ECHS (ex-serviceman contributory health scheme Wardha) येथे तीन पदांसाठी भरती. ECHS WARDHA BHARTI 2024.

ECHS WARDHA BHARTI 2024.

examsdetails

ECHS (ex.serviceman contributory health scheme Wardha) येथे तीन पदांसाठी भरती.

ECHS WARDHA BHARTI 2024.

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना अंतर्गत वर्धा येथे वैद्यकीय अधिकारी दंत अधिकारी नर्सिंग सहाय्यक या पदांच्या तीन जागा भरण्यात येणार आहे. येथे अर्ज भरण्यासाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत. ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून येथे अप्लाय करू शकतात. येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 नोव्हेंबर 2024 रोजी आहे. तेथे पात्र उमेदवार ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांची मुलाखत सुद्धा घेण्यात येईल. या पदासाठी मुलाखतीची तारीख हे 20 आणि 21 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.

या जाहिरातीतील पदाचे नाव पुढील प्रमाणे

वैद्यकीय अधिकारी दंत अधिकारी नर्सिंग सहाय्यक.

या पदाचे पदसंख्या ही – 3 आहे.

या पदासाठीचे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पीडीएफ अवेलेबल करून दिलेले आहे तेथे पदाची शैक्षणिक पात्रता दिलेली आहे ती व्यवस्थित पाहून घ्यावी.

DOWNLOAD PDF

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – वर्धा.

या पदासाठीचे अर्जपद्धती पुढीलप्रमाणे – ऑफलाइन पद्धती द्वारे अर्ज स्वीकारले जातील.

या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे OIC, Stn HQ ( ECHS सेल) , सिएडी पुलगाव, तेह – देवळी, जिल्हा – वर्धा , पिन कोड – 442303.

या पदासाठी अर्ज करण्याचे शेवटची तारीख पुढील प्रमाणे 14 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज करण्याची शेवटची तारीख राहील.

या पदासाठीची निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे – या पदासाठी मुलाखती द्वारे निवड करण्यात येईल.

या पदासाठीची मुलाखती तारीख पुढील प्रमाणे – 20 आणि 21 नोव्हेंबर 2024 रोजी मुलाखत घेण्यात येईल.

OFFICIAL वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.CLICK HERE

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे

पद क्रमांक – 1

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी.

पदांची संख्या – 01.

पद क्रमांक 2.

पदाचे नाव – दंत अधिकारी.

पदांची संख्या – 01

पद क्रमांक 3.

पदाचे नाव- नर्सिंग सहाय्यक.

पदांची संख्या – 01

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे

  1. वैद्यकीय अधिकारी – वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एमबीबीएस (MBBS) असणे आवश्यक आहे.
  2. दंत अधिकारी – दंत अधिकारी या पदासाठी बीडीएस (BDS) असणे आवश्यक आहे.
  3. नर्सिंग सहाय्यक – नर्सिंग सहाय्यक या पदासाठी बीएससी (BSC ) असणे आवश्यक आहे.

पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढील प्रमाणे

1)वैद्यकीय अधिकारी – 75 हजार रुपये.

2)दंत अधिकारी – 75 हजार रुपये.

3)नर्सिंग सहाय्यक – 28 हजार 100 रुपये.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला हजर राहावे.

यासाठी कोणताही TA/ DA स्वीकार्य नाही.

अर्ज केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांनी वेळेवर पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आम्ही तुम्हाला परीक्षाभिमुख माहिती प्रोव्हाइड करत असतो. हे युनिक पद्धती आमच्या ब्लॉगवर तुम्ही बघू शकतात. याद्वारे तुमचे मार्क्स वाढण्यासाठी तुम्हाला मदत होईल. आज उद्देश घेऊन आम्ही बऱ्याच दिवसापासून हा उपक्रम राबवत आहोत. त्यामुळे तुम्हाला जो फायदा होत आहे तो फायदा तुमच्या मित्रांना सुद्धा भावा ही जर तुम्हाला काळजी असेल तर तुम्ही या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पाठवा. तुमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये किंवा मित्रांना व्हाट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर या ग्रुपचे लिंक तुम्ही सेंड करू शकतात. यामुळे तुमचे यश तुम्हाला लवकर संपादन करता येईल. एक इच्छा या वेबसाईटचे आहे. त्यामुळे आमचे मार्गदर्शन तुमची इच्छाशक्ती हेच परीक्षेला सामोरे जाण्यासाठी भक्कम आहे.

चला तर मग सुरु करूया आता आजचा टॉपिक.

विद्यार्थी मित्रांनो आपण आज शिकणार आहोत भारताच्या पूर्व किनारपट्टीत लागून असलेले बंगालच्या उपसागरातील अपतट प्रमुख बेटे. हे अपतट प्रमुख बेटे पुढील प्रमाणे.

1) गंगासागर बेट – विद्यार्थी मित्रांनो गंगासागर बेट हे कोलकत्याच्या दक्षिणेस हुबळी नदीच्या मुखाशी आहे.

२) न्यू मुरे बेट – विद्यार्थी मित्रांनो हे बेट गंगा ब्रह्मपुत्रेच्या त्रिभुज प्रदेशावर आहे. या बेटाचे वैशिष्ट्य हे आहे की ते भारत-बांगलादेश यांच्यात हक्कावरून वाद आहे.

३) पंबन बेट – विद्यार्थी मित्रांनो हे पंबन बेट मन्नाराची खाडी या ठिकाणी आहे. या बेटाचे वैशिष्ट्य हे आहे की रामेश्वरम या नावाने या बेटाला ओळखतात.

४) श्रीहरीकोटा बेट – विद्यार्थी मित्रांनो श्रीहरी कोटा हे बेट भारताचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र म्हणून या बेटाचे वैशिष्ट्य आहे.

५) व्हीलर बेट – व्हींलर बेट हे ओरिसा राज्यात आहे. व्हीलर बेटाचे वैशिष्ट्य हे आहे की ते मिसाईल प्रक्षेपण केंद्र तिथे आहे. त्यालाच अब्दुल कलाम आयलँड असे म्हणतात.

६) लँड कॉल बेट – विद्यार्थी मित्रांनो लँड कॉल बेटे हे अंदमान निकोबार च्या उत्तरेस आहेत. या बेटांचे वैशिष्ट्य आहे की कोको खाडीने म्यानमारपासून वेगळे केलेले आहेत.

७) हेअर द्वीप – हेअर द्वीप हे तुतिकोरीन तामिळनाडू राज्यात आहेत. या बेटांचे वैशिष्ट्य हे आहे की ते बेटे प्रवाळ बेट आहेत.

८) माजुली बेट – माजुली बेट हे आसाम राज्याच्या ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे. या बेटाचे वैशिष्ट्य हे आहे की ते बेट ब्रह्मपुत्रा नदीतील सर्वात मोठे बेट आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले की भारताच्या पूर्व किनारपट्टीत लागून असलेली बंगालच्या उपसागरातील अपतट.
आता आपण पुढे बघूया सामुद्रधुनी आणि त्याने विभाजित केलेले प्रदेश.

समुद्रधुनी आणि त्याने विभाजित केलेले प्रदेश पुढीलप्रमाणे.

१) कोको सामुद्रधुनी – कोको समुद्रधुनी या सामुद्रधुनीने विभाजित केलेले प्रदेश हे म्यानमार- उत्तर अंदमान हे आहे.

२) ग्रँड सामुद्रधुनी – ग्रँड सामुद्रधुनी या सामुद्रधुनीने विभाजित केलेले प्रदेश हे निकोबार – सुमात्रा हे आहेत.

३) डंकन पास सामुद्रधुनी – डंकन पास सामुद्रधुनी या सामुद्रधुनीने विभाजित केलेले प्रदेश हे दक्षिण अंदमान – छोटे अंदमान हे प्रदेश आहेत.

४) १० डिग्री सामुद्रधुनी – १० डिग्री समुद्रधुनी हे सामुद्रधुनी याने विभाजित केलेले प्रदेश हे अंदमान – निकोबार हे आहेत.

५) ९ डिग्री समुद्रधुनी – ९ डिग्री सामुद्रधुनी या सामुद्रधुनीने विभाजित केलेले प्रदेश हे लक्षद्वीप – मिनिकॉय प्रदेश आहेत.

६) ८ डिग्री समुद्रधुनी – ८ डिग्री समुद्रधुनी या समुद्रधुनीने विभाजित केलेले प्रदेश हे मिनिकॉय – मालदीव हे प्रदेश आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारताचे अंतिम टोकाबद्दल सविस्तर माहिती.

*उत्तर दिशेकडील भारताचे अंतिम टोक हे इंदिरा कोल् आहे.
इंदिरा कोल हे अंतिम टोक लडाख राज्यात आहे.

*दक्षिण दिशेकडील भारताचे अंतिम टोक हे कन्याकुमारी, इंदिरा पॉईंट अंदमान निकोबार बेटे हे आहे. हे बेटे तमिळनाडू राज्यात आहेत.

*पूर्व दिशेकडील भारताचे अंतिम टोक हे किंबिथू आहे. हे किंबितू भारताचे अंतिम टोक अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे.

*पश्चिम दिशेला भारताचे अंतिम टोक हे गौरमाटा हे आहे. गौरमाटा हे भारताचे अंतिम टोक गुजरात जिल्ह्यात आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण भारताचे अंतिम टोक त्या संबंधातील दिशा व राज्य बघितले आहेत. आता आपण बघूया कर्कवृत्त रेषा ही भारतातील कोणत्या राज्यातून जाते व कोणत्या शहरात जवळून जाते ते बघूया.

कर्कवृत्त ही कोणत्या राज्यातून जाते ते राज्य व कोणत्या शहरात उडून जाते ते शहर पुढील प्रमाणे.

१) गुजरात राज्य – कर्कवृत्त हे गुजरात राज्यातून जाते. गुजरात राज्यातील गांधीनगर शहराजवळून कर्कवृत्त जाते.

२) राजस्थान राज्य – कर्कवृत्त हे राजस्थान राज्यातून जाते. राजस्थान राज्यातील बनसवारा या शहराजवळून कर्क वृत्त जाते.

३) मध्यप्रदेश राज्य – मध्यप्रदेश राज्यातून कर्कवृत्त जाते. मध्यप्रदेश राज्यातील विदिशा या शहराजवळून कर्कवृत्त जाते.

४) छत्तीसगड राज्य – छत्तीसगड राज्यातून कर्कवृत्त जाते. छत्तीसगड राज्यातील अंबिकापुर या शहरा जवळून कर्कवृत्त जाते.

५) झारखंड राज्य – कर्कवृत्त हे झारखंड राज्यातून जाते. झारखंड राज्यातील रांची या शहराजवळून कर्कवृत्त जाते.

६) पश्चिम बंगाल – पश्चिम बंगाल राज्यातून कर्कवृत्त जाते. पश्चिम बंगाल राज्यातील कृष्ण नगर शहराजवळून कर्क वृत्त जाते.

७) त्रिपुरा राज्य – त्रिपुरा राज्यातून कर्कवृत्त जाते. त्रिपुरा राज्यातील उदयपूर शहराजवळून कर्कवृत्त जाते.

८) मिझोरम राज्य – मिझोराम राज्यातून कर्कवृत्त जाते. मी जरा राज्यातील शियाल सुक या शहारा जवळून कर्कवृत्त जाते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेतले की कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते आणि त्या राज्यातील कोणत्या शहरा जवळून जाते याबद्दल माहिती.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान शेवटची पाच राज्य याबद्दल माहिती व त्या राज्यातील क्षेत्रफळ तसेच भारताच्या एकूण क्षेत्रफळाचे त्या राज्याच्या क्षेत्रफळाची तुलना.

चला तर मग सुरु करूया.

१) गोवा राज्य – गोवा राज्याचे क्षेत्रफळ हे 3702 चौरस किलोमीटर इतके आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या बरोबर तुलना केली तर या गोवा राज्याचे तुलना 0.11% इतके आहे.

२) सिक्कीम राज्य – सिक्कीम राज्याचे क्षेत्रफळ हे 7096 चौरस किलोमीटर इतके आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या बरोबर तुलना केली तर या सिक्कीम राज्याची तुलना ही 0.22% इतके आहे.

3) त्रिपुरा राज्य – त्रिपुरा राज्याचे क्षेत्रफळ हे 10486 चौरस किलोमीटर इतके आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या बरोबर तुलना केली तर त्रिपुरा राज्याची तुलना ही 0.32% इतके आहे.

4) नागालँड राज्य – नागालँड राज्याचे क्षेत्रफळ हे 16579 चौरस किलोमीटर इतके आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या बरोबर तुलना केली तर नागालँड राज्याचे तुलना ही 0.50% इतकी आहे.

5) मिझोरम राज्य – मिझोरम राज्याचे क्षेत्रफळ हे 21081 चौरस किलोमीटर इतके आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळाच्या बरोबर तुलना केली तर मिझोराम राज्याची तुलना ही 0.64% इतकी आहे.

विद्यार्थी मित्रांनो आपण आता बघितले की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान शेवटची पाच राज्य. आता आपण बघूया क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे पहिले तीन केंद्रशासित प्रदेश.

भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे पहिल्या तीन केंद्रशासित प्रदेश पुढील प्रमाणे.

1) लडाख केंद्रशासित प्रदेश – भारतातील लडाख हे सर्वात मोठे केंद्रशासित प्रदेश आहे.

२) जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश – भारतातील जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश दोन नंबरचे मोठे केंद्रशासित प्रदेश आहे.

३) अंदमान निकोबार केंद्रशासित प्रदेश – भारतातील अंदमान निकोबार हे केंद्रशासित प्रदेश तीन नंबरचे मोठे केंद्रशासित प्रदेश आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण पहिले भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे तीन केंद्रशासित प्रदेश.

आता आपण बघूया भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने शेवटचे तीन केंद्रशासित प्रदेश.

लक्ष द्वीप केंद्रशासित प्रदेश, चंदीगड केंद्रशासित प्रदेश, पदुच्चेरी केंद्रशासित प्रदेश.
हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने शेवटचे तीन केंद्रशासित प्रदेश आहेत.

विद्यार्थी मित्रांनो भारताचे एकूण क्षेत्रफळ हे 32 लाख 87 हजार 243 चौरस किलोमीटर इतके आहे. भारताचे क्षेत्रफळ हे पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या 0.57% इतके आहे. तसेच जगाच्या क्षेत्रफळापैकी भारत देशाने 2.42% इतके क्षेत्र व्यापलेले आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो.

सिक्वेन्स वाईज क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक पुढील प्रमाणे.
रशिया, कॅनडा, अमेरिका, चीन, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, भारत या देशाचा सातवा नंबर लागतो.

विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला चांगलाच वाटला असणार. कारण आज आम्ही खूप महत्त्वाची तुम्हाला शिकवले आहे. यातून तुम्हाला खूप मोठा फायदा होईल. व परीक्षेला जाण्यासाठी तुम्हाला भक्कम असा ज्ञानाचा आधार मिळेल. या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवू शकतात व त्यांच्या ज्ञानाचा आधार सुद्धा भक्कम करू शकतात. तुमच्या व्हाट्सअप ग्रुप तसेच टेलिग्राम ग्रुप मध्ये या ब्लॉगची लिंक नक्की टाका. व फेसबुक पेजवर सुद्धा तुम्ही या ब्लॉगची लिंक शेअर करू शकतात. 
धन्यवाद…