Mpsc Nagar Vikas Vibhag Bharti 2024.
MPSC NAGAR VIKAS VIBHAG BHARTI 2024.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नगर रचना व मूल्यमापन सेवा भरती 2024 यात नगर रचनाकार, गट अ व सहाय्यक नगर रचनाकार गट ब पदांच्या एकूण 208 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहिरात व सर्व माहिती आपण पुढील प्रमाणे बघू.
जाहिरात क्रमांक – 050/2024 and 051/2024
संपूर्ण जागा : 208 जागा
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | नगर रचनाकार गट अ | 60 |
2 | सहाय्यक नगर रचनाकार गड ब | 148 |
संपूर्ण जागा | 208 |
पद क्रमांक एक साठी लागणारी पात्रता. | नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाचे शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी आवश्यक आहे. |
पद क्रमांक दोन साठी लागणारी पात्रता | नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी. |
01 फेब्रुवारी 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय/अनाथ/ आ.दु.घ – 5 वर्षे सूट )
पदासाठी नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र ( महाराष्ट्रात कोठेही )
परीक्षेसाठी लागणारी फी पुढील प्रमाणे –
पद क्रमांक एक साठी लागणारी फी | – खुला प्रवर्ग 719 रुपये. ( मागासवर्गीय/ अनाथ/ दिव्यांग / आ. दु. घ. – 449 रुपये ) |
पद क्रमांक दोन साठी लागणारी फी | – खुला प्रवर्ग 394 रुपये. ( मागासवर्गीय/ अनाथ/ दिव्यांग / आ. दु. घ. – 294 रुपये ) |
ऑनलाइन (online ) अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 4 नोव्हेंबर 2024.
पदासाठीच्या महत्त्वाच्या लिंक पुढील प्रमाणे.
पदाची जाहिरात PDF स्वरूपात –
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक – CLICK HERE
ऑफिशियल वेबसाईट LINK – CLICK HERE
अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज पात्र ठरविण्यात येईल.
विद्यार्थी मित्रांनो नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WHATS APP LINK – CLICK HERE
TELEGRAM LINK – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो आज आमची टीम एक नवीन टॉपिक घेऊन येत आहे.
आज तुम्ही शिकणार आहात कृषी विभागाच्या योजनांबाबत. चला तर मग बघूया या योजना आहेत पुढील प्रमाणे.
पहिली योजना
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, महाराष्ट्र
मित्रांनो शेतकरी अवकाळी पावसामुळे व वादळ गारपीट मुळे पहिलेच हताश झालेला असतो. काही वेळेस त्याच्या हाती शून्य उत्पन्न लागते. त्यांनी उभ्या केलेल्या शेतीला आधीच खूपच मशागत खर्च त्यांनी केलेली असते. त्यात म्हणजे पंपांना लागणारे डिझेल त्या डिझेल ला लागणारा खर्च यामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक स्थिती पूर्णपणे खालावून गेलेली असते.
काही शेतकरी डिझेल पंपाचा वापर न करता इलेक्ट्रिक पंपाचा वापर करतात. इलेक्ट्रिक पंपामुळे विजेचे थकीत वीज बिल त्यांना चिंतदायक ठरते. काही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे ते विज बिल भरू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यावर वीज बिलाचे ओझे वाढत जाते. या वाढत्या ओझ्यांचे ओझे कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 साली सुरू करण्यात आली.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून देण्यात आले. राज्य सरकार या सौर पंप योजना अंतर्गत पंप किंमतीच्या 95 टक्के अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले. लाभार्थी शेतकरी केवळ पाच टक्के रक्कम खर्च करेल असे या योजनेत तरतूद केली आहे. या सौर पंपामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न तर वाढेलच आणि त्यात जास्त किंमत त्यांना खरेदी करावा लागणार नाही. त्यांच्या पैशांची बचत होईल व त्यांची प्रगती होत जाईल. हे सर्व पंप शेतकऱ्याला मिळाल्यामुळे भविष्यात प्रदूषणाचे प्रमाण हे बऱ्याच प्रमाणात कमी होईल. डीजल मुळे होणारे प्रदूषण खूप वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलची बचत या सौर पंपामुळे होईल. तसेच शेतकरी इलेक्ट्रिक पंप वापरतात आणि हे इलेक्ट्रिक पंप जर कमी झाले तर त्यामुळे सरकारचा अतिरिक्त वीज भार सुध्धा कमी होण्यास मदत होईल. तसेच जुने डिझेल पंप नवीन सौर ऊर्जा पंपात बदलले जातील. महत्त्वाचे म्हणजे सिंचन क्षेत्रात विजेसाठी महाराष्ट्र शासना कडून दिले जाणारे अनुदान देखील कमी होईल.
ही सौर पंप योजना मिळवण्यासाठी खालील वेबसाईटवर जाऊन शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करावे.
वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा CLICK HERE
दुसरी योजना
मागेल त्याला शेततळे योजना.
सध्याची घडी लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला की मागेल त्याला शेततळे देण्यात येईल. कारण पावसाचे पडणारे अल्प प्रमाण त्यामुळे पडणारा मोठा दुष्काळ व त्यामुळे होणारे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे सर्व बघितल्यावर महाराष्ट्र शासनाने हाच निर्णय घेतला की मागेल त्याला शेततळे देण्यात येईल. शेतकऱ्याच्या जमिनीला नियमित अखंड पाणीपुरवठा होण्यासाठी हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे.
9 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही शेततळे योजना मंजूर करण्यात आली होती. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र जलसंधारण मंडळासाठी दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली. खूप महत्वकांक्षी योजना शासनाद्वारे राबविल्या जात आहे. या योजनेत राज्यातील पाणीटंचाईग्रस्त, संकटग्रस्त जिल्ह्यांमधील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला.
या योजनेत जास्तीत जास्त 30 × 30 × 3 मीटर या आकारमानाचे व कमीत कमी इनलेट आणि आऊटलेट सह प्रकारामध्ये किमान 15 × 15 × ३ मीटर या आकारमानाचे शेततळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी घेता येईल. तसेच शेतकरी मित्रांनो यात इनलेट आउटलेट विरहित प्रकारांमध्ये किमान 20 × 15 × 3 मीटर या आकारमानाचे शेततळे शेतकरी बांधवांना घेता येते.
या शेततळ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसाठी खूप मोठे वरदान ठरणार आहे. शेतीचे पालन पोषण हे पाण्यामुळेच होऊ शकते. पाणी जर नसले तर पिकांमध्ये जीवच राहणार नाही. जमिनी ओसाड पडतील. शेतकरी उत्पन्न घेऊ शकणार नाही. आणि सर्वीकडे अन्नाचा तुटवडा पडेल. ही अशी मोठी जोखीम निवारण्यासाठी राज्य शासनाने खूप मोठा निर्णय घेतला आहे. मागेल त्याला शेततळे ही स्कीम शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.
मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी देण्यात येणारे अनुदान पुढीलप्रमाणे.
मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत 30 × 30 × 3 मीटर शेततळ्यासाठी पन्नास हजार रुपये इतके कमाल अनुदान राज्य शासना मार्फत या योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आले होते.
मागेल त्याला शेततळे ही योजना मागणीसाठी जवळपास पाच शेतकऱ्यांचा गट करून सामुदायिक रित्या शेततळ्याची मागणी करता येईल.
शेत तळ्यांचा आकारमान राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे लागू असलेल्या आकारमानानुसार राहील हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.
सगळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिळणाऱ्या अनुदान व पाण्याचा वापर, पाण्याचे हिस्से वारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करावा आणि शेतकरी मित्रांनी तो अर्ज सोबत सादर करणे अनिवार्य राहील.
शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी पुढील वेबसाईटचा वापर करावा.
वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा CLICK HERE
तिसरी योजना
पोखरा अंतर्गत गोळ्या पाण्यातील मत्स्य पालन योजना 2023
शेतकरी मित्रांनो कोरडवाहू शेतीसाठी संरक्षित सिंचनाकरिता मुख्यतः विहीर गावतडे, पाझर तलाव, सामुदायिक शेततळे किंवा वैयक्तिक शेततळे याद्वारे पाणी उपलब्ध करतात.
याच सिंचना बरोबर शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून गोळ्या पाण्यातील मस्त शेती केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात खूप वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांना या उत्पन्नातून भरघोस रक्कम मिळू शकते. त्यामुळे त्यांच्या राहणीमान जीवनमान उंचावन्यास त्यांना खूप मोठी मदत होईल.
त्यामुळेच जागतिक बँक अर्थसहित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत एकात्मिक शेती पद्धती या घटकांतर्गत शेतकऱ्यांच्या शेततळ्यात गोड्या पाण्यातील मत्स्य पालन हा लाभांच्या घटकांमध्ये समाविष्ट केलेला आहे.
मित्रांनो या योजनेसाठी अनुदान पुढीलप्रमाणे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत एकात्मिक शेती पद्धती यात गोड्या पाण्यातील मत्स्य पालन साठी प्रती हेक्टर आकारानुसार येणारे एकूण खर्चाच्या रकमेच्या 50% अर्थसाह्य शेतकऱ्यांना देण्यात येईल असे नियोजन करण्यात आलेले आहे.
शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील वेबसाईटवर आपली ऑनलाइन नोंदणी अर्ज करून कागदपत्रे अपलोड करावी.
वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा CLICK HERE
चौथी योजना.
एक रुपयात पिक विमा योजना.
शेतकरी मित्रांनो सरकार कडून शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा देण्याचा प्रस्तावास मंजुरी देण्यात आली होती. या निर्णयामुळे शेतकऱ्याला एक रुपयात पिक विमा मिळणार आहे. योजनेसाठी अंदाजे जवळपास 3312 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आले आहे असे संकल्प सादर करताना त्यांनी सांगितल.
माहिती जाणून घेण्यासाठी पुढील वेबसाईटवर लॉगिन करावे.
वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा CLICK HERE
पाचवी योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना. (महाराष्ट्र राज्य)
शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारने कृषी विषयक अवजारे आणि त्यासाठी लागणारे यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
यात अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचा लाभ व्हावा हेच मुख्य उद्दिष्ट या योजनेचे आहे.
शेतकरी मित्रांची ही शेती विषयक कामे अधिक सुखरपणे करण्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरते.
या शेतकऱ्यांना जमीन सुधारणा, पूर्व मशागत अवजारे, पेरणी, लागवड, आंतरमशागत यंत्र, पीक संरक्षण अवजार, काढणी, असे अनेक शेतीचे कामे शेतकरी मित्रांची जलद गतीने होण्यासाठी हे यंत्र विकत घेण्यासाठी राज्य शासनाने अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेतला होता. गरीब शेतकरी व गरजू शेतकऱ्यांसाठी शेतीची कामे कमी वेळात होण्यासाठी ही योजना लाभदायक ठरणार आहे. राज्य शासनाने म्हणूनच या कृषी यांत्रिकीकरणाला प्राधान्य दिलेले आहे. राज्य सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना 50% तर इतर शेतकऱ्यांना 40 टक्के कृषी यांत्रिकीकरणाला अनुदान देण्याचे ठरवले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो या योजना बघता शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने खूप छान निर्णय घेतला आहे हे दिसून येते. शेतकरी राजा हा पुन्हा जगाचे पोषण करता आहे. आणि त्याला जगाचे पोषण करण्यासाठी खूप हाल भोगावे लागतात. त्यासाठी राजाची मदत करणे आपले कर्तव्य आहे. शेतकरी राजा जगला तर जग जगेल. शेतकऱ्याला दैनंदिन शेतीकामात यंत्रसामग्रीचे खूप मोठ्या प्रमाणात गरज भासते. नंतर सामग्री काळानुसार महागच होत चालले आहे. त्यामुळे ही महाग यंत्र सामग्री घेणे शेतकऱ्याच्या कल्पने पलीकडची गोष्ट आहे. हीच बाब लक्षात घेता सरकारने शेतकऱ्यांसाठी ही योजना आणल्यामुळे त्यांच्या जीवनात सुखाचे क्षण वाढत जातील आणि त्यांचे काम करण्याची उम्मिद सुद्धा वाढत जाईल.
राज्य शासनाच्या देण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर अनुदानासाठी शेतकरी मित्रांनी पुढील वेबसाईट वर जाऊन अर्ज करावा.
वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा CLICK HERE