बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अंतर्गत दहावी पास असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी वर्ष 2024. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स रिक्वायरमेंट 2024.

Border security force Bharti sport Kota 2024.

Border security force Bharti sport Kota 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अंतर्गत म्हणजे सीमा सुरक्षा दल अंतर्गत कॉन्स्टेबल जीडी स्पोर्ट कोटा याच्या जागा भरण्यात येणार आहेत. मूळ जाहिरात उमेदवारांनी बघून पात्र असणारे उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज पाठवायचा आहे.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे – पदाचे नाव कॉन्स्टेबल जीडी – स्पोर्ट कोटा.

पदसंख्या – 276

जाहिरातीमधील पदासाठी असलेली वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 23 वर्ष.

जाहिरातीमधील पदासाठी असणारे अर्ज शुल्क पुढील प्रमाणे – GENERAL, OBC , EWS 147 रुपये.

SC, ST महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी फी नाही.

या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता दहावी पास असणे आवश्यक आहे.

या पदासाठी वेतनश्रेणी पुढील प्रमाणे

जाहिरातीमधील पदाचे नाव कॉन्स्टेबल स्पोर्ट कोटा या पदाची वेतन श्रेणी 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये इतकी आहे.

या पदासाठी असणारे अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठी असणारे अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धती आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे [- या पदासाठी शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 रोजी आहे.

official वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक कराCLICK HERE

या पदासाठी चे जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक कराCLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो आजच्या टॉपिक मध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत भारतातील वृत्तपत्रे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती. त्या वृत्तपत्रांच्या माहितीमध्ये वृत्तपत्राचे नाव वर्ष स्थळ आणि संपादक व इतर माहिती त्यामध्ये असेल.
चला तर मग सुरु करूया आजचा टॉपिक.

पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट , या बंगाल गॅझेट चे स्थापना वर्ष 19 जानेवारी 1780 या रोजी करण्यात आली. या बंगाल गॅझेटचे स्थळ कलकत्ता हे होते. बंगाल गॅजेट चे संपादक हे जेम्स ऑगस्टस
होते. हे भारतातील पहिले वर्तमानपत्र होते.

दुसरा वर्तमानपत्र म्हणजेच वृत्तपत्र या वृत्तपत्राचे नाव इंडिया गॅजेट तथा कलकत्ता पब्लिक एडवर्टाइजर होते.
या इंडिया गॅझेट स्थापना वर्ष हे 1780 नोव्हेंबर मध्ये आहे. या इंडिया गॅझेट स्थळ कलकत्ता होते. याचे संपादक हे पीटर रीड व मेसिक होते. विद्यार्थी मित्रांनो या वृत्तपत्राला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंगचा पाठिंबा होता.

तिचे वर्तमानपत्र कलकत्ता गॅझेट तथा ओरिएंटल एडवर्टाइजर होते. या वर्तमानपत्राचे स्थापना वर्ष चार मार्च 1784 होते. याचे स्थळे हे कलकत्ता होते. या वर्तमानपत्राचे संपादक फ्रान्सिस बर्नार्ड होते.

चौथे वर्तमानपत्र मद्रास कुरिअर होते हे मद्रासचे पहिले वृत्तपत्र होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1784 होते. हे वृत्तपत्र मद्रास येथील होते.

पाचवी वृत्तपत्र हे बेंगाल जर्नल होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष हे 1785 होते. या वृत्तपतत्राचे स्थळ कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक विल्यम देऊन व थॉमस जोन्स होते. यांनी फ्रेंच राज्यक्रांतीबाबत लिखाण प्रसारित केलेले होते.

सहाव वृत्तपत्र हे ओरिएंटल मॅक्झिन होते. या ओरिएंटल मॅक्झिनचे स्थापना वर्ष 1785 होते. या ओरिएंटल मॅगझिनचे स्थळ हे कलकत्ता होते.
ओरिएंटल मॅक्झिनचे संपादक हे गार्डन व जॉन होते. विद्यार्थी मित्रांनो या ओरिएंटल मॅक्झिनच्या दुसरे नाव कलकत्ता अम्युजमेंट होते.

सातव वृत्तपत्र हे कलकत्ता क्रोनिकल अँड जनरल ॲडव्हायझर होते.
याचे स्थापना वर्ष 26 जानेवारी 1786 होते. या क्रोनिकल अँड जनरल ॲडव्हायझर वृत्तपत्राचे स्थळ हे कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक डॅनियल स्टुअर्ट व जोसेफ कूपर होते.

आठवे वृत्तपत्र हे इंडियन हेरोल्ड होते. या इंडियन हेरोल्ड वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1795 होते. या वृत्तपत्राचे स्थळ मद्रास होते. या वृत्तपत्राचे संपादक आर विल्यम्स होते.

नववे वृत्तपत्र बेंगॉल गॅझेट होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष हे 1816 मध्ये झाले होते. या वृत्तपत्राचे स्थळ कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक गंगाधर भट्टाचार्य व हरिश्चंद्र राय हे होते. आणि हे पहिले बंगाली वृत्तपत्र होते.

दहावें वृत्तपत्र हे दिग्दर्शन होते. याची स्थापना वर्ष हे 1818 होते. याचे स्थळ कलकत्ता होते. हे दिग्दर्शन वृत्तपत्र हे पहिले बंगाली मासिक होते.

अकरावे वृत्तपत्राचे नाव कलकत्ता जर्नल होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1818 होते. या वृत्तपत्राचे स्थळ हे कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक जेम सिल्क बक्किंग हॅम होते.

बारावें वृत्तपत्र हे समाचार दर्पण होते. या वृत्तपत्राचे वर्ष स्थापना वर्ष 23 मे 1818 होते. या वृत्तपत्राचे स्थळ हे सेरामपुर हे स्थळ पश्चिम बंगालमधील होते.

तेराव्या वृत्तपत्र हे संवाद कौमुदी होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष चार डिसेंबर 1821 होते. या वृत्तपत्राचे स्थळे कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक राजा राम मोहन रॉय व भवानी चरण बॅनर्जी होते.

चौदाव्या वृत्तपत्राचे नाव समाचार चंद्रिका होते. या वृत्तपत्राचे वर्ष स्थापना वर्ष 18 मार्च 1822 होते. या वृत्तपत्राचे स्थळ कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक भवानी चरण बंडोपध्याय होते. या भवानी चरण बंडोपध्याय यांनी सती प्रथा बंदी कायद्याला विरोध केला.

पंधरावे वृत्तपत्र मीरात उल अखबार होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1822 होते. या वृत्तपत्राचे स्थळ कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक राजा राम मोहन रॉय होते. हे फारसी भाषेतील पहिले वृत्तपत्र होते.

सोळावे वृत्तपत्र ज्याने जहानुमा होते. याचे स्थापना वर्ष हे 1822 होते. या वृत्तपत्राचे स्थळ कलकत्ता होते. हे वृत्तपत्र उर्दूतील पहिले उर्दू भाषिक वृत्तपत्र होते.

सतराव्या वृत्तपत्र हे बंगदत्त होते. या वृत्तपत्राच्या स्थापना वर्ष 1822 होते. या वृत्तपत्राचे स्थळ कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक राजा राम मोहन रॉय होते. तसेच द्वारकानाथ टागोर होते. या वृत्तपत्राचे भाषेतील साप्ताहिक हे इंग्लिश बंगाली पर्शियन व हिंदी होते.

अठरावे वृत्तपत्र हे ईस्ट इंडियन होते. या वृत्तपत्राचे स्थळ कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक हेन्री विवियन होते.

19 वे वृत्तपत्र हे हिंदू patriat होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1853 होते. या वृत्तपत्राचे स्थळ कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक हे गिरीश चंद्र घोष व हरिश्चंद्र मुखर्जी होते.

विसावे वृत्तपत्र सोमप्रकाश होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1858 होते. या वृत्तपत्राचे स्थळ कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक देवेंद्रनाथ टागोर होते. हे देवेंद्रनाथ टागोर राजकीय पक्षांवर भर देणारे बंगालचे पहिले वृत्तपत्र त्यांनी बनवले होते.

21 वे वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडिया होते. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राची स्थापना वर्ष 1861 होते. या टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राचे स्थळ कलकत्ता होते. या टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्र बद्दल माहिती युरोपियन व्यापाऱ्यांनी एक कंपनी स्थापना करून रॉबर्ट नाईट च्या नेतृत्वात या वृत्तपत्राची सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी बॉम्बे टाइम्स आणि टेलिग्राम आणि कुरिअर या तीन वृत्तपत्रांच्या एकीकरण केलेले होते.

22 वे वृत्तपत्र हे इंडियन मिरर होते. या इंडियन मिरर वृत्तपत्राची स्थापना वर्ष 1862 होते. या इंडियन मिरर वृत्तपत्राचे स्थळ कलकत्ता होते. या इंडियन मिरर वृत्तपत्राचे संपादक देवेंद्रनाथ टागोर होते. इंडियन मिरज हे पहिले इंग्रजी दैनिक वृत्तपत्र होते.

23 वे वृत्तपत्र बंगाली होते. या बंगाली वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1862 होते. या बंगाली वृत्तपत्राचे स्थळ कलकत्ता होते. या बंगाली वृत्तपत्राचे संपादक गिरीशचंद्र घोष होते. या वृत्तपत्राचे संपादन पद हे गिरीशचंद्र घोष यांच्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याकडे 1879 या वर्षी आले.

24 वे वृत्तपत्र हे नॅशनल पेपर होते. त्याचे स्थापना वर्ष हे 1865 होते. या वृत्तपत्राचे स्थळ कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक हे देवेंद्रनाथ टागोर होते.

25 वे वृत्तपत्र हे मद्रास मेल होते. या मद्रास मेल वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1868 होते. या मद्रास मेल वृत्तपत्राचे स्थळ मद्रास होते. हे वृत्तपत्र भारतातील पहिले सायनदैनिक वृत्तपत्र होते.

26 वे वृत्तपत्र हे अमृत बाजार पत्रिका होते. या पत्रिकेचे स्थापना वर्ष मार्च 1868 होते. या वृत्तपत्रेचे स्थळ हे कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक हेमंत कुमार, शिरीष कुमार व मोतीलाल यांनी हे पत्र कलकत्ता जवळील अमृत बाजार नावाच्या खेड्यात सुरू केले होते.

27 वे वृत्तपत्र शिक्षा दर्पण होते. या शिक्षा दर्पण वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1868 होते. या वृत्तपत्राचे स्थळ कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक भूदेव मुखोपाध्याय होते. हे शिक्षा दर्पण शिक्षणावरील मासिक होते.

28 वे वृत्तपत्र हे बंग दर्शन होते. या वृत्तपत्राची स्थापना वर्ष 1873 होते. या वृत्तपत्राचे स्थळ कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक बंकिमचंद्र चॅटर्जी होते. हे वृत्तपत्र बंगाली भाषेत होते

29 वे वृत्तपत्र हे द स्टेट्समन होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1875 होते. हे वृत्तपत्रक याचे स्थळ कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक रॉबर्ट नाईट होते.

तीसावे वृत्तपत्र द हिंदू होते. हे वृत्तपत्र 1878 यावर्षी स्थापन करण्यात आले. या वृत्तपत्राचे स्थळ मद्रास होते. या वृत्तपत्राचे संपादक जीएसअयर, वीर राघवाचार्य व सुब्बाराव पंडित हे होते. यांनी सुरुवातीला साप्ताहिक स्वरूपात वृत्तपत्र सुरू केले होते.

31 सावे वृत्तपत्र हे ट्रिब्युन होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1881 होते. या वृत्तपत्राचे स्थळ लाहोर होते. या वृत्तपत्राचे संपादक दयालसिंग मजीठा होते. हे दैनिक वृत्तपत्र होते.

32 वे वृत्तपत्र हे स्वदेश मित्रम होते.
हे स्वदेश मित्रम वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1882 होते. या वृत्तपत्राचे स्थळ मद्रास होते. या वृत्तपत्राचे संपादक जीएस अय्यर होते. हे वृत्तपत्र तमिळ वृत्तपत्र होते.

तेहतीस वे वृत्तपत्र हे परिदशक होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1886 होते. या वृत्तपत्राचे स्थळ सिल्हेट होते. या वृत्तपत्राचे संपादक प्रकाशात बिपिनचंद्र पाल होते. हे एक साप्ताहिक वृत्तपत्र होतं.

34 वे वृत्तपत्र हे तहसील उल अखलाक होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1871 होते. या वृत्तपत्राचे स्थळ अलीगड होते. या वृत्तपत्राचे संपादक सर सय्यद अहमद खान होते. या वृत्तपत्रातून या संपादकांनी मुस्लिम धर्मातील परंपरागत रुढींवर आघात करण्यास सुरुवात केली होती.

35 व्या वृत्तपत्राचे नाव संध्याराणी होते. त्या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1874 होते. या वृत्तपत्राचे स्थळ कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक अक्षय चंद्र सरकार होते.

36 व्या वृत्तपत्राचे नाव डॉन होते. या वृत्तपत्राची स्थापना वर्ष 1897 होते. या वृत्तपत्राचे स्थळ कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक सतीशचंद्र मुखर्जी होते.

इंडियन रिव्ह्यू हे वृत्तपत्र 37 वे वृत्तपत्र होते. याचे स्थापना वर्ष 1900 होते. याचे स्थळ हे मद्रास होते. या वृत्तपत्राचे संपादक नटेसन होते.

विद्यार्थी मित्रांनो आजचा परीक्षेसाठीचा टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. व तुमच्या व्हाट्सअप टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुक अकाउंट वर सुद्धा या ब्लॉगची लिंक शेअर करा.