भारतीय नौदल कॅडेट प्रवेश योजना भरती 2024. इंडियन नेव्ही कॅडेट एन्ट्री स्कीम 2024. इंडियन नेव्ही स्कीम भरती 2024.

Indian Navy cadet entry Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link Telegram group link

Indian Navy cadet entry Bharti 2024.

पदा संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

विद्यार्थी मित्रांनो भारतीय नौदल कॅडेट प्रवेश योजनेअंतर्गत टेन प्लस टू म्हणजेच 10+2 बी टेक योजनेत पदांच्या जागा भरल्या जाणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपली पात्रता ओळखून लवकरात लवकर अर्ज आहे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे आता आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.

पदाचे नाव- 10+2 (b.tech) कॅडेट प्रवेश योजना.

या जागांसाठी असणारी पदसंख्या 36 आहे.

या पदासाठीचे अर्ज पद्धती ही ऑनलाईन पद्धती आहे. उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीचा उपयोग करून आपला अर्ज करू शकतात.

या पदासाठीचे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे –

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE.

या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – ONLINE

पदासाठीचे मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF

चालू घडामोडी हा टॉपिक

विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया चालू घडामोडी हा टॉपिक. या टॉपिक मध्ये आपण आता परीक्षेसाठीचे महत्त्वाचे टॉपिक घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया आजचा टॉपिक चालू घडामोडी.

आयसीसी चे नवीन अध्यक्ष जय शहा बनलेले आहेत.
जय शहा यांनी एक डिसेंबर रोजी पदभार स्वीकारलेला आहे.
जय शहा हे सर्वात कमी वयात आयसीसी चे अध्यक्ष बनलेले आहेत. त्यांचे वय आहे 36 वर्ष.
आयसीसी चे अध्यक्ष बनणारे ते पाचवे भारतीय ठरलेले आहेत.
जय शहा हे यापूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष बनलेले होते.

मित्रहो, आता आपण जाणून घेऊया आयसीसी चे पाच अध्यक्ष भारतीय.
पहिले भारतीय अध्यक्ष होते शरद पवार. त्यानंतर जगमोहन दालमिया. तिसरे होते एन श्रीनिवासन, चौथे होते शशांक मनोहर, इयत्ता पाचवी भारतीय अध्यक्ष आहेत जय शहा.

आयसीसी चा लॉंग फॉर्म आहे – इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल.
आयसीसी चे मुख्यालय हे दुबई येथे आहे.
त्याच्या अध्यक्ष आता जयशहा आहेत.

कश्यप पटेल यांचे अमेरिकेच्या एफबीआयच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते भारतीय वंशाचे आहेत.
मित्रहो आता पण जाणून घेऊया या एफ बी आय चा लॉंग फॉर्म – फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन हा आहे.
ही एक अमेरिकेची तपास यंत्रणा आहे.
एफबीआयच्या प्रमुख पदी भारतीय वंशाच्या व्यक्तीची पहिल्यांदा नियुक्ती करण्यात आलेली आहे.

पुणे या ठिकाणी भारत आणि कंबोडिया सैन्य अभ्यास पार पडलेला आहे.
त्या सैन्य अभ्यासाचे नाव आहे SINBAX.
या सैन्य अभ्यासाचा कालावधी होता एक डिसेंबर ते 8 डिसेंबर.
हा सैन्य अभ्यास संयुक्त दहशतवाद विरोधी कारवाया रोखण्यासंबंधीत होता.

पी व्ही सिंधू यांनी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय टूर्नामेंट मध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय टूर्नामेंट बद्दल माहिती.
या आंतरराष्ट्रीय टूर्नामेंटच्या आयोजन लखनऊ उत्तर प्रदेश येथे पार पाडले.
पी व्ही सिंधू यांनी महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकलेले आहे.
लक्षसेन यांनी पुरुष एकेरी मध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे.
पी व्ही सिंधू यांनी हे विजेते पद तिसऱ्यांदा जिंकलेले आहे.

एड्स दिवस हा एक डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
विद्यार्थी मित्रांनो जागतिक एड्स दिवस हा 1 डिसेंबरला साजरा करण्यात येतो.
याचे उद्देश पुढील प्रमाणे – एड्स रोगाविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

आता आपण एड्स (AIDS) चा लॉंग फॉर्म जाणून घेऊया.
acquired immune deficiency syndrome.
हा रोग HIV या विषाणूमुळे होतो.
या रोग झालेल्या व्यक्तीला रोगप्रतिकार शक्ती कमी होते.
त्यामुळेच त्याला खूप आजार होतात तसेच त्वचेचे आजार, भूक कमी होणे, TB चे आजार, व इत्यादी.

आता आपण जाणून घेऊया हा आजार का होतो.
हा आजार असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यामुळे होतो.
तसेच हा आजार होण्याचा एक कारण आहे एड्स झालेल्या व्यक्तीच्या रक्ताच्या संपर्कात आल्यामुळे सुद्धा हा आजार होतो.

डॉक्टर वसंत गोयल यांना युनायटेड नेशन ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे.
त्यांना हा अवार्ड स्वास्थ व समाज सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल देण्यात आलेला आहे.
यापूर्वी वसंत गोयल यांना भारत कीर्तिमान अलांकरण पुरस्कार देऊन लंडनमध्ये सन्मानित करण्यात आलेले होते.

राजस्थान या राज्यात भारताचा 55 वा व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो केंद्र सरकारने नुकतेच तीन व्याघ्र प्रकल्प घोषित केलेले आहे.
त्यामध्ये 53 वा व्याघ्र प्रकल्प आहे उत्तर प्रदेश येथील राणीपूर येथे.
व 54 वा व्याघ्र प्रकल्प आहे मध्य प्रदेश येथील वीरांगणा दुर्गावती येथे.
55 वा व्याघ्र प्रकल्प हा राजस्थान येथील धोलपूर करोली येथे.

भारताचा पहिला व्याघ्र प्रकल्प हा उत्तराखंड राज्यातील जिम कार्बेट येथे.
26 जुलै या रोजी जागतिक व्याघ्र दिवस.
मित्रहो भारतामध्ये व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात झाली होती 1973 यावर्षी.

हरिमऊ शक्ती हा भारत मलेशिया देशाच्या दरम्यान झालेला सैन्य अभ्यास आहे.
मित्रहो याच्याबद्दल आता पण संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
हा सैन्य अभ्यास भारत मलेशिया या दोन देशांच्या मध्ये झाला.
या सैन्य अभ्यासाचा कालावधी आहे 2 डिसेंबर ते 15 डिसेंबर.
या सैन्य अभ्यासाचे ठिकाण आहे मलेशिया.

समुद्र लक्ष्मण ह्या सैन्य अभ्यास मलेशिया भारत या दोन देशांच्या मध्ये पार पडला.
उदार शक्ती हा सैन्य अभ्यास मलेशिया आणि भारत या दोन देशांच्या मध्ये पार पडला.

विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया इतर सैन्य अभ्यासाबद्दल माहिती.
भारत आणि यांच्या दरम्यान डेझर्ट सायक्लोन हा सैन्य अभ्यास पार पडला.
सहयोग कायजीन हा सैन्य अभ्यास भारत आणि जपान या दोन देशांमध्ये पार पडला.
खंजीर हा सैन्य अभ्यास भारत आणि क्रिकेट स्थान या दोन देशांमध्ये पार पडला.
दोस्ती हा सैन्य अभ्यास भारत, मालदिव, श्रीलंका या तीन देशांच्या मध्य पार पडला.
डस्टलिंक हा सैन्य अभ्यास भारत उझनेकिस्तान स्थान या दोन देशांमध्ये पार पडला.

महा कुंभ हा ७६वा नवीन जिल्हा उत्तर प्रदेश राज्यात बनलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश सरकारने प्रयागराज जिल्ह्यातील महाकुंभ क्षेत्राला नवीन जिल्हा बनवण्याची घोषणा केलेली आहे.
या क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.
मित्रहो कुंभमेळा २०२५ हा याच ठिकाणी होणार आहे.

उत्तर प्रदेश या राज्याचे राजधानी आहे लखनऊ.
या राज्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ.
या राज्याचे राज्यपाल आहेत आनंदी बेन पाटील.

गुजरात या राज्यातील पारंपारिक घरचोला साडीला जीआय टॅग मिळालेला आहे.
मित्रांनो जीआय टॅग केव्हा मिळतो त्यात आपण जाणून घेऊया.
एखाद्या ठिकाणची युनिक वस्तू असेल तर तिला केंद्र सरकारकडून जीआय टॅग दिला जातो.
जीआय टॅग हा 1999 च्या कायद्यानुसार देण्यास सुरुवात झालेली आहे.
सर्वात पहिले जीआय टॅग हा दार्जिलिंगच्या चहाला मिळालेला होता.

नागोजी ओकोंजो इवेला हे जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख बनलेले आहेत.
जागतिक व्यापार संघटनेला इंग्रजी मध्ये म्हणतात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन.
याचे प्रमुख आता नागोजी ओकोंजो इवेला आहेत. या प्रमुख पदी नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
त्यांची दुसऱ्यांदा पुन्हा नेमणूक करण्यात आलेले आहे.
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना 1995 या वर्षी करण्यात आलेले होते. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे मुख्यालय आहे जिनिव्हा हे स्वित्झर्लंड येथे आहे.
त्याचे कार्य आहे – आंतरराष्ट्रीय संघटना जी विविध देशांमधील व्यापार विषयक नियमांचे नियंत्रण करते.

मध्य प्रदेश या राज्यांमध्ये ७२वे महाबोधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले.
हे 72 वें महाबोधी महोत्सव आहे. याचे ठिकाणे सांची स्तूप मध्य प्रदेशात आहे.
जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये सांची स्तूपचा समावेश आहे.

विद्यार्थी मित्रांनो यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2024 हा डॉक्टर जयसिंग पवार यांना देण्यात आलेला आहे.
हा पुरस्कार मिळणारे डॉक्टर जयसिंगराव पवार हे प्रसिद्ध इतिहास लेखक आहेत. या लेखकांनी महाविद्यालयीन तसेच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके लिहिलेले आहेत.
त्यांना हा पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई द्वारे हा पुरस्कार देण्यात येत आहे.
या पुरस्काराच्या सुरुवात 1990 यावर्षीपासून झालेले आहे.
या पुरस्काराचे रक्कम आहे दोन लाख रुपये.

विश्व संगणक साक्षरता दिवस हा दोन डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला.
विद्यार्थी मित्रांनो संगणक साक्षरता विषय जनजागृती करण्यासाठी हा दोन डिसेंबर दिवस साजरा करण्यात येतो.
भारताचे पहिले सुपर कॉम्प्युटर हे परम 8000.
विजय भटकर हे भारतात सुपर कॉम्प्युटरचे जनक आहेत.
frontier हे जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर आहे.

BRAIN ROT या शब्दाला ऑक्सफर्ड 2024 वर्षासाठीचे वर्ड ऑफ द इयर घोषित केलेला आहे.
ब्रेन रॉट म्हणजे काय ते आता आपण जाणून घेऊया.
ब्रेन रॉट म्हणजे सोशल मीडियावर उपयोगी नसणाऱ्या गोष्टी विचार न करता तासंतास पाहणे म्हणजेच ब्रेन रॉट.
यामुळेच बुद्धीची विचार करण्याची क्षमता कमी होण्याचे प्रमाण वाढते.
त्यामुळे दिवसभर मानसिक थकवा जाणवत असतो.
तसेच कामात मन लागणे व स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होतो.

नवी दिल्ली येथे 20 वी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप चे आयोजन करण्यात आल्या आहे.
ही चॅम्पियनशिप तीन ते दहा डिसेंबर दरम्यान चालणार आहे.
या चॅम्पियनशिपचे भारतात पहिल्यांदाच आयोजन करण्यात येत आहे.

पाकिस्तान या देशाने अंधांचे टी ट्वेंटी विश्व कप जिंकलेले आहे.
या अंधांच्या t-20 विश्व कपाचे फायनल होते पाकिस्तान वर्सेस बांगलादेश मध्ये.
याचे आयोजन हे पाकिस्तान येथे केले होते.
ही स्पर्धा 23 नोव्हेंबर ते तीन डिसेंबर दरम्यान पार पडली.

तेलंगणा या राज्यात रयथू भरोसा या योजनेचे सुरुवात करण्यात आली.
या योजनेबद्दल आता आपली माहिती जाणून घेऊया.
तेलंगणा राज्य सरकारने या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये सबसिडी देणार आहे.

तेलंगणाच्या बद्दल आता पण माहिती जाणून घेऊया.
याचे मुख्यमंत्री आहे रेवंत रेड्डी.
याचे राज्यपाल आहेत जीष्णू देव वर्मा.

विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी दररोज आम्ही नवीन टॉपिक घेऊन येत आहोत. मागच्या काही दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला इतिहास आणि भूगोल या विषयांवर महत्त्वाचे पॉईंट्स शिकवले म्हणजेच दिले होते. या पॉईंट्समुळे तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल.
या ब्लॉग मध्ये काय टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा.
चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.