India Post Payment Bank Bharti 2024 (IPPB BHARTI ) इंडियन पोस्ट पेयमेंट बँकेत 344 जागांसाठी भरती.

INDIAN POST PAYMENT BANK RECRUITMENT 2014.

INDIAN POST PAYMENT BANK RECRUITMENT 2014.

विद्यार्थी मित्रांनो टपाल खात्यात IPPB मध्ये ग्रामीण डाक सेवकाची कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

विद्यार्थी मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही भारत सरकारच्या 100% इक्विटीसह दळणवळण मंत्रालयाच्या टपाल विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेली बँक होय.

या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्युटिव्ह म्हणून 344 जागांची भरती करण्यात येणार आहे.

पदाची जाहिरात क्रमांक – IPPB / CO / HR / RECT/ 2024 – 25 /03

पदासाठीच्या संपूर्ण जागा – 344 जागा.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.

पद क्रमांकपदाचे नावपदांची संख्या
1एक्झिक्युटिव्ह 344
संपूर्ण जागा344
पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे.
1) कोणत्याही शाखेचे पदवी आवश्यक. २) GDS म्हणून दोन वर्षांचा अनुभव.
पदासाठीची वयाची अट पुढील प्रमाणे..
1 सप्टेंबर 2024 रोजी 20 ते 35 वर्ष ( sc/ st – पाच वर्षे सूट , OBC – तीन वर्षे सूट )
पदासाठीचे नोकरीचे ठिकाण..
संपूर्ण भारत ( भारतात कोणत्याही ठिकाणी)
पदासाठी लागणारी फी
GENERAL /OBC /EWS – 1000 रुपये , SC/ST/ ExSM/ महिला – फी नाही.
पदासाठीच्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे31 ऑक्टोबर 2024

पदासाठीच्या महत्त्वाच्या लिंक्स पुढील प्रमाणे.

पदाची जाहिरात पीडीएफ (PDF) स्वरूपातDOWNLOAD PDF
ऑफिशिअल वेबसाईटCLICK HERE
पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकCLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया राज्यानुसार पदाच्या जागा.

अनुक्रमांकराज्यजागा
1अंदमान आणि निकोबार1
2आंध्र प्रदेश8
3अरुणाचल प्रदेश5
4आसाम16
5बिहार20
6चंदिगड2
7छत्तीसगड15
8दादरा आणि नगर हवेली1
9दिल्ली6
10गोवा1
11गुजरात29
12हरियाणा10
13हिमाचल प्रदेश10
14जम्मू आणि काश्मीर4
15झारखंड14
16कर्नाटक20
17केरळ4
18लडाख1
19लक्षदीप1
20मध्यप्रदेश20
21महाराष्ट्र19
22मणिपूर6
23मेघालय4
24मिझोरम3
25नागालँड3
26ओडिसा11
27पदुच्चेरी1
28पंजाब10
29राजस्थान17
30सिक्कीम1
31तमिळनाडू13
32तेलंगणा15
33त्रिपुरा4
34उत्तर प्रदेश36
35पश्चिम बंगाल13
संपूर्ण जागा344

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WHATS APP LINK TELEGRAM LINK

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया भूगोल हा विषय.

विद्यार्थी मित्रांनो जगातील 90% लोकसंख्या ही 30 टक्के भूभागावर वास्तव्यास आहे. तो उरलेला 70 टक्के भूभाग हा एक तर विरळ लोकसंख्येचा आहे किंवा तो भूभाग निर्जन स्वरूपाचा आहे.

आपल्या पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 30 टक्के हा जमिनीचा भाग म्हणजेच भूमी आहे. आणि हा भाग सुपीक मैदान व नदी खोऱ्यात भरलेला आहे. या ठिकाणी शेती करण्यास योग्य जमीन असल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या वास्तव्य करू लागली.

आता आपण देशानुसार त्यांची पिक भूमी आणि कुरणे, वने टक्केवारी मध्ये बघूया.

ऑस्ट्रेलिया – या देशात पीकभूमी म्हणजेच शेती उपयुक्त जमीन 6% इतकी आहे. आणि कुर्णांचा प्रदेश हा 56% आहे. आणि वनांनी आच्छादलेला प्रदेशात 14 टक्के आहे.

ब्राझील – ब्राझील देशात पिक भूमी म्हणजेच शेती उपयुक्त जमीन ही 9 टक्के आहे. कुर्णांचा प्रदेश हा 20 टक्के इतका आहे. आणि वनांनी आच्छादलेला प्रदेश 66% इतका आहे.

कॅनडा – कॅनडा या देशातील एक भूमी ही 5 टक्के इतके आहे. कूर्णांचा प्रदेश हा 4 टक्के इतका आहे. वनांनी आच्छादलेला प्रदेश हा 39% इतका आहे.

चीन – चीन देशात दहा टक्के जमीन ही पीकभूमीसाठी उपयोगात आणली जाते. आणि कुर्णांसाठी 34% इतके क्षेत्रफळ देत आहे.

भारत – भारत या देशात पिक भूमी म्हणजेच शेती युक्त जमीन ही सर्वात जास्त म्हणजेच 57% इतके आहे. आणि कूर्णांसाठी प्रदेश हा
4 टक्के इतका आहे. वनांसाठी भारतात 22 टक्के क्षेत्रफळ आहे.

जपान – जपान या देशात पिक भूमी ही 12 टक्के इतके आहे. कुरूनांसाठी सर्वात कमी जागा तेथे म्हणजेच 2 टक्के इतकी जागा आहे. आणि वनांनी आच्छादलेला प्रदेश हा सर्वात जास्त म्हणजे 67% आहे.

रशिया – या देशात ही भूमी म्हणजे शेतीउयुक्त जमीन हे 8 टक्के इतकी आहे. आणि कुरणे ही 5 टक्के क्षेत्रफळात आहे. वनांसाठी क्षेत्रफळ 44% इतके आहे.

यु. के. – युनायटेड किंगडम येथे पीक भूमी 29 टक्के इतके आहे. तेथे कुरणे 46% इतक्या क्षेत्रफळावर आहे. आणि वनांनी आच्छादलेला प्रदेश हा 10 टक्के इतका आहे.

विद्यार्थी मित्रांनो वाढत्या लोकसंख्येने आणि तसेच भूमीची वाढती मागणी यामुळे वन भूमी आणि कृषी भूमीचा खूप मोठ्या प्रमाणात नाश झालेला दिसून येत आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया भूस्खलन म्हणजे नेमकं काय.

सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर डोंगरावरून उतारावरून पडणारी माती किंवा खडक खूप मोठ्या प्रमाणात जमिनीवर येणे. हे कशामुळे घडते तर मोठा भूकंप , पूर , आणि ज्वालामुखी. भूस्खलन सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती यात मोडली जाते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया मृदा अवनती.

पाचळण – पाचळन म्हणजे वनस्पतींच्या मधील मोकळी जमीन ही जैविक पदार्थांनी झाकले जाते त्यामुळे तेथे ओलावाट खूप मोठ्या प्रमाणात टिकून राहतो यालाच पाचळन असे म्हणतात.

दगडी बांध – दगडी बांध हे उतारावरून वाहून जाणाऱ्या पाणी रोखण्यासाठी बनवले जाते. यामुळे मृदा वाहून जात नाही व मृदेचा ऱ्हास होत नाही.

contour बॅरियर – हे बॅरियर बनवण्यासाठी दगड, गवत, मातीचा उपयोग केला जातो. त्यामुळे सुद्धा मृदा ऱ्हास होण्यास आळा बसतो.

टेरेस फार्मिंग – टेरेस फार्मिंग हे डोंगर उतारावर बनवले जाते. त्यामुळे डोंगर उतारावर लागवडीसाठी सपाट जमीन जागा उपलब्ध होते. यामुळे सुद्धा मृदा वाहून जाण्यास आळा बसतो.

आंतरपिके – शेतात एकाच वेळी दोन किंवा तीन प्रकारचे पीक लावले जाते त्यालाच आंतरपिके म्हटले जातात. या आंतरपीक लागवडीमुळे पर्जन्यापासून म्हणजेच पावसापासून मृदेला वाहून जाण्यापासून वाचवता येते.

शेल्टर बेल्ट – शेल्टर बेल्ट म्हणजे वृक्ष समुद्रकिनारी व शुष्क प्रदेशात लावले जातात. यामुळे वाराच्या गतीमुळे होणारे मृदा अवनती रोखल्या जाते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया जंगलातील वनवा म्हणजेच आग कशाप्रकारे लागते.
जंगलात आग ही आकाशा तील विजानमुळे सुद्धा लागू शकते तिलाच नैसर्गिक आग सुद्धा म्हणतात.

जंगलात माणसाचे अस्तित्व आधीपासून आहे, त्यामुळे मानवाच्या निष्काळजीपणामुळे सुद्धा जंगलात आग लागू शकते. व त्या आगीमुळे रुद्ररूप धारण होते, आणि जंगलाला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

जंगलाच्या बाजूला असणारे गाव किंवा शहरे यातील रहिवासी लोक हे विकृत बुद्धीचा उपयोग करून विनाकारण जंगलात आग लावतात त्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आग लागून सर्वात जंगल खाक होण्याचे संभावना खूप मोठी असते.

या वणव्यावर नियंत्रण आपण कसे मिळवू शकतो ते आपण पुढे बघूया.

आजूबाजूच्या गावातील लोकांना शिक्षणाद्वारे प्रबोधन करून त्यांना समज देऊन आग लावण्यापासून रोखणे.

परीक्षण केंद्र व गस्त यांच्या समन्वयाने तसेच उत्कृष्ट संचार जाळी चा वापर करून आग लागण्यापासून थांबवू शकतो.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया भारताबद्दल माहिती.

इंदिरा पॉईंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे, ते 6°45′ उत्तर अक्षवृत्तावर आहे.

आता आपण बघूया हिमालय बद्दल माहिती.

हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे हिमालय हा अर्वाचित वाली पर्वत आहे. हिमालयाची शिवालीक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे व ती सर्वात नवीन पर्वतरांग आहे.

अरवली पर्वताचा पूर्वेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्याचा भाग असून तो भाग गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया सुंदरबन प्रदेश. पश्चिम बंगालच्या राज्यांचा बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश म्हणजे सुंदरबन होय.

हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.

थरचे वाळवंट / मरुस्थळी वाळवंट हे उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात आहे.

पंजाब मैदानाचा उतार पश्चिमेकडे आहे. येथे जागा शेती उपयुक्त असल्याने येथे शेती व्यवसाय आहेत खूप मोठ्या प्रमाणात चालतो.

जम्मू काश्मीर राज्यातून वाहणाऱ्या नद्या पुढील प्रमाणे.

सिंधू नदी व तिच्या तीन उपनद्या झेलम, चिनाब, रावी, बियास या आहेत.

सिंधूची उपनदी सतलज आहे. ती मान सरोवराजवळ उगम पावते.

सतलज ही पश्चिमेकडे वाहते. या नदीच्या गाळाच्या संचयनातून पंजाबाचे मैदान तयार झाले आहे.

भारतातून सिंधू नदी पुढे पाकिस्तानला जाते आणि नंतर अरबी समुद्रास मिळते.

हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून गंगा नदी उगम पावते. हिमालयाचा मैदानी प्रदेश ओलांडून ती पूर्ववाहिनी नदी बनते. यमुना हे यमुनोत्री येथे उगम पावते हे गंगेची एक प्रमुख उपनदी आहे.

बृहद हे गंगेचे एक मोठे उपनदी आहे व ती हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते. ही नदी हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. हिमालयातून वाहत जाऊन तिला त्सांग पो नावाने ओळखले जाते.

तिच्या हिमालय ओलांडणाऱ्या प्रवाहास दिहांग असे म्हणतात.

जी नदी पूर्वेकडे वाहते तिला ब्रह्मपुत्रा नदी असे म्हणतात. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात गंगेत जाऊन मिळते.

गंगेला येऊन मिळणाऱ्या नद्या पुढील प्रमाणे.

चंबळ, केन, बेटवा आणि शोन या आहेत.

उत्तर गुजरात मधील खंबातच्या आखातात मिळणाऱ्या नद्या पुढील प्रमाणे – तापी, नर्मदा, मही व साबरमती या आहेत.

ईशान्य नैऋत्येला वाहणारी नदी महानदी आहे.

साबरमती ही उत्तर दक्षिण वाहते ती अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावली आहे.

लोणी नदी ही अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी नदी आहे. ही नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते.

पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर उगम होणाऱ्या नद्या पुढील प्रमाणे-

गोदावरी, कृष्णा व कावेरी या तीन नद्या आहेत.

पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने गोदावरी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे नदी आहे. गोदावरीच्या दक्षिणेत कृष्णा नदीचे खोरे आहे.

कृष्णा नदीच्या उपनद्या पुढील प्रमाणे –

भीमा व तुंगभद्रा या उपनद्या आहेत.

कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहणारे नदी कावेरी नदी आहे.

या नदीचा जलसिंचनासाठी उपयोग केला जातो.

फार पूर्वीपासून नदीकिनारी किंवा नदीच्या खोऱ्यात मानव वस्ती राहू लागली. कारण तिथे शेतीयुक्त जमीन मानवांच्या प्रगतीसाठी योग्य ठरली.