नॅशनल फर्टिलाइजर लिमिटेड मध्ये 336 जागांसाठी भरती. NFL ( National fertilizer limited) रिक्वायरमेंट 2024.

National fertilizer limited requirement 2014.

National fertilizer limited requirement 2014.

रासायनिक खते, सेंद्रिय खते आणि औद्योगिक रसायने, नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड भरती 2024.

विद्यार्थी मित्रांनो एन एफ एल मध्ये 336 नॉन एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती काढण्यात आलेले आहे. त्यात कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक ग्रेड २, स्टोअर सहाय्यक ग्रेड २, लोको अटेंडेंट ग्रेड २, नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, लेखा सहाय्यक, परिचर ग्रेड २, लोको अटेंडेंट ग्रेड 3, ओटी तंत्रज्ञ. या पदांसाठी भरती आहे. या संपूर्ण अकरा पद आहेत.

जाहिरात क्रमांक – 05 (NFL) / 2024

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे

पद क्रमांकपदाचे नावपदांची संख्या
1जूनियर इंजीनियरिंग असिस्टंट ग्रेड २179
2स्टोअर असिस्टंट ग्रेड २19
3लोको अटेंडंट ग्रेड २05
4नर्स10
5फार्मासिस्ट10
6लॅब टेक्निशियन04
7एक्स-रे टेक्निशियन02
8अकाउंट असिस्टंट10
9अटेंडंट ग्रेड २90
10लोको अटेंडंट ग्रेड ३04
11OT टेक्निशियन03
संपूर्ण जागा336

या जागांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे.

General/ OBC – ६० टक्के गुण, sc/ st/ PWD – 50 टक्के गुण.

पद क्रमांक एक साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणेB.Sc. (pcm)/ engineering diploma ( chemical/ mechanical/ instrumentation aur electronics aur instrumentation and control or electronics and instrumentation or electronics instrumentation and control or industrial instrumentation aur process control instrumentation aur electronic and electrical or applied electronics and instrumentation or electronics and communication or electronics and telecommunication or electronics and control engineering or instrumentation and process control/ electrical / mechanical )

बी.एस.सी ( pcm ) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा ( केमिकल / मेकॅनिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल किंवा इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन किंवा प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल किंवा अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल इंजिनिअरिंग किंवा इन्स्ट्रुमेंटेशन आणि प्रोसेस कंट्रोल/ इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल )
पद क्रमांक दोन साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणेविज्ञान/ वाणिज्य / कला पदवी
पद क्रमांक तीन साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्रमांक चार साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणेबारावी उत्तीर्ण +GNM किंवा बी.एस.सी नर्सिंग
पद क्रमांक पाच साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे१) बारावी उत्तीर्ण २) डी फार्मसी / डी फार्मसी
पद क्रमांक सहा साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे१) बारावी उत्तीर्ण २)DMLT किंवा बी.एस.सी ( मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी)
पद क्रमांक सात साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे१) बारावी उत्तीर्ण २) डिप्लोमा ( एक्स-रे / मेडिकल रेडिएशन टेक्नॉलॉजी / रेडिओग्राफी (mecical) / रेडिओग्राफी टेक्निक्स / रेडिओलॉजी ) किंवा बी.एससी (hons) / बी.एससी ( रेडिओ ग्राफी) / मेडिकल टेक्नॉलॉजी ( एक्स-रे किंवा रेडिओग्राफी ) / मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी / रेडिओग्राफी आणि इमॅजिनिंग टेक्नॉलॉजी/ रेडिओलॉजी / रेडिओलॉजी आणि इमेजिंग टेक्नॉलॉजी/ मेडिकल रेडिओलॉजी आणि इमॅजिन टेक्नॉलॉजी / मेडिकल टेक्नॉलॉजी ( रेडिओ डायग्नोसिस आणि इमेजिंग / रेडिओलॉजी आणि इमेजिंग सायन्स टेक्नॉलॉजी/ मेडिकल टेक्नॉलॉजी ( रेडिओलॉजी आणि इमेजिंग )
पद क्रमांक आठ साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे  बी. कॉम
पद क्रमांक नऊ साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे१) दहावी उत्तीर्ण २) आय.टी आय ( फिटर/ वेल्डर/ ऑटो इलेक्ट्रिशियन / डिझेल मेकॅनिक / टर्नर / मेकॅनिस्ट / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रिशियन ( पॉवर डिस्ट्रीब्यूशन) / टेक्निशियन ( पॉवर इलेक्ट्रॉनिक सिस्टीम)
पद क्रमांक दहा साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे१) दहावी उत्तीर्ण २) आय.टी.आय ( मेकॅनिक डिझेल)
पद क्रमांक 11 साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे१) बारावी ( फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) उत्तीर्ण आवश्यक २) डिप्लोमा ( ऑपरेशन थेटर टेक्निक्स / ऑपरेशन थेटर आणि anaesthesia टेक्नॉलॉजी ( DOTAT) / ऑपरेशन थेटर टेक्नॉलॉजी)

या पदांसाठी लागणारी वयाची अट पुढील प्रमाणे – 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 30 वर्षे. ( SC / ST – पाच वर्षे सूट, OBC – ३ वर्षे सूट. )

पदांसाठीचे नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत ( भारतात कोठे ही)

पदांसाठीची परीक्षा फी पुढील प्रमाणे – General / OBC/ EWS – 200 रुपये. ( PWD / Ex.SM – परीक्षा फी नाही)

पदासाठीच्या परीक्षे संदर्भातील व इतर तारखा पुढील प्रमाणे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख –8 नोव्हेंबर 2024
परीक्षेची तारीख – परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल.

पदा संदर्भातील महत्त्वाच्या लिंक्स पुढीलप्रमाणे –

पदांसाठीची जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक कराDOWNLOAD PDF
पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे क्लिक कराCLICK HERE
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक कराCLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो भविष्यात येणाऱ्या नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

  1. WHATS APP LINK
  2. TELEGRAM LINK

विद्यार्थी मित्रांनो आता आपण चालू घडामोडी या विषयाकडे वळूया.

  • पश्चिम बंगाल येथील कोलकत्ता या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंडरवाटर मेट्रो सेवा चे उद्घाटन केले. हे अंडरवॉटर मेट्रो सेवा देशातील पहिले अंडरवॉटर मेट्रो सेवा ठरली.
    भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन हे हावडा मेट्रो स्टेशन हे आहे.
    पृष्ठभागापासून 33 मीटर खाली आहे.
    या मेट्रोला हुगळी नदी खालील 520 मीटर अंतर कापण्यासाठी 45 सेकंद लागतील.
  • जगातील मार्च 2024 सर्वात श्रीमंत व्यक्ती हा जेफ बेझोस आहे.
  • व्योममित्र ही महिला रोबोट गगनयान मिशन 2024 पूर्वी अंतराळात गेली होती.
  • विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया सर्वोच्च न्यायालयाने न्यायदेवतेच्या नव्यामूर्तीचे केलेले अनावरण.
    न्यायदेवतेची डोळ्याची पट्टी आता काढून टाकलेली आहे.
    न्यायदेवतेच्या हातात आधी हाती तलवार होती तर आता त्या ठिकाणी संविधानाचे स्थापना केली आहे.

न्यायदेवतेचा नवीन पुतळा लेडी ऑफ जस्टिस हा न्यायालयात बसवण्यात आला आहे.
डोळ्या पट्टी ही असे दर्शवत होते की कायदा आंधळा आहे. परंतु आता डोळ्याची पट्टी काढून टाकलेले आहे. आणि आता आपल्या देशातील कायदा आंधळा नसून ते शिक्षेचे प्रतीक नाही हा संदेश देण्याचा उद्देश आता नव्या पुतळ्याचा आहे.

समाजातील संतुलनाचे प्रतीक म्हणून पुतळ्याच्या उजव्या हातात तराजू ठेवण्यात आलेला आहे. तराजू हे प्रमाण दाखवते की कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी न्यायालय दोन्ही बाजूंचे तथ्य आणि युक्तिवाद पाहते आणि ऐकते सुद्धा.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सर्वोच्च न्यायालय बद्दल.

सर्वोच्च न्यायालयासाठी भारतीय संविधानात भाग पाच मध्ये कलम 124-147 आहे.

सर्वोच्च न्यायालयाला रीट जारी करण्याचा अधिकार कलम 32 मध्ये आहे.

देशाचे राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नियुक्ती करतात.

सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश HJ कानिया हे होते.

आता 50 वे सरन्यायाधीश हे DY चंद्रचुड हे आहे.

सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही 28 जानेवारी 1950 रोजी झाली.

  • मणिपूर या राज्यात ऑक्टोबर 2024 मध्ये लाम लाई महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवामध्ये नागरिक हे साफसफाई करतात रस्त्यावरचा कचरा साफ करतात.

हा महोत्सव मणिपूरच्या टग्नीपाल जिल्ह्यातील मारींग समुदाय वार्षिक लमलाई पूर्वकापणी उत्सव साजरा करतात. या उत्सवाची सुरुवात युद्ध नृत्य ‌‌खौसाब मिरवणूकने होते.

पिकांचे कापणी सुरू होण्याच्या वेळेस हा उत्सव साजरा करण्यात येतो.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मणिपूर या राज्याबद्दल.

मणिपूरची राजधानी ही इम्फाळ आहे.
मणिपूर राज्याची स्थापना ही 21 जानेवारी 1972 रोजी झाली.
मणिपूर राज्याचे अधिकृत भाषा ही मेईटीलोन ही आहे.
मणिपूर या राज्याचा राज्य प्राणी हा संगई हा आहे.
मणिपूर या राज्याचा राज्यपक्षी हा मिसेस ह्युमस् तितर हा आहे.

  • भारत सरकारच्या भारतीय विकास आणि आर्थिक सहाय्य योजना कार्यक्रमांतर्गत रुपयाचे कर्ज मिळवणारा पहिला देश हा मॉरिशस आहे.
    या योजनेअंतर्गत मॉरिशसला 487.60 कोटी रुपये क्रेडिट लाईन दिले आहे.
    भारताचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री मनीष गोविंद यांना हे कर्ज दिले.
    मॉरिशसला या योजनेद्वारे कर्ज दिले कारण मॉरिशस मध्ये जल प्रकल्पाला वित्त पुरवठा करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे हे 487.60 कोटी रुपये कर्ज देण्यात आले.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मॉरिशस या देशाबद्दल.

मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस ही आहे.
मॉरिशसचे चलन हे मॉरिशस रुपया आहे.
मॉरिशस ते पंतप्रधान हे प्रविंद जुगनाथ हे आहेत.
मॉरिशसचे अधिकृत भाषा ही इंग्रजी आहे.

  • युक्रेन या देशाने ड्रॅगन ड्रोन हे अत्याधुनिक अग्निशमन अस्र विकसित केले.

हाय ड्रोन आग ओकण्याच काम करतो. या ड्रोन द्वारे थर्माइट सोडल्या जाते.
हे थर्माइट ॲल्युमिनियम आणि आयर्न ऑक्साइड चे मिश्रण असून ते रेल्वे ट्रॅक बांधण्यासाठी विकसित केले गेले होते.

युक्रेन हे शस्त्र रशिया युक्रेन युद्धात वापरले जात आहे.

विद्यार्थी मित्रांनो थर्माइट चा वापर युद्धामध्ये कायदेशीर आहे. परंतु आग लावणाऱ्या शस्त्रांनी नागरिकांना लक्ष करणे हे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार प्रतिबंधित आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया युक्रेन या देशाबद्दल.
युक्रेन ची राजधानी ही कीव आहे.
युक्रेंन चे चलन हे युक्रेनियन रिवनिया हे आहे.
युक्रेन अध्यक्ष हे वोलोडीमिर झेलेंस्की हे आहेत.
युकेनचे पंतप्रधान हे डेनिस श्यामल हे आहेत.

  • भारताच्या आदित्य L1 या सूर्य मिशन ने 5 हॅलो आर्बिटची पहिली फेरी केले.
  • फ्रान्स आणि भारत या देशाने तृष्णा उपग्रह प्रक्षेपित केले हे उपग्रह पृथ्वीच्या तापमानावर लक्ष ठेवण्यासाठी प्रक्षेपित केले आहे.
  • पेरू आणि स्लोव्हा किया हा देश चंद्राच्या शांततेच्या शोधासाठी नासाच्या आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणारा 41 वा आणि 42 वा देश बनला आहे.
  • परम रुद्र सुपर कॉम्प्युटर हे तीन कॉम्प्युटर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 130 कोटी रुपये खर्चून लॉन्च केले आहेत. त्यात देशातील तीन मोठी शहरे तैनात केले जातील. ते तीन शहरे पुढील प्रमाणे- पुणे, दिल्ली आणि कोलकत्ता.
  • न्यूझीलंडच्या ऑकलँड विद्यापीठाला टेक महिंद्रा एआय आणि क्वांटम संशोधनासाठी सहकार्य केले.
  • 2028 वर्षी लाँच केल्या जाणाऱ्या चांद्रयान 4 मिशनला केंद्र सरकारने मान्यता दिली.
  • डी आर डी ओ (DRDO) ने झोरावर ची यशस्वी चाचणी केली.
    झोरावर हा एक टॅंक आहे.
  • गोपीचंद थोटाकुरा हे भारतातील पहिले नागरी अंतराळ पर्यटक बनले.
  • ओलेग कोनोनेंको या अंतराळात 1000 दिवस पूर्ण करणारे पहिली व्यक्ती बनली.
  • दक्षिण कोरिया या देशाने नॅशनल स्पेस एजन्सी कासाची स्थापना केली.
  • विद्यार्थी मित्रानो भारताने नुकतेच 20 मीटर लांबीच्या अग्नी चार क्षेपणास्त्राचे चाचणी घेतली. हे 4000 km पर्यंतच्या लक्षावर मारा करण्यास सक्षम आहे. तसेच याची 1000 किलो वजनाची पेलोड क्षमता आहे.
  • रब्बी हंगामासाठी 2025 – 26 गव्हाच्या एम एस पी ( MSP) मध्ये प्रतिक्विंटल दीडशे रुपये वाढ झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार समितीचे मीटिंग ठेवण्यात आली होती. याच मीटिंगमध्ये ही वाढ करण्यात आली.

MSP चा लॉंग फॉर्म आहे मिनिमम सपोर्ट प्राईस, याला मराठीतून म्हणतात किमान आधारभूत किंमत.

  • नवी दिल्ली येथे इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 आयोजित करण्यात आला होता.
    इंडिया मोबाईल काँग्रेसच्या आठव्या आवृत्तीचे उद्घाटन हे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केले.
    इंडिया मोबाईल काँग्रेस हा आशियातील सर्वात मोठा डिजिटल तंत्रज्ञान कार्यक्रम आहे.

याची थीम होती – THE FUTURE IS NOW
या प्रदर्शनात क्वांटम टेक्नॉलॉजी , CIRCULAR इकॉनोमी, आणि 6 जी सारख्या नवीन तंत्रज्ञानावर चर्चा केली.