बँक ऑफ इंडिया मध्ये पदांसाठी भरती 2024. बँक ऑफ इंडिया रिक्रुटमेंट 2024. बँक ऑफ इंडिया भरती 2024. बँक ऑफ इंडिया पदांसाठी रिक्रुटमेंट 2024.

Bank of India Bharti 2024.

Bank of India Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

विद्यार्थी मित्रांनो बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती निघालेले आहे. या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज हे लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत. या अर्ज करण्याची शेवटच्या तारखेच्या अगोदर हे अर्ज पाठवणे गरजेचे आहे.

या पदासंदर्भातील संपूर्ण माहिती आता आपण पुढे जाणून घेऊया.

पदाचे नाव – फॅकल्टी मेंबर

पदांची संख्या – 02.

पदाचे नाव- ऑफिस असिस्टंट.

पदांची संख्या – 01.

या पदासाठी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठीचे वयोमर्यादा 22 ते 40 वर्ष आहे.

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण रत्नागिरी आहे.

या पदासाठीचे अर्ज पद्धती पुढीलप्रमाणे – या पदासाठीचे अर्ज पद्धती ऑफलाइन पद्धती आहे.

या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे – या पदासाठीचा पत्ता बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर झोनल ऑफिस 15 19 सी , जय धवल बिल्डिंग, लक्ष्मीपुरी कोल्हापुर.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 डिसेंबर 2024 आहे.

या पदासाठीची मूळ जाहिरात पीडीएफ फरक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF

ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया चालू घडामोडी या विषयाबद्दल काही नोट्स. 

भारताच्या वैद्यकीय उपकरण क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी रसायन आणि खत मंत्रालयाने मेडिकल डीवाएस उद्योग मजबूत करण्यासाठी योजना सुरू केली आहे. रसायन आणि खत मंत्रालयाने मेडिकल डिवाइस उद्योग मजबूत करण्यासाठी योजना सुरू केलेले आहे. या योजनेचा एकूण अर्थसंकल्प 500 कोटी रुपये इतका आहे.

एनटीपीसी भारतातील सर्वात मोठे ऊर्जा उत्पादक यांनी त्यांच्या विद्यांचल केंद्रात 50 व्या स्थापना दिवसानिमित्त जगातील पहिले कार्बन डाय-ऑक्साइड ते मिथेनॉल रूपांतरण प्रकल्प सुरू केलेला आहे.

जगातील सर्वात उंच इंडोरो माउंटन बायकिंग शर्यत मोंडूरो 4.0 अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे पार पडले. इशारा 14,400 फूट उंचीवरून सुरू होऊन आठ हजार उंचीपर्यंत खाली जाते.

इस्रायलच्या संरक्षण मंत्रालय 2025 मध्ये जर्मनी सोबत arrow ३ क्षेपणास्त्र अडथळा प्रणाली तैनात करण्यासाठी काम करत आहे.

लंडन फेशियल प्लास्टिक सर्जरी सेंटर ने सर्वात सुंदर महिला म्हणून ब्रिटिश अभिनेत्री जोडी कॉमरची निवड केली. टॉप टेन सुंदर महिलांमध्ये भारतीय अभिनेत्री दीपिका पादुकोणचा ही समावेश आहे.

केंद्र कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नवी दिल्ली येथे मा मदर या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
ह्या पुस्तक केरळच्या राज्यपालांचे अतिरिक्त सचिव डॉक्टर देवेंद्र कुमार धोडावत यांनी लिहिले आहे.

नाडा इंडियाने खेळाडू आणि प्रशिक्षकांना अँटी डोपिंग बद्दल शिक्षित करण्यासाठी नो योर मेडिसिन ॲप सुरू केले आहे.

मॉरिशस चे नवीन पंतप्रधान आहेत नवीन राम गुलाम.

लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिलिंग आणि आदित्य मेहता फाउंडेशन लिहा येथे जगातील पहिले उंचावरील पॅरा स्पोर्ट्स केंद्र स्थापन करत आहे. हे केंद्र 2028 पॅराऑलिम्पिक साठी पॅरा एथिलिट्सना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.

व्योमिक स्पेस अकादमीच्या सहकार्याने इस्रोने स्पेस ट्यूटरने अरुणाचल प्रदेशातील kei panyor जिल्ह्यात अंतराळा शिक्षण प्रयोगशाळा स्थापन केले आहे.

भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि सानिया मिर्झाची दुबई स्पोर्ट्स कौन्सिल अंबिसीडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

अमेरिकेत स्थायिक झालेल्या आहेत मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन च्या वतीने ज्येष्ठ संशोधक विचारवंत डॉक्टर साळुंखे यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर केलेला आहे.

ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्सनुसार या यादीमध्ये भारता चा १29 वा क्रमांक आहे. यामध्ये आइसलँड प्रथम स्थानावर आहे.

ग्लोबल मृदा परिषद 19 ते 22 नोव्हेंबर 2024 च्या दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडली होती.

भारतीय सैन्याने संयुक्त विमोचन 2024 सराव 18 ते 19 नोव्हेंबर 2024 च्या दरम्यान अहमदाबाद आणि पोरबंदर गुजरात येथे आयोजित केला होता.

19 ते 25 नंबर 2024 च्या दरम्यान भारतामध्ये जागतिक वारसा सप्ताह साजरा करण्यात आला. त्या सप्ताहाची थीम होती विविधता शोधा आणि अनुभवा.

बारा वर्षानंतर होणारा कुंभमेळा प्रयागराज उत्तर प्रदेश येथे 13 जानेवारी 23 फेब्रुवारी 2025 च्या दरम्यान होणार आहे.

भारतामध्ये समर्पित ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर जीसीसी धोरण सुरू करणारे कर्नाटक हे पहिले राज्य ठरलेले आहे.

डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना 50 वी डॉक्टर प्रदान करण्यात आलेले आहे. आतापर्यंत अब्दुल कलाम यांना 48 डॉक्टर ने गौरविण्यात आले होते तो विक्रम डॉक्टर माशेलकर यांनी मोडलेला आहे.


अमोल पालेकर यांच्या आत्मचरित्र आहे ऐवज एक स्मृतिबंध.

आयपीएल लिलावात तेरा वर्षीय वैभव सुर्यवंशी वर राजस्थान रॉयल्स ने 1.१० कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
हा सर्वात कमी वयाचा आयपीएल खेळाडू आहे.

आयपीएल अठरा लिलावातील सर्वात महागडा खेळाडू हा ऋषभ पंत आहे. लखन सुपर जॉईंट संघाने 25.75 कोटी रुपयाला त्यांनी याची खरेदी केलेले आहे.


विकसित भारतीय लीडर्स डायलॉग कार्यक्रमाचे 11 व 12 जानेवारी 2025 रोजी दिल्लीमध्ये आयोजन करण्यात येणार आहे. राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना राजकारणाशी जोडण्याकरता हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

नोव्हेंबर 2024 मध्ये स्पेन मध्ये भीषण महापूर आल्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू झालेले आहे.

जनरल उपेंद्र द्विवेदी यांना नेपाळ देशाच्या सैन्याचे मानद जनरल पद मिळाले आहे.

खेलो इंडिया युथ गेम 2025 बिहार येथे एप्रिल 2025 मध्ये होणार आहे.

भारताच्या पहिल्या संविधान संग्रहालयाचे सोनीपत हरियाणा येथे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाले.

भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचे नवीन अध्यक्ष आहेत हर्षवर्धन अग्रवाल.

लखनऊ उत्तर प्रदेश येथे कुकरेल नाईट सफारी पार्क आणि वन्यजीव केंद्रात भारताचे पहिले नाईट सफारी होणार आहे.

गॅबोन देशाने अलीकडे जन्मत संग्रहाद्वारे नवीन संविधान मंजूर केले आहे.

इस्रोच्या वतीने जम्मू काश्मीरमधील लेह लडाखमध्ये देशातील पहिल्या अनलॉक अवकाश मोहिमेस प्रारंभ केला आहे. कृत्रिम अवकाश तयार करून अवकाशयात्रींना या मोहिमेत प्रशिक्षित केले जाते.

पाणी प्रदूषित करणारे बेंझिन्स किंवा फेनोल असे घटक शोधण्यासाठी आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी एरो ट्रॅक एक जल प्रदूषक सूचक उपकरण तयार केले आहे.

भारतीय अमेरिकन अल्पसंख्यांकांच्या संघटनेच्या डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर ग्लोबल पीस पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे.


आर्मीनिया आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 104 वा पूर्ण सदस्य देश बनलेला आहे.

ऑस्ट्रा हिंद लष्करी सराव तिसरी आवृत्ती औंध पुणे येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशात पार पडला.


विद्यार्थी मित्रांनो लडाखमध्ये नवीन पाच जिल्हे संदर्भातील घोषणा केलेले आहे.

त्यात नवीन पाच जिल्ह्यापुढील प्रमाणे - झांजकर, द्रास, श्याम, नुब्रा, चांग थांग.

यांचा उद्देश पुढील प्रमाणे - प्रशासकीय सुलभता, नागरिकांच्या सोयीसाठी यांचा उद्देश आहे.

यामध्ये आधीचे जिल्हे आहेत लेह आणि कारगिल.
लडाखमधील एकूण जिल्ह्यांची संख्या सात झालेले आहे.
आणि लडाख मधील केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती 31 ऑक्टोबर 2019 रोजी करण्यात आलेली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून एकमताने जयशहा यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. आयसीसी चे ते सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहेत. त्यांच्या वय आहे 35 वर्ष.
एक डिसेंबर 2024 पासून अध्यक्ष पद ते स्वीकारतील.
ग्रेग बारकली न्युझीलँड यांच्याकडून जयशहा यांनी सूत्र हातात घेतले.

विद्यार्थी मित्रांनो आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झालेले जयशहा हे पाचवे भारतीय आहेत.

ते आता आपण जाणून घेऊया.
पहिले अध्यक्ष भारतीय अध्यक्ष होते जग मोहन दालमिया यांचा कालावधी होता 1997 ते 2000.

दुसरे अध्यक्ष होते शरद पवार यांचा कालावधी होता 2010 2012.

तिसरे अध्यक्ष होते एन श्रीनिवासन यांचा कालावधी होता 2014 ते 2015.

चौथे अध्यक्ष होते शशांक मनोहर यांचा कालावधी होता 2015 ते 2020.

आता पाचवे भारतीय अध्यक्ष राहतील जय शहा त्यांचा कालावधी आहे 1 डिसेंबर 2024 पासून.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जयशहा यांच्या बद्दलची संपूर्ण माहिती.
जय शहा हे 2009 मध्ये अहमदाबाद क्रिकेट संघटनेच्या कार्यकारणी स्थान त्यांचे होते.
2019 मध्ये बीसीसीआयचे ते सचिव होते.
2022 मध्ये आयसीसीच्या वित्त आणि व्यावसायिक विभाग समितीत निवड त्यांची झाली होती.
2023 मध्ये वित्त आणि व्यवसायिक विभाग समितीचे अध्यक्ष होते.


आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
हे क्रिकेट आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे.
1909 मध्ये इम्पिरियल क्रिकेट कॉन्फरन्स म्हणून स्थापना केलेली आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड व दक्षिण आफ्रिका प्रतिनिधी आहेत.

1965 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नाव ठेवले आहे.
त्यांनी 1987 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नाव स्वीकारले.
त्याच्या मुख्यालय हे दुबई येथे आहे.
त्याच्या सदस्य राष्ट्र आहेत 108.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अवनी बचत खाते बद्दल माहिती.

22 ऑगस्ट 2024 रोजी बंधन बँकेने महिलांसाठी अवनी बचत खाते सुरू केले होते.
यामध्ये अवनी खाते 10 लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण, विनामूल्य विमानतळ लाउंज प्रवेश आणि 3.5 लाख रुपयांच्या हरवलेल्या कार्डदायित्व असलेल्या विशेष डेबिट कार्ड ऑफर करते.
हे लोकर च्या भाड्यावर 25% सूट आणि गोड लोन प्रोसेसिंग फीवर 50% सूट देते.

विद्यार्थी मित्रांनो बंधन बँकेबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
बंधन बँक एक गैरसरकारी संस्था म्हणून सुरू झाली आणि नंतर ती नॉन बँकिंग फायनान्स कंपनी मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन बनली.

याची स्थापना झाली होती 23 ऑगस्ट 2015 रोजी. त्याच्या मुख्यालय आहे कोलकत्ता पश्चिम बंगाल येथे.
त्याच्या सीईओ आहेत रतन कुमार केश.
याची टॅगलाईन आहे आपका भला सबकी भलाई.

विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक हे तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा. तसेच तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वर सुद्धा या ब्लॉग ची लिंक तुम्ही शेअर करू शकतात. या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.