BANK OF MAHARASHTRA APPRENTICE BHARTI 2024. बँक ऑफ महाराष्ट्र भरती एकूण जागा 600.

Bank of Maharashtra Apprentice Recruitment 2024.

Bank of Maharashtra Apprentice Recruitment 2024.

विद्यार्थी मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र हे आघाडीचे बँक असून त्याचे मुख्य कार्यालय पुणे या शहरी आहे. अप्रेंटिस अधिनियम 1961 अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी 600 जागा भरण्यात येणार आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया बँक ऑफ महाराष्ट्र बद्दल माहिती.

बँक ऑफ महाराष्ट्र ची स्थापना 16 सप्टेंबर 1935 रोजी झाली. या बँक ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री ए. एस. भट्टाचार्य हे आहेत. या बँक ऑफ महाराष्ट्र चे मुख्यालय पुणे येथे आहे.
या बँक ऑफ महाराष्ट्र सीईओ ए. एस. राजीव हे आहेत. या बँकेला सामान्य माणसांची बँक म्हणून ओळखले जाते.

बँक ऑफ महाराष्ट्राचे राष्ट्रीयकरण 1916 मध्ये झाले. बँक ऑफ महाराष्ट्र सार्वजनिक क्षेत्रात सर्वात जास्त शाखा असलेले नेटवर्क बँक आहे.

या बँकेचे मुख्य उद्देश सर्वसामान्य माणसांपर्यंत सुविधा पुरविणे, त्यांची सेवा करणे त्यांच्या सर्व बँकिंग गरजांना पूर्ण करणे हे आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र चे मुख्यालय लोकमंगल शिवाजीनगर पुणे येथे आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण पदांच्या पोस्ट विषयी माहिती जाणून घेऊया.

या पदांची जाहिरात क्रमांक – AX1/ST/RP/Apprentice/ notification/ 2024-25

पदासाठी च्या संपूर्ण जागा 600.

बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे घेण्यात येणाऱ्या पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.

पद क्रमांकपदाचे नावपदांची संख्या
अप्रेंटिस600
संपूर्ण जागा 600

अप्रेंटिस या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक.

अप्रेंटिस या पदासाठी लागणारी वयाची अट पुढीलप्रमाणे 30 जून 2024 रोजी 20 ते 28 वर्ष. (SC आणि ST- 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट )

पदासाठीचे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत ( भारतात कोठे ही )

या पदासाठी लागणारी परीक्षा फी पुढील प्रमाणे – General / OBC – 150 रुपये (SC/ ST – 100 रुपये फी. PWD – यांच्यासाठी फी नाही )

अप्रेंटिस या पदासाठीच्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही24 ऑक्टोबर 2024 रोजी.
पदासाठीची परीक्षा तारीखया पदासाठी परीक्षा तारीख नंतर कळविण्यात येईल.

अप्रेंटिस या पदासाठी च्या महत्त्वाच्या लिंक पुढीलप्रमाणे 
अप्रेंटिस या पदाची जाहिरात पीडीएफ (PDF) स्वरूपात बघण्यासाठी पुढे क्लिक कराCLICK HERE
ऑफिशिअल वेबसाईट साठी पुढे क्लिक कराCLICK HERE
अप्रेंटिस पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढे क्लिक कराCLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो नव नवीन परीक्षेसाठींच्या अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

WHATS APP GRPUPCLICK HERE

TELEGRAM GROUPCLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपण नवनवीन टॉपिक वर आम्ही तयार केलेल्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. तर आता आपण सुरू करूया वाकाटक घराणे.

विद्यार्थी मित्रांनो वाकाटक घराण्याचा उदय हा सातवाहन साम्राज्याच्या अस्था नंतर झाला.

विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया वाकाटक घराणे यांची राजकीय परिस्थिती.

वाकाटक घराण्याबद्दल अजिंठा लेण्यांमध्ये दिसून आले. “वाकाटक वंशकेतू” असे अजिंठा लेण्यांमध्ये वाकाटकांना म्हटले जायचे.

वाकाटक घराण्याचा संस्थापक हा वायपुराण व बिदर ताम्र पटातून “विंध्यशक्ती” याला वाकाटक घरान्याचा संस्थापक असे म्हटले आहे.

विंध्यशक्तीचा मुलगा याने इसवी सन 270 ते इसवी सन 330 पर्यंत म्हणजे साठ वर्षे राज्य केले. हा सर्वात बलशाही राजा होता. या राजाने सोलापूर, सातारा, कोल्हापूर, दक्षिण कोसल, कलिंग व आंध्र प्रदेश या भागावर वर्चस्व आणले.

याने चार अश्वमेध यज्ञ केले. हा राजा वैदिक धर्मानुचारी होता.

या राजाचे नाव प्रथम प्रवसन हे होते.

या राजाचे पुत्र गौतमी पुत्र व सर्वसेन हे होते. प्रथम प्रवसन याने या दोन पुत्रांमध्ये साम्राज्याची विभागणी केली होती.

वाकाटकांची ज्येष्ठ शाखा – प्रवरसेन चा पुत्र गौतमीपुत्र याचा मुलगा हा रुद्र सेन याने समुद्रगुप्तात सोबत सलोख्याचे संबंध ठेवले.

यानंतर रुद्र सिंग चा राजा पृथ्वी सेन हा राजा बनला. याने चंद्रगुप्ताची कन्या प्रभावती सोबत विवाह केला आणि राजधानी नागपूर जवळ नंदिवर्धन येथे आणले. इसवी सन 490 च्या सुमारास वाकाटकांची ज्येष्ठ शाखा वस्तगुल्म शाखेत विलीन झाली.

वत्सगुल्म शाखा – प्रवरसेन यांचा द्वितीय पुत्र सर्व सेन याने राजधानी वत्सगुल्म येथे आणली. हा कमी होता आणि त्याने धर्म महाराज हे उपाध्ये घेतले व हरिविजय प्राकृत काव्याची रचना केली.

या सत्तेचा रास झाला कारण इसवी सन 550 सुमारास महिषप्ती च्या कलचुरीनी विदर्भात त्यांचे राज्य स्थापन केले.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया वाकाटकाचे योगदान.

वाकाटकांचे राजे हे साहित्य विद्या कलेचे भोक्ते व आश्रयदाते होते. त्यांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीचे रक्षण केले. यांच्या राज्यात सर्व धर्मांचा विकास झाला. योग्य लष्कर व प्रशासनाच्या बळाद्वारे त्यांनी साम्राज्य विस्तार टिकवण्याचे काम केले.

आयात निर्यात कर, खंडनी, जमीन महसूल, राजकीय स्थिरत्यामुळे त्यांची चांगली आर्थिक प्रगती झाली.

मेघदूत ची रचना कवी कालीदासांनी केली त्यांचे वास्तव्य हे वाकाटकाकडे होते. वाकाटक राजांनी कवी लोकांना व विद्वान लोकांना राजाश्रय दिलेला होता. यांच्यानंतर बदनामीचे चालुक्य यांनी सत्ता स्थापन केले.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया बदामीचे चालुक्य घराणे याबद्दल सखोल माहिती.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया बदामीचे चालूक्य घराणे यांची राजकीय परिस्थिती.

बदामीचे चालुक्य घराण्याचा पहिला पुलकेशि हा बलशाही राजा होऊन गेला. वातापी हे चालुक्य राज्य घराण्याची राजधानी. पुलकेशियाने अश्वमेध यज्ञ केला होता. तसेच कीर्तीवर्मन सुद्धा हा पराक्रमी राजा त्या काळी होऊन गेला.

या राजाने 11 वर्षांच्या काळात कदंब व नल राजांचा पराभव केला होता.

त्यानंतर कीर्ती वर्मनचा लहान भाऊ मंगलेश यांनी गादी सांभाळली. याने युद्ध करून रेवती व कलचुरी राजघरा न्यांचा पराभव केला. त्यानंतर याचा पुतण्या दुसरा पुलकेशी गादीवर आला.

हा सर्वात पराक्रमावर बलशाही राजा होता. यांनी सैन्य व्यवस्था बळकट बनवले आणि मौर्य, कलचुरी , नल, राष्ट्रकूट , कदंब, गंग, आलुप, राज्यांचा प्रभाव करून महाराष्ट्रातील कोकण माळवा विदर्भ प्रांत जिंकून घेतले.

या राजाने हर्षवर्धनला पराभव करून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले.

याने कलिंग व कोसल राज्य जिंकले. द्वितीय पुलकेशेचा पराभव पल्लव राजा नरेंद्र सिंह वर्मा यांनी केला. दुसरा कीर्तीवर्मन हा घराण्यातील शेवटचा राजा होता. राष्ट्रकुट राजा कृष्ण प्रथम याने पराभव करून सत्ता संपुष्टात आणली.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया कल्यानीचे चालुक्य याबद्दल सखोल माहिती.

बदामीच्या चांलुक्याचा राष्ट्रकुटानी पराभव केला. राष्ट्रकूट राजा दुसरा कर्क याच्या काळातील सरदार चालुक्य मांडलिक याने आपले स्वतंत्र राज्य जाहीर केला. हा पराक्रमी राजा होता त्याने चोल , चेदी, , कुंतल, ओरिसा या राज्यांवर कब्जा मिळवला. त्यानंतर सत्याश्रय, पहिला विक्रमादित्य, जयसिंह प्रथम, पहिला सोमेश्वर हे राजे होऊन गेले. यादवांनी चालुक्य सत्तेचा शेवट केला होता.

विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया चालुक्यांचे योगदान.
कला साहित्य विद्येचे उपासक राजे चालुक्य काळात होऊन गेले.

चालुक्यांच्या काळात दक्षिणेत संस्कृत व कन्नड भाषेत साहित्य निर्माण केले गेले.

बिल्हण कवी : विक्रमांक- देवचरीत
विज्ञानेश्वर : मिताक्षरा
पंप : पंप रामायण
सोमेश्वर तिसरा : मान सो

अशा प्रकारचे ग्रंथ या काळात निर्मित केले गेले.

या काळातील सर्व मंदिरे हे द्रविड शैलीची होते.
त्यापैकी बदामी, हम्पी, येहोळ, पट्टदकल्ल , श्रवण बेळगोळ यांच्या स्थापत्य कलेची प्रगती खूप मोठ्या प्रमाणात दर्शवतात.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया राष्ट्रकूट घराणे.

इसवी सन 753 च्या सुमारास राष्ट्रकूट राजांची महाराष्ट्रावर सत्ता स्थापन झाली.

यांची नंदी वर्धन (अचलपूर), सातारा जिल्ह्यातील मान, मराठवाड्यातील लातूर व कंधार येथे सत्ता केंद्र होते.

ऐतिहासिक नावलौकिकता ही लातूर सत्तेने मिळवली.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया राष्ट्रकूट घराण्याचा राजकीय इतिहास.

या राष्ट्रकूट घराण्याचा राजा संस्थापक हा दंतिदुर्ग होता.

आधी हा चालुक्यांचा गुजरात मधील सामंत अधिकारी होता. चालुक्याचे सत्ता अधिकारी हे दुर्बळ होते त्यामुळे याने फायदा घेतला आणि स्वतःचे साम्राज्य स्थापन केले. त्यानंतर साम्राज्य विस्तार हा उत्तरेस नर्मदेपासून ते दक्षिणेस तुंगभद्रेपर्यंत केला. याच्यानंतर त्याचा चुलता कृष्ण प्रथम याने धुरा सांभाळली.

कृष्णप्रथम याने वेरूळ येथील कैलास मंदिर बांधले. यावरून दिसून येते की ते खूप वैभव संपन्न होते.

राधाकृष्णानंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र गोविंद दुसरा व नंतर राजाध्रुव यांनी गादीची धूरा सांभाळली.

अ मग वर्ष हा एक साहित्यिक व शांतता प्रिय राष्ट्रकुल राजा त्यावेळी होऊन गेला. त्या राजाने रत्नमालिका व कवी राजमार्ग या ग्रंथांची रचना केली होती.

राष्ट्रकूटांचा शेवटचा राजा हा राजा कर्क कहा होता. राष्ट्रकूटांच्या सत्याचारा सांग कल्यानी चे चालूक्य आणि परमारांनी केलेला आक्रमणामुळे झाला.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहू त्यांचे आर्थिक जीवन.

त्या काळातील प्रमुख व्यवसाय शेती होता. तसं पाहिलं तर भूमीही राज्याच्या मालकीची होती. त्या शेतीचा सातबारा, महसूल हे राजाच्या उत्पन्नाच्या प्रमुख साधन असल्याचे त्याची मोजणी ,पाणीपुरवठा ,पतपुरवठा यासाठी राजाकडून मदतीचे उदाहरण पाहायला मिळतात.

या काळातील व्यापार हा कापूस, मातीची भांडी, गुळ, कापड, धातूच्या वस्तू यांनी केला जाईल.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया धार्मिक परिस्थिती.

राष्ट्रकूट राजे हे जैन धर्माचे अनुयायी होते. तरीसुद्धा या राष्ट्रकुट राजांनी हिंदू मंदिरे बांधले. आणि त्यांनी शैव व वैष्णव धर्माला आहे राजश्रय दिलेला दिसून येतो.

या राष्ट्रकुट राजांनी बौद्ध विहार सुद्धा बांधल्याचे दाखले बऱ्याच ठिकाणी दिसून आले.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया त्यांची सामाजिक परिस्थिती.

या काळात जातीव्यवस्था खूप तीव्र असल्याचे दिसून आलेले आहे. या काळात एकत्रित कुटुंब पद्धती अस्तित्वात होते. ब्राह्मण क्षेत्र व सेवा शूद्र या चार वर्णनातील जाती व तिच्या पोट जाती याने समाज विभागलेला दिसतो.

या राष्ट्रकुट राज्यात आंतरजातीय व एक गोत्र विवाह होत नसायचे.

या काळातील लोकांना मध्ये ज्वारी, गहू, नाचणी, बाजरी, मूग, तांदूळ व मांसाहारही करत असे.

विद्यार्थी मित्रहो आता आपण बघूया कला व स्थापत्य.

यांची कला व स्थापत्य कला हे त्या काळातील मंदिर व शिल्पातून आपल्याला दिसून येते. जगप्रसिद्ध वेरूळच्या कैलास मंदिर हे एकात्म दगडात कोरलेले म्हणजेच एक मोठे लेणे होय.

विद्यार्थी मित्रांनो या काळात महाराष्ट्राचे सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक खूप मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येते.

विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी राबवलेली ही चालू घडामोडी व विषयानुसार प्रत्येक विषयाची सखोल माहिती तुम्हाला चांगली वाटलीच असणार.

आम्ही आता पुढच्या ब्लॉगमध्ये चालू घडामोडी प्लस इतर विषयांच्या आम्ही तयार केलेल्या शॉर्ट नोट्स ह्या तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील.

धन्यवाद जय हिंद..