Mahapareshan Nagpur Bharti 2024.
Mahapareshan Nagpur Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती निघालेली आहे. मूड जाहिरात पाहून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
जाहिरातीमधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
पदाचे नाव | अप्रेंटिस (शिकाऊ) |
पदांची संख्या | 46 जागा |
या पदासाठीचे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – दहावी पास आणि आयटीआय इन इलेक्ट्रिशियन ट्रेड/ NCVT.
या पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – 18 ते 38 वर्ष.
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – नागपूर, महाराष्ट्र.
या पदासाठीचे अर्ज पद्धती पुढीलप्रमाणे – याच पदासाठी अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धतीने आहे.
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 15 डिसेंबर 2024 ही शेवटची तारीख आहे.
या पदासाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 डिसेंबर 2024 आहे.
ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठीचा पत्ता पुढीलप्रमाणे – कार्यकारी अभियंता कार्यालय, आरोग्य विभाग, 132 केव्हि उपकेंद्र, मानकापूर कॉम्प्लेक्स, कुणाल हॉस्पिटल समोर, कोरडी रोड, मानकापूर, नागपूर. पिनकोड – 440030.
ऑफिशियल वेबसाइटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE.
या पदाची मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
या पदासाठी अर्ज करण्याची पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया काही राज्यांचे नवीन मुख्यमंत्री त्यांची नावे. दिल्लीचे मुख्यमंत्री अतिशी सिंग मार्लेना हे आहेत. मध्यप्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव आहेत. छत्तीसगड या राज्याचे मुख्यमंत्री विष्णु देव साई आहेत. तेलंगणा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आहेत. झारखंड या राज्या चे नवीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन आहेत. आंध्र प्रदेश या राज्याचे नवीन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आहेत. अरुणाचल प्रदेश या राज्याचे नवीन मुख्यमंत्री पेमा खांडू आहेत. हरियाणा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री नायब सैनी आहेत. मित्रांनो HAL या कंपनीला महा रत्न दर्जा देण्यात आलेला आहे. ही एक सरकारी कंपनी आहे. याचा फुल फॉर्म हा हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हे भारताचे चौदावी महारत्न कंपनी बनलेले आहे. या कंपनीला महारत्न दर्जा भारतीय वित्त मंत्रालयाकडून देण्यात आलेला आहे. याचे निकष पुढीलप्रमाणे – कोणत्याही कंपनीचे मागील तीन वर्षांमध्ये उलाढाल 25000 कोटी पेक्षा अधिक असावी. कोणत्याही कंपनीचा नेट वर्थ हा 15000 कोटी पेक्षा अधिक असावा. कोणत्याही कंपनीचा नफा हा 5000 कोटी पेक्षा अधिक असावा. मनोज कुमार दुबे हे आय आर एफ सी (IRFC) चे नवीन मुख्य कार्यकारी म्हणून त्यांचे निवड करण्यात आली. आय आर एफ सी चा फुल फॉर्म आहे – इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन. दुबई येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड ने पहिले विदेशी कॅम्पस सुरू केलेले आहे. दुबई येथे एक्सपो सिटी मधील इंडियन पॅव्हेलियन मध्ये IIFT ने देशाबाहेर पहिले कॅम्पस सुरू केलेले आहे. यामध्ये दोन्ही IIFT आणि दुबई सरकार एकमेकांना संशोधन प्रकल्प साठी सहकार्य करतील. यामुळे फायदा होणार आहे यूएई मध्ये राहणाऱ्या 3.5 दशलक्ष भारतीयांना. NOYAL टाटा हे टाटा ट्रस्ट चे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. रतन टाटांचे हे सावत्र भाऊ आहेत. रतन टाटांच्या निधनानंतर यांना ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. 11 ऑक्टोबर हा आंतराष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाची थीम गर्ल्स व्हिजन फॉर द फ्युचर होते. तेलंगणा या राज्याची राज्यात जाती आधारित सर्वेक्षणात सुरुवात करण्यात आले आहे. तेलंगणा हे राज्य जाती आधारित सर्वेक्षण करणारे तिसरे राज्य ठरले आहे. या अगोदरचे राज्य पुढीलप्रमाणे – बिहार, आंध्र प्रदेश, या राज्यात जाती आधारित सर्वेक्षण करण्यात आलेले आहेत. या सर्वेक्षणाचे उद्देश पुढील प्रमाणे – समाजातील सर्व जातींच्या लोकांना समान प्रमाणामध्ये संसाधनांचा लाभ मिळावा म्हणून हे जाती सर्वेक्षण करण्यात येते. मित्रहो राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 नुसार सर्वोत्कृष्ट राज्य हे ओडिसा राज्य आहे. याला इंग्रजी मधून म्हणतात नॅशनल वॉटर अवॉर्ड. सी आर पाटील हे केंद्रीय जलशक्ती मंत्री आहे यांनी पुरस्कार हा जाहीर केला. हा पुरस्कार एकूण 9 श्रेणीमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय जल पुरस्कारात सर्वोत्कृष्ट राज्य हे पहिले ओडिसा राज्य आहे त्यानंतर दुसरे राज्य उत्तर प्रदेश आहे. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हा हा विशाखापट्टणम आहे तो आंध्र प्रदेश या राज्यातील आहे. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गाव हे पूल्लंमपूरा आहे. ते गाव केरळ मधील आहे. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक स्वराज्य संस्था पहिले सुरत आहे, दुसरे पुरी आहे जे ओडिसा राज्यातील आहे, तिसरे आहे पुणे जे महाराष्ट्र राज्यातील आहे. बेस्ट वॉटर युजर असोसिएशन – पेनटाकळी प्रकल्प हा बुलढाणा येथे आहे. महाराष्ट्र या राज्यात भारतातील पहिला एकीकृत राज्यस्तरीय सायबर कमांड आणि कंट्रोल सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. याचे उद्घाटन हे महाराष्ट्रातील नवी मुंबई या ठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी लागलेला एकूण खर्च 800 कोटी. हा प्रकल्प भागीदारी मधून करण्यात आलेला आहे तो L AND T महाराष्ट्र सरकारने याच्यासोबत भागीदारी करून पूर्ण केला. या प्रकल्पाचा उद्देश पुढील प्रमाणे – सायबर धोक्यापासून बचावासाठी AI ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येईल. मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन स्किल इन्स्टिट्यूट चे उद्घाटन केले. या इन्स्टिट्यूट बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया – इंडियन स्किल इन्स्टिट्यूट PPP मॉडेल वर आधारित असेल. यामध्ये आता टाटा कंपनी आणि भारत सरकार सहभागी आहेत. याचा उद्देश पुढीलप्रमाणे – याचा उद्देश हा आहे की देशातील तरुणांमध्ये कौशल्य विकास करणे. स्तन कॅन्सर जागृकता हा दिवस 13 ऑक्टोबर. याची थीम आहे नो वन शुड फेस ब्रीस्ट कॅन्सर अलोन. पण स्तन कॅन्सर केव्हा होतो ते आपण जाणून घेऊया – जेव्हा स्तन मध्ये गाठी येतात. आणि जेव्हा महिलांमध्ये असणाऱ्या एस्ट्रोजीन हार्मोन च्या संतुलनामुळे होतो. जेव्हा अति ताण ,जंक फूड ,व्यायामची कमतरता असते. oncology हा कॅन्सरचा अभ्यास आहे. भारत हा UNISEF चा स्वास्थ व पोषण सहायता मध्ये सर्वात मोठा तिसरा देश पुरवठादार ठरला आहे. मित्रहो भारताने एकूण सहा बिलियन डॉलरच्या वस्तू व सेवांचा पुरवठा unicef ला केला आहे. यामध्ये आहेत औषधे, लसी, पोषण सामग्री, यांचा समावेश. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया UNICEF बद्दल माहिती. याचा फुल फॉर्म युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड आहे. याची स्थापना ही 11 डिसेंबर 1946 या रोजी झालेले आहे. याचे मुख्यालय हे न्यूयॉर्क अमेरिका येथे आहे. याचे प्रमुख हे केतरीन रसेल आहेत. टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत अहिका मुखर्जी आणि सूतीर्थ मुखर्जी . विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आशिया टेनिस टेबल स्पर्धा 2024 बद्दल माहिती. याचे आयोजन हे कझाकस्थान मध्ये झाले. या दोघींची जोडी या स्पर्धेमध्ये पदक जिंकणारी ही भारतातील पहिली जोडी बनलेली आहे. या दोघींनी टेबल टेनिस महिला दुहेरी प्रकारात कांस्यपदक जिंकलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टीचे actor अतुल परचुरे यांचे निधन झालेल आहे. ते चित्रपट क्षेत्राशी संबंधित होते. त्यांना ज्येष्ठ मराठी अभिनेते म्हणून ओळखले जायचे. त्यांचे निधन हे कर्करोगामुळे झाले. त्यांचे निधन हे वयाच्या 57 व्या वर्षी झाले. परमेश शिवमणी यांचे नुकतेच भारतीय तटरक्षक बल आयसीजी चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय तटरक्षक दलाबद्दलची माहिती पुढील प्रमाणे – यालाच इंडियन कोस्ट कार्ड असे म्हटले जाते. याची स्थापना ही एक फेब्रुवारी 1977 रोजी करण्यात आली. याचे उद्देश पुढीलप्रमाणे – समुद्रातील तस्करी बेकायदेशीर त्यांना रोखणे हे याचे उद्देश आहेत. याचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. याचे ब्रीदवाक्य हे वय रक्षाम आहे. s सोमनाथ यांचे आयएएफ (IAF) वर्ल्ड फेस अवॉर्ड देऊन यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. याचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल एस्ट्रॉनॉटिकल फेडरेशन. इस्रोचे अध्यक्ष S सोमनाथ यांना हा पुरस्कार दिलेला आहे. यांना हा पुरस्कार चंद्रयान तीनच्या यशस्वी अचिव्हमेंट साठी दिलेला आहे. हा पुरस्कार अंतरिक्ष विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो व संस्थांना सुद्धा दिला जातो. या आधी 2019 यावर्षी इस्रोला मंगळयान मोहिमेसाठी हा पुरस्कार दिलेला होता. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया चांद्रयान तीन या मोहिमेबद्दल संपूर्ण माहिती – मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक मोहीम 14 जुलै ते 23 ऑगस्ट दरम्यान 2023 दरम्यान चालली. LVM3M4 रॉकेट द्वारे याचे प्रक्षेपण केले. लँडर — विक्रम, रोवर — प्रज्ञान. भारत हा देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर या उतरवणारा पहिला देश बनलेला आहे. UNLEASHED हे आत्मकथा बोरीस जॉन्सन यांचे आहे ती नुकतीच प्रकाशित झालेले आहे. यांच्या बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया. हे ब्रिटनचे माजी पंतप्रधान आहेत. या पुस्तकांमध्ये भारत ऑफ ब्रिटनच्या संबंधाबद्दल माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परिवर्तन करणारे शासक असे प्रशंसा करण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात एकूण विधानसभा मतदार संघ हे 288 आहेत. याची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी झाले. आणि याचा निकाल हा 23 नोव्हेंबर रोजी आलेला आहे. या निवडणुका एकाच टप्प्यात झालेल्या आहेत. यामध्ये एकूण मतदार संघ हे 288 आहे. एकूण अनुसूचित जातीसाठी राखीव हे 29 होते. अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा 25. राज्य विधानसभेच्या निवडणुका ह्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात येतात. राजीव कुमार हे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. 2024 यावर्षी sco परिषद ही पाकिस्तान या देशात झाले. हे 15 व 16 ऑक्टोबर या दिवशी खाली. याचे ठिकाण इस्लामाबाद. भारताचे परराष्ट्रमंत्री नऊ वर्षानंतर पाकिस्तान मध्ये जात आहेत. त्या अगोदर गेलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या 2015 मध्ये पाकिस्तानला गेल्या होत्या. सांगाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचे सदस्य पुढील प्रमाणे . याचे एकूण दहा सदस्य देश आहेत. भारत , चीन, बेलारूस, इराण, कझाकस्तान, किरकिस्थान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उज्बेकिस्थान. एकूण दहा देश आहेत. विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉगची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि या ब्लॉग मध्ये काही टायपिंग मिस्टेक झाल्या असणार तर माफ करा. |