ह्यातून 4 ऑक्टोबर 1990 रोजी मुंबई उपनगर हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला.
धुळे आणि अकोल्या या दोन जिल्ह्यातून नवीन जिल्हा एक जुलै 1998 रोजी नंदुरबार आणि वाशिम तयार करण्यात आला.
भंडारा या मूळ जिल्ह्यातून एक मे 1999 रोजी गोंदिया हा जिल्हा तयार करण्यात आला.
परभणी त्यामुळे जिल्ह्यातून एक मे 1999 रोजी हिंगोली हा जिल्हा तयार करण्यात आला.
ठाणे या मूळ जिल्ह्यातून ऑगस्ट 2014 रोजी पालघर हा जिल्हा तयार झाला.
एक मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली त्या रोजी महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग हे चार होते आणि जिल्हे 26 होते आणि तालुके 235 होते.
आता च्या रोजी 27 ऑक्टोबर 2024 ला एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत. आणि 36 जिल्हे आहेत, आणि तालुके हे 355 +3 आहेत.
विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत जर तुम्हाला विचारले की महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत तर तुम्ही उत्तर लिहायचं 355 कारण जे तीन तालुके आहेत ते अनऑफिसिअल आहेत. या प्रशासकीय काम असतात तेव्हा त्या जिल्ह्यांचा उपयोग केला जातो.
ते अनऑफिसिअल जिल्ह्यात पुढील प्रमाणे – अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया महाराष्ट्राचे प्रशासकीय.
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग पुढीलप्रमाणे.
औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि कोकण हे महाराष्ट्राचे सहा प्रशासकीय विभाग आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया या प्रशासकीय विभागाचे जिल्हे.
औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजी नगर या प्रशासकीय विभागात एकूण आठ जिल्हे आहेत.
नाशिक – नाशिक या प्रशासकीय विभागात एकूण पाच जिल्हे आहेत.
पुणे – पुणे या प्रशासकीय विभागात एकूण पाच जिल्हे आहेत.
नागपूर – नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण सहा जिल्हे आहेत.
अमरावती- अमरावती या प्रशासकीय विभागात एकूण पाच जिल्हे आहेत.
कोकण – कोकण या प्रशासकीय विभागात एकूण सात जिल्हे आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया जिल्हा संख्या निहाय क्रम.
विद्यार्थी मित्रांनो हा विभागांचा क्रम क्षेत्रफळानुसार लावलेला आहे त्यामुळे या क्रमाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
औरंगाबाद – आठ जिल्हे.
कोकण – सात जिल्हे
नागपूर – सहा जिल्हे
नाशिक – पाच जिल्हे
पुणे – पाच जिल्हे
अमरावती – पाच जिल्हे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया महाराष्ट्र राज्यातील तालुका संख्या निहाय क्रम.
औरंगाबाद- औरंगाबाद या प्रशासकीय विभागात एकूण 76 तालुके आहेत.
नागपूर- नागपूर या विभागात एकूण 64 तालुके आहेत.
पुणे- पुणे या प्रशासकीय विभागात एकूण 58 तालुके आहेत.
अमरावती – अमरावती विभागात एकूण 56 तालुके आहेत.
नाशिक- नाशिक विभागात एकूण 54 तालुके आहेत.
कोकण – कोकण या विभागात एकूण 47 तालुके आहेत. विद्यार्थी मित्रांनो जे अन ऑफिसियल तालुके आहेत ते कोकण या राजकीय विभागात येतात ते अनऑफिशियल तालुके हे अंधेरी, बोरिवली, कुर्ला हे आहेत. या तालुक्यांचा फक्त प्रशासकीय कामांसाठी उपयोग केला जातो.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभाग.
पहिला विभाग औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर.
या विभागाचे क्षेत्र 21.06% आहे. या विभागाचे क्षेत्रफळ हे 64,813 किलोमीटर पर स्क्वेअर आहेत. यात एकूण आठ जिल्हे आहेत.
दोन नंबरचा विभाग हा नाशिक.
नाशिक हा प्रशासकीय विभाग याचे क्षेत्र 18.70% इतके आहे.
नाशिक विभागाचे क्षेत्रफळ हे 57,493 किलोमीटर पर स्क्वेअर आहे. या प्रशासकीय विभागाचे एकूण पाच जिल्हे आहेत.
तिसरा प्रशासकीय विभाग पुणे.
पुणे या जिल्ह्याचे क्षेत्र हे 18.60% इतके आहे.
पुणे विभागाचे क्षेत्रफळ हे 57,275 किलोमीटर स्क्वेअर आहे.
चौथा प्रशासकीय विभाग नागपूर.
नागपूर या प्रशासकीय विभागाचे क्षेत्र हे 16.69% आहे.
नागपूर या प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ हे 51,373 किलोमीटर पर स्केअर आहे.
पाचवा प्रशासकीय विभाग अमरावती.
अमरावती या प्रशासकीय विभागाचे क्षेत्र 14.95% इतके आहे.
या प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ हे 46,027 इतके आहे. या विभागात पाच जिल्हे आहेत.
सहावा प्रशासकीय विभाग कोकण.
कोकण प्रशासकीय विभागाचे क्षेत्र हे 10% आहे.
कोकण या प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ हे 30,728 किलोमीटर पर स्क्वेअर इतके आहे. या कोकण प्रशासकीय विभागात एकूण सात जिल्हे आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया प्रशासकीय विभागात येणाऱ्या जिल्ह्यांची नावे.
औरंगाबाद – बीड, नांदेड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली.
नाशिक – नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार.
पुणे – पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर.
नागपूर – गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा.
अमरावती – यवतमाळ , अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम.
कोकण – रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपशहर, मुंबई शहर.
विद्यार्थी मित्रांनो या जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार क्रम दिलेला आहे तो तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरेल.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल.
प्रस्तरभंग – विद्यार्थी मित्रांनो प्रस्तरभंग हा भूपृष्ठावर अंतर्गत शक्तीचा परिणाम होऊन त्यामुळे उभ्या आडव्या भेगा पडतात त्या क्षितिज समांतर असतात त्यांनाच प्रस्तरभंग असे म्हणतात.
गटपर्वत – विद्यार्थी मित्रांनो जर पृष्ठभागावर एकाच वेळी दोन प्रस्तर भंग झाले तेव्हा गट पर्वत तयार होतो.
प्रस्तरभंग – प्रस्तरभंग झालेला भाग खाली खचलेला दिसतो.
प्रस्तरभंग भाग कुठे आहे ते आपण आता बघूया.
कोकणाचा भाग हा खाली खचलेला आहे तो प्रस्तरभंग मुळे खचलेला आहे.
कोकण कडची बाजू ही एक तीव्र उतार दिसते, आणि पठारी बाजू ही मंद उतार दिसते.
मग ह्या कोकण किनारपट्टीचा विस्तार जो आहे हा कुठून कुठपर्यंत आहे आता कोकण किनारपट्टीचे महाराष्ट्राला लाभलेले आहे ते आपल्याला बघायला मिळते. तर उत्तर ते दक्षिण पर्यंतचे म्हणजे उत्तर दक्षिण असा त्याचा एकंदरीत विस्तार दिसतो. मग आपल्याला उत्तरेला बोर्डो तळासरीच्या खाडी पासून जर आपण सुरुवात केली तर दक्षिण बाजूला आपल्याला तेरेखोल च्या खाडीपर्यंत असा विस्तृत महाराष्ट्राला लाभलेला सागरी किनारा किंवा सागरी किनारपट्टीची रचना दिसते. विद्यार्थी मित्रांनो त्यालाच आपण कोकण किनारा म्हणून ओळखतो. मग आता या महाराष्ट्राला लाभलेला हा जो आम्ही किनाऱ्याबद्दल तुम्हाला सांगतोय हा महाराष्ट्राला लाभलेला किनारा एकूण किती आहे ??? तर विद्यार्थी मित्रांनो ह्या किनाऱ्याचा भाग बघत असताना 720 किलोमीटर लांबीचा हा किनारा आहे. हे इथे विद्यार्थी मित्रांनो विशेष लक्षात ठेवा.
विद्यार्थी मित्रांनो दंतुर किनारा हा सलग नाही.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया कोकण किनाऱ्याचा विस्तार.
या किनाऱ्याची रुंदी 30 ते 60 किलोमीटर इतके आहे.
उल्हास नदी खोऱ्यात हे रुंदी 100 किलोमीटर जास्तीत जास्त इतके आहे.
सिंधुदुर्ग मध्ये हे रुंदी ते 40 किलोमीटर कमीत कमी आहे.
विद्यार्थी मित्रांनो सह्याद्रीवर उगम पावणाऱ्या नद्यांचा सखल भागाच्या या सर्व नद्या अरबी समुद्राकडे जातात.
या नद्यांमुळे एक किनारा खंडित झालेला आहे.
त्या किनाऱ्याला रिया किनारा असं म्हणतात.
कोकणात दोन प्रकारच्या मृदा आढळतात.
उत्तर कोकणात तांबडी मृदा तर दक्षिण कोकणात जांभी मृदा होय. ( म्हणजेच यात लोहाचे प्रमाण जास्त असते)
कोकणाचे तीन भाग पडतात.
पहिला उत्तर कोकण
दुसरा मध्य कोकण
आणि तिसरा दक्षिण कोकण.
उत्तर कोकणात पाल, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगड हे येतात.
मध्य कोकणात – दक्षिण रायगड आणि उत्तर रत्नागिरी येतात.
दक्षिण कोकणात – दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येतात.
विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. तो वाचून तुम्ही तुमचे ज्ञान प्रगल्भ करणार आहात. आम्ही सर्व मुद्दे तुम्हाला स्पष्ट करून दाखवलेले आहेत. परीक्षेला येणारा सिलॅबस मधील हे टॉपिक खूप महत्त्वाचे ठरणार त्यामुळे तुम्ही या टॉपिकची रिविजन दोन-तीन वेळेस नक्की करावे. या टॉपिक मधून हमखास तुमचे दोन तीन मार्क तरी तुम्ही खेचून आणणार.
आमचा हा दररोज चा टॉपिक तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या मित्रांपर्यंत नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांना आमच्या ब्लॉगची लिंक नक्की शेअर करा.
धन्यवाद