NTPC Bharti 2024. National thermal Power corporation limited.नेशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 50 जागांसाठी भरती.

National thermal Power corporation limited. NTPC requirement 2024

National thermal Power corporation limited. NTPC requirement 2024.

जाहिरात क्रमांक : 13 /24

संपूर्ण जागा : 50 जागा.

जाहिरातीतील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.

पद क्रमांकपदांचे नावपदांची संख्या
1ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह बायोमास 50
संपूर्ण जागा 50
या पदासाठीची असणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे.
  • बीएससी ऍग्री कल्चर सायन्स (B.sc agriculture science)

या पदासाठीचे वयाची अट पुढीलप्रमाणे.

  • 28 ऑक्टोबर 2024 रोजी 27 वर्षांपर्यंत ( SC/ST पाच वर्ष सूट, OBC – तीन वर्षे सूट. )

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे.

  • संपूर्ण भारत (भारतात कोठेही.)

या पदासाठीची फी पुढील प्रमाणे.

  • General, OBC, EWS – 300 रुपये. (SC/ ST /PWD/ ExSM – कोणतीही फी नाही.)

या पदासाठीच्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 ऑक्टोबर 2024 रोजी आहे.

या पदासाठीची परीक्षा तारीख – परीक्षा तारीख नंतर कळविण्यात येईल.

या पदासाठीच्या महत्त्वाच्या लिंक पुढील प्रमाणे.

या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढे क्लिक करा – Apply online

या पदाची जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक कराDownload PDF

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा CLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WHATS APP GROUP LINK TELEGRAM GROUP LINK

विद्यार्थी मित्रांनो आपण ठरवल्याप्रमाणे अंदाज तुम्हाला भूगोल या विषयातील मृदा आणि खनिज संपत्ती टॉपिक बद्दल तुम्हाला आम्ही सखोल माहिती देणार आहोत.
ती माहिती कशी वाटली हे तुमच्या मित्रांना नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांना हा ब्लॉग नक्की शेअर करा.

विद्यार्थी मित्रांनो नद्या हा टॉपिक आपला संपलेला आहे आता आपण सुरू करूया मृदा आणि खनिज संपत्ती हा विषय. चला तर मग सुरु करूया मृदा आणि खनिज संपत्ती.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण घेऊया कोकणातील नद्या. खनिज संपत्ती हा टॉपिक तर आपण घेणारच आहोत त्यापूर्वी हा टॉपिक थोडा समजून घेऊया

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया कोकणातील नद्यांचा जिल्हा निहाय उत्तर दक्षिण क्रम.

*पालघर
दमनगंगा, सूर्या, पिंजाळ, वैतरणा, तानसा.
या एकूण पाच नद्या पालघर जिल्ह्यातील आहे.

*ठाणे
भातसा, काळू, मुरबाडी, उल्हास. या चार नद्या ठाणे जिल्ह्यातील आहेत.

*मुंबई
दहिसर, ओशिवरा, बोईसर, मीठी. या चार नद्या मुंबई जिल्ह्यातील आहेत.

*रायगड
उल्हास, पाताळगंगा, भोगावती, अंबा , कुंडलीका, काळ , घोड़ , गंधार, सावित्री.
या नऊ नद्या रायगड जिल्ह्यातील आहेत.

*रत्नागिरी
भारजा, जोग, जगबुडी, वशिष्ठी, शास्त्री , बाव, काजळी, मुचकुंडी, काजवी, शुक.
या दहा नद्या रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत.

*सिंधुदुर्ग
देवगड, आचरा, गड, कर्ली, तेरे खोल.
या पाच नद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील मृदा.

मृदा हे कसे तयार होते हे आता आपण जाणून घेऊया.
मृदा ही खडकांच्या झीज झाल्यामुळे तयार होते.

पहिला पॉईंट आपण बघूया महाराष्ट्रातील मृदा प्रकारांचा.

खडकांद्वारे मृदा कशी तयार होत असते एक लक्षात ठेवा की मृदा तयार होण्याची ही जी काही पूर्ण प्रोसेस आहे ही विशेष करून खडकांचे विदारणानंतर मृदा तयार होत असते. म्हणजे पहिल्यांदा खडकांच विदारण होण्याची प्रोसेस असते आणि विदारण होऊन त्यामध्ये ज्यावेळेस काही सेंद्रिय घटक त्याच्यामध्ये ऍड होतील त्यावेळेस ते फायनल मृदा म्हणजे याचा अर्थ असा की खडकांचे विदारण झाल्यानंतर जो खडकांचा भुगा होतो किंवा जे छोटे छोटे लहान कनांमध्ये त्याचे रूपांतर होते तर ती डायरेक्टली मृदा नसते. जोपर्यंत त्यामध्ये सगळे ऑरगॅनिक कॉम्पोनंट्स मिक्स होणार नाहीत, सेंद्रिय घटक त्यामध्ये मिक्स होणार नाही तोपर्यंत ती पर्टिक्युलर मृदा तयार होत नाही. म्हणून मृदा तयार होण्याची प्राथमिक प्रक्रिया आहे की त्यात खडकांचे विदारण होण हे त्यासाठी आवश्यक आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया मृदेचे घटक ते मृदेचे घटक पुढीलप्रमाणे.

१) खनिज द्रव्य.
२) सेंद्रिय घटक.
३) हवा.
४) पाणी.

भूपृष्ठाखालील दोन ते तीन मीटर जाडीचा थर हा मृदा असतो.

त्याच्याखाली जनक आणि मूळ खडक असतात.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मृदा निर्मितीसाठी परिणामकारक घटक. ते घटक पुढीलप्रमाणे.

जनक खडक
हवामान
कारक घटक
कालावधी
तापमान + पर्जन्य
सेंद्रिय घटक प्रमाण

हे घटक मृदा निर्मितीसाठी महत्त्वाचे घटक आहेत.

कारक घटकांमध्ये रासायनिक, भौतिक, जैविक घटक असतात ते मृदेचे विदारण करतात.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मृदेचे प्रकार.
१) काळी मृदा/ रेगुर मृदा.
२) जांभी मृदा.
३) गाळाची मृदा.
४) तांबडे / पिवळसर मृदा.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया काळी मृदेबद्दल माहिती.

सह्याद्रीचा खडक हा लाव्हारसाद्वारे बनलेला आहे. पूर्ण महाराष्ट्राचा भाग आहे लाव्हारसीच्या पठाराद्वारे बनलेला आहे. तो बेसॉल्ट या अग्निजन्य खडकाद्वारे बनलेला आहे.
काळी मृदा हे बेसॉल्ट आणि अग्निजन्य खडकाच्या विदारणामुळे तयार झालेली आहे.

हे काळी मृदा कापसासाठी प्रसिद्ध आहे. या काळी मृदे मध्ये कापसाच्या पिकापासून खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न घेता येते.

तसेच सह्याद्रीच्या पूर्व भागात काळी सर्वीकडे मृदा समान नाही.
मृदेत आपल्याला बदल झालेला दिसून येतो. काही ठिकाणी मृदा थर जाड असतो तर काही ठिकाणी मुद्दे चा रंग हा गडद तर फिका आपल्याला दिसून येतो.

उंच भागाच्या प्रदेशात मृदा थळ कमी जाडीचा असतो तेथे रंग मृदेचा फिकट झालेला दिसून येतो. तसेच त्याची सुपीकता आपल्याला कमी दिसून येते.

जास्त उंचीचा भाग असल्यास तेथे मृदेचा रंग तांबडा झालेला दिसून येतो.
तेथे मृदेचा कमी जाडीचा थर असतो आणि रंग फिकट झालेला दिसून येतो. तसेच त्या जागेची सुपीकता सुद्धा कमी असते.

विदर्भात अग्निजन्य खडकेपासून निर्मित खडक इतका दिसून येत नाही.
पठारे भागात जमिनीची सुपीकता फार कमी असते आणि नदी खोऱ्यांच्या भागात जमिनीची सुपीकता जास्त दिसून येते.

काळी मृदा हे ओलावा धरून ठेवण्यात सक्षम असते. त्या काळी मृदेत ओलावा धरून ठेवण्याची क्षमता सर्वात जास्त असते.

योग्य सिंचनाने मृदा सुपीक होण्यास मदत होते.

ज्या मृदेमध्ये चुनखडी जास्त प्रमाणात असते त्यामुळे त्याचे सुपीकता कमी होत नसते. उन्हाळ्यात त्या जमिनीला खूप मोठ्या भेगा पडतात.

तसेच विद्यार्थी मित्रांनो पाण्याचा अति सिंचनामुळे मृदा क्षारयुक्त होते व त्यावर क्षाराचे थर तयार होतात, या क्षारांमुळे जमीन नापीक होते.

विद्यार्थी मित्रांनो मृदेच्या रंगानुसार मृदाचे तीन प्रकार पडतात.
गडद काळी मृदा
मध्यम काळी मृदा 
उथळ काळी मृदा.

विद्यार्थी मित्रांनो आता पण खरीपो रब्बी हंगामातील पिके बघूया.

कापूस, ऊस, जवस, गहू हे पिके आहेत.

विद्यार्थी मित्रांनो नदी खोऱ्यात नगदी पीक हे जास्त घेतल्या जातात.

विद्यार्थी मित्रांनो भरड आणि उथळ मृदा हे पठाराच्या पंचवड्याच्या भागात आपल्याला दिसून येतो.

मैदानी प्रदेशात आपल्याला मध्यम काळी मृदा दिसून येते.

गोदावरी, भीमा, कृष्णा आणि तापी खोऱ्यात आपल्याला खोल आणि काळी मृदा दिसून येते.

तसेच डोंगर उतारावर व घाटमाथाच्या उतारावर तांबूस आणि तपकिरी मृदा आपल्याला पाहायला मिळते.

पूर्व विदर्भाच्या प्रदेशात आपल्याला उंचवटा दिसायला मिळतो त्यात पिवळसर व तपकिरी मृदा आपल्याला पाहायला मिळते.

पठारावरील मैदानी प्रदेशात पिवळसर आणि तपकिरी मृदा आपल्याला बघायला मिळते.

जांभी मृदा हे कोकणात अति पर्जन्य भागात आपल्याला दिसून येते.

कोकण भागात आपल्याला गाडाची मृदा सुद्धा दिसून येते.

खडकात बॉक्साईटचे साठे खूप मोठ्या प्रमाणात असतात.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जांभी मृदा.

उंचीवरील प्रदेशात मृदेचे तीन थर पडतात.

पातळ थर,
उथळ थर,
खडकाळ तर.

या थरांमध्ये ओलावा धरून ठेवण्याची क्षमता खूप कमी प्रमाणात दिसून येते.

जांभी मृदा हे फळबागांसाठी प्रसिद्ध आहे.

कोकण भागात जांभी मृदेत हापूस आंबा घेण्यात येतो.

जांभे मृदा हे सर्वात जास्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळते.
ती मृदा ही गडद आणि तपकिरी रंगाची असते.

गडद मृदेत ओलावा क्षमता चांगली असते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया गाळाची मृदा.

किनारी भागात गाळाची मृदा हे कोकण किनारा भागात आपल्याला दिसून येतो. तिचा विस्तार हा उत्तर दक्षिण आहे.

महाराष्ट्रात सिंचन उपलब्ध असल्यामुळे तेथे जास्त पाणी असते व त्या ठिकाणी तांदूळ उत्पादन क्षमता जास्त असते.
तेथे नारळ, सुपारी इत्यादी पिके घेतली जातात.

विद्यार्थी मित्रांनो मृदेचे सर्वात जास्त कोकणात दिसून येते.
कारण कोकणात नद्यांचा वेग जास्त असतो कारण तेथे पर्जन्य सृष्टी जास्त होते त्यामुळे तेथील जमिनीची झीज मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. तेथे जाड भरडा गाळ जास्त प्रमाणात असतो त्यालाच भाबर असे म्हणतात.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया तांबडी आणि पिवळसर मृदा.

हे तांबडे आणि पिवळसर मृदा सह्याद्रीच्या पर्वतीय भागात तसेच उत्तर कोकणात आणि विदर्भाच्या पूर्व भागात दिसून येते.

हे मृदा पर्वतीय भागात आढळते. तसेच या मृदेचा थर हा कमी सुपीक असा दिसून येतो.

सखल भागात योग्य रासायनिक घटक तसेच गडद रंग व मृदेचा लोम प्रकार आपल्याला दिसून येतो.

विद्यार्थी मित्रांनो तांबड्या मृदेत भरड धान्य जास्त प्रमाणात पिकवता येतात.

ती भरड धान्य पुढील प्रमाणे.
बाजरी, ज्वारी, नाचणी.

विद्यार्थी मित्रांनो येथे बाजरीचे पीक जास्त प्रमाणात लागवड करतात.

जिथे तांबडी मृदा असते त्या ठिकाणी जास्त पर्जन्य भागात तांदूळ लागवड करण्यात येतो.

विदर्भातील मृदा हे नापीक प्रकारची मृदा दिसून येते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील वनांचे प्रकार.

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय मौसमी हवामान प्रदेश आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया वनांचे प्रकार.

१)उष्ण कटिबंधीय सदाहरित वने.
२) उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित वने.
३) उपोषणा कटिबंधीय सदाहरित वने.
४) उष्ण कटिबंधीय आद्रक पानझडी /मान्सून वने.
५) कृष्णा कटिबंधीय शुष्क पानझडी वने.
६) काटेरी/ झुडपे वने.
७) किनारी प्रदेशातील खाजण वने.

विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया आपण उष्ण कटिबंधीय सदाहरित वने यांच्या बद्दल माहिती.

जास्त तापमान असणाऱ्या भागांमध्ये आणि जास्त पर्जन्य असणाऱ्या भागामध्ये आपल्याला उष्णकटिबंधीय सदाहरित वने बघायला मिळतात. जिथे जास्त तापमान आहे जिथे जास्त पर्जन्य आहे आणि पर्जन्य सर्वसाधारणपणे 200 cm पेक्षा जास्त जर असेल तर अशा प्रदेशांमध्ये आपल्याला हे वने बघायला मिळतात.

विद्यार्थी मित्रांनो उष्ण कटिबंधीय सदाहरित वने हे आपल्याला कोणत्या प्रदेशात बघायला मिळतात ते आता आपण बघूया.

पश्चिम घाट म्हणजे घाटमाथाचा प्रदेश जो वेस्टन घाट आहे. तसेच पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान, दक्षिण कोकण, रत्नागिरी, अंबोली आणि सिंधुदुर्ग हा जो आपल्याला पूर्ण कोकण पट्ट्याचा जो भाग आहे या कोकणपट्ट्याच्या सह्याद्री जवळच्या भागांमध्ये आपल्याला हे सदाहरित वने दिसतात. सदाहरित याचा अर्थ असा आहे की जी वने नेहमी कायम हिरवीगार आपल्याला दिसत असतात.

कोकण भागात आद्रता व दमट हवामान जास्त प्रमाणात दिसून येते. कोकणात जांभा मृदा भाग जास्त दिसून येतो.

या मृदेत ह्युमसचे प्रमाण जास्त दिसून येते.

या ठिकाणी वृक्षांचे उंच वाढ खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही वने नेहमी सदाहरित दिसतात. व हे वने नेहमी घनदाट वणे म्हणून ओळखले जातात. यांची उंची 45 ते 60 मीटर इतके असते.

या भागात वृक्ष हे फणस, कावसी, पांढरा सिडार, नागचंपा, जांभूळ, आंबा हे आहेत.

या वनांना आर्थिक महत्त्व कमी आहे येथे दळणवळण सुद्धा कमी पाहण्यास मिळते.

विद्यार्थी मित्रांनो आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला हे तुमचे मित्रांना नक्की कळवा. कारण आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला परीक्षेची माहिती तर मिळतेच अजून तुम्हाला तुमच्या ज्ञानात भर करण्यासाठी आम्ही नवीन नवीन टॉपिक घेऊन येतो.

तुमच्या ज्ञानात वाढ होऊन तुम्हाला परीक्षेत चांगल्या प्रकारचे यश संपादन करता येईल. त्यासाठी हा ब्लॉग तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करू शकतात.