Union Bank of India Bharti 2024. युनियन बँक ऑफ इंडिया तब्बल 1500 जागांसाठी भरती. Union Bank of India Recruitment 2024.

Union Bank of India Bharti 2024.

Union Bank of India Bharti 2024.

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये स्थानिक बँक अधिकारी म्हणजे लोकल बँक ऑफिसर पोस्टची भरती निघालेली आहे.

संपूर्ण जागा 1500.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण सगळ्यात पहिले जाणून घेऊया युनियन बँक ऑफ इंडिया बद्दल माहिती.

ही एक राष्ट्रीयकृत भारतीय बँक आहे. युनियन बँक ऑफ इंडिया ची स्थापना 1919 साली झाली. या युनियन बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण हे 1969 साली झाले.

युनियन बँक ऑफ इंडिया चे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. तसेच या युनियन बँक ऑफ इंडिया ची मालकी 43.44% ही भारत सरकारकडे आहे.
विद्यार्थी मित्रांनो या युनियन बँक ऑफ इंडियाचे उद्घाटन हे महात्मा गांधी यांच्या हस्ते 11 नोव्हेंबर 1919 ला झाले.

या युनियन बँक ऑफ इंडिया कडे 13 अब्जाच्या वरती अमेरिकन डॉलरची मालमत्ता आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या जाहिरातीतील पदाचे नाव व पदाचा तपशील.

पद क्रमांक.पदाचे नाव.पदांची संख्या.
1स्थानिक बँक अधिकारी लोकल बँक ऑफिसर (LBO)1500
संपूर्ण जागा1500

या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढीलप्रमाणे – संपूर्ण भारत ( भारतात कोठेही )

या पदासाठी वयाची अट पुढीलप्रमाणे. – 1 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे. (SC/ST – 5 वर्ष सूट, OBC – 3 वर्षे सूट)

या पदासाठी लागणारे परीक्षा फी पुढील प्रमाणे.
GENERAL/OBC – 850 रुपये. (SC/ST/ PWD – 175 रुपये )

या पदासाठीच्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे.
या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 नोव्हेंबर 2024.
या पदासाठी घेण्यात जाणाऱ्या परीक्षेचे तारीख – या परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल.

परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या पदासाठीच्या महत्त्वाच्या लिंक पुढीलप्रमाणे.

या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – CLICK HERE.

या पदासाठीचे जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढे क्लिक करा. DOWNLOAD HERE.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WHATS APP GROUP LINK TELEGRAM GROUP LINK

विद्यार्थी मित्रांनो आज आम्ही तुम्हाला राज्यव्यवस्था याबद्दल शिकवणार आहोत. तुम्हाला नक्कीच या सर्व टॉपिकचा फायदा परीक्षा दरम्यान होईल याची आम्ही आशा करतो. चला तर मग सुरु करूया आता राज्यव्यवस्थे मधील संसद हा टॉपिक.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया संसदेची रचना.
भारताचे संसद हे संविधानाच्या कलम 79 नुसार भारताचे राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा यांनी मिळून बनलेले राहील अशी तरतूद केलेली आहे.

कोणत्याही देशाची एक विशिष्ट व्यवस्था असते आणि त्याचे एक विशिष्ट स्ट्रक्चर असते कारण शासन कारभार व्यवस्थित चालावा यासाठी हे स्ट्रक्चर असते.

अरीस टोटल चे असे म्हणणे आहे की एकाच्या हातात सर्वी सत्ता केंद्रित होऊ नये. त्याचे असे म्हणणे होते की हायब्रीड व्यवस्था असावे.

त्यासाठी या तीन सिस्टम कार्यरत आहेत.

पहिली व्यवस्था म्हणजे कायदेमंडळ.
कायदे मंडळाचे प्रमुख काम आहे भारतासाठी कायद्याची निर्मिती करणे.

कार्यकारी मंडळ आणि कार्यकारी मंडळाला मंत्रिमंडळ आणि तिसरे सिस्टम असते त्याला म्हणतात न्याय मंडळ.

हायब्रीड चा अर्थ हा होतो की सिस्टम एक असावी एक, दोन आणि तीन.

विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक देशाचे एक कायदेमंडळ असतात. आपल्या भारत देशाचे कायदेमंडळ हे संसद आहे.

भारतात दोन स्तरीय कायदेमंडळ आहेत.
पाहिले म्हणजे केंद्रस्तरीय आणि दुसरे म्हणजे राज्यस्तरीय.

राज्यावर असणाऱ्या कायदेमंडळ हे राज्य विधिमंडळ असते.

देशामध्ये दोन कायदेमंडळ आहेत कारण की भारताची संघराज्य शासन प्रणाली आहे.

जे भारताची संसद आहे म्हणजे कायदेमंडळ आहे या भारताच्या संसदेमध्ये नंबर एक राष्ट्रपतीचा समावेश होतो.

एक सभागृह ज्याला म्हणतात लोकसभा आणि एक सभागृह ज्याला म्हणतात राज्यसभा असं तीन मिळून भारताची संसद तयार होते.

त्या संसदेला काही अधिकार दिलेले आहे जोपर्यंत दोन्ही सभागृह मान्यता देत नाही तोपर्यंत विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही.

विद्यार्थी मित्रांनो संसदीय शासन पद्धती म्हणजे काय ते आत्ता आपण बघूया, जेव्हा हेड ऑफ द स्टेट असेल त्याला संसदीय शासन पद्धती म्हणतात.

ज्या देशांमध्ये संसदीय शासन प्रणाली असते त्या देशामध्ये कायदेमंडळाचे सभागृह थेट जनते मार्फत निवडून येते.
लोकसभेचे सदस्य जनते मार्फत थेट निवडून येतात कारण भारतात संसदीय शासन प्रणाली आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया राज्यसभा म्हणजे नेमके काय.

ज्या देशांमध्ये संघराज्य प्रणाली असते तिथे राज्याचे प्रतिनिधित्व करणारे एक सभागृह असते त्याला म्हणतात राज्यसभा.

विद्यार्थी मित्रांनो आज पुरता राज्यघटनेबाबतचा इतका पॉईंट पुरेसा आहे.

आता आपण सुरू करूया भूगोल हा विषय. रोज आम्ही तुम्हाला थोडे थोडे मेन टॉपिक शिकवत आहोत. चला तर मग आता सुरू करूया भूगोल हा विषय.

विद्यार्थी मित्रांनो आपण आता महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यांचे तालुके बघूया.

खानदेश – विद्यार्थी मित्रांनो खानदेश तुम्हाला माहितीच आहे तीन जिल्हे मिळून खानदेश तयार होतो. येथील जिल्हे पुढीलप्रमाणे.

धुळे नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांचा समावेश खानदेश मध्ये होतो. हे उत्तर महाराष्ट्रातील तापी खोऱ्यातील तीन जिल्हे आहेत. आणि या तीन जिल्ह्यांमध्ये जमीन काळी व सुपीक आहे. तेथे कापसाचे व केळीचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. या कापसामुळे अनेक केळीमुळे हे जिल्हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया मराठवाडा.
या मराठवाड्यात एकूण आठ जिल्हे आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण विभागानुसार त्यांच्या जिल्हे व त्यांचे तालुके माहिती करून घेऊया.

पहिला विभाग पुणे विभाग.
या पुणे विभागातील पहिला जिल्हा पुणे जिल्हा.
येथील तालुके आता आपण बघूया. पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत.
ते तालुके पुढीलप्रमाणे.
१) पुणे जिल्हा – पुणे शहर, जुन्नर, वडगाव, आंबेगाव, शिरूर, राजगुरुनगर, हवेली, पौड म्हणजेच मुळशी, वेल्हे, दौंड , सासवड म्हणजेच पुरंदर, बारामती, भोर, आणि इंदापूर. हे एकूण 14 तालुके पुणे विभागात आहेत.

२) सातारा जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो सातारा जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत. ते तालुके आता आपण पुढील प्रमाणे बघूया.

सातारा हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे, महाबळेश्वर, खंडाळा, फलटण, वाई, मेढे म्हणजेच जावळी, खटाव, कोरेगाव, पाटण, दहिवडी, आणि शेवटचे आहे कराड. हे एकूण 11 तालुके सातारा जिल्ह्यात आहेत.

३) सांगली जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो सांगली या जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. ते दहा तालुके आता आपण पुढे बघूया.

शिराळा म्हणजेच महाल, विटा म्हणजेच खानापूर, इस्लामपूर म्हणजेच वाळवा, आटपाडी, कवठेमहाकाळ, तासगाव, जत, मिरज,
पलूस, कडेगाव. हे एकूण दहा तालुके सांगली जिल्ह्यात आहेत.

४) सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत. ते अकरा तालुके आपण पुढे बघूया.

उत्तर सोलापूर विद्यार्थी मित्रांनो हे उत्तर सोलापूर या जिल्ह्याचे मुख्यालय आहे, करमाळा, बार्शी , माढा, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, मोहोळ, मंगळवेढा, अक्कलकोट आणि शेवटचे दक्षिण सोलापूर. हे सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुके होते.

५) कोल्हापूर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत. ते तालुके आपण पुढे बघूया.

कोल्हापूर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे, चंदनगड, आजरा, गडहिंग्लज, गारगोटी, राधानगरी, कागल, शिरोळ, गगनबावडा, हात कणंगले, पन्हाळा, शाहूवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण बारा तालुके होते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया औरंगाबाद विभागातील जिल्हे व त्या जिल्ह्यातील एकूण तालुके.

१) औरंगाबाद जिल्हा – औरंगाबाद जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत. ते नऊ तालुके पुढील प्रमाणे- औरंगाबाद (विद्यार्थी मित्रांनो औरंगाबाद हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे) , फुलंब्री , पैठण, गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, सिल्लोड, कन्नड, सोयगाव. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण नऊ तालुके होते.

२) बीड जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो बीड जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत. ते अकरा तालुके पुढीलप्रमाणे – बीड ( विद्यार्थी मित्रांनो बीड हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे) , धारूर, परळी, शिरूर म्हणजेच कासार, वडवणी, आंबेजोगाई, केज, माजलगाव, पाटोदा, आष्टी, गेवराई हे टोटल 11 तालुके हे बीड जिल्ह्याचे होते.

३) जालना जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो जालना जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. ते आठ तालुके पुढीलप्रमाणे – जालना (विद्यार्थी मित्रांनो जालना हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे) , भोकरदन, जाफराबाद, अंबड, परतुर, मंठा, धन सावंगी, आणि बदनापूर हे सर्व आठ तालुके हे जालना जिल्ह्यातील तालुके होते.

४) परभणी जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो परभणी जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत. ते नऊ तालुके पुढीलप्रमाणे – परभणी (परभणी हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे) , जिंतूर, गंगाखेड, पाथरी, सोनपेठ, मानवत, सेलू, पालम, पूर्णा हे एकूण नऊ तालुके परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत.

५) उस्मानाबाद जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. ते आठ तालुके पुढील प्रमाणे – उस्मानाबाद ( विद्यार्थी मित्रांनो उस्मानाबाद हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे) , भूम म्हणजेच महाल, कळंब, तुळजापूर, परांडा, उमरगा, लोहारा, वाशी. हे एकूण आठ तालुके हे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे.

६) हिंगोली जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात एकूण पाच तालुके आहेत. ते पाच तालुके आता आपण पुढे बघूया – हिंगोली (विद्यार्थी मित्रांनो हिंगोली हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे) , औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी , सेनगाव. हे एकूण पाच तालुके हे हिंगोली जिल्ह्यातील आहे. विद्यार्थी मित्रांनो हिंगोली जिल्हा हा औरंगाबाद विभागातील सर्वात लहान तालुक्याचा जिल्हा आहे.

७) नांदेड जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो नांदेड जिल्ह्यात एकूण सोळा तालुके आहेत . ते 16 तालुके पुढीलप्रमाणे आपण बघूया – नांदेड ( विद्यार्थी मित्रांनो नांदेड हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. ) , त्यानंतर हदगाव, किनवट, भोकर, कंधार, मुखेड, बिलोली, हिमायतनगर, मुदखेड, देगलूर, माहूर, धर्माबाद, पेठ उमरी, अर्धापूर, लोहा, नायगाव म्हणजेच खैरगाव हे एकूण सोळा तालुके हे नांदेड जिल्ह्यातील आहेत.
विद्यार्थी मित्रांनो नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक तालुके आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात नांदेड जिल्ह्याचे सर्वाधिक तालुके म्हणून प्रथम क्रमांक लागतो.

८) लातूर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो लातूर जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. लातूर ( लातूर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे ) , अहमदपूर, निलंगा, भुम म्हणजेच महाल, कळंब, परांडा, तुळजापूर, उमरगा, वाशी, लोहारा. हे एकूण दहा तालुके लातूर जिल्ह्यातील तालुके आहेत.

विद्यार्थी मित्रांनो एकूण सहा प्रशासकीय विभाग आपले आहेत. त्यात कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग येतात. या सर्वांचे माहिती तालुका वाईज तुम्हाला आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये शिकवू.

विद्यार्थी मित्रांनो आज आम्ही तुम्हाला औरंगाबाद, पुणे विभागातील जिल्ह्यातील तालुक्यांबद्दल माहिती दिली. महाराष्ट्रातील आपल्या इतर विभागातील जिल्ह्यातील तालुक्यांची माहिती आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नोट्स बनवून टाकणार आहेत. आमचा हा एक नवीनच उपक्रम तुम्हाला दिसून येईल. आमची ही विशिष्ट व नवीन शैली तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पाठवा. त्यामुळे तुमच्या मित्रांचा सुद्धा फायदा होईल व त्यांना सुद्धा यशाला गवसनी घालायला वेळ लागणार नाही.

धन्यवाद…