ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई भरती 2024.ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई रिक्रुटमेंट 2024. मेडिकल कॉलेज रिक्रुटमेंट 2024.

Grant government medical College Mumbai Bharti 2024.

Grant government medical College Mumbai Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो शासकीय महाविद्यालय मुंबई अंतर्गत भरती निघालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून लवकरात लवकर अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या पदासंदर्भातील संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे

पदाचे नाव – सहाय्यक दंतशास्त्र.
पदांची संख्या – 03

या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन ही पद्धत या पदासाठीची अर्ज करण्याची पद्धत आहे.

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र.

या पदासाठी शैक्षणिक पात्रता – बीडीएस पदवी.

सहाय्यक दंतशास्त्र या पदासाठी वेतनश्रेणी – 7000 रुपये, अधिक चालू दराने महागाई भत्ता.

या पदासाठी अर्ज पाठवण्याचा व मुलाखतीचा पत्ता – ज. जी. समूह कार्यालय, प्रशासकीय भवन, पहिला माळा, आस्थापना वर्ग 3.

या पदासाठी असणारे मुलाखतीची तारीख – 17 डिसेंबर 2024.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2024.

ऑफिशिअल वेबसाईटला जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE

या पदाची मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link Telegram group link

आजचा दिवस आठ सप्टेंबर आज आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत चालू घडामोडी या विषयावर संबंधित टॉपिक. चला तर मग सुरु करूया आजचा विषय. 

पॅरा ऑलिंपिक मध्ये सुवर्णपदक जिंकलेले खेळाडू आहेत प्रवीण कुमार. त्यांनी उंच उडी या खेळात हे सुवर्णपदक जिंकलेल आहे.
त्यांनी हाय जंप t-64 मध्ये हे सुवर्णपदक जिंकलेला आहे.

इंग्लिश चैनल पार करणारे सर्वात वयस्कर भारतीय सिद्धार्थ अग्रवाल बनलेले आहेत.
त्यांचे वय ४९ आहे. सर्वात कमी वयात इंग्लिश चॅनल पार करणारी व्यक्ती जिया राय सोळा वर्ष. मुंबईची रहिवासी.

फुटबॉल खेळामध्ये नऊशे गोल करून जागतिक विक्रम करणारा खेळाडू आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. या खेळाडू ने 900 गोल पूर्ण केलेला आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राज्यपालांबद्दल माहिती. सी पी राधाकृष्णन यांचे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे.
यापूर्वीचे महाराष्ट्राचे राज्यपाल होते रमेश बैस. तसेच सी पी राधाकृष्णन हे यापूर्वी झारखंड राज्याचे राज्यपाल होते.

राज्यघटनेतील कलम 153 ते 167 हे राज्यपाला विषयीचे आहे.
राज्यपाल हे राज्याचे नामधारी कार्यकारी प्रमुख आहेत. त्यांचे नेमणूक राष्ट्रपती द्वारे केले जाते.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया राज्यपाल यांचे कार्य - राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी राष्ट्रपतींना शिफारसी करू शकतात.


महाराष्ट्र सरकारने शिवाजी महाराजांची वाघनखे इंग्लंड देशातून भारतात परत आणलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो ही वाघनखे भारतात फक्त तीन वर्षांसाठीच असणार आहेत.
ही वाघनखे सातारा कोल्हापूर नागपूर मुंबई या शहरांमध्ये लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे वाघनखे जे आहेत त्याद्वारेच शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता.

जगातील पहिली सीएनजी मोटरसायकल बाईक बजाज मोटर या भारतीय कंपनीने बनवले आहे. तिचे नाव आहे बजाज फ्रीडम 125. तिची किंमत आहे 95 हजार. तिला दोन लिटरचे पेट्रोल टॅंक आहे आणि दोन लिटरचे सीएनजी टॅंक आहे.

ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशात ई दाखील पोर्टल सुरू करण्यात आलेली आहे.

केरळ राज्याने केरळ राज्य सरकारने आयटीआय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी दरम्यान दोन दिवसाची सुट्टी देण्याची घोषणा केलेली आहे.

जम्मू काश्मीर वर लडाख उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की मालमत्तेचा अधिकार हा केवळ घटनात्मक आणि वैज्ञानिक अधिकार नसून तो मानवाधिकाराच्या देखील कक्षेत येतो.

नेटवर्क रेडीनेस इंडेक्स मध्ये भारत 49 व्या स्थानावर आहे. हा नेटवर्क रेडी नेस इंडेक्स 2024 चा आहे. त्यामध्ये प्रथम स्थानावर असणारा देश हा अमेरिका देश आहे.

जयसिंगराव पवार यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे.


भारतीय पर्वता रोहन फाउंडेशन तर्फे गिर्यारोहण क्षेत्रातील योगदान बद्दल शांती राय यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आलेले आहे.

मध्यप्रदेश या राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती झालेले आहे कैलास मकवाना यांची.

मराठवाडा साहित्य परिषद याचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित आयसीए जागतिक सरकार परिषद 2024 चे उद्घाटन करण्यात आलेले आहे.

वन नेशन वन सबस्क्रीप्शन हे योजना केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्वत्तापूर्ण संशोधन लेख आणि जनरल प्रकाशनाना देशव्यापी प्रवेश देण्यासाठी ही योजनेला मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभे च्या निवडणुकीमध्ये एनडीए आघाडी ला एकूण 230 जागा मिळालेल्या आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये 50 जागा या इंडिया आघाडीने जिंकलेले आहेत.

काशीराम पावरा हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 2024 च्या निवडणुकीमध्ये राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेले आहेत.

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये नोटाला 0.72% मतदान झाले आहे.

झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला झारखंड विधानसभा निवडणुकी 2024 मध्ये एकूण 34 जागा मिळालेल्या आहेत.

आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण श्री भूमी करण्यात आलेले आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय केंद्रीय मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा बँक लॉन्च केलेला आहे.

विद्यार्थी मित्रांनो संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे आता आपण महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीबद्दल माहिती करून घेऊया.

भारतीय जनता पक्षाने 132 जागा जिंकलेल्या आहेत.
शिवसेना शिंदे गटाने एकूण 57 जागा जिंकलेल्या आहेत
राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाने 41 जागा जिंकलेल्या आहे.
शिवसेना ठाकरे गटाने 20 जागा जिंकलेल्या आहेत.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 16 जागा जिंकलेल्या आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने दहा जागा जिंकलेल्या आहेत.
इतर दहा
आणि अपक्ष जागा आहेत दोन.
एकूण जागा 288.




विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया 2024 चे झारखंड विधानसभा निवडणुकी बद्दल माहिती.

झारखंड मुक्ती मोर्चाला 34 जागा जिंकलेल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाने 21 जागा जिंकलेले आहेत.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 16 जागा जिंकलेले आहेत.
इतर 10.

विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया महाराष्ट्र विधानसभा अंतिम निकाल बद्दलची टक्केवारी.

भाजप या पक्षाला 26.77%.
शिवसेना पक्षाला 12.38%.
राष्ट्रवादी या पक्षाला 9.01 टक्के.
काँग्रेस या पक्षाला 12.42%.
शिवसेना उबाठा या पक्षाला 9.96%.
राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षाला 11.28%.
मनसे या पक्षाला 1.55%.
नोटा - 0.72%.

विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं की सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले काशीराम पावरा यांची मते आहेत एक लाख 59 हजार 44.
त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांना 1,42,124 मते मिळाली आहेत.

धनंजय मुंडे यांना एक लाख चाळीस हजार 224 मते मिळालेले आहेत.
दिलीप बोरसे यांना एक लाख 29 हजार 297 मते मिळाली आहेत.
आशुतोष काळे यांना एक लाख 24 हजार 824 मते मिळालेले आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सर्वात कमी मतांनी निवडून आलेले विधानसभेत तील उमेदवार.

मुक्ती मोहम्मद यांना 162 मते मिळाली आहे.
नाना पटोले यांना 207 मते मिळालेले आहेत.
मंदा म्हात्रे यांना 377 मते मिळालेली आहे.
संजय गायकवाड यांना 841 मते मिळालेले आहेत.
शिरीष कुमार नाईक यांना 1121 मते मिळालेली आहेत.

के संजय मूर्ती यांची भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे.

मणिपूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पदी जस्टीस कृष्णकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेले आहे.

ब्राझील या देशाने 2025 चे जी 20 परिषदेचे अध्यक्षपद दक्षिण आफ्रिका या देशाकडे सोपवलेले आहे.


भारत या देशाने गयाना देशा सोबत संरक्षण व्यापार ऊर्जासह पाच करारावर स्वाक्षरी केलेले आहे.

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण 65 टक्के मतदान झालेले आहे.

गांधीनगर येथे 50 वी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद आयोजित करण्यात आलेली आहे.

श्रीलंका या देशाच्या पंतप्रधानपदी हरीनी अमर सूर्या यांचे निवड करण्यात आलेले आहे.

नागालँड हे राज्य आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी विमा देणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे.

मुंबई सेंट्रल स्टेशनचे नवीन नाव नाना जगन्नाथ शंकर शेठ स्टेशन ठेवलेले आहे.

लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया लेक लाडकी योजनेबद्दलची संपूर्ण माहिती.
ही योजना 1 एप्रिल 2023 रोजी सुरू करण्यात आलेली होती.
या योजनेच्या लाभार्थी असतील महाराष्ट्र राज्यातील कन्या. ही योजना मुलींसाठी सुरू करण्यात आलेली आहे.
लेक लाडकी योजनेचा उद्देश पुढील प्रमाणे - योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींना आर्थिक मदत देण्याचे ठरलेला आहे.
ही योजना महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र याच्या मार्फत आहे.
या योजनेमध्ये मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये देण्यात येणार आहे. ती पहिलेच असताना तिला सहा हजार रुपये देण्यात येणार आहे. मुलगी सहावी मध्ये गेल्यावर तिला सात हजार रुपये देण्यात येणार आहे. मुलगी इयत्ता अकरावीत गेल्यावर तिला आठ हजार रुपये देण्यात येणार आहे. या योजनेतील लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
मित्रहो आता आपण जाणून घेऊया हा कोणत्या कुटुंबातील मुलींना भेटणार आहे.
पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांतील या कुटुंबातील मुलींना हा लाभ मिळणार आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सलोखा योजनेबद्दल ची माहिती.
सलोखा योजना ही शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.
या योजनेची सुरुवात 3 जानेवारी 2023 रोजी सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेचे लाभार्थी आहेत महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्ग.
या योजनेचा उद्देश पुढीलप्रमाणे - या योजनेचा उद्देश हाच आहे की जमिनीचा ताबा व वही वाट बाबत शेतकऱ्यांची आपापसातील वाद-विवाद दूर करणे. तसेच त्यांच्यामध्ये परस्पर समर्थनाची भावना जोपासणे ज्यामुळे ग्रामीण जमीन मालकांमध्ये संवाद वाढेल. यासाठीच ही सलोखा योजना सुरू करण्यात आलेली आहे.
ही योजना महसूल व वन विभागामार्फत सुरू करण्यात आलेले आहे.

विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉकची लिंक तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. तसेच तुमच्या इंस्टाग्राम व्हाट्सअप आणि फेसबुक पेजवर सुद्धा तुम्ही या ब्लॉग ची लिंक शेअर करू शकतात. या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा. चला तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.