Nashik Mahanagar parivahan mahamandal limited Bharti 2024.
Nashik Mahanagar parivahan mahamandal limited Bharti 2024.
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत भरती निघालेली आहे. पदासाठी पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीच्या पत्त्यावर वेळेवर हजर राहणे आवश्यक आहे.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link Telegram group link
पदा संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – जनरल मॅनेजर ऍडमिन आणि टेक्नॉलॉजी.
पदासाठीची पदसंख्या – 01.
पदाचे नाव – डेप्युटी जनरल मॅनेजर.
पदासाठीची पदसंख्या – 02.
पदाचे नाव – असिस्टंट अकाउंट ऑफिसर.
पदासाठीची पदसंख्या – 01.
या पदासाठीचे असणारे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – नाशिक, महाराष्ट्र.
या पदासाठी जे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे –
पदाचे नाव – जनरल मॅनेजर ऍडमिन आणि टेक्निकल.
शैक्षणिक पात्रता – बी टेक/ बॅचलर ऑफ इंजीनियरिंग (मेकॅनिकल)/ ऑटोमोबाईल.
पदाचे नाव – डेप्युटी जनरल मॅनेजर.
शैक्षणिक पात्रता – बी टेक/ बॅचलर ऑफ इंजीनियरिंग, ग्रॅज्युएट.
पदाचे नाव – असिस्टंट अकाउंट ऑफिसर.
शैक्षणिक पात्रता – या पदासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला मूळ पीडीएफ मध्ये मिळेल. या पदासाठीची मूळ पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
या पदासाठी निवड प्रक्रिया – निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.
मुलाखतीची तारीख – या पदासाठीची मुलाखतीची तारीख चार डिसेंबर 2024.
- ऑफिशिअल वेबसाईट वर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो चला सुरू करूया आजचा टॉपिक चालू घडामोडी.
जिव्हाळा योजना ही महाराष्ट्र राज्यांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेची सुरुवात 1 मे 2022 रोजी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे यांनी केली होती.
या योजनेची सुरुवात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहाय्याने करण्यात आले होते.
योजनेचा मुख्य उद्देश होता राज्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
या योजनेमध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त कारावास भोगत असलेल्या कैद्यांसाठी ही योजना होती.
सुरुवातीच्या टप्प्यात त्यांना पन्नास रुपये कर्ज देण्यात येणार होते.
त्याचे व्याज दर होते सात टक्के इतके.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना बद्दल माहिती.
भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेअंतर्गत एकूण 5000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असणार आहे. या योजनेची सुरुवात महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 18 ऑगस्ट 2023 रोजी या योजनेची अंमलबजावणी ची घोषणा करण्यात आली.
या योजनेचा उद्देश पुढील प्रमाणे – राज्यातील 17 जिल्ह्यातील आदिवासी भागात रस्ते जोडणी वाढवने होते.
या योजनेअंतर्गत सर्व आदिवासी वाड्या वस्त्यांना सर्व मुख्य रस्त्याने जोडणे होते.
विद्यार्थी मित्रांनो 2023 या वर्षांमध्ये महाराष्ट्र सरकारने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेची सुरुवात ही 19 मे 2023 रोजी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते.
या योजनेचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे – या योजनेचे उद्दिष्ट बारावी उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींना शून्य अथवा अल्प दराने शैक्षणिक कर्ज देणे.
या योजनेअंतर्गत पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी पाच लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज देणे.
तसेच 90% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाखांपर्यंतचे पारितोषिक अथवा बक्षीस देण्यात येणार.
या योजनेचा लाभ हा 2023 पर्यंतच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना देण्यात आलेला होता.
महाराष्ट्र सरकारने परीस स्पर्श योजना एप्रिल 2023 मध्ये सुरू केली होती.
ती योजना शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेले होते.
हिंदुरुदय सम्राट साहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती.
यामध्ये असणारे बस स्थानक पारितोषिक पुढील प्रमाणे होते.
प्रथम क्रमांकासाठी 50 लाख रुपये.
द्वितीय क्रमांकासाठी 25 लाख रुपये.
तृतीय क्रमांकासाठी दहा लाख रुपये.
यासाठी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे एसटीचे सदिच्छा दूत म्हणून घोषणा करण्यात आली होती.
महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली होती.
या योजनेचे उद्देश पुढील प्रमाणे – अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावणे हाच या योजनेचा उद्देश होता.
मित्रहो या योजनेमुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा आणि मदत मिळणार आहे.
ही योजना म्हणजेच बिरसा मुंडा कृषी सिंचन योजना मुंबई सिंधुदुर्ग सातारा सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
त्यासाठीचे महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे –
या योजनेमध्ये नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये देण्यात येणार होते.
जुन्या विहिरी दुरुस्ती करण्यासाठी पन्नास हजार रुपये देण्यात येणार होते.
इनवेल बोअरिंग साठी वीस हजार रुपये देण्यात येणार होते.
वीज जोडणी साठी दहा हजार रुपये देण्यात येणार होते.
शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी रुपये एक लाख रुपये देण्यात येणार होते.
सूक्ष्म सिंचन संच साठी म्हणजे ठिबक सिंचन संचासाठी 50 हजार रुपये किंवा तुषार सिंचन संचासाठी 25 हजार रुपये देण्यात येणार होते.
पीव्हीपी पाईप वर तीस हजार रुपये देण्यात येणार होते.
परसबाग यावर पाचशे रुपये देण्यात येणार होते.
विद्यार्थी मित्रांनो एसटी महामंडळाच्या बस मध्ये प्रवास करताना महिला सन्मान योजना म्हणून महिलांना 50 टक्के बस तिकिटामध्ये सवलत मिळत असते. त्याबद्दलची महत्त्वाची माहिती आता आपण पुढे जाणून घेऊया.
17 मार्च 2023 पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट हे 50 टक्के सवलत लागू करण्यात आलेली आहे.
ग्राम स्वराज्य अभियान हे महाराष्ट्र सरकारने सुरू केले होते. हे ग्राम स्वराज्य अभियान 26 जानेवारी 2023 ते 25 जानेवारी 2024 दरम्यानचे होते.
या अभियानाचा शुभारंभ राळेगणसिद्धी येथे करण्यात आला होता.
या अभियानाचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे – शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनेचा लाभ पोहोचण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा उपयोग लाभार्थ्यांना व्हावा हा उद्देश या ग्रामस्वराज्य अभियान चा होता.
तसेच या अभियानाचे उद्दिष्ट म्हणजे राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा थेट फायदा लाभार्थ्यांना होण्यासाठी आहे.
स्वयं उद्योजक घडवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुद्रा योजनेला 2024 मध्ये नऊ वर्ष पूर्ण झालेले आहेत. ती योजना आठ एप्रिल 2015 रोजी सुरू करण्यात आलेली होती.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पंतप्रधान विश्वकर्मा योजनेबद्दल माहिती.
ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच विश्वकर्मा जयंती निमित्त 17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेची घोषणा स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यामध्ये करण्यात आलेली होती. या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली होती.
या योजनेचा कालावधी होता 2023-24 ते 2027-28.
या योजनेची तरतूद 13000 कोटी रुपये इतकी होती.
या योजनेमध्ये 18 पारंपारिक व्यवसायांची संख्या होती.
या योजनेचे मुख्य उद्देश पुढील प्रमाणे – या योजनेचा उद्देश हा आहे की पारंपारिक कारागिरांच्या उत्पादनांची पोहोच वाढविणे तसेच त्यांच्या सेवांचा दर्जा सुधारणे हा आहे.
यामधील 18 व्यवसाय पुढीलप्रमाणे – सुतार, नाव किंवा बोट तयार करणारे, लोहार, सोनार, कुंभार, चर्मकार, मूर्तिकार व शिल्पकार, बेलदार, झाडू तयार करणारे, बाहुल्या व खेळणी तयार करणारे, न्हावी, हार तुरे तयार करणारे, धोबी, शिवन काम करनारे. तसेच मासेमारीसाठी आवश्यक झाडे तयार करणाऱ्या कारागिरांचा देखील या योजनेमध्ये समावेश राहील.
विद्यार्थी मित्रांनो या योजनेबद्दल आता आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊया.
या योजनेत लाभार्थ्याला कर्जाच्या पहिल्या हप्त्यात दीड वर्षा साठी एक लाख रुपये तर दुसरा हप्त्यात अडीच वर्षांसाठी तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल. तसेच पारंपरिक कारागिरांना मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षण दिले जाईल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याकडून 5% सवलतीचा दर आकारला जाईल.
या योजनेमध्ये कर्जाच्या हमी शुल्क केंद्र सरकारकडून भरले जाणार.
2024 या वर्षापर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर पाणी पुरवायचे होते.
2019 पासून ही योजना सुरू झालेली होती. ही योजना जलशक्ती मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आली होती.
या योजनेचे उद्दिष्ट होते 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला कार्यात्मक घरगुती नळ जोडणी द्वारे प्रतिव्यक्ती 55 लिटर पाणी पुरवणे हा या योजनेचे उद्दिष्ट होते.
विद्यार्थी मित्रांनो याचा निधीतील वाटा आता आपण बघून घेऊया –
या निधीतील वाटप 50:50 केंद्र आणि राज्य व 90:10 राज्य व विधिमंडळ असल्या केंद्रशासित प्रदेशांसाठी होते. तसेच शंभर टक्के हे विधिमंडळ नसलेल्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्र सरकार द्वारे हा निधी पुरवठा करण्यात येणार होता.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया PM SHRI योजनेबाबत माहिती.
मित्रहो या योजनेचा संक्षिप्त अर्थ आता पण जाणून घेऊया. प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग असे योजनेचा संक्षिप्त अर्थ आहे.
या पीएम shri योजनेअंतर्गत 14,500 शाळांना मॉडेल स्कूल बनवले जाणार आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यांमध्ये दोन शाळा मॉडेल स्कूल बनवले जाणार होते.
या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील 516 शाळांना केंद्राच्या तज्ञ समितीने मान्यता दिलेली आहे.
शिक्षण मंत्रालयाने प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया योजनेसाठी देशभरातील सुमारे 9,000 शाळांची निवड केलेली होती. या योजनेमध्ये निवड झालेल्या शाळांसाठी 60% निधी केंद्र शासनाकडून मिळणार असून राज्य शासनाचा हिस्सा त्यात 40% असणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो या योजनेची वैशिष्ट्ये आता आपण जाणून घेऊया.
ही योजना केंद्र पुरस्कृत योजना म्हणून राबविण्यात येणार आहे.
या योजनेचा एकूण प्रकल्प खर्च हा 27,360 कोटी रुपये इतका आहे.
योजनेचा कालावधी पाच वर्षे राहणार आहे तो कालावधी पुढीलप्रमाणे – 2022 23 ते 2026 27 हा येता योजनेचा कालावधी राहणार आहे.
या योजनेमध्ये प्रत्येक ब्लॉक मध्ये दोन सरकारी शाळा मॉडेल स्कूल बनवल्या जाणार आहेत. त्या मध्ये एक प्राथमिक आणि एक माध्यमिक किंवा वरिष्ठ माध्यमिक स्तर असेल.
मित्रहो या योजनेचा लाभ वीस लाखाहुन अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
या शाळा या ग्रीन स्कूल म्हणून विकसित केल्या जाणार आहेत.
या शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी वर्चुअल लॅब, थ्रीडी लॅब, डिजिटल लर्निंग टूल्स, व्यावसायिक शिक्षण इतर सुविधा असतील.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग चांगला वाटला असणारच कारण या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला शिकवलेले आहेत योजना. या योजना टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रांमध्ये तुम्ही शेअर करू शकतात. तसेच इतर सोशल मीडिया वर असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही या ब्लॉग ची लिंक शेअर करू शकतात. या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाल्या असतील तर माफ करा. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.