राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था भरती 2024. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर रिक्वायरमेंट 2024.

National institute of health and family welfare requirement 2024.

National institute of health and family welfare requirement 2024.

विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था अंतर्गत प्राध्यापक वाचक पदांच्या भरती संदर्भातील नोटिफिकेशन निघालेली आहे. या पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. म्हणजेच ई मेल द्वारे अर्ज पाठवायचे आहेत. मात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावे.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे

पद क्रमांक – 1

जाहिरातीमधील पदाचे नाव – प्राध्यापक.

पदांची संख्या – 01

पद क्रमांक – 2

जाहिरातीमधील पदाचे नाव – वाचक.

पदांची संख्या – 01

या पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठीची वयोमर्यादा 50 वर्षे.

या पदासाठीचे अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठीचे अर्जपद्धती ही ऑनलाईन ईमेल द्वारे आहे.

या पदासाठीची निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे – या पदासाठीचे निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 18 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.

या पदासाठी वेतनश्रेणी पुढील प्रमाणे

प्राध्यापक – या पदासाठी वेतनश्रेणी ही अकॅडमीक पे लेवल -14 144200 रुपये ते 218200 रुपये + NPA.

वाचक – या पदासाठी वेतनश्रेणी ही अकॅडमीक पे लेवल- 12. 79,800 रुपये ते 211500 रुपये.

या पदासाठीची माहिती संपूर्ण जाणून घेण्यासाठी व त्या संदर्भातील पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक कराDOWNLOAD PDF

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक कराCLICK HERE

पात्र उमेदवारांनी ईमेल करण्यासाठीचा पत्ता पुढील प्रमाणे – recruit.admn1@nihfw.org

पदासाठी निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे – या पदासाठी निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे करण्यात येईल.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

प्रत्येक ब्लॉग नंतर आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नवीन टॉपिक घेऊन येतो. तो टॉपिक विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. पदांबद्दल व जाहिराती बद्दल माहिती जाणून घेतल्यानंतर नेहमी एका ब्लॉग नंतर एक विशेष माहिती एका विशेष टॉपिकवर आम्ही टाकत असतो. ती माहिती ब्लॉग वाचल्यानंतर जेव्हा विद्यार्थी वाचतो तेव्हा काही प्रमाणात तरी त्याच्या लक्षात तो टॉपिक राहतो. आणि तोच लक्षात राहिलेला टॉपिक त्याला परीक्षेला आला तर त्याचे योग्य ते अचूक उत्तर विद्यार्थी लिहू शकतो. तसेच सिलेक्ट करू शकतो. चला तर मग आजचा टॉपिक सुरू करूया.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मृदेचे प्रकार त्याबद्दल संपूर्ण माहिती.

गाळाची मृदा – विद्यार्थी मित्रांनो भारतातील एकूण आठ मृदा प्रकारांपैकी एक मृदा म्हणजे गाळाची मृदा. गाळाची मृदा ही भारतात उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात म्हणजेच पंजाब ते आसाम यादरम्यानच्या प्रदेशात दिसून येते. याचे कारण की त्या क्षेत्रात नदी खोऱ्यांचे बऱ्याच प्रमाणात जाळे आहे. त्या नद्या पुढील प्रमाणे – नर्मदा नदी तापी नदी कृष्णा नदी गोदावरी नदी कावेरी नदी या नद्यांचे खोरे त्या प्रदेशात असल्यामुळे तेथे गाळाची मृदा निर्माण झालेली आहे. या प्रदेशात एकूण 15 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात गाळाची मृदा पसरलेली आहे.

या गाळाच्या मृदेचा रंग फिकट पिवळा दिसतो. कारण या फिकट पिवळा मृदेत पोटॅशच्या प्रमाण कमी प्रमाणात असते आणि नायट्रोजन ह्युमसचे प्रमाण सुद्धा कमी असते. तसेच चुना व पालाश याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो या मृदेचा पोत सूक्ष्म गाळ तसेच वालूकाशम आणि चिकन पोयट्याचा असतो.

तसेच या मृदेची खोली ही जमिनीत तीन ते सहा मीटर पर्यंत आपल्याला आढळून येते. हे गाळाची मृदा एकदम सुपीक मृदा असते. या मृदेचा फायदा शेती करण्यासाठी शेतकरी वर्ग करत असतो. इतिहासात आपण बघितले आहे की गाळाच्या मृदे जवळ म्हणजेच नद्या खोऱ्यांजवळ मानवी वस्ती राहण्यास सुरुवात झाली. या एकत्रित राहणाऱ्या प्रकारामुळेच खेड्यांची निर्मिती झाली. सुपीक जमीन असल्यामुळे जमिनीत घेतलेले पीक त्यातून येणारे उत्पन्न हे खूप जास्त असायचे. जमिनीतून मिळणारा पोषक द्रव्य साठा हा पिकासाठी उत्तम ठरतो. पीक वाढीसाठी लागणारा सर्व पोषक द्रव्यांचा साठा येथे मुबलक प्रमाणात असल्यामुळे येथे शेती करण्यास योग्य जमीन मिळते.

विद्यार्थी मित्रांनो गाळाच्या मृदेचे दोन प्रकार पडतात. ते मृदेचे प्रकार पुढील प्रमाणे – 1) भांगर मृदा – बांगर मृदा हे जुन्या गाडाच्या संचयनामुळे तयार झालेले मृदा असते त्या मृदेस भंगार मृदा असे म्हटले जाते. या भंगार मृदेत खडी आणि रेतीचे प्रमाण जास्त आढळून येते. ही भांगर मृदा पाण्याचा निचरा होणारी मृदा असते. ही मुद्दा पुढील पिकांसाठी महत्त्वाची ठरते. या मृदेत चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येणारे पिके पुढीलप्रमाणे – गहू तांदूळ मका ऊस द्विदल धान्य तेलबिया बरसीम फळपिके भाजीपाला व चहा या पिकांचे उत्पादन खूप चांगला प्रकारे या भांगर मृदेत घेता येते.

2) खादर मृदा – या खादर मृदेत नवीन गाडाच्या संचाने निर्माण झालेले मृदा असते. त्यामुळे या मृदेला खादर मृदा असे म्हटले जाते. हे मृदा सखोल भागात आपल्याला दिसून येते. ही मृदा पूर आलेल्या नद्यांच्या मैदानात आढळते. या मृदेवर दरवर्षी येणाऱ्या पुराद्वारे नवीन गाळ वाहून येतो व तो गाळ भर पडून तेथे सुपीक होतो. या मृदेत येणारे पिके पुढीलप्रमाणे – या मृदेत गहू तांदूळ मका ऊस ताग द्विदल धान्य तेलबिया यासारखे पिके या खादर मृदेत घेतात.

खादर मृदा असलेले प्रदेश पुढीलप्रमाणे – खादर मृदा ही भारतात गंगासतलज, ब्रह्मपुत्राच्या मैदानी प्रदेशात म्हणजेच पंजाब येथे, तसेच उत्तर प्रदेश , बिहार , झारखंड पश्चिम बंगाल आसाम महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातील नद्यांच्या खोऱ्यात हे खादर मृदा दिसून येते.

२) तांबडी मृदा – विद्यार्थी मित्रांनो भारतात आढळणाऱ्या आठ मृदांपैकी एक मृदा हे तांबडी मृदा आहे. त्या मृदेबद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.

विद्यार्थी मित्रांनो गाळाच्या मृदेनंतर दुसरी मृदा म्हणजेच तांबडी मृदा. या मृदेला रेड सॉईल सुद्धा म्हटले जाते. या मृदेने भारतात एकूण 18.6% भाग म्हणजेच 6.10 लाख चौरस किलोमीटर इतके क्षेत्र व्यापलेले आहे.

तांबडी मृदा ही रूपांतरीत खडकांपासून निर्माण झालेली असते. ते रूपांतरीत खडक अति प्राचीन खडक असतात. या मृदेचा जास्त पावसाच्या प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणात विकास होऊन येतो. या मृदेचा रंग लाल रंग दिसून येतो. कारण या मृदेमध्ये लोहाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच या मृदेचा रंग लाल व तांबूस किंवा पिवळा दिसतो. या मृदेमध्ये आमल चुनखडी नायट्रोजन ह्युमस व पोटॅशियमची कमतरता असते. तसेच मॅग्नेशियम लोह ॲल्युमिनियम या मृदेमध्ये जास्त प्रमाणात असतात. या तांबड्या मृदेतून पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत असतो. मृदेची सुपीकता पाहिली तर या मृदेची सुपीकता फार कमी आहे. पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध झाल्यास या मृदेतून पिके घेतली जातात.

तांबडी मृदा असणारे प्रदेश पुढीलप्रमाणे – तांबडी मृदा ही भारतात द्विकल्पीय पठारावर पूर्वेस राजमहल टेकड्यांमध्ये तर ती पश्चिमेस काठेवाड कच्छ पर्यंत आहे. आणि उत्तरेत बुंदेलखंडापासून दक्षिणेस तमिळनाडू पर्यंत, कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश ओडीसा पूर्व बिहार राजस्थानातील अरवली टेकड्यापर्यंत ही मृदा आहे. तसेच बंगालमधील मिदनापूर बांकुरा इत्यादी भागात सुद्धा तांबडी मृदा आढळून येते.

तांबड्या मृदेमध्ये घेण्यात येणारी पिके पुढीलप्रमाणे – विद्यार्थी मित्रांनो तांबडे मृदेत घेण्यात येणारी पिके गहू बाजरी कापूस भुईमूग तंबाखू भाजीपाला तेलबिया आणि बटाटे हे पिके घेतले जातात. यात चांगल्या प्रकारे उत्पादन या पिकांपासून मिळत असते.

३) काळी रेगुर मृदा – काडी रेगुर मृदा हे बेसाल्ट या खडकापासून तयार झालेले असते. बेसल खडकाचे विदारण झाल्यामुळे या मृदेची निर्मिती झालेली दिसते. या मृदेने द्विकल्पीय पठाराचा भाग व्यापलेला आहे. काळी रेगुर मृदेने 16.6% इतके क्षेत्रफळ म्हणजेच 5.46 लाख चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ या रेगूर मृदेने व्यापलेले आहे. या मृदेमध्ये चून खडकाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या मृदेमध्ये पाणी धरून ठेवण्याचे क्षमता म्हणजेच ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता सर्वाधिक जास्त आहे. त्यामुळे या मृदेमधून बऱ्याच प्रकारची पिके घेतली जातात. .
या मृदेमध्ये लोह चुनखडी पोटॅश ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम कार्बोनेट अधिक प्रमाणात दिसून येते. तर फॉस्फरस व जैविक पदार्थाचे प्रमाण या मृदेमध्ये खूप कमी असते.

उन्हाळ्यात जास्त ऊन पडल्यामुळे या मृदेमध्ये भेगा तयार होतात. कारण अति उष्ण वातावरणामुळे या मृदेतील ओलावा वाफेत रूपांतरीत होतो व मृदा कोरडी पडते. या कोरड्या पडलेल्या मृदेमुळे जमिनीवर भेगा पडतात. त्या मृदेमध्ये दहा ते पंधरा सेंटीमीटर खोलीचे भेगा जातात.

काळी रेगूर मृदा असणारे प्रदेश पुढीलप्रमाणे – गुजरात , महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश, वायव्य आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड व झारखंड या प्रदेशांमध्ये काळी रेगुरु मृदा आढळून येते.

काळी रेगुर मृदेत घेतली जाणारी पिके पुढील प्रमाणे – कापूस द्विदल धान्य, बाजरी जवस ज्वारी मका तेलबिया ऊस तंबाखू कडधान्य संत्री मोसंबी केळी द्राक्ष पपई डाळिंब स्ट्रॉबेरी इत्यादी प्रकारचे पिके काळी रेगूर मृदेत घेतली जातात.

४) लेटेराईट मृदा – विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी जास्त पाऊस व उच्च तापमान असते त्या ठिकाणी जांभा खडकाच्या विदरनापासून लेटराईट मृदा तयार झालेले आपल्याला दिसून येते.

जास्त तापमान असलेले क्षेत्र म्हणजेच उष्णकटिबंधीय क्षेत्र तेथेच खडकाचे विदारण मोठ्या प्रमाणात होऊन येते. लेटेराईट मृदा हे भारतात 1.22 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावर व्यापलेली आहे. ही मृदा लाल किंवा जांभळा रंगाचे असलेले आपल्याला दिसून येते. हा रंग प्राप्त करण्याचे कारण की लोह व ॲल्युमिनियमच्या संयुगामुळे या मृदेस असा रंग मिळतो. या मृदेमध्ये पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो परंतु निचरा होताना या मृदेतील चुना व सिलीकाचे प्रमाण कमी कमी होत जाते.
ही मृदा ओली असताना मऊ लागते. आणि कोरडी झाल्यावर कडक लागते तसेच तिचे कडक ढेकुळ देखील तयार होते.

लेटेराईट मृदा आढळून येणारे प्रदेश पुढीलप्रमाणे- मध्य प्रदेश, आसाम, पूर्व व पश्चिम घाट मैसूर, राजमहल टेकड्या परिसर , सह्याद्रीचा घाटमाथा, द्वीपकल्पाच्या पूर्व घाटातील डोंगराळ प्रदेश दक्षिण महाराष्ट्र गोवा केरळ आंध्र प्रदेश या भागांमध्ये लेटेराईट मृदा आढळून येते.

या मृदेत येणारी पिके पुढील प्रमाणे – या मृदेमध्ये कडधान्य भाजीपाला तांदूळ नाचणी याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच फळ पिकांमध्ये देखील ही मृदा उपयुक्त ठरते. चहा आणि रबर चे उत्पादन सुद्धा या मृदेमध्ये घेतल्या जाते.

विद्यार्थी मित्रांनो मृदेचे एकूण चार प्रकार आता आपण बघितले. पुढील चार प्रकार पुढच्या ब्लॉगमध्ये आपण बघूया. तुम्हाला हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर तुम्ही या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रमंडळींमध्ये नक्कीच शेअर करा. आणि भविष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांसाठी या ब्लॉगवर नक्की भेट द्या. धन्यवाद..