GMC KOLHAPUR BHARTI 2024. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे 102 जागांसाठी भरती. Rajarshee Chhatrapati shahu Maharaj Government medical College Kolhapur requirement 2024.

GMC KOLHAPUR BHARTI 2024.

GMC KOLHAPUR BHARTI 2024.

जाहिरात क्रमांक – राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर / वर्ग 4 / जाहिरात 517 / 2024.

संपूर्ण जागा 102.

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट – ड म्हणजेच वर्ग-4 संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल ही कॉम्प्युटर बेस टेस्ट राहील.

या भरतीची संपूर्ण प्रक्रिया आय.बी.पी.एस या कंपनीमार्फत करण्यात येईल.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.

अनु क्रमांकपदाचे नावसंस्थेचे नाववेतनश्रेणीरिक्त पदांची संख्या
1प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय)राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूरएस -६ रुपये 19900- 6320008
2शिपाई (महाविद्यालय)राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर(एस – १) रुपये 15000 – 47600.03
3मदतनीस ( रुग्णालय )छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर(एस – १) रुपये 15000 – 47600.01
4क्ष किरण परिचर ( रुग्णालय)छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर(एस – १) रुपये 15000 – 47600.07
5शिपाई ( रुग्णालय )छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर(एस – १) रुपये 15000 – 47600.08
6प्रयोगशाळा परिचर ( रुग्णालय )छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूरएस -६ रुपये 19900- 6320003
7रक्तपेढी परिचर ( रुग्णालय )छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर(एस – १) रुपये 15000 – 47600.04
8अपघात सेवक ( रुग्णालय )छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर(एस – १) रुपये 15000 – 47600.05
9बाह्य रुग्णसेवक ( रुग्णालय )छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर(एस – १) रुपये 15000 – 47600.07
10कक्षसेवक (रुग्णालय)छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर(एस – १) रुपये 15000 – 47600.56
संपूर्ण जागा 102
या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – दहावी उत्तीर्ण आवश्यक.

या पदासाठी वयाची अट पुढीलप्रमाणे – 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्ष ( मागासवर्गीय / खेळाडू / अनाथ / आ.दु.घ – पाच वर्षे सूट )

या पदासाठी नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.

या पदासाठी परीक्षा अर्ज फी – खुला प्रवर्ग 1000 रुपये. ( मागासवर्गीय / आ.दु.घ – 900 रुपये.)

या पदासाठीच्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे.

या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे20 नोव्हेंबर 2024

परीक्षा – परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल.

या पदासाठीच्या महत्त्वाचा लिंक पुढील प्रमाणे.

  1. या पदाची जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

DOWNLOAD PDF

2. या पदासाठी चा ऑनलाईन अर्ज लिंक मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

CLICK HERE

3. यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

CLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

  1. WHATS APP GROUP LINK. 2. TELEGRAM GROUP LINK.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून छत्रपती शाहू महाराज भोसले यांच्या बद्दल.

छत्रपती शाहू महाराजांचा जन्म हा 26 जून 1874 मध्ये झाला. आणि त्यांचा मृत्यू 6 मे, 1922 रोजी.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया छत्रपती शाहू महाराज हे कोणकोणत्या नावांनी प्रसिद्ध होते.

छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू आणि चौथे शाहू या नावाने ते प्रसिद्ध होते.

त्यांचा राज्याभिषेक 1894 साली झाला.

हे मराठ्यांच्या भोसले घराण्यातील संस्थानाचे राजे होते. त्यांचा राज्यकाळ हा 1894 ते 1900 या दरम्यानचा होता.

छत्रपती शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाज सुधारक होते.

तसेच ते एक सक्षम राज्यकर्ते सुद्धा होते. त्यांनी मागास जातीतील लोकांसाठी काम केले. त्यांनी सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य ठरवले होते.

शाहू महाराजांनी ब्रिटिश राज सत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले होते.

शाहू महाराजांनी मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी व दलित समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

शाहू महाराजांच्या क्षात्र गुरुने त्यांना राजर्षी ही पदवी राज्याभिषेकाच्या वेळी दिले.

त्यांचे राज्य व्याप्ती हे कोल्हापूर जिल्हा होता. आणि राजधानी ही कोल्हापूर होती. त्यांचा जन्म हा 26 जून 1874 लां लक्ष्मी विलास राजवाडा कसबा बावडा कोल्हापूर येथे झाला.

त्यांचा मृत्यू हा मुंबई येथे झाला. ते पुर्वाधिकारी होते छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी) राजाराम तीन.

आणि उत्तराधिकारी छत्रपती राजाराम भोसले.

त्यांच्या पत्नीचे नाव महाराणी लक्ष्मीबाई भोसले हे होते.

यांचे राजा ब्रीदवाक्य हे जय भवानी हे होते.

शाहू महाराजांनी आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाला पाठिंबा दिला कारण राज घराण्यातील ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक श्रोतानुसार ब्रह्मनेतरांचे संस्कार करण्यास नकार दिले.

छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

त्यांचा दृष्टिकोन हा अस्पृश्यता नष्ट करण्याचे होते.

जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाह मान्यता दिली व तो कायदा केला.
तसेच त्यांनी 1919 साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरण्याची पद्धत बंद केली.

1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा केला.

1916 ला निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना केली.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळूया चालू घडामोडी व इतर विषयाकडे.

  • विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील एकूण सात जिल्ह्यांचा सीमा लागू नये.
    लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर , सिंधुदुर्ग आणि सांगली या जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत.

*फक्त गोव्याची सीमा फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून आहे.

*तेलंगणा जिल्ह्याला महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत त्या पुढील प्रमाणे.

गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड या चार जिल्ह्यांच्या सीमा तेलंगणा राज्याला लागून आहेत.

  • महाराष्ट्र लागून असलेल्या राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे.

कर्नाटक, गोवा, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांच्या सीमा महाराष्ट्र या राज्याला लागून आहेत.

  • गुजरात या राज्याला महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत त्या पुढील प्रमाणे.

धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर या सीमा गुजरात राज्याला लागून आहे.

*विद्यार्थी मित्रांनो गुजरात आणि तेलंगणा या दोन राज्यांना महाराष्ट्रातील प्रत्येकी चार जिल्ह्यांचे सीमा लागून आहे.

  • विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया मध्य प्रदेश या राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागू आहेत.

नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा , अमरावती, नागपूर ,भंडारा, गोंदिया या एकूण आठ जिल्ह्यांच्या सीमा मध्यप्रदेश या राज्याला लागून आहेत.

  • आता आपण बघूया छत्तीसगड या राज्याला महाराष्ट्र राज्या तील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत.

छत्तीसगड या राज्याला महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. पहिले जिल्हा सीमा गोंदिया आणि दुसरी गडचिरोली.

१) गुजरात – चार जिल्हा सीमा.
२) मध्य प्रदेश – आठ जिल्हा सीमा.
३) छत्तीसगढ – दोन जिल्हा सीमा.
४) तेलंगणा – चार जिल्हा सीमा.
५) कर्नाटक – सात जिल्हा सीमा.
६) गोवा – एक जिल्हा सीमा.

  • विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया महाराष्ट्रातील पर्वत शिखर.
    महाराष्ट्राच्या परवत शिखर हे उंचीनुसार उतरत्या क्रमाने आपण बघूया पुढीलप्रमाणे.

कळसुबाई , साल्हेर, घनचक्कर 1532, धोडप 1472, महाबळेश्वर 1438, तारामती 1431, हरिश्चंद्रगड 1424, सप्तशृंगी, तोरणा.

विद्यार्थी मित्रांनो हा महाराष्ट्रातील नवीन शिखरांचा क्रम आहे. परीक्षेसाठी हा तुम्हाला खूप उपयुक्त राहील.

  • उत्तरे कडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील घाटांचा क्रम पुढीलप्रमाणे.
    थळघाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट, आंबोली घाट.

मुंबई नाशिक मध्ये कसारा/थळ घाट आहे.
पुणे मुंबई मध्ये बोरघाट आहे.
कराड चिपळूण मध्ये कुंभार्ली घाट आहे.
कोल्हापूर रत्नागिरी मध्ये आंबा घाट आहे.
कोल्हापूर पणजी मध्ये फोंडा घाट आहे.
पुणे बारामती मध्ये दिवा घाट आहे.
पुणे सातारा मध्ये खंबाटकी घाट आहे.
सावंतवाडी बेळगाव मध्ये आबोली घाट आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण सिक्वेन्सवाईज घाट बघूया.

थळ/ कसारा, चंदनपुर, माळशेज, बोर, तामिनी, वरंधा, कुंभारली, आंबा, हनुमंते, फोंडा, आंबोली हे घाट आहेत.

  • महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात दरकेसा टेकड्या आढळतात.
    नवेगाव डोंगर सुद्धा गोंदिया मध्ये आहे. नवेगाव हे नागझिरा राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे.
  • गडचिरोली या जिल्ह्यात चिरोली, भामरागड, सुरजागड या टेकड्या/डोंगर आहेत.
  • चंद्रपूर या जिल्ह्यात सीमूर टेकड्या आहेत.
  • हिंगोली टेकड्या या हिंगोली जिल्ह्यात आहे.
  • मुदखेड हे डोंगर नांदेड मध्ये आहे.
  • मुंबईमध्ये मलबार डोंगर आहे.
  • ठाणे या जिल्ह्यात तुंगार टेकडी आहे.
  • अजिंठा आणि वेरूळ हे डोंगररांग छत्रपती संभाजीनगर येथे आहे.
  • गाळणा डोंगर हे धुळ्यामध्ये आहे.
  • अमरावती जिल्ह्यात गाविलगड डोंगर आहे.
    *नागपूर जिल्ह्यात गरमसुर आहे.
  • भंडारा जिल्ह्यात गायखुरी डोंगर आहे .
  • विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील खाड्यांच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम पुढीलप्रमाणे.

तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ, राजापुरी हा दक्षिणेकडून उत्तरेकडचा योग्य क्रम आहे.

  • विद्यार्थी मित्रांनो खाडी म्हणजे नेमके काय आता आपण पुढे बघूया.

नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते तिथल्या भागाला खाडी असे म्हटले जाते.

  • विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया सिक्वेन्सवाईज खाड्या.

डहाणू खाडी , दातीवरे खाली, वसई खाडी, धरमतर खाडी, रोह्या खाडी, राजापुरी खाडी, बाणकोट खाडी, दाभोळ खाडी, जयगड खाडी, विजयदुर्ग खाडी, तेरे खोल खाडी.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया कोणत्या नदीवर कोणती खाडी आहे.

वैतरणा नदीवर दातीवरा खाडी आहे. जिल्हा पालघर
उल्हास नदीवर वसई खाडी आहे. जिल्हा पालघर
पाताळगंगा नदीवर धरमतर खाडी आहे. जिल्हा रायगड
कुंडलिका नदीवर रोह्याची खाडी आहे. जिल्हा रायगड
सावित्री नदीवर बाणकोट खाडी आहे. जिल्हा रायगड
वाशिष्टी नदीवर दाभोळ खाडी आहे. जिल्हा रत्नागिरी
शास्त्री नदीवर जयगड खाडी आहे. जिल्हा रत्नागिरी
शुक नदीवर विजयदुर्ग खाडी आहे. जिल्हा रत्नागिरी व सिंधुदुर्ग सीमेवर.
गड नदीवर कलावली खाडी आहे. जिल्हा सिंधुदुर्ग
करली नदीवर करली खाडी आहे. जिल्हा सिंधुदुर्ग
तेरेखोल नदीवर तेरेखोल खाडी आहे. जिल्हा सिंधुदुर्ग

  • नान्नज अभयारण्य हे सोलापूर जिल्ह्यातील आहे ते माळढोक पक्षांसाठी प्रसिद्ध आहे.
  • विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया अभयारण्य.
    राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर येथे आहे.
    सागरेश्वर अभयारण्य हे सांगलीमध्ये आहे.
    रायगड येथे कर्नाळा अभयारण्य आहे.
    पालघर मध्ये तुंगारेश्वर अभयारण्य आहे.
    साताऱ्यामध्ये कोयना अभयारण्य आहे.
    नगरमध्ये कळसुबाई अभयारण्य आहे.
    छत्रपती संभाजी नगर मध्ये जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे.
    नाशिक मध्ये नांदूर मधमेश्वर अभयारण्य आहे.
    पालघर मध्ये तानसा अभयारण्य आहे.
    जळगाव मध्ये यावल अभयारण्य आहे.
    वर्धा मध्ये वान अभयारण्य आहे.
    गडचिरोली मध्ये चपराळा , भामरागड अभयारण्य आहे.
  • गुगामाळ हे राष्ट्रीय उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले. हे राष्ट्रीय उद्यान अमरावती मधील आहे.

*नवी मुंबईमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे.

  • नागपूर मध्ये पेंच राष्ट्रीय उद्यान आहे.