Coal India limited requirement 2024 post 640.
Coal India limited requirement 2024 post 640.
विद्यार्थी मित्रांनो कोळसा मंत्रालय अंतर्गत महा रत्न सार्वजनिक क्षेत्रातील हा उपक्रम आहे. ऑल इंडिया येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदे भरण्यात येणार आहेत.
संपूर्ण जागा 640.
या पदासाठीची जाहिरात क्रमांक 04/2024
भरण्यात येणारे पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक : 1
पदांचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनिं
विषय :
- मायनिंग – पदांची संख्या = 263
- सिविल – पदांची संख्या= 91
- इलेक्ट्रिकल – पदांची संख्या=102
- मेकॅनिकल – पदांची संख्या =104
- सिस्टम पदांची संख्या = 41
- E AND T पदांची संख्या = 39.
संपूर्ण जागा – 640
या पदासाठीची वयाची अट पुढील प्रमाणे :
30 डिसेंबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत वय. ( SC / ST / – पाच वर्षे सूट , OBC – तीन वर्षे सूट) |
या पदासाठीची शैक्षणिक पात्रता –
- a) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी पास होणे आवश्यक. ( मायनिंग (mining) , civil/ electrical /mechanical) केव्हा प्रथम श्रेणी BE/ बी. टेक /बीएससी इंजिनिअरिंग (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/ आय.टी / E and T) किंवा MCA
- b) GATE 2024.
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे :
संपूर्ण भारत ( भारतात कोठे ही ) |
या पदासाठीची लागणारी फी पुढील प्रमाणे – General/ OBC / EWS – 1180 रुपये ( SC/ST PWD /ExSM यांच्यासाठी कोणती ही फी नाही.)
जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे.
या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख ही 28 नोव्हेंबर 2024 (संध्याकाळी सहा वाजेपर्यंत) |
या पदांसाठीच्या महत्त्वाच्या लिंक पुढीलप्रमाणे.
या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | Apply online |
ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा | CLICK HERE |
या पदासाठीची जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढे क्लिक करा | Download PDF |
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या शिकवण्यामुळे तुमचा नक्कीच फायदा होतोय हे आम्हाला माहित आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील पिके व फळे याबद्दल सविस्तर माहिती शिकवू. ज्या नोट्स आम्ही काढलेले आहेत त्या तुमच्या नक्कीच कामात येतील. चला तर मग सुरु करूया महाराष्ट्रातील पिके व फळे.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे फळे व पिके घेतले जातात. ते आता आपण बघूया.
- वाघ्या घेवडा – विद्यार्थी मित्रांनो सातारा जिल्ह्यात वाघ्या घेवड्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या ठिकाणी याची लागवड केली जाते.
- अंजीर – विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्ह्यात अंजीरचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. पुणे जिल्ह्यातील पुरंदर हे ठिकाण अंजीर साठी प्रसिद्ध आहे.
- सिताफळ – विद्यार्थी मित्रांनो बीड जिल्ह्यात सिताफळ हे खूप मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते. आणि तेथील सीताफळ हे खूप रसाळ व पिष्टमय असते. खायला सुद्धा ते खूप छान लागतात. तेथील सीताफळ शेती ही खूप मोठ्या प्रमाणात प्रगत झालेले आहे. शेतकऱ्यांना यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतीतून आर्थिक लाभ मिळत आहे.
- स्ट्रॉबेरी – सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी चे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी पीकास पोषक वातावरण मिळते त्यामुळे तेथे स्ट्रॉबेरीचे पीक उत्तम दर्जाचे पिकते. आणि आज स्ट्रॉबेरीतून शेतकरी बंधूंना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत होते. स्ट्रॉबेरी साठी थंड हवामान आवश्यक असते. तेच थंड हवामान या सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरीला मिळते.
- भरताची वांगे – विद्यार्थी मित्रांनो सर्वात चविष्ट असे वांगे हे मिळतात तर जळगाव जिल्ह्यात. जळगाव जिल्हा हे भारताच्या वांग्यांसाठी प्रसिद्ध आहेत. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ही भारताची वांगी त्यांची भाजी आवडीने खाल्ली जाते. व या शेतीतून शेतकरी मित्रांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ सुद्धा होतो. या वांग्यांचे निर्यात सुद्धा केली जाते. त्यामुळे शेतकरी मित्रांना दोन पैसे सुद्धा जास्त मिळतात.
- हळद – विद्यार्थी मित्रांनो सांगली जिल्हा हा हळद लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. हळद हे गुणकारी आहे. ती आरोग्यासाठी खूप चांगली मानले जाते. त्या हळदीचे उत्पादन घेतल्यास या शेतकरी मित्रांना विदेशात हळद सुद्धा निर्यात करता येते. व त्यातून चार पैसे शिल्लक ते पाडू शकतात. सांगली जिल्ह्यात वायगाव व सांगली येथे मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पन्न घेतल्या जाते. नुकतेच जळगाव जिल्ह्यात सुद्धा या हळदीचे उत्पादन घेणे वाढले आहे. कारण हळदीला तसा भाव सुद्धा मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील जमीन ही पोषक ठरत आहे. वातावरण हे हळद लागवडीसाठी पोषक आहे.
- डाळिंब – विद्यार्थी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात डाळिंबाचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतल्या जाते. डाळिंब हे सर्वीकडे निर्यात केल्या जाते. याचा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होतो. डाळिंबाची लागवड ही या जिल्ह्यात खूप मोठ्या पद्धतीने केला जाते. डाळिंबावर योग्य निगा राखली जाते. तसेच तंत्रज्ञान शेतकरी मित्रांनी विकसित करून घेतलेले आहे. चांगले माहिती आणि मेहनती द्वारे या डाळिंब पिकातून भरघोस उत्पन्न शेतकरी मित्र घेत आहे.
- गूळ – विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्यात ऊस या पिकाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. त्या उसाद्वारे गुळ निर्मित केला जातो. आता रासायनिक पद्धत सुद्धा असते आणि सेंद्रिय पद्धत सुद्धा असते. जास्त लोकं आता सेंद्रिय पद्धतीकडे वळलेले आहे. सेंद्रिय पद्धतीच्या गुळामुळे शरीराला कोणती ही हानी होत नाही. जास्त उत्पादन असल्यामुळे तिथे तयार झालेला गुळ हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये निर्यात केला जातो. व यातून शेतकऱ्यांना खूप फायदा होतो.
- तूरडाळ – तुरदाळ हे नंदुरबार जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते. तिचे उत्पादन नंदुरबार जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर हे तुरदाळ लागवडी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. चांगला भाव व त्यातून मिळणारे उत्पन्न यामुळे शेतकरी मित्र या तुरदाळ लागवडीचे फायदे घेत आहे.
- आंबेमोहोर तांदूळ – विद्यार्थी मित्रांनो पुणे येथील वडगाव मावळ येथे आंबेमोहोर तांदुळाचे उत्पन्न घेतले जाते. या विशिष्ट प्रकारचा तांदूळ फक्त या भागातच आपल्याला बघायला मिळतो. कारण तेथील पोषक वातावरण या तांदुळासाठी खूप महत्त्वाचे ठरते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना या वातावरणाचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो.
- ज्वारी – ज्वारी हे पीक सोलापूर जिल्ह्यात चांगल्या प्रकारे घेतले जाते. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हे ठिकाण ज्वारीच्या उत्पन्न घेण्यात अग्रेसर आहे. त्यातून त्यांना चांगला नफा मिळतो व आर्थिक मदत होते. येथून सुद्धा ज्वारी निर्यात केली जाते.
- केळी पिक – विद्यार्थी मित्रांनो केळीसाठी सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे जळगाव. जळगाव चे पोषक वातावरण जे केळीला मिळते तसे वातावरण पूर्ण देशात सुद्धा मिळत नाही. येथील केळी जगप्रसिद्ध आहे. ती केळी इतकी स्वादिष्ट असते की खाणाऱ्याला परत खाण्याचा मोह आवरल्या जात नाही. मिळणारे पोषक वातावरण आणि जमिनीची पोषकता या पिकाला पूर्ण मिळते. त्यामुळे याच्यात योग्य ते घटक पिकाला वाढीसाठी कारणीभूत ठरतात. येथील जमीन खूप पोषक आहे. केळीचे खरी लागवड हे जळगाव जिल्ह्यातील रावेर या भागात होते. त्यामुळे जळगावला या केळीमुळे खूप मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. हे महत्त्व केळीमुळे प्राप्त होऊन ते विदेशात सुद्धा जळगाव जिल्ह्याचे नावलौकिकता मिळवून देण्यास कारणीभूत ठरतात. येथील केळी पाकिस्तान, श्रीलंका, तसेच इतर देशातही निर्यात केली जाते. केळीमुळे व्यापाऱ्यांचे जाळे निर्माण झाले आहे. आणि निर्माण झालेल्या जाळ्यामुळे शेतकऱ्याची केळी शेतातून लवकर घेतल्या जाते व तिला योग्य तो भाव दिला जातो.
- हापूस आंबा – हापूस आंबा हा रत्नागिरी जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात घेतला होतो. तेथील हापूस आंबा इतका चविष्ट असतो की त्याची तुलना कोणत्याही राज्यातील कोणत्याही देशातील आंब्यासोबत होऊ शकत नाही. एकदम रसाळ आणि चविष्ट आंबा हा रत्नागिरी जिल्ह्यातून वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या देशात निर्यात केला जातो. यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला खूप मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे. येथील पोषक वातावरण या हापूस आंब्याला खूप चांगले आहे. कारण त्या आंब्यासाठी लागणारा थंडावा हा त्या जिल्ह्यात त्याला मिळवून देतो. अति उष्ण प्रदेशात हा आंबा लवकर पिकला जातो. त्यामुळे त्याचे काही ठिकाणी आयात करणे खूप अवघड जाते. या आंब्यातून रत्नागिरीचे शेतकरी मित्र खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करू शकतात.
- चिकू पीक – पालघर जिल्ह्यातील डहाणू या ठिकाणी शिकूया पिकाचे खूप चांगले उत्पन्न घेतले होते. चिकू हा दैनंदिन आहारात आवडीने खाल्ले जाणारे फळ आहे. चिकू इतके चविष्ट असते की त्याला खाण्याचा मोह लहानांपासून मोठ्यांना आवरता येत नाही.
त्यात वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी शेतकरी मित्र लागवड करत असतो. त्यामुळे वर्षभर चिकू हे फळ आपल्याला बघायला मिळते. या चिकू पिकातून शेतकरी मित्रांना आर्थिक लाभ होतो. चिकू या पिकाची एक प्रकारे जमिनीवर शेतीच आच्छादली जाते. त्यामुळे शेतकरी मित्र आपल्या ज्ञान प्रगत करून या चिकू शेतीचे शेती करून आर्थिक भरभराट करून घेतो.
केसर आंबा – विद्यार्थी मित्रांनो मराठवाडा विभागात केशर आंब्याचे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या आंब्यातून चांगल्या प्रकारे आर्थिक मदत शेतकरी मित्रांना होते. हे आंबे निर्यात करण्यास योग्य आहे. हे लवकर खराब सुद्धा होत नाहीत. आपण पाहिलं की हापूस आंबा अति उष्ण भागात लवकर पिकतो. व त्याला निर्यात करणे कठीण जाते. तसं केसर आंब्यात असे नसते. तो लवकर खराब न होता योग्य ठिकाणी योग्य स्थितीत पोहोचू शकतो.
या केसर आंब्यातून खूप मोठ्या प्रमाणात नफा शेतकरी मित्रांना मिळत असतो.
संत्री – ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाणारे नागपूर सिटी. हे सिटी संत्र्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथील पोषक वातावरण या नागपूर भागातून संत्र्यांचा पीक घेण्यासाठी महत्त्वाचे ठरते. या नागपूर भागातून वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात संत्र्यांची निर्यात केली जाते. हे निर्यात करताना संत्र्यांना काहीच प्रॉब्लेम होत नाही. कारण की त्यांची जडणघडच तशी बनलेली असते. ते निर्यात करण्यासाठी योग्य असतात. या शेतीतून तिथल्या शेतकरी वर्गांना चांगला हमीभाव भेटतो. त्यामुळेच शेतकरी वर्ग या पिकाचे उत्पन्न घेण्यास महत्त्व देतात.
कोकम – सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कोकम पिकाचे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कोकम पिकासाठी लागणारे पोषक वातावरण पोषक जमीन या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्या कोकम पिकाला चांगल्या पद्धतीने मिळते. तेथील प्रगत शेतकरी कोकम चे घेण्यास अग्रेसर आहेत. यातून मिळणारा आर्थिक नफा हा शेतकऱ्यांना त्यांची स्थिती सुधारण्यास मदत करते.
कांदा – विद्यार्थी मित्रांनो नाशिक भागात कांद्याचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. दैनंदिन आहारात लागणार हा कांदा सर्वीकडे उपलब्ध होतो त्याचे कारण हे की या कांद्याचे निर्यात खूप मोठ्या प्रमाणात होते. आर्थिक लाभ मिळवून देणारा हा कांदा शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात लागवड करतात. घराघरात स्वयंपाकात वापरण्यात येणारा हा कांदा लागवड जास्त असल्यामुळे सर्वीकडे उपलब्ध असतो. नाशिक भागातील लासलगाव येथे उत्कृष्ट प्रकारचा कांदा उत्पादन घेतल्या जाते. येथील कांदे खूप प्रसिद्ध आहेत. या कांद्याला चांगला भाव मिळतो व तो कांदा निर्यात सुद्धा केला जातो. त्यामध्ये दोन प्रकार असतात त्यातील एक प्रकार हा पांढरा कांदा. या पांढरा कांद्याचे औषधी उपयोग म्हणून सुद्धा केला जातो.