National tobacco testing laboratory Bharti 2024.
National tobacco testing laboratory Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
राष्ट्रीय तंबाखू चाचणी प्रयोगशाळा मुंबई अंतर्गत भरती निघालेली आहे. जाहिरात बघून पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, प्रशासकीय सहाय्यक, उपकरण परिचर.
या पदासाठी पदसंख्या सहा आहे.
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई येथे आहे.
या पदासाठी वयोमर्यादा ही 35 ते 45 वर्षे आहे.
या पदासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे.
या पदासाठीचे अर्ज पद्धती ही ऑफलाईन असणार आहे.
या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे – संचालक, राष्ट्रीय चाचणी प्रयोगशाळा, मुंबई, केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळा मुंबई, विभागीय FDA भवन, GMSD कंपाउंड, बेलासिस रोड, मुंबई सेंट्रल मुंबई, पिन कोड 400008.
या पदासाठीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2025 आहे.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
या पदासाठीची मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक ब्लॉक नंतर आपण एक विशेष टॉपिक घेत असतो. आमच्या पहिल्या ब्लॉकपासून आम्ही ही परंपरा चालू ठेवले आहे. तसेच या टॉपिक मध्ये आम्ही बरेच चालू घडामोडी तसेच इतर विषय सुद्धा कव्हर केलेले आहेत. आता सध्या आपला विषय सुरू आहे मराठी ग्रामर.
चला तर मग सुरु करूया या विषयाला.
संयुक्त क्रियापदाबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
जेव्हा वाक्याच्या शेवटी दोन क्रियापदे येतात व त्यापासून एकच क्रिया घडताना दिसते तेव्हा त्या वाक्यातील क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणजे सहाय्यक क्रियापद असे म्हणतात.
मुख्य क्रियापद - जेव्हा वाक्य ते शेवटी दोन क्रियापद आले व तेथे दोन क्रिया होत असतील तर त्या वाक्यातील क्रियापदाला मुख्य क्रियापद असे म्हणतात.
गौण अनियमित क्रियापद - म्हणजे नको टाळावे पाळावे नये नाही यांचा वापर येथे होतो.
अकर्मक क्रियापदाबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
या क्रियापदामध्ये जर वाक्याच्या सुरुवातीचा पहिला शब्दाला ला लागला असेल तर ते वाक्य अकर्मक क्रियापदाचे असते.
उदाहरणार्थ
राजाला मुकुट शोभतो.
उभय विध क्रियापद
जे क्रियापद सकर्मक व अकर्मक क्रियापद म्हणून काम करत असा क्रियापदाला उभय विध क्रियापद असे म्हणतात.
भाव कर्तुक क्रियापद.
जो करता कधीकधी नाम असतो. तो जर क्रियापदाच्या जागेवर आला तर त्याला भाव करतुक असे म्हणतात.
धातू साधित क्रियापद म्हणजे नेमकं काय त्यात आपण जाणून घेऊया.
जेव्हा धातू शब्दात थोडाफार बदल होऊन तो शब्द जर वाक्याच्या मध्ये येतो तर ते धातू साधित क्रियापद होय.
अव्यय साधित क्रियापद.
जेव्हा अव्ययांमध्ये बदल करून त्यांना जर क्रियापदाच्या जागेवर आणले तेव्हा त्यांना अव्यय साधित क्रियापद असे म्हणतात.
नाम साधित क्रियापद - यामध्ये जेव्हा नामात बदल करून क्रियापदांच्या जागेवर आणणे म्हणजेच नाम साधित क्रियापद.
विशेषण साधित क्रियापद - यामध्ये विशेषणात थोडाफार बदल करून त्याला जर क्रियापदाच्या जागेवर लिहिल्या तर त्याला विशेषण साधित क्रियापद म्हणून ओळखले जाते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया केवलप्रयोगी अव्ययी बद्दल माहिती.
आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडावाटे अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात त्यांना उद्गारवाचक शब्द किंवा केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. केवलप्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसतात ते केवळ वापरायचे म्हणून वापरले जातात. परंतु त्यांच्यामुळे भाषेची शोभा वाढते. केवलप्रयोगी अव्यय यांना विभक्तीचे प्रत्यय लागत नाहीत. ते केवळ भावनेचे उद्गार असतात.
केवळ प्रयोगी अव्यय कोणता भाव व्यक्त करतात यावरून त्यांचे खालील भाग पडतात..
केवळ प्रयोगी अव्ययाचे एकूण नऊ प्रकार पडतात ते प्रकार पुढील प्रमाणे.
हर्ष दर्शक - आ हा
शोकदर्शक
शिव शिव
आशर्य दर्शक
ओहो
संमती दर्शक
जी हा
विरोध दर्शक
छे
तिरस्कार दर्शक
धिक्कार
संबोध दर्शक
अगं अरे
मौन दर्श
गुपचूप
करणवाचक शब्दयोगी अव्यय.
जेव्हा एखादी वस्तू वापर करून दुसरे काहीतरी काम होत असेल तर त्या ठिकाणी मुळे कडून द्वारा इत्यादींचा वापर होतो.
आता आपण जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो दृष्टांत अलंकाराबद्दल माहिती.
या अलंकाराचा वापर कीर्तन भजन भारुड एकपात्री प्रयोग या ठिकाणी केला जातो.
दृष्टांत अलंकार म्हणजे दिलेल्या उदाहरणातून त्या मागचा भावार्थ सांगणे होय.
स्वभा वोक्ती अलंकार.
जेव्हा एखाद्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे एकाच गद्यात किंवा पद्यात दिलेले असेल त्या ठिकाणी हा अलंकार होतो.
पर्याय योक्ती अलंकार
एखादी गोष्ट सरळ भाषेत न सांगता प्रत्यक्षपणे सांगणे याला पर्याय युक्त अलंकार असे म्हणतात.
अन्योक्ती अलंकार.
यामध्ये ज्याच्याबद्दल बोलायचे आहे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे हा अलंकार होईल.
ससंदेह अलंकार.
जेव्हा दोन गोष्टींमध्ये शंका निर्माण होते पण वास्तविकता समजत नाही त्याला संसंदेह अलंकार म्हणतात.
व्यातिरेक अलंकार.
उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे अशा ठिकाणी व्यतिरेक अलंकार होतो.
वास्तविक ज्या गोष्टीची शक्ती किंवा किंमत जास्त आहे तिला कमी महत्त्व देणे व तिला जास्त महत्त्व देणे.
व्याज स्तुती अलंकार म्हणजे एखाद्याचे बाहेरून स्तुती पण आतून निंदा करणे किंवा बाहेरून निंदा आणि आतून स्तुती करणे.
सारं अलंकार.
म्हणजे जेव्हा एखादी कल्पना किंवा विचार चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने वाढत जाते किंवा औनती किंवा उन्नती होत जाते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितला होता मराठी ग्रामर चा टॉपिक. वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था.
चला तर मग आता सुरू करूया एक नवीन टॉपिक.
भारतातील इंग्लंडच्या वसाहतीवादी अर्थव्यवस्थेची तीन टप्पे पुढीलप्रमाणे.
1757 ते 1813 वाणिज्यवादाचा कालखंड
1813 ते 1857 खुला व्यापाराचे अवस्था.
1857 नंतरचा कालखंड
1757 ते 1772 या काळाला वसाहती च्या लुटीचा कालखंड मानले जाते.
1813 मध्ये भारताची व्यापारी मक्तेदारी रद्द करण्यात आली.
1833 मध्ये भारताचे चीन सोबतची व्यापारी मक्तेदारी रद्द करण्यात आली.
1800 ते 1850 या काळाला अनोद्योगीकरण काळ असे म्हणतात.
भारतीय विणकारांची हाडे भारतीय प्रदेशात विखुरलेले आहेत असे म्हटले होते बेटिंग याने 1834 मध्ये.
भारतीय शेतीची व्यापारीकरण म्हणजे नेहमीच्या अन्नधान्या ऐवजी कापूस तंबाखू अशी व्यापारी के घेण्यास सुरू होण्याच्या प्रक्रियेला भारतीय शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात.
1833 चे चार्टर्ड अॅक्ट नुसार इंग्रज व युरोपीय नागरिकांना भारतात खुल्या जाण्यास राहण्यास व संपत्ती विकत घेण्यास परवानगी देण्यात आली होती.
1815 ते 1880 या काळात भारतातील मजुरांचे उद्योगाकडून शेतीकडे स्थलांतर झाले असे म्हटले होते एलिस व डॅनियल याने.
परकीय व्यापार गुंतवणूक तसेच भारत सरकार तर्फे तसेच अर्ध सार्वजनिक मंडळातर्फे इंग्रजांचे भांडवल हे भारतात या प्रकारे गुंतवले जात होते.
रमेशचंद्र दत्त यांनी म्हटले होते की आज जर भारत गरीब असेल तर त्याचे कारणे आर्थिक आहेत.
तसे त्यांनी म्हटले आहे की सूर्य भारताकडून पाणी घेतो आणि पाऊस मात्र इंग्लंडला देतो.
लोकमान्य टिळकांनी म्हटले होते की युरोपियन लोकांना करण्यासाठी एक कुरण म्हणून हिंदुस्तानाचा निश्चितच वापर होत आहे.
दादाभाई नौरोजी यांनी म्हटले होते की शहराचे हितकर्ते हा ब्रिटिश शासनाच्या खरा चेहरा नसून तो त्यांचा मुखवटा आहे.
20 मे १४९८ मध्ये वास्को-द-गामा भारतात आला होता.
झामोरीन हा वास्को-द-गामा भारतात आला तेव्हा कालीकतचा शासक होता.
वास्को-द-गामा भारतात परत आला 1505 मध्ये.
वास्को-द-गामांनी कालिकत कोचिन कन्नोर या ठिकाणी व्यापारी केंद्र स्थापन केले होते.
पंधराशे पाच या वर्षी भारताचा पहिला पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून वास्को-द-गामाला नेमण्यात आले होते..
1510 मध्ये विजयपूरच्या आदिलशहाकडून गोवा हे अल्फांसो डी याने जिंकून घेतले होते.
पॉंडिचेरीवर सत्ता स्थापित करणारे पहिले युरोपीय देश होते पोर्तुगाल.
स्वराज्य पक्ष अपयशी ठरला त्याचे कारण पुढील प्रमाणे -
स्वराज्य पक्षात पडलेले फूट
मतभेद यामुळे आलेला शिस्तीतीचा अभाव
जनतेचा कमी होत चाललेला पाठिंबा
फोडा व सोडा निती.
आठ नोव्हेंबर 1927 रोजी सायमन कमिशन ची स्थापना झाली होती.
1919 च्या मॉडफोर्ड कायद्याचे परीक्षण करण्यासाठी सायमन कमिशनचे स्थापना झाली होती.
काँग्रेसच्या 1927 च्या अधिवेशनात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास झाला होता. अधिवेशन मद्रास येथे होते त्याचे अध्यक्ष होते अन्सारी.
सायमन कमिशन वर बहिष्कार टाकणारे तीन गट पुढील प्रमाणे.
मुस्लिम लीग लिबरल पार्टी हिंदू महासभा. हे तीन गट होते.
चार मे 1930 या रोजी गांधीजींच्या अटकेनंतर काँग्रेस वर्किंग कमिटीने निर्णय घेतले ते निर्णय पुढीलप्रमाणे.
रयतवारी असणाऱ्या भागात कर देऊ नये तसेच जमीनदारी असणाऱ्या भागात चौकीदारी करू नये तसेच मद्य प्रांतात जंगल कायदा मोडणे या बाबीं संदर्भातल्या आंदोलन हाती घेतले होते.
गुजरात मधील धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व हे सरोजिनी नायडू यांनी केले होते.
धारासना सत्याग्रहामध्ये एकूण 2000 सत्याग्रही सहभागी होते.
सविनय कायदेभंगाच्या चळवळीत मुंबईतील एक सत्याग्रही गटाचे नेतृत्व केल्यामुळे अवंतिकाबाई गोखले यांना कारावाच भोगाव लागला होता.
पश्चिम भागातून सत्याग्रह करून 424 स्वयंसेवकांपैकी 175 जण धुळे जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील होते.
5 सप्टेंबर 1930 रोजी सातारा जिल्ह्यातील विळाशी गाव येथे पोलिसांनी झेंडा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी राजू ताई कदम यांनी झेंडा सोडला नाही.
पहिल्या गोलमेज परिषदा दरम्यान घडलेल्या घटना पुढील प्रमाणे.
आठ उप समित्या त्यावेळेस स्थापन झालेल्या होत्या.
स्वतंत्र मतदार संघाची मागणी करण्यात आली होती.
प्रांतातील द्विदल पद्धत बंद करण्यात आलेली होती.
गांधी आर्विन करार हा 05 मार्च 1931 रोजी झाला.
काँग्रेस सोडून लंडनला निघालेले भारतीय प्रतिनिधी म्हणजे जणू नवऱ्या मुलाखत लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाड होते हे म्हटले होते मुदुमदार यांनी.
पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते ramse त्यांचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्यावर सायमन कमिशनच्या अहवालांवर चर्चा करण्यासाठी केली होती.
पहिल्या गोलमेज परिषदेला भारतीय राजकीय पक्षाचे 57 प्रतिनिधी उपस्थित होते.
गांधी आर्विण करारामध्ये काही बाबी मान्य झाल्या त्या पुढील प्रमाणे.
त्यामध्ये राजकीय कैद्यांची मुक्तता आली.
वसूल न झालेल्या दंड माफ करणे.
शेतकऱ्यांच्या जमिनी परत करणे.
ज्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला त्यांच्या सहानभूतीपूर्व विचार करणे.
मीठ तयार करण्याचे परवानगी द्यावी.
निदर्शने करण्याचा हक्क.
महात्मा गांधीजींनी नाकारलेल्या मागण्या पुढील प्रमाणे.
पोलिसांच्या अत्याचारांचे जनसुनवाई, सार्वजनिक चौकशी करणे.
भगतसिंग व साथीदारांची फाशी माफ करून सौम्य करणे.
विद्यार्थी मित्रांनो आजचा सर्व टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रांमध्ये तुम्ही शेअर करा कारण या ब्लॉगचा तुमच्या मित्रांना सुद्धा फायदा व्हायला पाहिजे. ह्या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाल्या असतील तर माफ करा. भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये.