Power grid corporation of India recruitment 2024.
Power grid corporation of India recruitment 2024.
जाहिरात क्रमांक – CC/ 08/ 2024 AND CC/09/2024.
विद्यार्थी मित्रांनो पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड याचे मुख्यालय गुडगाव येथे आहे.
एक भारतीय सरकारी मालकीचे इलेक्ट्रिक युटीलिटीज कंपनी आहे.
पॉवरग्रिड ही कंपनी भारतात निर्माण होणाऱ्या एकूण विजे पैकी 50 टक्के वीज वापरते.
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये पुढील प्रकारच्या जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
संपूर्ण जागा 117.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
जाहिरात क्रमांक | पद क्रमांक | पदांचे नाव | पदांची संख्या |
CC/ 08/ 2024 | 1 | ट्रेनी इंजिनीयर ( इलेक्ट्रिकल ) | 47 |
CC/09/2024 | 2 | ट्रेनी सुपरवाईजर ( इलेक्ट्रिकल ) | 17 |
संपूर्ण जागा | 117 |
- पद क्रमांक एक साठी लागणारे शैक्षणिक पात्रता. – 60 टक्के गुणांसह B.E / बी टेक / बी.एससी इंजिनिअरिंग ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल (पॉवर) / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सिस्टिम्स इंजीनियरिंग / पॉवर इंजीनियरिंग. )
- पद क्रमांक दोन साठी लागणारी शैक्षणिक पात्रता – 70% गुणांसह डिप्लोमा उत्तीर्ण ( इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल (पॉवर) / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टिम्स इंजीनियरिंग / पॉवर इंजीनियरिंग) ( SC/ ST/ PWD – उत्तीर्ण श्रेणी )
या पदांसाठी वयाची अट पुढील प्रमाणे – 6 नोव्हेंबर 2024 रोजी, (SC/ ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट.
- पद क्रमांक एक साठी वयाची अट पुढीलप्रमाणे – 18 ते 28 वर्षे.
- पद क्रमांक दोन साठी वयाची अट पुढीलप्रमाणे – 18 ते 27 वर्षे.
पदासाठी नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (भारतात कोठेही).
पदासाठी लागणारी परीक्षा फी पुढील प्रमाणे.
- पद क्रमांक एक साठी लागणारी परीक्षा फी – General/ OBC / EWS – 500 रुपये. ( Sc/ st/ PWD / ExSM – परीक्षा फी नाही)
- पद क्रमांक दोन साठी लागणारी परीक्षा फी – General/ OBC / EWS – 300 रुपये. ( Sc/ st/ PWD / ExSM – परीक्षा फी नाही)
पदासाठी च्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे.
पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही | 6 नोव्हेंबर 2024. |
परीक्षेची तारीख | परीक्षेची तारीख ही नंतर कळविण्यात येईल. |
या पदाची जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा | POST 1-DOWNLOAD PDF POST 2-DOWNLOAD PDF |
या पदासाठी ऑनलाइन एप्लीकेशन करण्यासाठी पुढे क्लिक करा | CLICK HERE |
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा | CLICK HERE |
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WHATS APP LINK
TELEGRAM LINK
मुख्यमंत्री वयोश्री योजना.
विद्यार्थी मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळण्यासाठी ही मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळील ज्येष्ठ नागरिकांना कळवून लवकरात लवकर त्यांचे फॉर्म भरावे कारण या योजनेचे फॉर्म भरणे सुरू झाले आहे. तुम्ही त्वरित योजनेचा फॉर्म भरून घेऊन या योजनेचा लाभ त्यांना मिळवून द्यावा.
माणसाचे शरीर हे काही काळापर्यंत म्हणजे काही वर्षापर्यंत साथ देते व ते काम करणे योग्य असते. त्यामुळे कुठे ही नोकरी करत असताना त्यांना त्या कामाच्या मोबदल्यात तितका पगार सुद्धा दिला जात नाही. त्यानंतर उतरत्या वयात काम करणे खूप जड जाते आणि शरीरात योग्य काम करण्यायोग्य बळ नसल्यामुळे त्यामुळे शरीर ते काम करू शकत नाही व त्यांना त्या मोबदल्यात इतका पगार सुद्धा दिला जात नाही. तसेच त्यांना दैनंदिन उपयोगासाठी येणाऱ्या वस्तू घेण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा सुद्धा राहत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री वयोश्री योजना ही त्यांच्यासाठी एक वरदानच ठरली आहे.
राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात तसेच सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणारे अपंगत्व येण्यामुळे तसेच वाढता वयामुळे येणारा अशक्तपणा , थकवा यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांना आवश्यक साधने खरेदी करण्याकरता तसेच त्यांच्यासाठी मन स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र यांच्याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात आली आहे.
हा जीआर 6 फेब्रुवारी 2024 रोजी काढण्यात आलेला होता.
तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता जाणून घेऊया मुख्यमंत्री वयोश्री योजनेबाबत संपूर्ण माहिती.
(केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवणाची बाब आहे.)
या योजनेचे ध्येय उद्दिष्ट पुढील प्रमाणे – महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षे वय असणाऱ्या व त्या पुढील वय असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात जगण्यासाठी व त्यांना येणारे वाढत्या वयाने येणाऱ्या अपंगत्वासाठी व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने खरेदी करण्याकरता व मन स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीं द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी त्यांना प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एक रकमी तीन हजार रुपये पात्र जेष्ठ नागरिक लाभार्थ्यांच्या बँकेत वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट ही रक्कम डीबीटी प्रणाली द्वारे टाकण्यात येणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया योजनेचे स्वरूप.
मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार पायाभूत साधने खरेदी करता येतील ती साधने पुढील प्रमाणे.
१) श्रवण यंत्र.
२) चष्मा.
३) ट्रायपॉड, टेक व्हील चेअर.
४) फोल्डिंग वॉकर.
५) कमोड खुर्ची.
६) नि – ब्रेस.
७) सर्वाइकल कॉलर.
८) लंबर बेल्ट.
तसेच या वयोवृद्ध व्यक्तींना राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगपचार केंद्र व मन स्वास्थ्य केंद्र तसेच मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र यात सहभागी होता येईल.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया निधी वितरण व अर्थसहाय्य याबद्दल माहिती.
१) मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत राज्य शासनातर्फे 100% अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येईल.
२) या योजनेअंतर्गत थेट लाभ वितरण हा डीबीटी प्रणाली द्वारे तीन हजार रुपयांच्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येईल.
३) मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत शिबिराचे आयोजन करणे – सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय व उपकेंद्र यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणाच्या जाडे राज्याच्या विविध ठिकाणी पसरलेले आहे. पॉप्युलेशन बेस्ट स्क्रीनिंग म्हणजेच असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण व माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजने अंतर्गत या अभियाना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. याच यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल.
आता आपण बघूया योजनेची अंमलबजावणी –
या योजनेत कोणकोणत्या समित्यांचा सहभाग असेल तर आता आपण बघूया.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, आयुक्त समाज कल्याण विभाग, पुणे आणि जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी समिती या समित्या ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य व विशेष आर्थिक सहाय्य अनुदान थेट डी.बी.टी प्रणाली द्वारे देतील.
या योजनेच्या अंमलबजावणीवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग देखरेख व नियंत्रण करेल.
राज्य नोडल एजन्सी यंत्रणा ही मुख्यमंत्री वयोश्री योजना मध्ये योजनेसाठी लाभार्थ्याची निवड करणे, लाभार्थ्याच्या आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, त्यांच्या आधार कार्ड बँक खात्याची माहिती गोळा करणे हे काम केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था म्हणजेच CPSU याच्या माध्यमातून आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याद्वारे पार पाडण्यात येईल.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे.
आधार कार्ड, मतदान कार्ड.
राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स,
दोन पासपोर्ट फोटो,
स्वयं घोषणापत्र,
शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्न कागदपत्रे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेत निवड केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30 टक्के महिला असतील हे या योजने त नमूद केले आहे.
मला सोबत जोडायचे कागदपत्रे पुढीलप्रमाणे.
आधार कार्ड मतदान कार्ड ,
राष्ट्रकुल बँक पासबुक झेरॉक्स,
दोन पासपोर्ट फोटो,
कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला घोषणापत्र,
समकक्ष योजनेचा लाभ मागील तीन वर्षात घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र,
शिधापत्रिका क्र, / बी.पी.एल पत्रिका झेरॉक्स,
वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र,
जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र/ बीपीएल रेशन कार्ड/ इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन पुरावा/ राज्यसेवा केंद्रशासित सरकारच्या वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळकत असल्याचा पुरावा.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेला हे कागदपत्र जोडल्यानंतर समाज कल्याण विभागात जाऊन सबमिट करणे.
मुख्यमंत्री वयोश्री योजने चा लाभ मिळण्यासाठी एक करायचा अर्जाचा नमुना त्यात दिलेले काही माहिती ती भरून घेणे. ती माहिती पुढील प्रमाणे.
१) अर्जदाराचे संपूर्ण नाव.
२) अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा कायमचा पत्ता.
३) अर्जदार भ्रमणध्वनी क्रमांक.
४) अर्जदार आधार क्रमांक.
५) अर्जदाराचे लिंग – स्त्री /पुरुष.
६) अर्जदार जात/ पोटजात/ प्रवर्ग.
७) अर्जदार यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न.
८) शिधापत्रिका क्रमांक / बी.पी.एल/ पत्रिका क्रमांक.
९) अर्जदार बँकेचे नाव.
१०) बँकेचा संपूर्ण पत्ता.
११) अर्जदार जन्मदिनांक.
१२) शाखा.
१३) खाते क्रमांक.
१४) IFSC CODE NO.
महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप उपयोगाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.
शासन निर्णय क्रमांक – ज्येष्ठना – 2022/ प्रक्र. 344 / सामासू.
मंत्रालय, विस्तार मुंबई – 400032.
दिनांक – 6 फेब्रुवारी 2024
याचे प्रस्तावना पुढीलप्रमाणे – सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र जय एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे, त्यात 65 वर्षे व त्यावरील अंदाजे एकूण 10 – 12 टक्के ज्येष्ठ नागरिक ( म्हणजेच 1.25 – 1.50 कोटी इतके) आहेत. यापैकी जेष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात कोणता ना कोणता अपंगत्वाचा सामना करावा लागतो त्यामुळे ही बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्यरेषेखालील दिव्यांग जेष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य उपकरणे साधने पुरवण्याची मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण चालू घडामोडी वर काही प्रश्न घेऊया. त्यामुळे तुमच्या ज्ञानात बरीच भर पडेल आणि तुम्हाला परीक्षेला सामोरे जाण्यास मदत होईल.
- जागतिक सांख्यिकी दिन 20 ऑक्टोबर 2024 रोजी साजरा केला. ( एखादा सरकारला धोरण वगैरे ठरवायचं असल्यास त्यावेळेस या आकडेवारीची मदत होते ) ( भारताचा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस हा 29 जून रोजी साजरा केला जातो)
- मोहनजी यांना ऑक्टोबर 2024 मध्ये नवव्या कॉन्शियस कंपनीज अवार्ड कार्यक्रमात जागतिक मानवतावादी नेतृत्व साठी मानवतावादी पुरस्कार देण्यात आला.
- 2024 चा रॅमन मॅगसेस पुरस्कार हायाओ मियाझाकी यांना देण्यात आला. ते जपान या देशाचे रहिवासी आहेत.
- इंटरनॅशनल बुकर प्राइज 2024 हा पुरस्कार जेनी एरपेनबॅच यांना कायरोस या पुस्तकासाठी यांना देण्यात आला.
- अबेल पुरस्कार 2024 हा मिशेल टालाग्रँड यांना देण्यात आला ते फ्रान्स या देशाचे रहिवासी आहेत.
- तीमोर लेस्टेचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तीमोर लेस्टे हा द्रोपदी मुर्मु यांना देण्यात आला.
- चार अमृत फार्मसी 2024 ऑक्टोबर मध्ये उघडणारे पहिले कोळसा कंपनी ही साउथ ईस्टर्न कॉल फील्ड लिमिटेड या कंपनीने उघडले आहेत. ही कंपनी छत्तीसगड मध्ये स्थित आहे. ही कोल इंडियाचे उप कंपनी आहे. अमृत म्हणजेच परवडणारे औषधे आणि उपचारांसाठी विश्वसनीय इम्प्लांटस. असे करणारे ते पहिले कोळसा कंपनी बनली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2015 मध्ये लॉन्च केलेल्या अमृत फार्मसी या सवलती च्या दरात औषधे रोपण आणि शस्त्रक्रिये च्या वस्तू प्रदान करतात. SECL च्या गेवरा, बिलासपूर, सोहागपुर, आणि चिरीमिरी येथे चार फार्मसी आहेत. त्या फार्मसी कर्करोग आणि हृदयरोग व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसारख्या गंभीर परिस्थितीवर लक्ष केंद्रित करतात.
मित्रांनो आज दिलेली उपयुक्त माहिती तुम्हाला जर चांगली वाटली असेल तर तुम्ही हा ब्लॉग तुमच्या दुसऱ्या मित्रांना शेयर करू शकतात आणि तुमच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये सुध्धा तुम्ही शेअर करू शकतात. चालू घडामोडींवर आम्ही नवनवीन प्रश्न तुमच्यासाठी रोज घेऊन येतो. त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडते आणि ती ज्ञानाची भर सर्वीकडे व सर्वांनी उपभोगावी यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करू शकतात आणि या ब्लॉग ची लिंक सर्व ग्रुप मध्ये शेअर करू शकतात.
धन्यवाद