Central Arm Police Force Recruitment.
Central Arm Police Force Recruitment.
विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात म्हणजेच बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी, आणि आसाम रायफल्स यामध्ये सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी ( सेकंड इन कमांड ) , विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी ( उपकमांडंट ) , आणि वैद्यकीय अधिकारी ( सहाय्यक कमांडंट ) या गट “अ” पदांच्या 345 पदांसाठी भरती निघालेली आहे.
आता आपण त्या बद्दलची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे बघूया.
भरती पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | सुपर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर { सेकंड इन कमांड } | 5 |
2 | स्पेशालिस्ट मेडिकल { ऑफिसर डेप्युटी कमांडंट } | 176 |
3 | मेडिकल ऑफिसर { असिस्टंट कमांडट } | 164 |
संपूर्ण जागा | 345 |
पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे.
पद क्रमांक एक | १) MBBS (एम.बी.बी.एस) २) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा. ३) DM. / M.CH + तीन वर्षांचा अनुभव |
पद क्रमांक दोन | १) MBBS (एम.बी.बी.एस) २) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा. ३) 1.5 किंवा 2.5 वर्षांचा अनुभव. |
पद क्रमांक तीन | 1) औषधांच्या ऍलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता. 2) रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतु नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल. |
पदासाठी लागणारे शारीरिक पात्रता पुढीलप्रमाणे.
उंची /छाती/ वजन | उंची | छाती | वजन |
पुरुष | 157.5 सेंटीमीटर | 77- 82 सेंटीमीटर. | उंची आणि वयाच्या प्रमाणात. |
महिला | 142 सेंटीमीटर | – | उंची आणि वयाच्या प्रमाणात. |
पदासाठी वयाची अट.
पद क्रमांक एक साठी वयाची अट | 14 नोव्हेंबर 2024 रोजी 50 वर्षांपर्यंत. |
पद क्रमांक दोन साठी वयाची अट | 14 नोव्हेंबर 2024 रोजी 40 वर्षांपर्यंत. |
पद क्रमांक तीन साठी वयाची अट | 14 नोव्हेंबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत. |
पदासाठी नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (भारतात कोठेही)
पदासाठी लागणारी परीक्षा फी पुढील प्रमाणे.
GENERAL/ OBC / EWS – 400 रुपये. |
( SC / ST / ExSM / महिला – यांना फी नाही ) |
पदासाठीच्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे.
पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 नोव्हेंबर 2024.
परीक्षा तारीख – तारीख नंतर कळविण्यात येईल.
या पदासाठीच्या महत्त्वाच्या लिंक पुढील प्रमाणे –
पदासाठीची जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा. | PDF DOWNLOAD |
पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे क्लिक करा. | CLICK HERE |
ऑफिशियल वेबसाईट वर जाण्यासाठी पुढे क्लिक करा | CLICK HERE |
विद्यार्थी मित्रांनो परीक्षेबाबतीत पुढील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा. या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जाण्यासाठी पुढे क्लिक करा.
WHATS APP LINK TELEGRAM LINK
विद्यार्थी मित्रांनो आज चालू घडामोडी या विषया संदर्भात आमची टीम तुम्हाला उपयुक्त माहिती देणार आहे. तर चला बघूया आपण चालू घडामोडी.
*विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्तरावर पुरस्कार प्राप्त अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देणार बाबत धोरण निर्गमित करण्याबाबतचे कार्य सुरू आहे.
हे नियुक्ती महाराष्ट्र शासनात होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
*सीबीडीटी अध्यक्षपदी रवी अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली.
रवी अग्रवाल है सीबीडीटी मध्ये सदस्य होते त्यानंतर त्यांची पदोन्नती झाले व नियुक्ती ही अध्यक्ष पदी करण्यात आली.
सीबीडीटी म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष दर. या सीबीडीटीची स्थापना 1963 साली स्थापना करण्यात आली.
या अगोदरचे सीबीडीटी अध्यक्ष हे नितीन गुप्ता हे होते.
*विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मुख्यमंत्री माझे लाडके बहिण योजना बाबत.
ही योजना महाराष्ट्र शासनाची योजना आहे. राज्यातील माता बहिणींना आत्म निर्भर करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.
या योजनेचा निर्णय असा आहे की आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात जमा होणार प्रति महिना 1500 रुपये.
तसेच विद्यार्थी मित्रांनो 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, विधवा आणि घटस्फोटित आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
आता आपण बघूया या योजनेचा लाभ ती लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या महिलांना मिळणार आहे.
वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाखापेक्षा कमी असणाऱ्या ना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेची घोषणा ही अदिती वरदा सुनील तटकरे. या मंत्री आहेत महिला व बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य.
या योजनेत दरमहा पंधराशे रुपये हे पात्र महिलांना मिळणार आहे.
शासन दरवर्षी 46000 कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी उपलब्ध करून देणार.
या योजनेसाठी पात्रता पुढील प्रमाणे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे योजनेस पात्र असण्यासाठी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे महत्त्वाचे आहे.
वय वर्ष 60 पेक्षा जास्त वय असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र असेल.
आता आपण बघूया अपात्र महिला कोण असेल.
अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे हे अपात्र असतील.
महिलेच्या घरातील सदस्य किंवा स्वतः महिला टॅक्स भरत असेल तर येथे या योजनेसाठी अपात्र असेल.
महिलेच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्त वेतन घेत असेल तर ती महिला सुद्धा या योजनेसाठी अपात्र होईल.
महिलेच्या कुटुंबात पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर ती महिला अपात्र ठेवण्यात येईल.
महिलेच्या कुटुंबातील सदस्यांकडे चार चाकी वाहन असेल तर ती महिला अपात्र ठरविण्यात येईल. जर महिलेच्या कुटुंबात ट्रॅक्टर सोडून इतर चार चाकी वाहन असतील तर ती महिला अपात्र ठरवण्यात येईल.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे कागदपत्रे पुढील प्रमाणे.
आधार कार्ड, रेशन कार्ड , उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला, बँक पासबुक, फोटो
- अंटोनिओ कोस्टा हे पोर्तुगालचे पंतप्रधान यांचे नियुक्ती युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्ष पदी करण्यात आली.
युरोपियन युनियन मध्ये सहभागी झालेल्या देशाला युरो हे चलन वापरावे लागते.
अंटोनिओ कोस्टा यांचा जन्म 1961 मध्ये झाला. सुरुवातीला त्यांनी वकील म्हणून काम केले. राजकीय कारकिर्दीमुळे ते पोर्तुगालमधील कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर युरोपियन संसदेचे उपाध्यक्ष झाले. आणि लिस्बन चे महापौर झाले होते. कोस्टा यांचे काम पोर्तुगालचे अर्थव्यवस्था आणि सामाजिक फॅब्रिक्स दोन्ही पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने सुधारणांचे अंमलबजावणी गोष्टींचा यात महत्वपूर्ण भूमिका होती.
कोस्टा हे सामाजिक न्यायासाठी दृढ वचनबद्धतेने संतुलित आहे.
- महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव या सुजाता सैनिक आहेत.
सुजाता सैनिक या यापूर्वी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह खाते) होत्या. 30 जून रोजी त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया महाराष्ट्रातील महिला नेतृत्वाचे महत्व.
या पहिल्या महिला सचिव बनल्या आहेत.
- भारतीय सैन्याने स्वदेशी 4g मोबाईल बेस् स्टेशन तैनात केले.
भारतीय लष्करी दळणवळण तंत्रज्ञान सक्षम होत आहे. नुकतेच भारतीय लष्कराने भारतात बनवलेले पहिले 4g मोबाइल बेस स्टेशन मिळवले.
बंगळुरू मधील सिग्नल ट्रॉनने बांधलेले आहे.
गव्हर्नमेंट मार्केट प्लेस (GeM) या साईटमुळे हे खरेदी करणे शक्य झाले.
विद्यार्थी मित्रांनो या विकासामुळे केवळ लष्कराचे संवाद साधण्याची क्षमता सुधारले नाही तर युनायटेड स्टेट्स मध्ये धोरणात्मक कारणांसाठी बनवलेल्या तंत्रज्ञान वापरण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल देखील हे मानले जाते.
- विद्यार्थी मित्रांनो संशोधकांनी कीटकनाशकांना तटस्थ करणारे अँटी कीटकनाशक बनवले आहे. हे कीटकनाशक इन्स्टिट्यूट फॉर स्टेम सेल अँड सायन्स अँड जेनेरिक मेडिसिन हे बंगळुरू मधील संस्था आहे. या संस्थेला शॉर्टकट मध्ये इमस्टेम म्हणतात.
यात बनवलेला आहे एक फॅब्रिक जे कीटकांना मारते. हे कापड आहे.
- न्योमा चुशुल प्रदेश या प्रदेशात पुरामुळे आलेल्या पाण्यामुळे हा प्रदेश बातम्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालू होता तो प्रदेश लडाख या केंद्रशासित प्रदेशात आहे.
- फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर ची बैठक सिंगापूर येथे झाली.
यामध्ये भारताला नियमित पाठपुरावा श्रेणीमध्ये ठेवण्यात आले. दहशतवाद वित्त पुरवठा आणि प्रसार विरोधी अनुपालन याचा पाठपुरावा करतात.
भारत, रशिया, फ्रान्स, इटली आणि युके या देशांना नियमित फॉलोआपमध्ये ठेवण्यात आले.
- स्वाल बार्ड हा द्वीपसमूह आर्टिक महासागरात आहे.
स्वाल बार्ड चा शोध 1596 मध्ये लागला विल्यम ब्यारेंटझ यांनी लावला. याचे लोकेशन नॉर्वे आणि उत्तर ध्रुवाच्या मध्ये आहे. - राष्ट्रपती यांनी लॉ कमिशनच्या 23 व्या स्थापनेला मंजुरी दिले.
- अपराजिता महिला आणि बालक पश्चिम बंगाल फौजदारी कायदे विधेयक 2024 यात एकमताने विधेयक पारित केला. या दहा दिवसात गुन्हेगाराला फाशी देण्यात येईल असे विधेयक पारित केले.
ममता बॅनर्जी विधेयक बलात्काराला दहा दिवसात फाशी. हे जिल्हा पातळीवर टास्क फोर्स राहील.
- अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील होणाऱ्या मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू हे डॉक्टर अविनाश आवलगावकर यांचे नियुक्ती करण्यात आले.
- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे
21 वे राज्यपाल आहे. - थॉमस कप हा बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे.
- सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024 हा पॅराशुट फिल्ड हॉस्पिटल उत्तर प्रदेश या संस्थेला देण्यात आला.
- महा रेराच्या अध्यक्षपदी मनोज सैनिक यांची निवड करण्यात आली.
- महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक या मनोज सैनिक यांच्या पत्नी आहे.
*महाराष्ट्रात 2014 च्या महाराष्ट्र आर्थिक पाहणीनुसार एकूण 146 नगरपंचायती आहेत.
- जयदीप आपटे हा राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणारा शिल्पकार आहे. त्याच्या विरोधात लोक आउट नोटीस जारी करण्यात आले. मालवण पोलिसांनी याच्या विरोधात लोकाउट नोटीस जारी केले.
- पंतप्रधान मोदी हे ब्रुनेई मध्ये दाखल झाले तिथे व्यापाऱ्याने सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार.
- सर्वोच्च न्यायालयाला मिळाला नवा ध्वज आणि चिन्ह राष्ट्रपतीच्या हस्ते झाले ध्वजाचे अनावरण.
भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांनी एक सप्टेंबर 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 75 वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ नवीन ध्वजाचे आणि नवीन चिन्हाच्या अनावरण केले.
- राष्ट्रीय इगव्हर्नन्स परिषद ही मुंबई येथे झाली.
- प्रभारी पंतप्रधान म्हणजेच केअर टेकर पीएम यांच्या यादीत आतापर्यंतच्या भारताचे पंतप्रधान म्हणून गुलझरीलाल नंदा यांनी पद भूषवले.
- ग्रामीण विकास मंत्रालयाने भू आधार क्रमांक याचे अनावरण 17 फेब्रुवारी 2024 ला लॉन्च करण्यात आले , डरांग आसाम या ठिकाणी याचे अनावरण करण्यात आले.
- जागतिक बँकेचे संचालक हे अगस्ते टॅनो कॉमे हे आहेत.
यांचे असे म्हणणे आहे की भारताच्या विकासदरात चांगले वाढ होत आहे, आणि महागाईच्या दरात घसरन सुरू आहे. यामुळेच भारतात दारिद्र्याची पातळी कमी होण्यास मदत होईल. तसेच जागतिक व्यापाराच्या संधीचा योग्य वापर केल्यामुळे विकास दरात आणखीन वाढ होऊ शकते असे भाकित त्यांनी दिले.
- विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सर्वोच्च आणि उच्च न्यायालय बद्दल एक महत्त्वाचा विषय.
संसदेने किंवा विधानसभेने पारित केलेले कायदे वैध आहेत की नाही हे ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाला आहे.
अनुच्छेद 32 नुसार मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालय काही आदेश पारित करू शकते. तसेच इतर अनुच्छेदांमधील तरतुदींमुळे सर्वोच्च न्यायालय एखादा कायदा संविधानाशी संसंगत आहे किंवा नाही एक पण सुद्धा ठरवू शकते.
तुमच्या उदाहरणासाठी एक सांगतो की 2017 साले कायदा करून निवडणूक रोखे योजना म्हणजेच इलेक्टोरल बॉंड स्कीम अमलात आणले गेली होते. परंतु ही योजना संविधानाशी विसंगत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने 2024 झाले जाहीर केले आहे.