MGM hospital Navi Mumbai Bharti 2024. MGM hospital Navi Mumbai recruitment 2024.
MGM hospital Navi Mumbai Bharti 2024. MGM hospital Navi Mumbai recruitment 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो एमजीएम हॉस्पिटल नवी मुंबई येथे भरती निघालेली आहे. मेन जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून घेणे.
एमजीएम हॉस्पिटल नवी मुंबई भरती 2024. एमजीएम हॉस्पिटल नवी मुंबई रिक्रुटमेंट 2024.
जाहिरातीमधील पदाचे नाव पुढील प्रमाणे –
रेडिएशन सेफ्टी ऑफिसर, फिजीसिस्ट, रिलेशन थेरेपी टेक्नॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, मेडिकल ऑक्नोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, ड्युटी मेडिकल ऑफिसर, क्लीनिकल कोऑर्डिनेटर, फिजिशियन असिस्टंट, फार्मासिस्ट, नर्सिंग स्टाफ, मेडिकल आणि सर्जिकल ऑनको नर्स, मार्केटिंग मॅनेजर, ओंकोलॉजी सेंटरचे व्यवस्थापक, तंत्रज्ञ अनुभवी प्रशासकीय कर्मचारी, देखभाल कर्मचारी. |
या पदासाठीचे अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठीचे अर्ज पद्धतीही ऑनलाईन व तसेच ऑफलाइन पद्धतीने आहे. इच्छुक उमेदवार ऑफलाइन तसेच ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज पाठवू शकतात.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्यासाठी चा ईमेल पुढील प्रमाणे – hr@mgmhospitalvashi.net
अर्ज पाठविण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे – वैद्यकीय संचालक/ संचालक एमजीएम न्यू बॉम्बे हॉस्पिटल, वाशी प्लॉट क्रमांक 35, सेक्टर 3, वाशि नवी मुंबई पिन कोड 400703.
जाहिरातीमधील पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – जाहिराती मधील पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया देशातील प्रमुख 13 बंदरे यांच्या बद्दल माहिती.
मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी तुमच्यासाठी असणारी उपयुक्त माहिती दररोज तुम्हाला पाठवत असतो. ब्लॉग वर आल्यानंतर तुम्ही ब्लॉक वाचल्यानंतर या माहितीचा अभ्यास करतात, वाचन करतात आणि याच माहितीमुळे तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. हीच आशा करून आम्ही दररोज तुम्हाला काही ना काही नवीन शिकवत असतो.
चला तर मग आता सुरू करूया देशातील प्रमुख तेरा बंदरे.
हल्दीया पोर्ट हे बंदर हलदीया या ठिकाणी आहे. हल्दिया हे ठिकाण पश्चिम बंगाल राज्यात येते.
कोची पोर्ट हे बंदर कोचिंन या बंदरावर येते. कोचीन हे बंदर केरळ राज्यात येत.
चेन्नई पोर्ट हे बंदर चेन्नई या ठिकाणी आहे. चेन्नई हे ठिकाण तामिळनाडू राज्यात आहे.
न्यू मंगरूळ पोर्ट हे बंदर न्यू मंगळुरू या ठिकाणी आहे. हे ठिकाण कर्नाटक राज्यात येते.
तूतीकोरिन पोर्ट हे बंदर तुतीकोरीन ठिकाणी आहे. हे ठिकाण तामिळनाडू राज्यात आहे.
कामराज पोर्ट हे बंदर येनोर ठिकाणी आहे. हे ठिकाण तामिळनाडू राज्यात आहे.
विशाखापट्टणम पोर्ट हे बंदर विशाखापट्टणम या ठिकाणी आहे. हे ठिकाण आंध्र प्रदेश राज्यात आहे.
पॅराद्वीप पोर्ट हे बंदर पॅरादीप ठिकाणी आहे हे बंदर ओडीसा राज्यात येते.
पोर्ट ब्लेअर पोर्ट हे बंदर पॅराद्वीप ठिकाणी आहे. हे ठिकाण ओडिसा राज्यात येते.
मुंबई पोर्ट हे बंदर मुंबई या ठिकाणी येते. हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील आहे.
जे एन पी टी हे बंदर नावाशेवा या ठिकाणी आहे. हे ठिकाण मुंबई जवळील आहे. हे ठिकाण महाराष्ट्र राज्यात आहे.
मार्मा गोवा पोर्ट हे बंदर मार्मा गोवा ठिकाणी आहे. हे ठिकाण गोवा राज्यात येते.
दीनदयाल बंदर हे कांडला ठिकाणी आहे. हे ठिकाण गुजरात या राज्यात येते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील पश्चिम बंगाल आणि ओडिसा राज्यातील बंदर बद्दल माहिती.
पश्चिम बंगाल – पश्चिम बंगाल या राज्यात श्यामप्रसाद मुखर्जी पोर्ट , कोलकत्ता कुल्फी पराक्का सागर तालापूर हे बंदर आहेत.
ओडिसा राज्यात विचितन पूर सुवर्णरेखा बहाबल पुर चांदेपूर इत्यादी बंदरे येतात.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया राष्ट्र जलमार्ग क्रमांक व त्यांचे स्थापना दिन व त्यांची लांबी व नदी बॅकवॉटर.
NW – 1 प्रयागराज हलदिया हा जलमार्ग उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल आसाम या राज्यातून जातो. या जलमार्गाची स्थापना 27 ऑक्टोबर 1986 रोजी झालेले आहे. या राष्ट्रीय जलमार्गाची लांबी 1720 किलोमीटर इतकी आहे. या राष्ट्रीय जलमार्ग हा गंगा भगीरथ हुबळी या नदी बॅकवॉटर मधून जातो.
NW -2 सादिया धुबरी (आसाम) हा राष्ट्रीय जलमार्ग याची स्थापना 26 ऑक्टोबर 1988 या रोजी झाले. या जलमार्गाचे एकूण लांबी ही 891 km इतकी आहे. हे जलमार्ग ब्रह्मपुत्रा नदीतून जातो.
NW ३ कोटापुरम कोलम हा जलमार्ग केरळ राज्यातील आहे. हा राष्ट्रीय जलमार्गाची स्थापना 1 फेब्रुवारी 1993 रोजी झालेली आहे. हा राष्ट्रीय जलमार्ग याची लांबी 205 किलोमीटर इतकी आहे. हा राष्ट्रीय जलमार्ग पश्चिम किनारा कालवा चपकारा कालवा तसेच उद्योग मंडलम कालवा यातून जातो.
NW ४ काकीनाडा पदुचेरी हा राष्ट्रीय जलमार्ग आंध्र प्रदेश मधील आहे. या राष्ट्रीय जलमार्गाची स्थापना 2008 यावर्षी नोव्हेंबर मध्ये झालेली आहे. या जलमार्गाची लांबी एकूण 1095 किलोमीटर इतकी आहे. हा जलमार्ग कृष्णा व गोदावरी नदीतून जातो.
NW १० हा जलमार्ग महाराष्ट्र राज्यातून जातो. या जनमार्गाची स्थापना 2016 यावर्षी झालेली आहे. या राष्ट्रीय जलमार्गाची लांबी 45 किलोमीटर इतकी आहे. हा जलमार्ग अंबा नदी बॅकवॉटर मधून जातो.
NW १६ हा राष्ट्रीय जलमार्ग आसाम राज्यातील आहे. या आसाम राज्यातील राष्ट्रीय जलमार्गाची स्थापना 2016 यावर्षी झालेली आहे. या आसाम राज्यातील जलमार्गाची लांबी ही 121 km इतकी लांब आहे. या आसाम राज्यातील जलमार्गाचा मार्ग हा गंगा ते लकीपूर या नदीतून जातो.
NW 83 हा राष्ट्रीय जलमार्ग राजापुरी हे महाराष्ट्रातील राज्यातून जातो. या महाराष्ट्र राज्यातील राजापुरी येथील राष्ट्रीय जलमार्गाची स्थापना 2016 यावर्षी झाली. या महाराष्ट्रातील राष्ट्रीय जलमार्गाची लांबी 31 किलोमीटर इतकी आहे. या महाराष्ट्रातील राजापूर येथील राष्ट्रीय जलमार्ग हा राजापुरी खाडी यातून जातो.
NW 85 हा राष्ट्रीय जलमार्ग रेवदंडा हे महाराष्ट्र राज्यातून जातो. या महाराष्ट्रातील राष्ट्रीय जलमार्गाची स्थापना 2016 या वर्षी झाली. या महाराष्ट्रातील राष्ट्रीय जलमार्गाची लांबी एकूण 31 km इतकी आहे. हा राष्ट्रीय जलमार्ग हा रेवदंडा खाडी कुंडलिका नदी यातून जातो.
NW 91 जयगड हा राष्ट्रीय जलमार्ग महाराष्ट्र राज्यातील आहे या राष्ट्रीय जलमार्गाची स्थापना 2016 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय जलमार्गाची लांबी एकूण 52 किलोमीटर इतके आहे. हा राष्ट्रीय जलमार्ग जयगड खाडी शास्त्री नदी यातून जातो.
NW 68 मांडवी अरबी समुद्र हा राष्ट्रीय जलमार्ग गोवा या राज्यातील आहे. गोवा या राज्यातील जलमार्गाची स्थापना 2016 या वर्षी झालेली आहे. या राष्ट्रीय जलमार्गाचे लांबी एकूण 41 किलोमीटर इतकी आहे. हा राष्ट्रीय जलमार्ग मांडवी नदी अरबी समुद्र यातून जातो.
NW 111 झुआरी मार्मा गोवा हा राष्ट्रीय जलमार्ग गोवा राज्यातील आहे. या गोवा राज्यातील राष्ट्रीय जलमार्गाची स्थापना 2016 या वर्षी झालेली आहे. ह्या गोवा राज्यातील राष्ट्रीय जलमार्गाची लांबी 50 किलोमीटर इतके आहे. हा राष्ट्रीय जलमार्ग झुआरि नदीतून जातो.
NW 73 गुजरात महाराष्ट्र हा राष्ट्रीय जलमार्ग याची स्थापना 2016 यावर्षी झाली. या राष्ट्रीय जलमार्गाचे लांबी एकूण 226 किलोमीटर इतकी आहे. हा राष्ट्रीय जलमार्ग नर्मदा नदीतून जातो.
NW 100 गुजरात महाराष्ट्र हा राष्ट्रीय जलमार्ग याची स्थापना 2016 यावर्षी झाले. या राष्ट्रीय जलमार्गाची लांबी एकूण 436 किलोमीटर इतकी आहे. हा राष्ट्रीय जलमार्गा तापी नदीतून जातो.
NW 97 पश्चिम बंगाल नमखाना ते अथरा बांकिखाल हा राष्ट्रीय जलमार्ग याची स्थापना 2016 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय जलमार्गाचे एकूण लांबी ही 172 किलोमीटर इतकी आहे. हा राष्ट्रीय जलमार्ग संदर्भात जल मार्ग भारत-बांगलादेश मार्गातून जातो.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया हवाई वाहतूक बद्दल संपूर्ण माहिती.
एअर इंडिया या हवाई वाहतुकीची सुरुवात हे भारतात 1932 मध्ये जुलै या महिन्यात करण्यात आले. टाटा एअरलाइन्स मार्फत एअर इंडियाची ही पहिली वाहतूक होते. भारतातील पहिला पायलट परवाना हा जहांगीर रतनजी दादाभाई त्यांनाच जेआरडी टाटा असे म्हणतात त्यांना मिळाला. या जेआरडी टाटा यांना भारतीय हवाई वाहतुकीचे जनक म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो एअर इंडिया हे नाव टाटा एअरलाइन्स चे बदललेले नाव आहे. 1946 मध्ये हे नाव बदलण्यात आले होते. 1948 मध्ये एअर इंडिया ही भारत सरकारच्या मालकीची झाली. विद्यार्थी मित्रांनो एअर इंडियावर आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
इंडियन एअरलाइन्स टाटा एअरलाईन सारखेच आहे. हे खाजगी विमान कंपनी आहे जी त्या काळात सुद्धा कार्यरत होते. भारत सरकारने आठ खाजगी विमानांचे राष्ट्रीयकरण 1953 या वर्षी केली त्यातूनच एअर इंडिया एअरलाइन ची स्थापना करण्यात आली होती.
इंडियन एअरलाइन्स वर देशांतर्गत विमान वाहतुकीची जबाबदारी देण्यात आलेली होती.
विद्यार्थी मित्रांनो एअर इंडिया लिमिटेडच्या तीन उप संस्था आहेत त्या उपसंस्था पुढील प्रमाणे –
एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया रीजनल या तीन उपसंस्था एअर इंडिया लिमिटेडच्या आहेत.
वायुदुत महामंडळ हे 20 जानेवारी 1981 ला ईशान्य पूर्व भागात विमानसेवा पुरवण्यासाठी याची स्थापना करण्यात आले. या महामंडळाचे 1993 मध्ये विलीनीकरण एअर इंडिया एअरलाइन्स मध्ये करण्यात आला.
पवन हंस- विद्यार्थी मित्रांनो या महामंडळाची हेलिकॉप्टर सेवा पुरवण्यासाठी 15 ऑक्टोबर 1985 यावर्षी स्थापना करण्यात आली
याचं नाव बदलवून नंतर पवनहंस हेलिकॉप्टर लिमिटेड असे ठेवण्यात आले होते. या पवन हंसा ची स्थापना ही तेल खाणींचा शोध घेण्यासाठी करण्यात आली होती. आसाम तसेच दुर्गम भागातील तेल खाणींचा शोध हा पवनहंस घेत होता.
एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया याची स्थापना 1972 मध्ये करण्यात आले. याची स्थापना करण्याचे कारण की मुंबई कोलकत्ता दिल्ली आणि चेन्नई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी या एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली.
या एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ची स्थापना करण्याचे कारण की 1986 मध्ये देशांतर्गत विमानसेवा पुरवणाऱ्या विमानतळाच्या विकास साठी केली होती.
याचे काम हे एक एप्रिल 1995 रोजी पासून सुरू झाले. 2.8 मिलियन नॉटीकल मैल हवाई क्षेत्राचे नियोजन हे ही ऑथॉरिटी करते.
राजीव गांधी नॅशनल फ्लाईंग इन्स्टिट्यूट हे गोंदिया येथे पायलट प्रशिक्षणासाठी उभारण्यात आले होते. तसेच भारतामध्ये फुरसतगंज येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान ॲकॅडमी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आम्ही ब्लॉग नंतर पोस्ट केलेली महत्त्वाची माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा पाठवू शकतात. तसेच या ब्लॉकमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळू शकते. परीक्षेसाठीचे महत्त्वपूर्ण माहिती आम्ही रोज नोट्स काढून टाकत असतो. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल ही आशा करतो.