Aarogya vibhag Bharti Nashik 2024.
Aarogya Vibhag Bharti Nashik 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागात भरती निघालेले आहे. या भरतीसाठी प्रकल्प समन्वयक व तालुका समन्वय पदाच्या चार जागा भरण्यात येणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा. चला तर मग जाणून घेऊया या पदासंबंधातील संपूर्ण माहिती.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – प्रकल्प समन्वयक.
पदांची संख्या – 01.
पदाचे नाव – तालुका समन्वयक.
पदांची संख्या – 03.
या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे-
प्रकल्प समन्वयक – MPH
तालुका समन्वयक – MSW
या पदासाठी नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण नाशिक येथे आहे.
या पदासाठीचा अर्ज करण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे – प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक, जिल्हा रुग्णालय आवार.
ऑफिशिअल वेबसाइटवर जाण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 9 डिसेंबर 2024 या पदाची शेवटची तारीख आहे.
या पदासाठीची मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
सुरू करूया टॉपिक चालू घडामोडी.
रामसर स्थळांच्या संवर्धनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमृत धरोवर योजना सुरू केलेले आहे.
मिस्टी योजना.
विद्यार्थी मित्रांनो या योजनेबद्दल महत्त्वाचे म्हणजे ही योजना खारफुटींच्या वनांच्या संरक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.
गरीब कल्याण अन्न योजनेला 2028 वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेले आहे.
मित्रहो आता पण जाणून घेऊया गरीब कल्याण योजनेबद्दलचे महत्वाची माहिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाने आता निर्णय घेतला आहे की पंतप्रधान गरीब कल्याण यांनी योजनेला एक जानेवारी 2024 पासून पाच वर्षे मुदतवाढ देण्यात घेतलेला आहे.
मागील पाच वर्षात देशातील सुमारे 13.5 कोटी नागरिक दारिद्र रेषा बाहेर आलेले आहेत. ही योजना कोविड-19 साथीच्या लॉकडाऊन दरम्यान केंद्राने मार्च 2020 मध्ये सुरू केली होती आणि ती योजना डिसेंबर 2022 मध्ये बंद झाली होती परंतु या योजनेला आता एक जानेवारी 2024 पासून पाच वर्षे मुदत वाढ देण्याचा निर्णय केंद्राने घेतले आहे.
मालवीय मिशन – या मिशन अंतर्गत पुढील तीन वर्षात 15 लाख शिक्षकांना प्रशिक्षित केल्या जाणार आहे. तसेच या मिशन अंतर्गत उच्च शैक्षणिक संस्थांच्या शिक्षकाणा प्रशिक्षित केले जाणार आहे.
आता आपण बघूया या योजनेची वैशिष्ट्ये.
ही योजना शिक्षकांची गुणवत्ता आणि उत्कृष्टता वाढून सर्व स्तरांवर शिक्षणाची गुणवत्ता सुधारने.
तसेच सर्व घटकांमध्ये नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धती विकसित करणे.
या योजनेतील एक वैशिष्ट्य म्हणजे अध्यापन शास्त्राशी संबंधित प्रशिक्षणासह प्राध्यापकांची व्यवहारिक कौशल्य सुधारणे.
राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान या योजनेचे नाव बदलून पीएम उषा असे करण्यात आलेले आहे.
मित्रहो pm उषा बद्दल आता आपण जाणून घेऊया. PM USHA योजनेत पुढील तीन वर्षांसाठी 13000 कोटी रुपयांचा निधी मिळवण्यासाठी राज्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे.
तसेच या योजनेत 40% निधीची व्यवस्था राज्यांनी स्वतः करायचे आहे.
पीएम स्वनीधी योजनेबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
या योजनेमधील लाभार्थ्यांची संख्या 2023 मध्ये 50 लाखाच्या पुढे गेलेले आहे.
या योजनेच्या कालावधीत आठ हजार सहाशे कोटी पेक्षा अधिक रुपयांची 65.75 लाख कर्ज वितरित करण्यात आलेले आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मध्यप्रदेश आसाम गुजरात राज्य पातळीवर आघाडीवर होते. शहरांमध्ये अहमदाबाद लखनऊ कानपूर इंदूर आणि मुंबई आघाडीवर होती.
या योजनेची सुरुवात एक जून 2020 या वर्षापासून झालेली आहे.
हे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेले आहे.
या योजनेचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे –
साहेब रोजगार आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास पुनरसंचयित करून रस्त्यावरील विक्रेत्यांना सक्षम बनवणे या योजनेचे उद्दिष्ट होते.
राष्ट्रीय रिबेल धोरण अंतर्गत 2030 वर्षांपासून भारतातून रेबीज निर्मूलन करायचे आहे हे उद्दिष्ट ठेवलेले आहे.
मित्रहो आता आपण जाणून घेणार राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम बद्दल माहिती.
या कार्यक्रमात केंद्र सरकारने 24 मार्च 2023 रोजी राष्ट्रीय दैनिक नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केली.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे – या राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत मोफत रेबीज लस प्रदान करण्यात येणार आली आहे. तसेच जनतेमध्ये रेबीजचा प्रतिबंध करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यात आलेली आहे.
हा कार्यक्रम केंद्रीय मस्त व्यवसाय तसेच पशुवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालय व केंद्रीय आरोग्य मंत्री व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त उपक्रमाने सुरू आहे.
या कार्यक्रमाचा उद्देश आहे की 2030 पर्यंत भारतातून निर्मूलन करायचे आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण रेबीज विषयी माहिती जाणून घेऊया.
रिमिक्स हा विषाणूजन्य रोग आहे. हा विषाणूजन्य रोग प्रामुख्याने बाधित कुत्रा, मांजर, माकड अशा प्राण्यांनी माणसाला घेतलेल्या चाव्यामुळे होतो. या रोगाचे नाव दुसरे हायड्रोफोबिया हे देखील याला म्हणतात. ज्या व्यक्तीला हा रोग होतो त्या व्यक्तीला लागण झालेले असते त्याला पाण्याची भीती वाटू लागते.
आता आपण जाणून घेऊया या रेबीज रोगाची लक्षणे. या रेबीज रोगाची लक्षणे आहेत ताप, डोकेदुखी, मळमळ ,उलट्या, पाण्याची भीती तसेच अस्वस्थता.
या रोगाला प्रतिबंध म्हणजे रेबीजलस.
नवभारत साक्षरता कार्यक्रमाबद्दल आता आपण जाणून घेऊया.
नवभारत साक्षरता कार्यक्रमाची सुरुवात 1 एप्रिल 2023 रोजी करण्यात आलेली होती. या कार्यक्रमाचा कालावधी आहे 2023- 24 ते 2026-27 होती. नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या माध्यमातून पंधरा वर्षे व त्यावरील पाच कोटी निरक्षरांना साक्षर केले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेसाठी सरकार १०३७ कोटी रुपयांचा खर्च करणार होते.
नवभारत साक्षरता कार्यक्रम म्हणजे न्यू इंडिया लिटरसी प्रोग्रॅम.
ही योजना केंद्रीय पुरस्कृत योजना होती.
नवभारत साक्षरता कार्यक्रमां अंतर्गत मोबाईल ॲप्लिकेशन च्या साह्याने घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर लाभार्थ्यांचा शोध घेतला जाणार होता.
राष्ट्रीय हरित पत कार्यक्रम –
या कार्यक्रमाचे वशिष्ठ पुढीलप्रमाणे – या कार्यक्रमांमध्ये ग्रीन क्रेडिट प्रोग्राम मध्ये आठ प्रमुख क्रिया कलापांचा समावेश आहे.
यामध्ये वृक्षारोपण, जल व्यवस्थापन, शास्वत शेती, कचरा व्यवस्थापन, वायू प्रदूषण कमी करणे, खारफुटी चे संवर्धन आणि जीर्णोद्धार इको मार्क लेबल, शाश्वत इमारती व पायाभूत सुविधा.
केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट प्रोग्रॅमच्या अंमलबजावणी मध्ये मध्य प्रदेश राज्यावर आहे.
मेरा युवा भारत हे व्यासपीठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकतीस ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय एकता दिनाच्या दिवशी सुरू केले होते.
मित्रहो आता पण जाणून घेऊया मेरा युवा भारत मंच प्लॅटफॉर्म बद्दल माहिती. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारतातील तरुणांना समर्पित मेरा युवा भारत मंच सुरू केला. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाने 11 ऑक्टोबर 2023 रोजी मेरा युवा भारत नावाच्या स्वायत्त मंचाच्या स्थापनेला मान्यता दिली.
विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया मेरा गाव मेरी धरोहर या प्रकल्पाबद्दल माहिती.
मेरा गाव मेरी धरोहर हा प्रकल्प केंद्र सांस्कृतिक व पर्यटन मंत्रालयाने सुरू केलेला आहे. या प्रकल्पाचे महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्प अंतर्गत सर्व गावांचा सांस्कृतिक नकाशा तयार करण्यात येणार आहे. याची घोषणा केली होती 7 डिसेंबर 2023 रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी.
आता आपण महत्त्वाचे बघूया मेरे गाव मेरी धरोहर प्रकल्पाबद्दल.
या प्रकल्पात केंद्रीय सांस्कृतिक पर्यावरण आणि ईशान्य पूर्व भाग मंत्री श्री जी किशन रेड्डी यांनी 6 डिसेंबर रोजी मेरा गाव मेरी धरोहर या प्रकल्पाचे राज्यसभेमध्ये घोषणा केलेली होती
मेरा गाव मेरी तरह या कार्यक्रमांतर्गत सर्व गावांचा सांस्कृतीक नकाशा आणि दस्तऐवजीकरण करण्यात येणार होते.
केंद्राचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते 27 जुलै 2023 रोजी या पोर्टलचे अनावरण केले होते.
2024 मध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एक कोटी घरांच्या छतावर सौर पॅनल बसवण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू केलेले आहे.
या योजनेमध्ये एक कोटी घरांना दरमहा 300 युनिट मोफत वीज देण्यासाठी योजना सुरू केलेली आहे.
गोबर धन योजना ही योजना पर्यावरण संरक्षण आणि गुरांच्या शेन व्यवस्थापनासाठी 2023 मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे.
याबद्दलची महत्त्वाचे मुद्दे आता आपण जाणून घेणार आहोत.
गोबर धन या योजनेचे पूर्ण नाव आहे GALVANSING ORGANIC BIO AGRO RESOURCES.
योजना सुरू झालेले आहे एक फेब्रुवारी 2018 रोजी. अर्थसंकल्प सादर करताना याची घोषणा केलेली होती.
PM प्रणाम योजना ही योजना पर्यायी खतांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये या योजनेला मान्यता दिली होती.
या योजनेचा लॉंग फॉर्म आहे प्राईम मिनिस्टर प्रोग्राम फॉर रेस्टोरेशन अवेअरनेस नरेशमेंट अँड अमेलिओरेशन ऑफ मदर एर्थ.
योजना सुरू झाली होती 28 जून 2024 रोजी.
पी एम किसन भाई योजना ही योजना व्यापाऱ्यांचे मक्तेदारी मोडून काढण्यासाठी कृषी मंत्रालयाने 2023 मध्ये सुरू करण्याची घोषणा केलेली होती.
या योजना विषयीची महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे – पी एम किसान भाई चे पूर्ण नाव आहे (PM KISAN BHAI) किसान स्टोरेज इन्सेंटिव्ह स्कीम.
या योजनेचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे – शेतकरी पीक काढनी नंतर किमान तीन महिने साठवू शकतो.
मित्रहो ही योजना सात राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे.
प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणारे सात राज्य पुढीलप्रमाणे – मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, आसाम, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू. या राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
नया सवेरा ही योजना अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी 2023 यावर्षी अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेली आहे.
या योजनेबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे.
या योजनेची सुरुवात ही अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाने केलेली आहे.
या योजनेचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे – या योजनेमध्ये अल्पसंख्याक समुदायातील शीख, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे आणि त्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार करणे. कारण त्यांचा सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांमध्ये सहभाग सुधारणे हा योजनेचा उद्देश आहे.
श्रेष्ठ योजना – अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने ही योजना सुरू केली होती. योजना 2022 मध्ये सुरू करण्यात आलेले आहे.
या श्रेष्ठ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सीबीएससी शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे. या योजनेमध्ये 3000 विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. यामध्ये देशभरातून नववी आणि अकरावी करता 3000 विद्यार्थ्यांची परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्तेनुसार निवड केली जाणार आहे. या योजनेचे पूर्ण नाव आहे स्कीम फॉर रेसिडेन्शिअल एज्युकेशन फॉर स्टुडन्ट इन हायस्कूल इन टारगेटेड एरियास.
याचे उद्घाटन केले होते केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉक्टर विरेंद्र कुमार.
याचे उद्घाटन 3 जून 2022 रोजी करण्यात आलेले होते.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुझ्या मित्रांमध्ये शेअर करा आणि या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाली असल्यास माफ करा.