Indian Navy executive Bharti 2024
Indian Navy executive Bharti 2024
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो भारतीय नौदला अंतर्गत भरती निघालेली आहे. त्या अंतर्गत शॉर्ट सर्विस कमिशन कार्यकारी या पदासाठी जागा रिक्त आहेत. त्या जागा भरण्यासाठी ही जाहिरात निघालेली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज आहे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – शॉर्ट सर्विस कमिशन कार्यकारी.
पदांची संख्या – 15.
या पदासाठी अर्ज स्वरूप होण्याचे तारीख 29 डिसेंबर 2024 आहे.
या पदासाठी अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धत आहे.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदाची मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो आजच्या आधीच्या दोन ब्लॉग मध्ये तुम्ही चालू घडामोडी हा विषय बघितला असेल. तो चालू घडामोडी चा विषय आपण कंटिन्यू करत आहोत. तुम्हाला असलेले चालू घडामोडी या विषयाबद्दलची भीती आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच परीक्षेमध्ये तुमच्या मार्कांमध्ये भर करण्याचे काम हा चालू घडामोडी टॉपिक करणार आहे.
परम रुद्र सुपर कॉम्प्युटर बद्दल आता पण माहिती जाणून घेऊया.
हे लॉन्च केले होते 27 सप्टेंबर 2024 रोजी.
हे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले होते.
पीएम मोदी ने तीन परम रुद्र सुपर कॉम्प्युटर लॉन्च केलेले आहेत.
हे त्यांनी सुपर कॉम्प्युटर नॅशनल सुपर कॉम्पिटिंग मीशन म्हणजेच हा एनएसएम अंतर्गत 130 कोटी खर्चून भारतात तयार करण्यात आलेले आहे.
हे तीन संगणक पुणे कोलकत्ता दिल्ली येथे वैज्ञानिक संसाधने अवकाश संशोधन विज्ञान आणि आरोग्य सेवा क्षेत्रासाठी तैनात करण्यात आलेले आहे.
परम रुद्र हे आराखड्यापासून निर्मितीपर्यंत पूर्ण स्वदेशी असलेल्या पहिले सुपर कॉम्प्युटर आहे.
विद्यार्थी मित्रांनो अवकाशात प्रथमच खाजगी स्पेस वॉक बद्दल आता पण माहिती जाणून घेऊया.
उद्योगपती ऍलोन मस्क यांच्या स्पेसएक्स या खाजगी अवकाश संशोधन कंपनीच्या पोलारीस डॉन मोहिमेतून चार अंतराळवीर 10 सप्टेंबर 2024 रोजी अवकाशात झपावले होते.
चार अंतराळवीरांचे नावे पुढीलप्रमाणे.
इसाक मॅन, एनामेनन, स्कोट पोटेट, सारा गेलीस,
हे एकूण पाच दिवसांचे मोहीम होती त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया.
यामुळे द्वारे प्रथमच खाजगी स्पेस्वॉक करण्याचे उद्दिष्ट आहे.
नासाच्या अपोलो मून शॉट नंतरचा हा पहिला खाजगी स्पेस वॉक आहे.
स्पेस वॉक हा अंतराळ मोहिमेतील सर्वात धोकादायक भागांपैकी एक मानला जातो.
भूतपूर्वक सोवियत महासंघाने 1965 मध्ये पहिल्यांदाच स्पेस वॉकला सुरुवात केली होती.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्पाबद्दल माहिती.
मुख्यमंत्री सर्व कृषी ऊर्जा योजना 2.0 अंतर्गत राज्यात 9200 mw ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी तीन मेघवाट क्षमतेचा पहिला प्रकल्प संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे कार्यान्वित करण्यात आलेला आहे.
या प्रकल्पामुळे 1753 शेतकऱ्यांना दिवसा पुरवठा उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित आणि भरवसाचा वीस पुरवठा करण्यात येऊन त्यांना लाभ होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत संपूर्ण क्षमता डिसेंबर 2025 पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होईल.
तेरा एकल जमिनीवर हा प्रकल्प उभारलेला आहे.
आशियाई ऑलिंपिक परिषद अध्यक्षपदी रणधीर सिंग यांची नेमणूक करण्यात आलेले आहे. त्याबद्दल आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
1987 2012 भारतीय ऑलिंपिक संघटनेचे येथे महासचिव होते.
1991 2015 ओसीएचे महासचिव होते.
2021 पासून ओसीएचे कार्यकारी अध्यक्ष ते होते.
१९७८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावलेले होते.
2001 पासून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे ते सदस्य होते.
ओलंपियड मध्ये भारताला सुवर्णपदक मिळालेला आहे.
याचे ठिकाण होते बुडापेस्ट हंगेरी येथे.
भारताच्या पुरुष तसेच महिला खेळाडूंनी बुद्धिबळ ओलंपियाड मध्ये सुवर्णा पथक जिंकलेला आहे.
भारताच्या पुरुष संघाने स्लोव्हेनियाचा याचा तर महिला संघाने अझहर बैजान संघाचा पराभव केला आहे.
भारताचे हे ओलंपियाड मधील पहिले सुवर्णपदक ठरलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारताच्या पुरुष संघातील खेळाडू - डी गुकेष , प्रज्ञानंद, अर्जुन, विदीत. हरी कृष्णा.
भारताच्या महिला संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे - वैशाली, हरिका द्रोणावली, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल, तानिया सचदेव.
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा २०२४ बद्दल आता पण माहिती जाणून घेऊया.
पुरुष गटामध्ये विजेता होता यानिक सिनर इटली.
उपविजेता होता टेलर फ्रिट.
चार पैकी दोन गॅदस्लॅम 2024 चे कार्लोस फ्रेंच दोन यानिक सिनरने ऑस्ट्रेलियन यूएसए जिंकले.
सीनरचे कारकिर्दीतील हे दुसरे ग्याडस्लम विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने 2024 ची ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया त्यावेळेस त्या विधी आयोगाची स्थापना याबद्दल माहिती.
एक सप्टेंबर 2024 पासून 23 व्यां विधी आयोगाची स्थापना करण्यात आली.
त्याचा कार्यकाळ आहे एक सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2027.
22 व्या विधी आयोगाची मुदत ही एकतेस ऑगस्ट 2024 ला संपली होती.
या आयोगात पूर्णवेळ अध्यक्ष व चार पूर्णवेळ सदस्य होते.
गुंतागुंतीच्या कायदेशीर मुद्द्यांवर विधी आयोग केंद्र सरकारला सल्ला देते.
स्वातंत्र्योत्तर भारतात 1955 मध्ये पहिला कायदा आयोग स्थापन करण्यात आला.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अरुणा वासुदेव यांच्या बद्दल माहिती.
हे ख्यातनाम चित्रपट समीक्षक आणि लेखिका होते.
वयाच्या 88 व्या वर्षी त्यांची निधन झाले.
अल्जायमर या आजारांने त्यांचे निधन झाले. आशियाई सिनेमाची जननी अशी त्यांची ओळख होती. दिल्लीहून प्रसिद्ध होणाऱ्या सिनेमा या : द एशियन फिल्म कॉर्टरली या नियतकालिकेच्या संस्थापक संपादक त्या होत्या.
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या नेट पॅक या संस्थेची स्थापना करण्याच्या श्रेय अरुणा वासुदेव यांना जाते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सिताराम येचुरी यांच्या बद्दल माहिती.
मार्क्सवादी कम्युनिस पक्षाचे सरचिटणी सिताराम येचुरी यांचे वयाच्या 72 व्या वर्षी 12 सप्टेंबर 2024 रोजी निधन झाले.
बारावीच्या परीक्षेत ते देशात पहिले आले होते.
त्यांनी दिल्लीच्या जे एन यू विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली होती.
2005 ते 2017 या काळात ते राज्यसभा सदस्य होते.
ते जे एन यू विद्यार्थी संघाचे तीन वेळा अध्यक्ष बनले होते.
माकपचे सर्वात तरुण पॉलिट ब्युरोचे सदस्य झाले होते.
आणीबाणी विरोधात जे एन यू या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये ते सक्रिय झाले होते. त्यांच्या आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना जे एन यू चे कुलपती पद सोडावे लागले होते. त्यांनी 1996 मध्ये संयुक्त आघाडी सरकारसाठी आणि 2004 आणि 2009 मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारसाठी समान किमान कार्यक्रमांवर काम केले होते.
2017 ला त्यांना सर्वोत्तम संसद पटू म्हणून गौरविण्यात आले होते.
काँगो या देशाची राजधानी कींशासा येथे असलेल्या तुरुंगातून तुरुंग फोडून कैद्यांची पडून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये त्यावेळेस 129 जणांचा मृत्यू झाला होता.
अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे स्थापन करण्यात आलेल्या मराठी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून डॉक्टर अविनाश आवलगावकर यांचे नियुक्त करण्यात आले आहे.
सामान्य प्रशासन विभागाने नवीन नामांतरण शासकीय नाविन्यता. उत्कृष्टता आणि सुशासन , सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन.
मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यवसायिक शहरांना जोडणाऱ्या 309 किलोमीटरच्या नव्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे.
पश्चिम बंगालमध्ये बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलेले आहे.
सी ए ए अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे गोव्यातील पहिले व्यक्ति ख्रिश्चन जोसेफ परेरा.
महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांच्या हस्ते वरिष्ठ सभागृहाचे आवश्यकता आणि महत्त्व ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र विधान परिषद स्थापना 1921 मध्ये झाली होती. त्याच्या पहिले सभापती होते नारायण गणेश चंदावरकर.
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौतच्या बहु चर्चित इमर्जन्सी चित्रपटावर जबलपूर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.
देशातील विरोधी पक्षांची परिषद केरळमध्ये पार पडली होती.
अल्जेरियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अब्देल माद जिद हे विजयी झाले आहेत.
लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी कोर्टाची सात सदस्य समिती नेमण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सुचविणारा उपाय उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव आणि शालिनी फणसळकर यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करणार आहे.
भंडारदरा जलाशय आता आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय या नावाने ओळखले जाणार आहे.
शाहरुख खान हा देशातील सर्वाधिक कर भरणारा सेलिब्रिटी ठरलेला आहे. त्याने 92 कोटी रुपयांचा कर भरला आहे.
मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारने सक्षम बालक अभियान सुरू केले आहे.
पहिली ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट हैदराबाद येथे पाच ते सहा सप्टेंबर 2024 दरम्यान पार पडली होती.
आदिवासी समाजासाठी नाशिक येथे स्वातंत्र आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात आलेले आहे.
पोर्तुगालाच्या विजयात महत्त्वाचे योगदान देणारा कर्णधार रोनाल्डोने 900 गोल करून इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणार तो पहिला फुटबॉलपटू आहे.
भारत आणि अमेरिकेमधील सर्वात मोठ्या संयुक्त लष्करी युद्ध सराव बिकानेर राजस्थान येथे पार पडला. हा विसावा युद्ध सराव होता.
भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय नौदल सराव त्याचे नाव आहे वरून.
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात 27 ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान विषाणू युद्ध अभ्यास हा रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती.
अमेरिकेच्या पेस्टल सोसायटीने भारतीय कलाकार पराग बोरसे यांना 2024 या वर्षीचा फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल पुरस्कार प्राप्त झाला आहे. पराग बोरसे यांचे सॉफ्ट पेस्टल या माध्यमातून चितारलेले यट बरण गेझ हे एका फेटा घातलेल्या धनगराचे व्यक्तिचित्र नाही.
फ्रान्सचे नवनियुक्त पंतप्रधान मिशेल बार नियर आहेत.
हवेतून जमिनीवर मारा करण्यास तसेच शत्रूवर नजर ठेवण्यास सक्षम असलेला स्वदेशी बनावट असलेल्या मानव रहित बॉम्बर ड्रोन विमानाचे यशस्वी उड्डाण करण्यात आलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तरी ब्लॉकची लिंक तुमच्या मित्र मंडळींमध्ये तुम्ही नक्की शेअर करा. या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा.
चला तर मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.