विणकर सेवा केंद्र मुंबई अंतर्गत भरती 2024. Weavers service center Mumbai 2024. Weavers service center Mumbai requirement 2024.

Weavers service center Mumbai 2024.

Weavers service center Mumbai 2024.

विद्यार्थी मित्रांनो विणकर सेवा केंद्र मुंबई अंतर्गत सहाय्यक लघुलेखक Gr १ पदासाठी जागा भरण्यात येत आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे

पद क्रमांकपदाचे नावपदांची संख्या
1सहाय्यक1
2लघुलेखक Gr 11
एकूण जागा2

जाहिरातीमधील पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता आहे तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या पीडीएफ मध्ये दिलेले आहे. ती पीडीएफ व्यवस्थित रित्या वाचून तुम्ही शैक्षणिक पात्रता व इथे सगळ्या गोष्टी वाचून घ्या.

या पदाची जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढे क्लिक कराDOWNLOAD PDF

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – या पदासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई महाराष्ट्र.

या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन पद्धत आहे.

या पदासाठीचा अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता संचालक पश्चिम विभाग विणकर सेवा केंद्र मुंबई.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2024 ही आहे.

ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा –

CLICKHERE

या पदासाठीचे वेतनश्रेणी पुढील प्रमाणे

सहाय्यक या पदासाठीची वेतनश्रेणी ही – लेव्हल 6 पे मॅट्रिक्स 7th CPC (pre – revised PB – 2 of 9300 रुपये – 34800 with ग्रेड पे 4200 रुपये.)

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

प्रत्येक ब्लॉग नंतर आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नवीन टॉपिक घेऊन येतो. तो टॉपिक विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. पदांबद्दल व जाहिराती बद्दल माहिती जाणून घेतल्यानंतर नेहमी एका ब्लॉग नंतर एक विशेष माहिती एका विशेष टॉपिकवर आम्ही टाकत असतो. ती माहिती ब्लॉग वाचल्यानंतर जेव्हा विद्यार्थी वाचतो तेव्हा काही प्रमाणात तरी त्याच्या लक्षात तो टॉपिक राहतो. आणि तोच लक्षात राहिलेला टॉपिक त्याला परीक्षेला आला तर त्याचे योग्य ते अचूक उत्तर विद्यार्थी लिहू शकतो. तसेच सिलेक्ट करू शकतो. चला तर मग आजचा टॉपिक सुरू करूया.

विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक आपण बघूया ब्रह्मपुत्रा नदी. यामध्ये बद्दल आपण जाणून घेऊया तिची लांबी मध्ये कोणकोणत्या देशांमधून व राज्यांमधून जाते.

ब्रह्मपुत्रा हे अशा खंडातील सर्वात लांब नदी आहे. या ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे एकूण 5 लाख 80 हजार चौरस किलोमीटर इतके आहे. या ब्रह्मपुत्रा नदीची लांबी 2900 किलोमीटर इतके आहे. ब्रह्मपुत्रा नदी ही भारतातून 916 km अंतर वाहत जाते. भारतातील ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे 1 लाख 94 हजार 413 किलोमीटर इतके आहे.

नदी तिबेट आणि चीन मधून १७०० किलोमीटर इतके अंतर वाहत जाते. तसेच बांगलादेशमध्ये या नदीचा प्रवास तीनशे किलोमीटर इतका आहे. ब्रह्मपुत्रा नदीचे रुंदी उत्तर-दक्षिण ही 682 किलोमीटर इतके आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याचा देश निहाय विस्तार.

चीन देश – चीन देशात ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याचे क्षेत्रफळ हे 2 लाख 92 हजार 900 चौरस किलोमीटर इतके आहे. या चीन देशात ब्रह्मपुत्रा नदीची टक्केवारी ही 50.5% टक्के इतकी आहे.

भारत देश – भारत देशात ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याचे क्षेत्रफळ हे 1 लाख 94,413 चौरस किलोमीटर इतके आहे .
या ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याची टक्केवारी भारत देशात त 33.6% इतके आहे.

बांगलादेश – बांगलादेशात ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याचे क्षेत्रफळ हे 46 हजार 980 चौरस किलोमीटर इतके आहे. ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याची टक्केवारी बांगलादेशात 8.1% इतकी आहे.

भूतान – भूतान देशात ब्रह्मपुत्रा खोऱ्याचे क्षेत्रफळ 45 हजार 240 चौरस किलोमीटर इतके आहे. तसेच भूतान देशात ब्रह्मपुत्र खोऱ्याची टक्केवारी ही 7.8% इतके आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया भारतातील राज्यनिहाय ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याचे क्षेत्रफळ.

अरुणाचल प्रदेश राज्यात ब्रह्मपुत्रा नदीचे क्षेत्रफळ हे 81424 चौरस किलोमीटर इतके आहे. ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याचे टक्केवारी ही अरुणाचल प्रदेश राज्यात एकूण टक्केवारी हे 42.57% इतकी आहे.

आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यातील क्षेत्रफळ हे ७०६३४ चौरस किलोमीटर इतके आहे. या आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याचे टक्केवारी 36.47% इतके आहे.

पश्चिम बंगाल राज्यात ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याचे क्षेत्रफळ हे 12585 चौरस किलोमीटर इतके आहे. ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याचे टक्केवारी पश्चिम बंगाल येथे एकूण टक्केवारी ही 5.9% इतके आहे.

मेघालय राज्यात ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याची क्षेत्रफळ हे 11667 चौरस किलोमीटर इतके आहे.
मेघालय राज्यात ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याचे टक्केवारी एकूण 5.7% इतके आहे.

नागालँड राज्यात ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ 10803 चौरस किलोमीटर इतके आहे. ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याचे एकूण टक्केवारी नागालँड राज्यात 5.63% इतकी आहे.

सिक्कीम राज्यात ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ 7300 चौरस किलोमीटर इतके आहे. ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याचे एकूण टक्केवारी सिक्कीम राज्यात 3.73% इतकी आहे.

मणिपूर राज्यात ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याचे क्षेत्रफळ हे 369 चौरस किलोमीटर इतके आहे. ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याची मणिपूर राज्यात एकूण टक्केवारी 0.04% इतकी आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मृदा बद्दल संपूर्ण माहिती.
विद्यार्थी मित्रांनो मृदेचे एकूण सहा प्रकार पडतात. ते सहा प्रकार पुढील प्रमाणे.

पर्वतीय मृदा, वाळवंटी मृदा, गाळाची मृदा, काळी मृदा, तांबडी मृदा, लेटे राईट मृदा….

हे मृदेचे एकूण सहा प्रकार आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मृदेची कार्य. मृदेची कार्य पुढील प्रमाणे.

मृदा हे खडकापासून वेगळा झालेला जमिनीचा भाग. हा भाग वनस्पतींना पोषक अन्नद्रव्य पुरवतो.

मृदेचे घटक आता आपण बघूया.
मृदेमध्ये चार घटक आहेत. या घटकांवर जमिनीची सुपीकता टिकून आहे.

मृदेचे घटक – खनिज द्रव्य, सेंद्रिय द्रव्य, जल , वायु.. हे मृदेचे मुख्य चार घटक आहेत.

खनिज द्रव्य हे जमिनीत 45 टक्के इतके असायला हवे.
सेंद्रिय द्रव्य जमिनीत 5% असायला हवे.
जल हे जमेल 25% असायला हवे.
वायु हे जमिनीत 25% असायला हवे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मृदेचे कार्य. ते मृदेचे कार्य पुढील प्रमाणे.

मृदा ही वनस्पतींना आजार देते व पोषक द्रव्य पुरवते. तसेच त्या वनस्पतींना वाढीसाठी असलेले नायट्रोजन, पोटॅश फॉस्फरस लोह इत्यादी हे जमिनीतून पिकाला मिळत असते. या प्रकारचे बरीच खनिज द्रव्य हे मृदे द्वारे वनस्पती व पिकांना मिळत असतात. त्यामुळे पिकाचे चांगले वाढ होते. व पीक तक धरून राहते.

या मृदेमध्ये बऱ्याच प्रकारचे असंख्य जिवाणू असतात. या जिवाणूमुळे मातीमध्ये असलेले रसायनांमध्ये योग्य तो बदल घडवून येतो. तसेच मृदेची हवा यामुळे खेळती राहते.

मृदा हे वनस्पतीला पाणीपुरवठा करण्याचे काम करते. मृदेमध्ये असलेल्या पाणी हे पिकाच्या मुळांद्वारे पिकाला प्रोव्हाइड केला जातो. आणि मृदेमध्ये पाणी आणि हवा धरून ठेवण्याचे क्षमता असल्यामुळे ते वनस्पतीसाठी खूप महत्त्वाचे ठरते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया मृदा निर्मितीचे घटक ते मृदा निर्मितीच्या घटक पुढीलप्रमाणे.

हवामान, कालावधी, जनक खडक, जैविक खडक, मानवी हस्तक्षेप. हे मृदा निर्मितीच्या घटकातील महत्त्वाचे मुद्दे.

यामुळे मृदा चांगले सुद्धा होते व मृदेची झीज देखील होते.

हवामान – मृदा निर्मितीसाठी हवामान हे खूप महत्त्वाचे ठरते. कारण या मृदा निर्मितीवर हवामानाचा खूप मोठा परिणाम होतो. भारतामध्ये आपण बघितले आहे की आदर व उष्ण प्रदेशात जांभ्या मृदेची निर्मिती झालेली आहे. तसेच उच्च तापमान कोरडी हवा कमी पर्जन्य असलेल्या राजस्थान प्रदेशात तसेच हरियाणा व कच्च इत्यादी वाळवंटी प्रदेशात वाळवंटी मृदा तयार झालेले आहे.
तसेच विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेशात मृदेमध्ये आम्लाचे प्रमाण जास्त दिसून येते. तर चुनखडीचे प्रमाण फार कमी दिसून येते.

तसेच विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी तापमान अधिक असते त्या ठिकाणी रासायनिक पदार्थांचे स्वरूप खूप मोठ्या प्रमाणात आणि लवकर बदलत असते.

तसेच थंड प्रदेशात ही बदलणारी क्रिया संतवतीने होत असते.

कालावधी – जनक खडकांपासून तयार झालेली मृदा त्यावरून खडकावर व मृदेवर बाह्यकारकांचे कार्य किती काळ चालू आहे त्यावरूनच मृदेचा विकास अवलंबून असतो.

जनक खडक – विद्यार्थी मित्रांनो जनक खडक म्हणजे एखाद्या प्रदेशात खडक फुटून ते इकडे तिकडे विघटन आणि विदारण झाल्यामुळे ते बऱ्याच भागात पसरतात आणि त्यापासून मृदेची निर्मिती होते. जमिनीला उत्पादन क्षमता बनवण्यासाठी जनक खडकांपासून द्रव्य मिळतात.

विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी मृदा तांबडी असते त्या भागात जांभा खडकापासून मृदा तयार झालेले असते.

तसेच ज्या बेसाल्ट खडकापासून मृदा तयार झालेले असते तेथे मृदा काळी असते व सुपीक कसदार असते.

जैविक खडक- वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव हे तीन घटक मृदेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घटक असतात. आपण बघितले आहे की ज्या ठिकाणी झाडे जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणी मातीची झीज फार कमी प्रमाणात झालेले दिसून येते. आणि ज्या ठिकाणी झाडे जास्त असल्यामुळे मुळा खोलवर पसरलेल्या असतात त्या ठिकाणी बीळ करून राहणारे प्राणी हे जमीन पोखरतात व जमीन झीज होण्यासाठी कारणीभूत ठरते. याच कारणामुळे मृदा ठिसूळ होत असते.
तसेच विद्यार्थी मित्रांनो मृदेमध्ये जर पालापाचोळा व तसेच मृत प्राण्यांचे अवशेष विघटन पावले असतील त्या मृदेत सुपीकता आपल्याला जास्त दिसून आले दिसते. यामुळे पिकांसाठी पोषक व सुपीक जमीन तयार होते. या मृदामुळे पाणी धरून ठेवण्याचे क्षमता जास्त होते. ज्या ठिकाणी जंगलासारखे प्रमाण आहे त्या ठिकाणी त्यांच्या पालापाचोळ्यापासून तसेच मृत प्राण्यांपासून तयार झालेले मृदा हे सेंद्रिय घटकांचे प्रमाण जास्त असलेले मृदा असते.

मानवी हस्तक्षेप – विद्यार्थी मित्रांनो जंगलात मानवांचा संचार आपल्याला बघायला मिळतो. काही मानव जंगलात शिकारीसाठी जातात तसेच काही लोक हे जंगलाचे संपत्ती नाश करण्यासाठी जातात. जंगलाचे संपत्ती म्हणजेच झाडे. ते लोक वृक्षतोड करतात व त्यामुळे जंगलाचे संपत्ती नाश पावते. तसेच काही लोक त्यांचे जनावरे करण्यासाठी जंगलात घेऊन जातात व त्याचा अतिवापर मुळे जंगलातील हिरवी झाडे कमी होतात. तसेच जमिनीचे झालेले सपाटीकरण व उतारावरील सोपान शेती तसेच रासायनिक व नैसर्गिक खतांचा वापर. तसेच जमिनीच्या मशागतीमुळे सुद्धा बऱ्याच गोष्टींवर परिणाम होतो.

विद्यार्थी मित्रांनो आपण हे सगळे मृदा निर्मितीचे घटक बघितले. काही गोष्टींवर आळा घातला तर जमिनीची झीज होणे थांबू शकते. त्यामुळे सर्वांनाच खूप मोठा फायदा होईल. माणूस स्वार्थ पद्धतीने जमिनीचा उपभोग घेत आहे. तसेच जमिनीची काळजी सुद्धा माणसाने घ्यायला हवी. मृदेचे काळजी म्हणजेच पृथ्वीची काळजी. पृथ्वी टिकली तर मानवसृष्टी टिकेल. हेच वाक्य मनात ठेवले आणि आपण पृथ्वीची काळजी घेतली तरच आपले व आपल्या लोकांचे भविष्य चांगले राहील. 

धन्यवाद…