MPSC Maharashtra Services Group C Combined PRE – Examination 2024.
मित्रांनो आपण आता पहिले जाणून घेऊया महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे नेमके काय आहे.
भारतीय राज्यघटनेने कलम 315 अन्वये अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार व आरक्षणाच्या नियमानुसार महाराष्ट्र राज्यातील नोकऱ्यांसाठी अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा स्थापन करण्यात आला.
आता या आयोगामार्फत पुढील पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ते पद कोणते हे आपण जाणून घेऊया.
उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बेलीफ व लिपिक गट क ( नगरपाल शेरीफ मुंबई यांचे कार्यालय ) , लिपिक -टंकलेखक.
परीक्षेचे नाव व पदाचे नाव आणि तपशील पुढील प्रमाणे.
एमपीएससी मार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदाचा विभाग | पदांची संख्या |
1 | उद्योग निरीक्षक | उद्योग ऊर्जा व कामगार विभाग | 39 |
2 | कर सहाय्यक | वित्त विभाग | 482 |
3 | तांत्रिक सहाय्यक | वित्त विभाग | 09 |
4 | बेलीफ व लिपिक गट क | विधी व न्याय विभाग | 17 |
5 | लिपिक टंकलेखक | मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, तसेच राज्य शासनाचे महाराष्ट्रातील विविध कार्यालय. | 786 |
संपूर्ण जागा | 1333 |
अनुक्रमांक | ||
1 | पद क्रमांक एक साठी पात्रता. | सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा. |
2 | पद क्रमांक दोन साठी पात्रता. | 1) पदवीधर २) मराठी टंखलेखन 30 शब्द प्रति मिनिट. व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट. |
3 | पद क्रमांक तीन साठी पात्रता. | १) पदवीधर |
4 | पद क्रमांक चार साठी पात्रता. | १) पदवीधर २) मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट. |
5 | पद क्रमांक पाच साठी पात्रता. | १) पदवीधर २) मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट. |
1 फेब्रुवारी 2025 रोजी (आ.दू.घ,/अनाथ/मागासवर्गीय – पाच वर्षे सूट)
पद क्रमांक एक साठी वयाची अट. – 19 ते 38 वर्षे.
पद क्रमांक दोन साठी वयाची अट. – 19 ते 38 वर्षे.
पद क्रमांक तीन साठी वयाची अट. – 18 ते 38 वर्षे.
पद क्रमांक चार साठी वयाची अट. – 19 ते 38 वर्षे.
पद क्रमांक पाच साठी वयाची अट. – 19 ते 38 वर्षे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (महाराष्ट्रात कोठेही.)
पदासाठी लागणारी फी पुढील प्रमाणे : खुला प्रवर्ग 394 रुपये. (मागासवर्गीय/ आ.दु घ/ अनाथ : 294 रुपये.)
परीक्षा केंद्र बाबतीत माहिती : महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रात.
महत्त्वाच्या तारखा :
1)ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2024.
2) पूर्व परीक्षा तारीख : 2 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक व PDF पुढील प्रमाणे
जाहिरात नोटिफिकेशन PDF – DOWNLOAD PDF
OFFICIAL WEBSITE – CLICK HERE
ऑनलाइन अर्ज भरण्याची लिंक – CLICK HERE
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या EXAMSDETAILS व्हाट्सअप ग्रुप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.
- व्हाट्सअप ग्रुप लिंक – CLICK HERE.
- टेलिग्राम ग्रुप लिंक – CLICK HERE.
मित्रांनो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही चालू घडामोडींचा अभ्यास केला. आजही तुमच्यासाठी आमची टीम एक नवीन विषय तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. तुमचा सर्वांगीण चालू घडामोडी विषयात विकास होण्यासाठी तुम्हाला आमची टीम सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यास तत्पर आहे. आजही आम्ही तुमच्यासाठी काही चालू घडामोडी विषयी या ब्लॉगमध्ये ऍड केलेले आहे. ते वाचून झाल्यानंतर याचा फायदा आपल्या मित्रांनाही व्हावा यासाठी या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करू शकतात.
धन्यवाद जय हिंद.
- जागतिक ब्रेल दिवस हा 4 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. हा दिवस अंध बांधवांसाठी खूप खास आहे. कारण या दिवशी अंधांच्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या लुई ब्रेल यांचा जन्म झाला होता. ब्रेल लिपीचा जन्म हा लुई ब्रेल यांनी केला. या लिपीमुळेच अंध व्यक्तीं हे लिहू व वाचू शकतात आणि त्यांच करिअर घडवू शकतात.
- Lancet अभ्यासानुसार भारतात एकूण 20 लाख कॅन्सर मृत्यूची नोंद नोंदवल्या गेलेले आहे. आशियामध्ये भारत हा कॅन्सर मृत्यूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात सन 2019 मध्ये 12 लाख नवीन कॅन्सर प्रकरणे दिसून आली आणि त्यात 9.3 लाख मृत्यूची नोंद झालेली दिसून आली. तसेच 2019 साली चीनचा यात पहिला नंबर होता. 2019 साली आशियातील चीन भारत आणि जपान रुग्ण आणि मृत्यूच्या संख्या बाबतीत आघाडीवर आहेत.
- महाराष्ट्र राज्याने दरवर्षी 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. 15 जानेवारी हा कुस्तीगीर शाखा बा जाधव यांच्या जयंतीनिमित्त निवडण्यात आला. खाशाबा जाधव हे 1952 मध्ये ऑलम्पिक मध्ये स्वतंत्र पदक जिंकणारे पहिले भारतीय होते. फिनलँड मधील हेलसिंकी येथे 1952 च्या उन्हाळी ऑलिंपिक मध्ये खाशाबा जाधव यांनी कांस्यपदक जिंकले होते.
- दरवर्षी राष्ट्रीय डॉल्फिन दिवस आता 5 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येईल.
- दरवर्षी आता आंतरराष्ट्रीय बायोस्फियर दिवस तीन नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येईल.
- दरवर्षी आता मैत्री दिवस असा डिसेंबर रोजी साजरा करण्यात येईल.
- दरवर्षी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस हा 16 जानेवारी रोजी साजरा करण्यात येईल.
- दरवर्षी आता वीर बाल दिवस हा 26 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येईल.
*23 जानेवारी हा दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. - 15 नोव्हेंबर हा जनजाती गौरव दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येईल.
- सात ऑगस्ट हा दिवस दरवर्षी भालाफेक दिवस म्हणून साजरा करण्यात येईल.
- एक मे रोजी उज्वला दिवस हा दरवर्षी साजरा करण्यात येईल.
- तर वर्षी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा करण्यात येईल.
- जम्मू काश्मीर हे राज्य PM विश्वकर्मा योजना लागू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश बनले आहे. पीएम विश्वकर्मा योजना ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे. ही योजना लॉन्च 17 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आली. गुरु शिष्य परंपरेला किंवा पारंपारिक कौशल्यांच्या कौटुंबिक आधारित सरावाला बळकट करणे आणि त्यांचे पालन पोषण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. कारण कारागीर त्यांच्या हातांनी आणि साधनांनी काम करतात. या विश्वकर्मासाठी प्रतिदिन 500 चे स्टायपेंड आणि 15000 किमतीचे मोफत आधुनिक टूलकिट देण्याचा समावेश केला आहे.
- जम्मू काश्मीर याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा 31 ऑक्टोबर 2019 रोजी देण्यात आला होता. त्याचे उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा. जम्मू काश्मीरची राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू.
तेथील राष्ट्रीय उद्याने आहे सलीम अली आणि दचीगाम.
जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे महत्त्वाची धरणे बाग्ली हार आणि उरी हे आहेत. - ब्रिक्स चे मेंबर ब्राझील, रशिया, भारत, चीन , साऊथ आफ्रिका,
आताचे नवीन मेंबर इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, युनायटेड अरब एमिरेट्स हे आहेत. - महत्त्वाचे चॅम्पियनशिप स्पर्धा पुढीलप्रमाणे.
डेव्हीस कप 2023 हे चॅम्पियनशिप इटली या देशाने जिंकली.
फिफा अंडर 17 विश्वचषक 2023 हे जर्मनी या देशाने जिंकले.
2023 ची विजय हजारे ट्रॉफी हे हरियाणा या देशाने जिंकले.
कनिष्ठ हॉकी विश्वचषक 2023 ही जर्मनी या देशाने जिंकली.
26 वी जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2023 ही फ्रान्स या देशाने जिंकली.
2023 ची पाचवी टेनिस प्रीमियर बेंगळुरू मेव्हेरिक्स याने जिंकली.
2023 चा 20 वा फिफा क्लब विश्वचषक मँचेस्टर सिटी यांनी जिंकले. - फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन हॉस्पिटॅलिटी (FAITH) चे चेअर एमडी आणि सीईओ म्हणून पूनित छटवाल यांची नियुक्ती करण्यात आली.
- भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरीया यांची निवड करण्यात आली.
- प्रवीण मधुकर पवार यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो चे महासंचालक म्हणून निवड करण्यात आली.
- अशोक वासवानी यांची कोटक महिंद्रा बँक एमडी आणि सिंह पदी नियुक्ती करण्यात आली.
- राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षपदी वासुदेव देवनानी यांची नियुक्ती करण्यात आली.
- पावर ग्रिड कॉर्पोरेशन चे नवीन सीएमडी हे रवींद्र कुमार त्यागी आहेत.
- BSE चे नवीन अध्यक्ष म्हणून प्रमोद अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली.
- डॉक्टर अरविंद पणगरिया यांची 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.
- जगातील सर्वात मोठा दहा लक्ष टन लिथियमचा साठा अमेरिका या देशात सापडला. लिथियम चा अनुक्रमांक ३ आहे आणि अनु वजन हे 6.941u हे आहे.
- जयपुर या शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या तीन दिवसीय वार्षिक परिषदेला उपस्थित राहणार आहेत. याचे उद्दिष्ट हे आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता, वामन ते अतिरेकी, आणि अमली पदार्थांच्या तस्करीमुळे निर्माण होणाऱ्या आव्हाने यांचा विचार करणे, दहशतवाद विरोधी या आव्हानावर सुद्धा विचार करणे.
- शितलदेवी यांना जागतिक तिरंदाजी पुरस्कार मिळाला. या जम्मू काश्मीर या केंद्रशासित राज्याच्या आहेत. २०२३ साली.
- बी आर कंबोज यांना एम एस स्वामीनाथन जानेवारी 2024 च्या पुरस्काराने सन्मानित केले. ते हरियाणा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. या पुरस्काराचे कारण की कृषी विज्ञान क्षेत्रातील शास्त्रज्ञ आणि विस्तार तज्ञ म्हणून त्यांनी दिलेल्या त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- *विवेक श्रीवास्तव यांचे अग्निशमन सेवा, नागरिक संरक्षण आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- मित्रांनो आता आपण महासंचालक बघूया.
- NSG चे महासंचालक एम ए गणपती हे आहेत.
- itbp चे महासंचालक राहुल रसगोत्रा आहेत.
- SSB चे महासंचालक रश्मी शुक्ला हे आहेत.
- RAW महासंचालक रवी सिन्हा हे आहेत.
- आयबीचे महासंचालक हे तपन कुमार डेका हे आहेत.
- व्हिएतनाम या देशाने भारताच्या लेह लडाख सोबत देशाच्या लॅमडोंग शहरासोबत ऐतिहासिक सांस्कृतिक आणि पर्यटन करार केला.
- चीनचे संरक्षण मंत्री म्हणून डोंग जून यांचे नियुक्ती करण्यात आली.
- म्यानमार या देशाला भारताची ही चार राज्य मिझोरम मणिपूर नागालँड आणि अरुणाचल प्रदेश हे लागून आहेत.
- केरळ राज्यातील राष्ट्रीय उद्याने पुढील प्रमाणे – इरवीकुलम, मठी केतन, अनमुडी, पाम बदुम, पेरियार, सायलेंट व्हॅली.
- उधमपूर राज्याने विकसित भारत संकल्प यात्रा यात 100% संपृक्तता प्राप्त केली.
- उत्तर प्रदेश येथे देशातील मुलींसाठी पहिली मिलिटरी स्कूल सुरू करण्यात आली.
या उत्तर प्रदेश राज्यातील मुलींसाठी पहिले मिलिटरी स्कूलचे नाव आहे संविद गुरुकुलम बालिका. - नासा इम्पॅक्ट प्लॅनेट अवॉर्ड हा सुजित रॉय यांना देण्यात आला.
- इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा अली अबू आणि डॅनियल ब्यारेन बोईम यांना देण्यात आला.
- सायबर गुन्हा – गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारी नुसार सर्वाधिक सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत तेलंगणा हे राज्य आहे.
सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रकार खूप वाढले आहे. सायबर गुन्हा हा संगणक आणि नेटवर्कद्वारे केला जातो. भारत देशातील तेलंगणा महाराष्ट्र बिहार आणि उत्तर प्रदेश - हे सायबर क्राईम हॉटस्पॉट आहेत.
- तसेच फेक प्रोफाइल चे सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात नोंदवली गेलेली आहे.
- आणि बिहारमध्ये तर सर्वाधिक ATM फसवणुकीचे प्रकार नोंदवल्या गेले.
- आपण सर्वांनी सावधगिरी बाळगणे खूप महत्त्वाचे झाले आहे. कारण कधीही केव्हाही आपल्यावर सुद्धा ही सायबर अटॅक होऊ शकतो. आपली फसवणूक होऊ शकते त्यासाठी आपण अलर्ट असायला हवे. आणि कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवणे टाळले पाहिजे. आपण कधीही व्हाट्सअप द्वारे पाठवला गेलेल्या किंवा टेक्स्ट मेसेज द्वारे पाठवल्या गेलेल्या लिंक वर क्लिक करू नये. अमिषाला बळी जाणे हे थांबवले पाहिजे.