NTRO BHARTI राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत 75 जागांसाठी भरती. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन.

NATIONAL TECHNICAL RESEARCH ORGANISATION RECRUITMENT 2024.

मित्रांनो राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था बद्दल आपण आता पहिले माहिती जाणून घेऊया. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन ही भारताच्या पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या अधीन तांत्रिक गुप्तचर संस्था आहे.

एन.टी.आर.ओ या संस्थेची स्थापना 2004 साली झाली.

या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे “आ ना भद्रा: क्रतवो यंतू विश्वस्त”

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन ची हेडकॉटर हे दिल्ली येथे आहे.

या संस्थेचे अध्यक्ष अरुण सिन्हा हे आहेत.

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनचे ध्येय हे आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तांत्रिक माहिती गोळा करणे आणि पुरविणे हे आहे.

ही 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्ध दरम्यान अधोरेखित झालेल्या गुप्तचर कमतरते ला प्रतीसाद म्हणून या NTRO ची स्थापना करण्यात आली.

गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी विशेष तांत्रिकी शाखा स्थापन करणे हे गरजेचे वाटू लागले. तेव्हा तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गटाने या ऑर्गनायझेशन ची शिफारस केली.

तेव्हा वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी तयार केलेल्या आराखड्या अनुसार ही शिफारस करण्यात आली होती.

या शिफारशीला मान्यता म्हणजेच एजन्सीला मान्यता ऑक्टोबर 2004 वर्षे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने अधिकृतरित्या मान्यता दिली.

या संस्थेत “SCIENTIST B” या पदासाठी जाहिरात निघालेली आहे.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.

पद क्रमांकपदाचे नावपदांची संख्या
1SCIENTIST B75
एकूण पदे75

या जागेसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे.

1) प्रथम श्रेणी MSC (एम.ए.ससी) ( electronics/ electronics and computer science/ applied electronics/ radio physics and electronics / geo – informatic / remote sensing and geo informatics / mathematic / applied mathematics / mathematics and computing / mathematical science ) किंवा प्रथम श्रेणी bachelor of engineering / B.tech ( electronics / electronics communication and instrumentation / electronics and communication / electronics and power/ tele communication / electronics and telecommunication / information and communication / communication optics / opto electronics / electrical )

एम.एस.सी ( इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / रेडिओ फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स / geo – इन्फॉर्मेटिक / रिमोट सेन्सिंग आणि geo इन्फॉर्मेटिक / मॅथेमॅटिक्स / अप्लाईड मॅथेमॅटिक्स /मॅथेमॅटिक्स आणि कॉम्प्युटर / मॅथेमॅटिकल सायन्स ) किंवा प्रथम श्रेणी बॅचलर ऑफ इंजीनियरिंग /बी टेक ( इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स कमुनिकेशन आणि इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि पावर / टेले कम्युनिकेशन / इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन / कम्युनिकेशन ऑप्टिक्स / opto इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल.
2) GATE 2022/ 2023 / 2024.

“सायंटिस्ट B” या पदासाठी लागणारी वयाची अट पुढीलप्रमाणे

8 नोव्हेंबर 2024 रोजी 30 तीस वर्षांपर्यंत ( SC / ST – 5 वर्ष सूट )

“सायंटिस्ट B” या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (भारतात कुठे ही)

या पदासाठी लागणारी परीक्षा फी पुढील प्रमाणे

General/ obc / Ews – 250 रुपये. ( SC /ST / PWD / महिला – यांच्यासाठी फी नाही.

“सायंटिस्ट B” या पदासाठीच्या महत्त्वाच्या तारखा पुढील प्रमाणे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 8 नोव्हेंबर 2024.

“सायंटिस्ट B” या पदासाठीच्या महत्त्वाच्या लिंक्स पुढील प्रमाणे

या पदासाठी ची जाहिरात PDF स्वरूपात बघण्यासाठी येथे क्लिक कराCLICK HERE

या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा CLICK HERE

ऑफिशियल वेबसाइट साठी येथे क्लिक करा CLICK HERE

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

WHATS APP GROUP TELEGRAM LINK

मित्रांनो नेहमीप्रमाणे आमची टीम तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन येत आहे. आज हा मी एक आगळावेगळा टॉपिक तुमच्यासाठी एक घेऊन येत आहे. चला तर मग सुरु करूया.

विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले आपण घेऊया अश्मयुग यालाच इंग्रजी मधून stone age असे म्हणतात. मानव निर्मितीच्या भौतिक विकासामध्ये अश्मयुग खूप महत्त्वाचे ठरले आहे. अश्म म्हणजे दगड आणि या दगडाचे या विभागात खूप महत्त्व होते.

सुरुवातीच्या काळात मानवाने अन्न गोळा करण्यासाठी दगडाचा मुख्यतः उपयोग केला. त्याने या दगडाचा उपयोग करून आपल्या संरक्षणासाठी निवारा सुद्धा बनवला. आणि संरक्षणासाठी सुद्धा त्या मानवाने दगडांपासून हत्यारे सुध्धा निर्माण केली. त्याला इतकी समज निर्माण झाली होती की त्याने या दगडावरच कोरीव काम करून कलेचा आविष्कार केला आणि या दगडाद्वारेच त्याने अग्नीची निर्मिती सुद्धा केली.

दगडाचा वापर या कालखंडात जास्त झाल्यामुळे या कालखंडाला अश्मयुग असे म्हणतात.

भारतात एका रॉबर्ट ब्रूस फुट या भूतत्व विद्वानाला मद्रास जवळील पर्यावरण येथे सर्वात पहिले पुरानाश्मयुगात तील पाषानो पकरण सापडल्यावर त्याला दिसून आले की अश्मयुगीन काळातही भारतात लोकवस्ती होती.

आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी उत्खननाद्वारे सापडलेल्या हत्यारांमुळे अश्मयुगाचे तीन खंडात विभागणी करण्यात आली.

ती विभागणी आपण पुढील प्रमाणे बघूया-

१) पुराश्मयुग यालाच इंग्रजीमध्ये palaeolithic age असे म्हणतात.

या युगातील मानवाचे वैशिष्टे कसे होते ते आपण पुढील प्रमाणे बघूया.

१) या युगातील मानवाचे जीवन भटक्या स्वरूपाचे होते. हे मानव एका जागी स्थिर नसायचे. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना जागोजागी, जंगलो जंगली भटकावे लागत असे.

२) या युगातील माणूस हा आपल्या बचावासाठी नैसर्गिक गुहा व मोठ्या मोठ्या शीळांचा आश्रय घेत असे. त्यामुळे त्याला थंडी पाऊस व हिंस्र प्राणी या सर्वांपासून संरक्षण मिळत असे.

३) या युगातील या काळातील मानव हत्यारांच्या वापर करून जमिनीत गड्डे करून त्यातून कंदमुळे काढून खात असे. तसेच त्या काळातील मानव हे माणसाहारी होते व ते प्राण्यांचे कच्चे मांस खात असे.

४) या पुराश्मयुगीन मानवास अंगावर घालण्यासाठी कपड्यांचे पोशाख माहीत नव्हते. त्यामुळे ते ऊन वारा पाऊस यांपासून वाचण्यासाठी जंगलातील झाडांच्या साली तसेच प्राण्यांच्या कातड्यानी आपले शरीर संरक्षित करत व झाकत असे.

५) या पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष या सापडलेल्या उत्खननातून मिळालेले नाहीत.

६) या युगातील मानव पोट भरण्यासाठी शिकार करण्याचे व त्यासाठी ते ओबड धोबड आकाराचे व मोठ मोठ्या दगडांचा वापर करत असत.

७) पुराश्मयुगातील हत्यारे हे खडकांपासून बनवलेले असतात ते खडक पुढील प्रमाणे – अगेट, चर्ट, टफ , डोलेराईट , बेसाल्ट इत्यादी खडकांपासून बनवलेले असत.

८) महाराष्ट्रात पुराश्मयुगीन अवशेष पुढील ठिकाणी प्राप्त झाले – महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील कुंभार पाडा व उमरज आणि धुळे जिल्ह्यातील भाडणे या ठिकाणी सापडून आले.

९) या उत्खननामध्ये हत्यारांमध्ये बऱ्याच गोष्टी सापडून आल्या त्या पुढील प्रमाणे – वेधण्या, हात कुऱ्हाडी, तासण्या या सर्व हत्यारांचा त्यात समावेश आहे.

मित्रांनो आपण आता पाहिले पुराश्मयुग. या युगानंतर जो युग सुरू होतो त्याचे नाव आहे मध्याश्मयुग. या मध्याश्मयुगालाच इंग्रजीमध्ये mesolithic Age असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मध्याश्मयुगाबद्दल.

2) मध्याश्मयुग.

विद्यार्थी मित्रांनो मध्याश्मयुगातील मानवाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आपण बघूया.

१) मध्याश्मयुगात हवा उबदार होती तर पुराश्मयुगीन हवा खूप थंड होती. या बदलामुळे मानवाला शिकारीच्या तंत्रज्ञानात बदल करावा लागला कारण पुराश्मयुगात हत्तीसारखे मोठे प्राणी होते आणि आता हवामान उबदार असल्यामुळे मध्याश्मयुगात चपळ व लहान प्राणी अस्तित्वात आले.
यामुळेच मानवाला त्याच्या तंत्रातही बदल करावा लागला.
त्यामुळे त्यांनी सूक्ष्म हत्यारांचा वापर करण्यास सुरुवात केली. यालाच सूक्ष्मास्रे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो हीच सूक्ष्मास्रे मध्याश्मयुगाची वैशिष्ट्य मानले जातात.

२) उबदार हवामाना मुळे प्राणी सुद्धा लहान होते आणि चपळ होते त्यामुळे या काळातील हत्यारे हात कुऱ्हाडी , वेधन्या, तासन्या, तिराग्रे , टोकदार अशा हत्यारांचा वापर केला गेला. 

३) मित्रांनो आपण पाहिल्याप्रमाणे पुराश्मयुगात शेतीचा शोध नव्हता. परंतु या मध्याश्म युगात शेवटच्या काळात शेतीचा शोध लागला असे दिसून येते.

४) पुराश्मयुगात मानव दगडांच्या साहाय्याने आपल्या अन्न इत्यादी गोष्टी संरक्षित करत होता परंतु आता मध्याश्मयुगात मानवाला मृद भांड बनवण्याची कला अवगत झाली.

५) या काळातील मानव बऱ्यापैकी विकसित झाला होता तो पशुपालन सुद्धा करू लागला होता. तसेच या काळात मानवाला अग्नीचा सुद्धा शोध लागला.

६) मागच्या काळातील हत्यारे आपण बघितली परंतु या काळातील हत्यारांसाठी वेगवेगळ्या दगडांचा वापर करू लागले. ती हत्यारे कोणत्या दगडांपासून बनवले होते ते आपण पुढील प्रमाणे बघूया.

जस्पर, चर्ट, एगट, अशा दगडांपासून मध्याश्मयुगातील मानव हत्यारे बनवू लागला.

७) या मध्याश्मयुगात मानवाला एक कला अवगत झाली होती ती म्हणजे टोळी करून राहणे. टोळी करून राहण्यामुळे मानव हा स्वतःला संरक्षित सुद्धा करू लागला व शिकारीसाठी ही त्याला या टोळीचा फायदा होऊ लागला.

८) या काळात बऱ्याच प्राण्यांची शिकार केले जाई त्यात काही प्राणी पुढील प्रमाणे- शेळी, घोडा, गाय, बैल , बैल, म्हैस , मेंढी या प्राण्यांची शिकार केली जाई. 

९) या मध्याशम युगातील मानवाला त्याच्या मरणोत्तर जीवनावर विश्वास असल्याचे दिसून आलेले आहे. कारण पूरलेल्या मृतदेहा जवळ काही वापरातील भांडी व हत्यारे दिसून आलेले आहेत.

मित्रांनो आपण बघितलं पुराश्मयुग, मध्याश्मयुग.

आता आपण बघूया नवाश्मयुग.

१) नवाश्मयुग हा खूप प्रगत युग होता. या युगातील मानव शेती करण्यात खूप प्रगत झाला होता. शेतीमध्ये वापरण्यात येणारे नांगर हे दगडाद्वारे बनवले गेले होते. तसेच शेतीसाठी लागणारे विविध प्रकारची हत्यारे, अवजारे साधने बनवण्याचे तंत्र या काळातील मानवाला अवगत झाले होते.

२) या युगातील मानवाने अन्न साठवण्यासाठी वापर करण्यास सुरू केले.

३) नवाश्मयुग हे एक गतिमान योग झाले होते कारण त्या काळात कुंभाराच्या चाकाचा शोध लागला होता.

४) या युगातील मानव शेतीमुळे गावाची निर्मिती करून मनुष्य जीवनात स्थैर्य प्राप्त करून गावातच राहू लागला.

५) शेती करण्यात यशस्विता प्राप्त केल्यामुळे नवाश्मयुगातील मानव हा कापसा द्वारे बनवलेल्या लोकरीद्वारे कापड विनण्याचे ज्ञान प्राप्त करून कापड बनवू लागला. तसेच त्याने झाडांच्या साली आणि कातडी वस्त्र सुद्धा परिधान करणे चालू ठेवले.

६) या नवाश्म युगातील काळातील घरे दगड मातीची बनलेली होती तसेच लाकडाची सुद्धा बनलेली होती. तसेच या काळातील लोक झोपडी बांधून सुद्धा राहत होते. खेड्यातील घरातील अवशेष बऱ्याच ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत.

७) नवाश्मयुगातील मानव हा खूप प्रगत झालेला दिसून येतो. कारण हा मानव मूर्ती पूजक सुद्धा होता.

मित्रांनो मानव हा युगांद्वारे कसा प्रगत होत गेला हे आपण पाहिले. या पृथ्वीतलावर माणूस हा असा एक प्राणी आहे जो स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकला. इतिहासामुळे माणूस बराच प्रगत झाला. इतिहासातील केलेल्या चुकांमुळे भविष्यात त्याने स्वतःचा उद्धार करून घेतला. मानवाला तसा इतिहास खूप महत्त्वाचा असतो. त्यातून तो चांगल्या गोष्टी शिकतो तसेच तो वाईट गोष्टी शिकतो. ते मानवावर डिपेंड करते की तो त्याचे व्यक्तिमत्व कसे खुलावतो.

मित्रांनो आपण आता बघूया कार्बन 14 पद्धती.

मित्रांनो हे पद्धत पुरातत्त्व पुराव्यांचे कालमापन करण्यासाठी उपयोगात आणली जाते. कार्बन 14 ही पद्धत F. W. Libi या शास्त्रज्ञाने 1949 साली शोधून काढली. कामासाठी त्यांना रसायन शास्त्राचे नोबल पारितोषिक सुद्धा देण्यात आले आहे.

मानव, वनस्पती, प्राणी हे जिवंत असताना आपल्या शरीरात श्वासाद्वारे कार्बन डाय-ऑक्साइड सुद्धा शरीरात घेतात. त्यांच्या माहितीनुसार सर्व सजीवांमध्ये कार्बन 14 चे प्रमाण एकच असते. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अवशेषातून कार्बन 14 बाहेर पडतो. त्यांच्या मते जिवंतपणे असलेला कार्बन 14 चा अर्धा भाग मृत्यूनंतर 5568 वर्षांनी नाहीसा होतो. याच कालावधीला कार्बन 14 चे आयुष्य म्हणतात.

प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला तर याच पद्धतीनुसार कार्बनच्या किरनोत्सर्जनाची तुलना केली असता प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला आहे हे निश्चित ठरवता येते.