National insurance company limited requirement 2024. NICL Bharti 2024.
National insurance company limited requirement 2024. NICL Bharti 2024.
या पदांच्या संपूर्ण जागा 500
जाहिरातीच्या पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | असिस्टंट क्लास III | 500 |
संपूर्ण जागा | 500 |
या पदासाठी वयाची अट पुढीलप्रमाणे | एक ऑक्टोबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे (SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.) |
या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे | या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक. |
या पदासाठी लागणारी फी पुढील प्रमाणे | GENERAL/ OBC/ EWS – 850 रुपये. (SC/ST/EXSM – 100 रुपये ) |
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे. | या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत ( म्हणजेच भारतात कुठेही) |
या पदासाठीचे महत्त्वाचे तारखा पुढीलप्रमाणे.
या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11 नोव्हेंबर 2024 |
परीक्षेचा phase I | 30 नोव्हेंबर 2024 |
परीक्षेचा phase II | 28 डिसेंबर 2024 |
या पदासाठीचे महत्त्वाच्या लिंक्स पुढील प्रमाणे
ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा. | CLICK HERE |
या पदासाठी ची जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा | Download PDF |
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो नेहमी प्रमाणे आज सुद्धा आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाचे टॉपिक घेऊन येत आहोत. हे टॉपिक परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारल्या गेलेले आहेत.
आमचा ब्लॉग हा सर्वांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वांनी या ब्लॉगमधून परीक्षेची माहिती तर घ्याच परंतु त्यानंतर महत्त्वाच्या टॉपिक वर आम्ही टाकलेल्या म्हणजेच तयार केलेल्या नोट्स सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. याच कारणामुळे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचे व आमच्या वेबसाईटचे नाते एकदम घट्ट होत आहेत.
चला तर मग सुरु करूया…..
WHATS APP GROUP LINK | TELEGRAM GROUP LINK |
विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया अक्षवृत्त म्हणजे नेमकं काय.
अक्षांश हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर होय. याला अंशांमध्ये मोजतात. हे विषुववृत्त ला समांतर असतात यालाच अक्षवृत्त असे म्हणतात.
हे अक्षवृत्त असमान व्यास असलेला वर्तुळांसारखा आहे.
तर अक्षवृत्त एकूण किती आहेत ते आपण बघूया.
अक्षवृत्ते हे 181 इतके आहेत. आणि हेच अक्षवृत्त एका अंशाच्या अंतराने काढतात. जर पृथ्वी पूर्णतः गोल असेल तर अक्षांशांची लांबी स्थिर मूल्य असते.
प्रत्येक अक्षवृत्तांचा डिस्टन्स म्हणजे अंतर हे 111 किलोमीटर इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया विषुववृत्त.
या विषुववृत्ताचा परिघा 40,075 किलोमीटर लांब इतका आहे. आणि हा विषुववृत्त 0° अक्षांशावर स्थित आहे.
तुम्हाला माहिती आहे का की विषवृत्तावर तसेच त्याच्या जवळच्या भागात सूर्यप्रकाशात डोक्यावर येतो आणि हा सूर्य प्रकाश हा वर्षभर डोक्यावर येतो. त्यामुळे विषुववृत्तावर पूर्ण वर्षभर दिवसाचे हे तापमान स्थिर बघायला मिळते.
तसेच विद्यार्थी मित्रांनो विषुववृत्त हे पृथ्वीवरील अक्षवृत्ताच्या पाच वर्तुळांपैकी एक आहे.
आर्टिक सर्कल आणि अंटार्टिका सर्कल हे दोन्ही ध्रुवीय वर्तुळे आणि दोन्ही उष्णकटिबंधीय वर्तुळे म्हणजेच कर्क व मकर उष्णकटिबंधीय वर्तुळे आहेत.
उत्तर गोलार्धात कर्कवृत्त, दक्षिण गोलार्धात मकरवृत्त, विषुववृत्ताच्या दक्षिणेस अंटार्टिका वर्तुळ, विषुववृत्ताच्या उत्तरेस आर्टिक वर्तुळ, सर्वात मोठे वर्तुळे हे विषुववृत्त आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया रेखावृत्त म्हणजे नेमके काय.
प्राईम मेरिडियन हे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल या दोन्ही ध्रुवांना जोडणारी रेषा होय. यालाच शून्य डिग्री प्राईम मेरिडियन म्हणतात.
रेखांश हे मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील स्थानाचे मोजमाप आहे.
ही रेषा ध्रुव आणि ग्रीनवेज लंडन या दोन्हींमधून जाणारे काल्पनिक उत्तर दक्षिण रेषा आहे.
म्हणजेच विरुद्ध रेखावृत्त एकत्र केल्यास ते रेखावृत्त वर्तुळ पूर्ण करतात. परंतु हे दोन रेखावृत्ते वेगवेगळ्या आहेत.
ते रेखावृत्त सर्व समान लांबीचे आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो अक्षवृत्त हे समान लांबीची नाहीत.
विषुववृत्ताला रेखावृत्ते हे काटकोनात छेदतात.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय तारीख रेषा. आंतरराष्ट्रीय तारीख रेषा ही 180° आंतरराष्ट्रीय तारीख रेखांश म्हणून ओळखले जाते.
तारीख रेषा ही कोणत्याही देशातून जात किंवा ओलांडत नाही.
रेखांश मधील अंतर विषुववृत्तापासून ध्रुवाकडे कमी होते. रेषेची पश्चिम बाजू नेहमी पूर्वेकडील बाजूच्या पुढे असतो.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या लाईन्स या रेषा कोणत्या कोणत्या देशातून जातात.
विषुववृत्त – यालाच इक्वेटर म्हणतात ही रेषा
1) दक्षिण अमेरिका – इक्विडोर कोलंबिया आणि ब्राझील या तीन देशातून जाते.
२) आफ्रिका – विषुवृत्तीय रेषा ही आफ्रिकेतील साओ टॉम आणि प्रिन्सिपे, गॅबोन, काँगो, काँगो लोकशाही या देशांमधून जाते.
३) आशिया – विषुववृत्तीय रेषाही आशियातील मालदीव, इंडोनेशिया, किरीबाटी या देशांमधून जाते.
मूळ रेखावृत्त – यालाच प्राइम मेरिडियन असे म्हणतात.
१) युरोप – युनायटेड किंगडम, फ्रान्स, स्पेन.
२) आफ्रिका – अल्जेरिया, माली, बुर्किना, फासो, घाना, टोगो.
३) अंटार्टिका.
या देशांमधून मूळ रेखावृत्त जाते.
कर्कवृत्त – यालाच ट्राफिक ऑफ कॅन्सर असे म्हणतात.
१) उत्तर अमेरिका – बहामास दीप समूह, मेक्सिको.
२) आफ्रिका – इजिप्त, लिबिया, नायजर, अल्जेरिया , माली, वेस्टन सहारा, मॉरिटानिया.
३) आशिया – तैवान , चीन, म्यानमार, बांगलादेश, भारत, ओमान, युएई , सौदी अरेबिया.
भारत – गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम इतक्या राज्यांमधून कर्कवृत्त जाते.
या सर्व देशांमधून कर्कवृत्त जाते.
मकरवृत्त – यालाच ट्राफिक ऑफ कॅप्रीकॉन असे म्हणतात.
१) दक्षिण अमेरिका -अर्जेंटिना, ब्राझील, चिली, पॅराग्वे या देशांमधून दक्षिण अमेरिका खंडातून मकरवृत्त जाते.
२) आफ्रिका – नामेबिया, बोत्सवाना, दक्षिण आफ्रिका, मोझांबिक, मादागास्कर.
आफ्रिका खंडातील इतक्या देशातून मकरवृत्त जाते.
३) ऑस्ट्रेलिया.
भारतीय प्रमाण वेळ – उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिषा, आंध्र प्रदेश.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण विषुववृत्त किती देशांमधून जाते हे बघूया – विषुववृत्त हे तीन खंडातील एकूण 14 देशांमधून जाते.
मूळ रेखावृत्ता बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
मुळ रेखावृत्त हे तीन खंडातील नऊ देशांमधून जाते.
कर्कवृत्त – कर्कवृत्त ही रेषा तीन खंडातील 17 देशातून जाते.
भारत देशातील आठ राज्यातून कर्कवृत्त रेषा जाते.
मकरवृत्त – मकरवृत्त ही रेषा तीन खंडातील दहा देशातून जाते.
भारतीय प्रमाण वेळ हे पाच राज्यातून दातांना दिसते.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिषा, आंध्र प्रदेश.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पृथ्वीचे तापमान क्षेत्रा बद्दल माहिती.
उष्णकटिबंधीय क्षेत्रात म्हणजेच ट्रॉपिकल झोन मध्ये सूर्यकिरण हे माथ्यावर पडतात. सूर्यकिरण हे लंबरुप पडतात. या लंबरूप पडत असणाऱ्या सूर्यकिरणामुळे तेथे तापमान जास्त दिसून येते.
समशीतोष्ण क्षेत्र – म्हणजेच टेम्परेट झोन.
उष्णकटिबंधाच्या पलीकडे अक्षांशावर कधी थेट सूर्यकिरण पडत नाही. या ठिकाणी तिरपे सूर्यकिरणे पडतात. या कारणामुळेच येथे तापमान मध्यम स्वरूपाचे असते.
बर्फाळ क्षेत्र – म्हणजेच फ्रिजिड झोन.
बर्फाळ क्षेत्रात सूर्य हा क्षितिजापेक्षा जास्त वरती येत नाही.
त्यामुळे तेथील तापमान हे अतिशय कमी किंवा अतिशय थंड असते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पृथ्वीची गती. पृथ्वीच्या गतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
परिवलन – पृथ्वी स्वतःला एक पूर्ण फेरी मारते तेव्हा त्याला आपण परिवलन असे म्हणतो. पृथ्वी हे स्वतःच्या अक्षाभोवती पश्चिम ते पूर्व असे भ्रमण करते.
पृथ्वीला परिवलन पूर्ण करण्यासाठी म्हणजेच एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात.
विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे आपल्याला दिवस-रात्र अनुभवायला मिळते. या ठिकाणी कोरियालिस फोर्स apply होतो.
परिभ्रमण – पृथ्वी ही सूर्याभोवती जेव्हा एक फेरी पूर्ण करते त्यालाच परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वी ही सूर्याभोवती एक लंब वर्तुळाकारात फिरत असते. पृथ्वीच्या त्या एक फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला 365 दिवस आणि सहा तास लागतात.
विद्यार्थी मित्रांनो सूर्यापासूनचे सर्वाधिक अंतर हे उपभू स्थितीत असते. हे उपभू स्थिति हे 3 जानेवारी रोजी असते.
त्यानंतर सूर्यापासूनचे सर्वात कमी अंतर म्हणजेच अपभू स्थिती. हे अपभू स्थिती हे चार जुलै रोजी असते.
या पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे दिवस रात्रीचा फरक आपल्याला दिसतो.
परिभ्रमणामुळे ऋतूंची निर्मिती होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळूया ग्रहण या टॉपिक कडे.
सूर्यग्रहण – सूर्यग्रहण हे पृथ्वीवरून बघितले असता चंद्र हा सूर्यासमोरून जातो याला सूर्यग्रहण असे म्हणतात.
ही स्थिती आपल्याला अमावस्येच्या दिवशी उद्भवते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पृथ्वीपासून चंद्राच्या अंतरावर आधारित सूर्या ग्रहणाच्या तीन अवस्था –
पहिले ग्रहण आहे खंडग्रास सूर्यग्रहण.
१) खंडग्रास सूर्यग्रहण – खंडग्रास सूर्यग्रहणात सूर्य , पृथ्वी आणि चंद्र हे एका रेषेत येतात तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण होते.
या खंडग्रास सूर्यग्रहणात सूर्यप्रकाशाचा काही भाग झाकला जातो.
२) कंकणाकृती सूर्यग्रहण – कंकणाकृती सूर्यग्रहणात सूर्याची वर्तुळाकार कडी चंद्राच्या पाठीमागे दिसते यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात.
३) खग्रास सूर्यग्रहण – खग्रास सूर्यग्रहणात सूर्य ,चंद्र , पृथ्वी थेट एकसमान रेषेत येतात त्यामुळे खग्रास सूर्यग्रहण आपल्याला पाहायला मिळते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया चंद्रग्रहणाबद्दल माहिती.
जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जातो तेव्हा चंद्रग्रहण स्थिती निर्माण होते.
हे स्थिती केवळ पौर्णिमेच्या वेळी उद्भवते.
विद्यार्थी मित्रांनो सूर्य, चंद्र आणि पृथ्वीच्या स्थितीनुसार दोन प्रकारचे चंद्रग्रहण आपल्याला पाहायला मिळतात ते चंद्रग्रहण पुढील प्रमाणे.
खंडग्रास चंद्रग्रहण आणि खग्रास चंद्रग्रहण.
१) खंडग्रास चंद्रग्रहण – चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या सावलीखाली असतो तेव्हा आपल्याला बघायला मिळते खंडग्रास चंद्रग्रहण.
२) खग्रास चंद्रग्रहण – ज्या वेळेस चंद्र आणि सूर्य पृथ्वीच्या अगदी विरुद्ध बाजूला असतात त्यावेळेस आपल्याला कचरा चंद्रग्रहण बघायला मिळतो.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया चंद्राबद्दलची वैशिष्ट्ये.
सुपरमून, ब्ल्यू मून, ब्लड मून , सुपर ब्ल्यू मून हे चार वैशिष्ट्ये चंद्राचे आहेत.
१) सुपर मून ( super moon ) – विद्यार्थी मित्रांनो सुपरमॅन चे वैशिष्ट्ये हे आहे की जेव्हा चंद्र पृथ्वीपासून किमान अंतरावर असतो. त्या अवस्थेला उपभू अवस्था असे म्हणतात किंवा पौर्णिमा असेही म्हणतात.
यावेळेस चंद्रा हा 14% मोठा असतो आणि 30 टक्के प्रकाशमान दिसतो.
२) ब्ल्यू मून ( blue moon ) – जेव्हा एका महिन्यात दोन पौर्णिमा दिसल्यास दुसऱ्या चंद्राला ब्लू म्हणून असे संबोधले जाते. ही स्थिती दोन किंवा तीन वर्षांनी उद्भवते.
ब्ल्यू मून वर्ष – कोणत्याही वर्षात दोन किंवा दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ ब्लू मून दिसला तर त्याला ब्ल्यू मून वर्ष म्हणतात.
विद्यार्थी मित्रांनो 2018 हे ब्ल्यू मून वर्ष होते.
३) ब्लड मून ( blood moon ) – विद्यार्थी मित्रांनो सलग चार चंद्रग्रहणांना ब्लड म्हणून असे म्हणतात.
मून टेट्राड – या सलग चार चंद्रग्रहणा च्या या दुर्मिळ घटनेला मून टेट्राड असे म्हणतात.
४) सुपर ब्ल्यू ब्लड मून – ब्ल्यू मून , सुपर मुन आणि संपूर्ण ग्रहण यांना एकत्रितपणे सुपर ब्लड मून असे म्हटले जाते.
विद्यार्थी मित्रांनो आजची तुम्हाला तुमच्या यशाला गवसणी घालण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. आमच्या रोजच्या पोस्टमध्ये रोजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नवनवीन माहिती मिळत जात आहे. आम्ही नुकताच एक व्हाट्सअप ग्रुप सुद्धा आमचा बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. या सर्व गोष्टींचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या ब्लॉग ची लिंक तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या ग्रुपमध्ये पाठवू शकतात. यामुळे तुमच्या सह तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा या सर्वांचा लाभ मिळणार आहे.
धन्यवाद.