Maharashtra Group B {Non Gazetted} Service Combined Pre – Examination 2024. MPSC RECRUITMENT 2024 POST 480.
Maharashtra Group B {Non-Gazetted} Service Combined Pre – Examination 2024.
विद्यार्थी मित्रांनो तुमचे प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच भरती ची जाहिरात जाहीर केलेली आहे. त्यात मुख्यतः तीन पद दिसून येतील ते पदे पुढील प्रमाणे- पहिले पद सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब, राज्य कर निरीक्षक गट ब, पोलीस उपनिरीक्षक गट ब.
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसभा आयोग ही भारतीय राज्यघटनेने कलम 315 अन्वये गुणवत्तेनुसार व आरक्षण नियमानुसार नोकऱ्यांसाठी अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी स्थापन केलेली संस्था आहे.
जाहिरात क्रमांक – 048/2024
परीक्षेचे नाव पुढील प्रमाणे. महाराष्ट्र गट ब ( अराजपत्रित ) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024.
संपूर्ण जागा 480.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | जागांची पद संख्या |
सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब | 55 | |
राज्य कर निरीक्षक गट ब | 209 | |
पोलीस उपनिरीक्षक गट ब | 216 | |
संपूर्ण जागा | 480 |
पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे.
1 )पद क्रमांक एक साठी लागणारी पात्रता – पदवीधर.
2) पद क्रमांक दोन साठी लागणारी पात्रता – पदवीधर.
3) पद क्रमांक तीन साठी लागणारी पात्रता –
a) पदवीधर.
b) उंची पुरुष- 165 सेंटीमीटर. उंची महिला – 157 सेंटीमीटर.
c) छाती पुरुष – 79 सेंटीमीटर.
पदासाठी असणारी वयाची अट पुढील प्रमाणे.
1 फेब्रुवारी 2025 रोजी ( मागासवर्गीय /आ.दू.घ,/ अनाथ – पाच वर्षे सूट )
- पद क्रमांक एक साठी वयाची अट. 18 ते 38 वर्षे.
- पद क्रमांक दोन साठी वयाची अट. 18 ते 38 वर्ष.
- पद क्रमांक तीन साठी वयाची अट. 19 ते 31 वर्षे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र ( महाराष्ट्रात कोठे ही)
पदासाठी लागणारी फी पुढील प्रमाणे. – खुला प्रवर्ग 394 रुपये. (मागासवर्गीय/ आ.दु घ/ अनाथ : 294 रुपये.)
पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी केंद्र संख्या – महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्र.
महत्त्वाच्या तारखा पुढील प्रमाणे –
- ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2024
- पूर्व परीक्षा तारीख – 5 जानेवारी 2025.
महत्वाच्या लिंक व PDF पुढील प्रमाणे –
जाहिरात नोटिफिकेशन PDF | DOWNLOAD PDF |
ऑनलाइन अर्ज भरण्याची लिंक | CLICK HERE |
ऑफिशियल वेबसाईट | CLICK HERE |
विद्यार्थी मित्रांनो परीक्षा संदर्भातील नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला लवकर जॉईन व्हा
WHATS APP LINK – CLICK HERE
TELEGRAM LINK – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो इतिहासात आपण बघितले पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. या तीन युगांमध्ये मानवाची जडणघडण कशा प्रकारे झाली हे आपण पाहिले. त्याचा प्रत्येक युगामध्ये झालेला बदल हा त्याच्या हुशार बुद्धीचे गमकच आहे. जीवन जगण्यासाठी त्याने टोळी करून राहण्याचा निर्णय घेतला. होळी करून राहण्याने त्याचे जीवनात भरभराट झाली. कारण एकत्रित रित्या राहिल्याने आणि गाव वसवल्याने त्याला हिंस्र प्राण्यांपासून आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यास मदत झाली. शेतीमध्ये त्याचे झालेले प्रगती आपण नवाश्मयुगात बघितली. मानवा प्रत्येक युगाच्या टप्पा टप्प्यात प्रगती करत आलेला आहे.
तिघायुगांचा अभ्यास झाल्यानंतर आता आपण येऊ या संस्कृतिंकडे त्यापैकी एक संस्कृती म्हणजे “सिंधू संस्कृती“.
सिंधू संस्कृती आपल्याला बघायला मिळते इसवी सन पूर्व 2500 आणि इसवी सन पूर्व 1700 या दरम्यान.
चला तर मग आपण याबद्दल आता माहिती घेऊया.
सुमारे 5000 वर्षांपूर्वी माने संस्कृती ही नद्यांच्या काठी निर्माण झाले. या नद्या होत्या तैग्रीस, नाईल नदी, सिंधू नदी, हो हँग हो नदी.
या चार नद्यांच्या काठी मानव संस्कृतीचा उदय झाला.
पहिली नदी तैग्रीस आणि युफ्रेटीस या दोन नद्यांच्या बाजूला म्हणजेच काठी मेसोपोटेमिया संस्कृती उदयास आली.
दुसरी नदी NAIL या नदीच्या काठी इजिप्त संस्कृती उदयास आली.
तिसरी नदी सिंधू नदीच्या काठी सिंधू संस्कृती उदयास आली.
चौथी नदी हो हँग हो नदीच्या काठी चिनी संस्कृतीचा उदय झाला.
त्या काळात चार संस्कृतीचा उदय आपल्याला बघायला मिळतो.
तर मित्रांनो या संस्कृती फक्त नदीच्या काठी का वसले याचे कारण तुम्हाला माहित आहे का?
खर तर याचे कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे तरी सर्वांना सांगतो नदीच्या बाजूला नदीच्या काठी गाळाची व सुपीक जमीन/ माती निर्माण होते. हे माती शेती करण्यास खूप पोषक ठरते. व नदीच्या काठी पोषक वातावरण व पाण्याचा वापर करून मानव तेथे शेतीचे उत्पादन घेऊ लागला.
शेतीचे उत्पन्न वाढल्यामुळे त्यांनी शेती कार्यास पूरक व्यवसाय करण्यास सुरुवात केली. ते व्यवसाय म्हणजे घरांची निर्मिती, धातू उद्योग इत्यादी प्रकारचा व्यवसाय करण्यास त्यांनी सुरुवात केली.
या व्यवसायामुळे या वस्तू घेण्यासाठी देवाणघेवाणीसाठी मोठ्या प्रमाणात समुदाय एकत्र येऊन राहू लागला. या एकत्र येऊन राहण्यामुळेच तेथे “नागरी संस्कृती” ची निर्मिती झाली.
मित्रांनो आता आपण बघूया सिंधू संस्कृतीचा शोध कसा लागला.
1826 मध्ये चार्ल्स मेसन याने सिंधू संस्कृतीचा पहिला उल्लेख केला. परंतु विद्यार्थी मित्रांनो 1920 आणि 21 साली जेव्हा लाहोर मुलतान रेल्वेसाठी खोदकाम चालू होते तेव्हा तेथे विटा, मुद्रा, व पुरातत्वीय अवशेष सापडले.
हे अवशेष सापडल्यामुळे त्या ठिकाणी पुरातत्त्व विद्वानांच्या परिश्रमपूर्वक उत्खनामुळे एक अशा प्राचीन संस्कृती चा शोध लागला त्यालाच सिंधू संस्कृती नाव देण्यात आले.
पुरातत्व विद्वानांच्या यादीतील नावे पुढीलप्रमाणे.
१) जॉन मार्शल.
२) दयाराम सहानी,
३) राखालदास बॅनर्जी.
४) माधव स्वरूप वत्स.
हडप्पा या शहराचा शोध उत्खननाद्वारे दयाराम सहानी यांनी 1921 मध्ये लावला.
हडप्पा हे शहर सिंधू संस्कृतीमधील सर्वप्रथम उत्खननद्वारे आढळून आलेले पहिले शहर होते. सिंधू संस्कृती मध्ये हडप्पा शहरातील लक्षणे होते ती लक्षणे या शहरात आढळत असल्यामुळे सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे संबोधले जाते.
आता आपण बघूया सिंधू संस्कृतीतील वैशिष्ट्ये – ढोलीविरा, मेहरगड, रोपड, सुरकोटडा , हडप्पा, मोहेंजोदडो, रंगपुर, कालिबंगण, दायमाबाद, चंदुहडो, या अशा चारशेहून अधिक ठिकाणांच्या उत्खननातून मिळालेल्या अवशेषांवरून पुढील वैशिष्ट्ये दिसून येतात.
१) ही संस्कृती ताम्रपाषाण युगीन आहे.
२) सिंधू संस्कृती हे व्यापार प्रधान व एक नागरिक संस्कृती होती.
३) या सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला धार्मिक वैमन्यासाचा व सामाजिक वैमन्यासाचा अभाव दिसून येतो.
४) इतर संस्कृतींमध्ये सिंधू संस्कृतीचे व्यापारिक संबंध असल्याचे उत्खनात मिळालेल्या पुरावांवरून आपल्याला दिसून येते.
५) हिंदू संस्कृतीतील लोक हुशार होते म्हणजे त्यांना लिपी अवगत होते व त्या लिपीचे ज्ञान सुद्धा अवगत होते.
६) ही सिंधू संस्कृती ही शांतप्रिय संस्कृती होती व या संस्कृती मध्ये मंदिरांचा अभाव दिसून आला.
७) या संस्कृतीच्या सर्व नगरांना तटबंदी दिसून आली व त्यांच्या वजन मापात समानता दिसून आली.
८) या सिंधू संस्कृतीमध्ये महत्त्व हे नगर नियोजनास होते.
या पुढारलेल्या संस्कृतीचा ऱ्हास होण्याची कारणे प्रत्येक इतिहासाकाराने विविध मतांनी नोंदवलेली आहे. त्यांचे मत असे होते की हवामानातील बदल, सिंधू नदीच्या प्रवाहाच्या दिशेत बदल, त्या काळचा दुष्काळ आणि यामुळेच तेथील रहिवासी लोकांनी केलेले स्थलांतर त्यामुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाला असेल असे मत इतिहासकारानी नोंदवले.
त्या काळात परकीय आक्रमण खूप मोठ्या प्रमाणात व्हायचे. त्यामुळेच कदाचित इतिहासकारांना वाटत आहे की आर्यांच्या आक्रमणामुळे, भूकंपासारख्या आपत्तीमुळे, व्यापारातील मंदीमुळे ही संस्कृती नष्ट पावली असेल.
इतिहासकारांनी नोंदवले की इसवी सन पूर्व 1750 च्या दरम्यान या सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाला.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया ताम्रपाषाण युग.
तांब्याचा वापर करून कृषीप्रधान संस्कृती ही सिंधू संस्कृतीच्या उत्तर काळात महाराष्ट्रात निर्माण झाल्या. कृषीसाठी वापरण्यात येणारे अवजारे व हत्यारे हे ताम्र म्हणजेच तांबे या धातू पासून संयुक्त वापरण्याने बनायचे त्यामुळेच या कालखंडाला ताम्र पाषाण युग असे म्हणतात.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया महाराष्ट्रातील ताम्र पाषाण स्थळे व कालखंडे – चांदोली , नेवासे, सोनगाव, प्रकाशे, टेकवडा, सावळदा , बहाळ, दायमाबाद, या अश्या शहरांमध्ये खेड्यांमध्ये महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत.
या ताम्र पाषाण युगाचा कालखंड हा सुमारे इसवी सन पूर्व 2200 ते इसवी सन पूर्व 1000 असा मानण्यात येतो.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया ताम्र पाशान युगाचे वैशिष्ट्ये.
तांब्यापासून युगात गृहरचना ही योजनाबद्ध व उत्कृष्ट होती. त्या युगातील घरे गोलाकार तसेच आयताकृती होते. यात कुडाच्या भिंतींचा वापर आयताकृती घरांमध्ये होत असे. आणि गोलाकार घरे ही झोपड्या सारखे असत. या युगातील उत्कृष्ट घराचा नमुना म्हणजे भाजलेला विटांचा वापर या घरात केल्या जाईल.
तसेच या युगात पक्की भाजलेली व पातळ पृष्ठभागाचे भांडे असत. या भांड्यांचा पृष्ठभाग तांबड्या रंगाचा लेप लावून तसेच काळया रंगाने नक्षी काम केलेले असायचे. यात गोलाकार भांडे, वाडगे, लोटा उथळ तळाची भांडी होती. त्या भांड्यांवर नक्षीकाम करून केलेले दिसते. त्या नक्षीमध्ये त्या चित्रांमध्ये हरीण, मोर, चित्ता, बैल , पक्षी इत्यादीं प्राण्यांचे चित्र आढळले.
या ताम्रपाषाण युगात तांब्याचा वापर हा विविध प्रकारचे अलंकार बनवण्यासाठी होत असे. असे त्यांनी तंत्र सुद्धा विकसित केले होते. या युगातील लोक दगड व हाडांपासून हत्यारे बनवत असत.
तांब्याच्या धातूला वितळवण्यासाठी चालकोपायराईटचा उपयोग करत असे. याचा उपयोग करून त्या युगातील लोक हे तांब्यापासून कुऱ्हाडीचे पाते, टोकदार हत्यारे ,चाकू, बाण, भाल्याचे टोक बनवत असत.
या ताम्रपाषाण विभागात माणसाच्या आहारात शाकाहार व मांसाहार आहार सुद्धा होता. या दोघे आहाराचा ते अन्नामध्ये समावेश करत असे.
या युगातील लोकांच्या स्थायी स्वरूपाच्या वास्तवातून खेडी निर्माण झाल्या या खेड्यांमधूनच ग्रामीण महाराष्ट्राचा आरंभ झाला. या ताम्रपाषाण युगात गहू, तांदूळ, मसूर, मुंग, उडीद, बाजरी इत्यादी प्रकारचे धान्य पिकवल्या जायचे व गाय, बैल, म्हैस इत्यादी प्राणी ते लोक पाळत असे. तसेच मासेमारीचा व्यवसाय सुद्धा या काळात मोठ्या प्रमाणात चालत असे हे दिसून आले. कारण उत्खननात सापडलेल्या मासे पकडण्याच्या गळा वरून तेथे मासेमारीचा व्यवसाय चालत असे दिसून आले.
तसेच या युगात सामूहिक शिकार, प्राण्यांमध्ये झुंज हे खेळ मनोरंजनासाठी प्रचलित होते. या ताम्रपाषाण युगातील लोक मातृ पूजा व प्राणी पूजा करत असत असे उत्खनातून मिळालेल्या पुराव्यांद्वारे दिसून येते.
या युगात तांब्यापासून बनवलेले आभूषणे, शंख शिंपल्या च्या बांगड्या, दगडी मनी व हस्ती दंताची सुध्धा सौंदर्यप्रसाधनांसाठी वापर करत असत. हे लोक अंगठ्या , कर्णफुले , बांगड्या इत्यादी अलंकारांचा वापर करीत असत.
या युगातील लोकांचा मरणोत्तर जीवनावर विश्वास असल्याचे दिसून आले. ते लोग मृतदेह पुरण्यासाठी दफनकुंभ व शवपेटी चा वापर करत असत. मृत व्यक्ती ज्या वस्तू वापरायचा त्या वस्तू त्या मृत व्यक्तीसोबत पुरल्याचे दिसून आलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया महापाषाण युगिन संस्कृती यालाच इंग्लिश मधून MEGALITHIK AGE असे म्हणतात.
MEGALITHIK म्हणजेच महापाषाण. महापाषाण हा शब्द megas म्हणजे मोठा व litho म्हणजे दगड या दोन शब्दांपासून बनला आहे.
विद्यार्थी मित्रांनो या युगात पुरल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या वरती मोठा दगडाचा ढीग व्यवस्थित एका विशिष्ट पद्धतीने ठेवला जाई आणि त्याच्यासोबत पुरल्या जायच्या त्याच्या दैनंदिन जीवनातील वस्तू व आवडी च्या वस्तू. दफनासाठी वापरलेल्या पाषाणाच्या विशिष्ट पद्धतीमुळेच या कालखंडाला पाषाणयुग असे म्हणतात.
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील महापाषाण युगाचा काळ हा इसवी सन पूर्व 1000 वर्षांपूर्वीचा आहे.
युगाला लोह युगिन संस्कृती असे म्हणतात. या लोहगीन म्हणजेच मा पाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष हे धुळे जिल्ह्यातील रंजाळा जळगाव जिल्ह्यातील बहाळ, टेकवाडे तसेच नागपूर जिल्ह्यातील माहूरझरी येथे दिसून आले.